NANDINI DESHMUKH

About Author

Birth Date : 22/07/1952




शिक्षण : एम.ए.बी.एड. निवृत्त वरिष्ठ लेखाधिकारी, भारत संचार निगम लिमिटेड, मुंबई लहानपणापासूनच लेखनाची आणि वाचनाची आवड. १९७७-७८ पासून लेखनास प्रारंभ. अनेक मासिकांमधून कथालेखन. औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावरून नभोनाट्य आणि ऐतिहासिक लेखन प्रसारित. कथाश्री, आवाज, मोहिनी, कालनिर्णय, स्नेहप्रभा इ. दिवाळी अंकांमधून कथा प्रसिद्ध. इ-साहित्य.कॉमवर पुस्तके प्रसिद्ध. ‘सकाळ’ कथा विशेषांक २००९ मध्ये ‘प्रमोशन’ या कथेला प्रथम पारितोषिक. ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’मधून लेखन. दैनिक प्रजावाणी नांदेड, दैनिक उद्याचा मराठवाडा, नांदेड या वर्तमानपत्रांमधून सदर लेखन. महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद, नांदेड शाखे तर्फे ‘अनुवंश’ आणि ‘मी रचना देसाई’ या नाटकांचे प्रयोग. कामगार कल्याण मंडळ स्पर्धेत ‘तुमच्यासारख्या तुम्हीच’ या एकांकिकेला प्रथम पारितोषिक. २००४ मध्ये ‘औट घटकेची राणी’ ही कादंबरी आणि निरनिराळ्या मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या कथांचा ‘कुंपणाच्या पलीकडे’ हा कथासंग्रह २०१० मध्ये प्रकाशित.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
KANDYACHA VANDHA Rating Star
Add To Cart INR 200
VADACHYA ZADAKHALI ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.