* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DID YOU KNOW THERE WAS A TIME WHEN BEARS SPOKE, THE MOON LAUGHED AND BABIES WERE FOUND INSIDE FISH? HAVE YOU HEARD OF THE TWO-HORNED SAGE WHO HAD NEVER SEEN A WOMAN IN HIS LIFE? DID YOU KNOW RAVANA`S HALF-BROTHER WAS THE GOD OF WEALTH? HAVE YOU EVER SEEN A MAN WITH A THOUSAND ARMS? THE TALES IN THIS COLLECTION SURROUND THE TWO MOST POPULAR AVATARS OF LORD VISHNU-RAMA AND KRISHNA-AND THEIR LINEAGE. COUNTLESS STORIES ABOUT THE TWO ABOUND, YET MOST ARE SIMPLY DISAPPEARING FROM THE HEARTS AND MINDS OF THE PRESENT GENERATION. BESTSELLING AUTHOR SUDHA MURTY TAKES YOU ON AN ARRESTING TOUR, ALL THE WHILE TELLING YOU OF THE DAYS WHEN DEMONS AND GODS WALKED ALONGSIDE HUMANS, ANIMALS COULD TALK AND GODS GRANTED THE MOST GLORIOUS BOONS TO COMMON PEOPLE.
रामाच्या सूर्यवंशातील दिलीप राजाला देवांनी तू काही काळ निपुत्रिक होशील असा शाप दिला होता...कशामुळे मिळाला होता त्याला शाप?...कसा दूर झाला तो शाप?...समुद्राची निर्मिती कशी झाली...रावणाला चार जणांकडून कोणते चार शाप मिळाले होते...विजयादशमीला आपण सोनं का लुटतो...कसं झालं राम-लक्ष्मण-भरत-शत्रु्घ्न यांचं महानिर्वाण...चंद्रवंशाचे दोन भाग कसे झाले...शबरासुराने कृष्णाचा पुत्र प्रद्युम्नाला समुद्रात फेकून दिलं...तरी तो वाढत होता शबरासुराच्या महालात...कसा? बाणासुराची रूपवती कन्या उषा हिच्या स्वप्नात एक देखणा तरुण रोज येतो आणि स्वप्नातच ती त्याच्याशी विवाह करते... कोण असतो तो तरुण?...सत्यवती अंध भिकारी असलेल्या वर्धनशी लग्न का करते?...तिला वैभव कसं प्राप्त होतं?...उदंक ऋषींना श्रीकृष्ण काय वर देतो...श्रीकृष्णाची महानिर्वाणाकडे वाटचाल कशी होते...हे जाणून घेण्यासाठी वाचा रामायणातील आणि महाभारतातील असंख्य कथांनी-उपकथानकांनी सजलेला वाचनीय कथासंग्रह ‘त्रिशंकू.’

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarPramod Shinde

    खुप वाचनीय पुस्तक

  • Rating StarDivya Marathi 14.12.19

    मिथक कथांचा तपशीलवार वर्णनात्मक आढावा असणाऱ्या कथा... श्रीराम आणि श्रीकृष्ण ही भारतीयांची आराध्य दैवतं. या दोघांच्या कथा सगळ्यांना माहीत असल्या तरी त्यातील काही उपकथानकं किंवा आख्यायिका सगळ्यांना माहीत नसतात किंवा त्यातील बारीकसारीक तपशील माहीत नसता. तर या दोन्ही दैवतांच्या कथा त्या कथांमधील उपकथानकांसह, आख्यायिकांसह सुधा मूर्ती यांनी त्यांच्या `द अपसाइड डाउन किंग` या पुस्तकातून समोर आणल्या आहेत. राम ज्या वंशात जन्मला त्या सूर्यवंशातील दिलीप राजाची कथा यात अंतर्भूत आहे. दिलीप राजाने कामधेनूकडे दुर्लक्ष केलं म्हणून देवांनी त्याला शाप दिला, की जोपर्यंत तुला गायीचं महत्त्व कळणार नाही, तोपर्यंत तू निपुत्रिक राहशील. त्यानंतर वसिष्ठ मुनींनी त्याला नंदिनी नावाची गाय भेट म्हणून दिली. दिलीप राजाने आपल्या राज्याचा त्याग करून पत्नीसह नंदिनीची खूप सेवा केली आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. मुलाचं नाव ठेवलं रघू. रघू पराक्रमी होता. त्याने वडिलांचं राज्य परत मिळवलं. रघूने सूर्यवंशाचं नाव इतकं उज्ज्वल केलं, की सूर्यवंश रघुवंश म्हणून ओळखला जाऊ लागला. अज हा रघूचा मुलगा, त्याच्याबाबतीतलं छोटंसं कथानक, अजाचा मुलगा दशरथ याचा उल्लेख, अशा रीतीने सूर्यवंशाची वंशावळ कथाभागासह समजते. मनोहर या वाटमाऱ्याची कथा यात आहे. वाटमाऱ्याचा वाल्मीकी कसा झाला, हा कथाभाग त्यात येतो. ईक्ष्वाकु वंशाचा बहू राजा, त्याला राज्य गमावून आपल्या दोन राण्यांसह भार्गव ऋषींच्या आश्रमात घ्यावा लागलेला आश्रय. तिथे त्याच्या मुलाचा सगराचा झालेला जन्म, सगराने वडिलांचं राज्य परत मिळविणे, सगराच्या दोन राण्या, त्यातील एकीला साठ हजार पुत्रांची झालेली प्राप्ती, त्यांनी सुमद्राची केलेली निर्मिती इ. कथाभाग बहू राजाच्या कथेत येतो. वसिष्ठ मुनींचा निमी राजावर झालेला रोष आणि त्याने त्यांच्याकडे मागितलेला वर याची कथा, भगिरथाने गंगेला पृथ्वीवर का आणि कसं आणलं ही कथा, सत्यव्रत त्रिशंकू का झाला, हरिश्चंद्राला किती दिव्यांमधून जावं लागलं, कौशेट्याच्या कथेचा विजयादशमीच्या सोनं लुटण्याशी असलेला संबंध, रावणाच्या जन्माची, त्याच्या विवाहाची, त्याला मिळालेल्या चार शापांची, त्याला शंकराकडून मिळालेल्या आत्मलिंगाची, रावणाच्या भावांची इ. रावणाशी संबंधित कथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. हनुमानाशी संबंधित कथा, सीतेने दशरथासाठी केलेलं वाळूचं पिंडदान, राम-लक्ष्मण भरत-शत्रुघ्न यांचं महानिर्वाण इ. रामायणातील अनेक कथांचा समावेश या पुस्तकात केला गेला आहे. महाभारतातील कथांची सुरुवात होते चंद्रवंशापासून. या वंशातील राजा ययातीच्या कथेत चंद्रवंशाचे पुरुवंश आणि यदुवंश असे दोन भाग कसे झाले, हा कथाभाग येतो. कृष्णाशी संबंधित अनेक कथा यात आहेत. त्यात स्यमंतक मण्याची कथा आहे. त्या कथेतच सत्यभामा आणि जांबुवंतीशी कृष्णाच्या झालेल्या विवाहाचं उपकथानक आहे. कृष्णाचे शत्रू, त्याला झालेली अश्व आणि रथाची, शंखाची प्राप्ती, नरकासुर वध, कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न आणि शबरासुराची कथा, प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध आणि बाणासुराची कन्या उषा यांची प्रेमकथा, कृष्णाच्या राण्यांची कथा, वर्धन आणि सत्यवतीची कथा, साडेतीन रत्नांची कथा, गया राक्षसाची, उंदक ऋषींची कथा आणि कृष्णाच्या अंताची कथा इ. उपकथानकांसह, अाख्यायिकांसह या पुस्तकात अंतर्भूत केल्या अाहेत. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या घटना अापल्या देशात काेणत्या भागात घडल्या अाणि अाता ताे प्रदेश काेणत्या नावानं अाेळखला जाताे, या विषयीही या पुस्तकातून माहिती मिळते. जसे गया राज्याच्या बलदंड व विस्तृृत छातीवरच युद्ध झाल्याने त्याला मरण पत्करावे लागले; पण जेथे हे युद्ध घडले, ती जागा बिहार राज्यातील गया नावानेच प्रसिद्ध आहे. आजही तेथे मृत्यूनंतरचे संस्कार केल्याने मोक्ष मिळतो असे म्हणतात. कर्नाटकातील गोकर्ण येथे रावणाने आत्मलिंग जमिनीवर ठेवल्याचा प्रसंग घडला व ते रावणाने तेथून उचलण्याच्या प्रयत्नांत ओढले गेल्याने गाईच्या कानासारखा आकार प्राप्त झाल्याचे आजही पहायला मिळते. असे अनेक संदर्भ या कथांच्या अनुषंगाने आपल्यासमोर येतात. महत्त्वाच्या घटनांच्या अपरिहार्यतेला कारणीभूत ठरलेले प्रसंग उदा. रावणाला चार प्रसंगांत चार जणांकडून शाप मिळाला. त्या चार शापांचं फलित होतं, त्याचा रामाकडून झालेला वध. हनुमानाचं पाताळात जाणं, राम काळाशी बोलत असताना व्यत्यय न आणण्याची अगदी महत्त्वाची सूचना लक्ष्मणाला दिलेली असताना दुर्वासांचं तिथं येणं, लक्ष्मणाला राम आणि काळ यांच्या संभाषणात व्यत्यय आणणं भाग पाडणं, या प्रसंगांची परिणती राम आणि लक्ष्मणाच्या मृत्यूच्या अटळतेत होते. तेव्हा एकमेकींमध्ये गुंफलेल्या या कथारूपी कड्या वाचकाला गुंतवून ठेवतात आणि त्याचं रंजनही करतात. राम आणि कृष्ण हे देव असूनही मानव जन्मात त्यांना जे दुःख भोगावं लागलं, ते त्यांनी धीरोदात्तपणे भोगलं. त्यामुळे माणसाने दुःख भोगताना मनाचा तोल सांभाळला पाहिजे, असा संदेश या कथांमधून मिळतो; तसेच वाईट गोष्टीचे फळ वाईट मिळते आणि चांगल्या गोष्टीचे फळ चांगले मिळते, असाही एक संदेश या कथांमधून अधोरेखित होतो. सुधा मूर्तींच्या मूळ रसाळ कथनाचा ओघ लीना सोहोनींनी मराठीतही कायम ठेवल्याने वाचक पुस्तक वाचून पूर्ण केल्यावरच खाली ठेवतो. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 07-04-2019

    विस्मृतीत गेलेल्या कथांची ओळख... प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांच्या ‘द अपसाइड डाऊन किंग’ या पुस्तकाचा ‘त्रिशंकू’ हा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला असून, यात राम आणि कृष्ण यांच्या अप्रचलित कथा आहेत. राम आणि कृष्ण हे विष्णूचे मनु्यरूपात प्रकट झालेले दोन अवतार. या दोन अवतारांना लोकजीवनात फार मोठे स्थान असून, त्यांच्या भरपूर प्रचलित कथा आपल्याला माहीत असतात. आपण त्या वाचलेल्या व ऐकलेल्या असतात. पण लेखिका सुधा मूर्ती यांनी विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या कथांची या पुस्तकातून ओळख करून दिली आहे. राम आणि कृष्ण यांच्याकडे केवळ देव म्हणून न पाहता त्यांच्यातील माणूसपण कसं होतं, या दृष्टिकोनातून त्यांच्यावर प्रकाश टाकला आहे. यात रामाच्या पंधरा तर कृष्णाच्या दहा कथा आहेत. या सर्व सुरस कथा वाचताना नव्याने वाचल्याचा अनुभव येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर