* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BEANS IN A FARM. SHANKAR PATIL`S STORIES ARE A TREASURE OF MARATHI LITERATURE. HE HAS A VERY UNCOUTH MIND. HE DOES NOT INTEND TO EXPOSE THE RURAL LIFE TO GAIN POPULARITY. HE DOES NOT WRITE JUST WITH THE URBAN READERS IN HIS MIND. HE WRITES TO FIND HIMSELF IN THE WORDS, IN THE INCIDENCES, IN THE STORIES. HE HAS RECOGNIZED THE VALUE OF STORY WRITING, HE UNDERSTANDS THAT WRITING IS A MEAN TO FIND THE TRUE SOUL. HE STARTED HIS JOURNEY AS A STORY WRITER IN 1950. THE RURAL MIND AND SOUL LIVES IN A SOCIETY, YET THE SOCIETY FAILS TO INCULCATE THE VALUES LIKE FREEDOM, EQUALITY; THIS IS WHAT HE ALWAYS REGRETS. PATIL HAS MORE FAITH ON TRANSMOGRIFICATION THAN TRADITIONS. HE REALIZES THE PROBLEMS OF RURALITES, HE DOES NOT AIM AT ENTERTAINING, BUT WRITES OUT OF HIS SOCIAL AWARENESS. WHAT FACES HIM IS THE SOCIETY BASED ON THE ABODE OF VALUES AND CULTURE. HE EXPOSES THE SHOWY BUT USELESS TRANSFORMATION IN HIS UNIQUE STYLE, SARCASTIC YET WITH A TOUCH OF HUMOUR. DOES ANYONE FIND EXPERIENCES? NO, THEY COME TO US AUTOMATICALLY; WE JUST HAVE TO KEEP ALL OUR SENSES OPEN TO THEM. PATIL MUST HAVE REALIZED AND PRACTICED THIS. STILL, A LOT HAPPENS BETWEEN HIS FEELING OF THE EXPERIENCES AND REPRODUCTION OF THEM. IT IS A VERY INTRICATE PHENOMENON. HIS STORIES TAKE BIRTH FROM THE DEPTH OF HIS CONTEMPLATION. THIS PROCESS HAS BEEN CONTINUOUSLY GOING ON FOR OVER A PERIOD OF 25 TO 30 YEARS NOW. HIS STORIES HAVE ENRICHED MARATHI LITERATURE WORDLESSLY, CAN WE REFUSE THIS?
शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे एक लेणे आहे. त्यांचे मन अतिशय संस्कारक्षम आहे. केवळ ग्रामीण जीवनदर्शन घडवावे असा त्यांचा हेतू नसतो किंवा लोकप्रियता मिळविण्यासाठी गावरान किस्से सांगावेत असाही त्यांचा हेतू नाही. त्यांनी शहरी वाचकांचे भान ठेवून कथालेखन केले नाही. कथा हे आत्मशोधाचे साधन आहे, ही जाणीव शंकर पाटलांना आहे. १९५० पासून त्यांचा कथालेखनाचा प्रवास पाहिला तर हे लक्षात येईल, पण ग्रामीण मन ज्या समाजव्यवस्थेत वाढते आहे त्यात स्वातंत्र्य समतादी मूल्यांची रुजवण झालेली नाही, याचे त्यांना दु:ख आहे. पाटील परंपरेपेक्षा परिवर्तनावर श्रद्धा ठेवतात. त्यांना ग्रामीण प्रश्नांचे भान आहे; आणि म्हणूनच त्यांच्या कथेचा अवतार केवळ रंजनार्थ नाही, त्यांच्या लेखनामागे सामाजिक जाणीव आहे. मूल्यांवर अधिष्ठित अशा समाजव्यवस्थेचे चित्र त्यांच्या समोर आहे; म्हणून तर ते आपल्या कथांतून बेगडी परिवर्तनाचे व्यंगचित्रण करतात. अनुभव कधी शोधून सापडतात? ते आपसुक यावे लागतात. पाटलांच्या कथा अशाच रीतीने त्यांचे बोट धरून आल्या असाव्यात पण या कथानिर्मिती मागे केवढी प्रचंड घडामोड आहे, गुंतागुंत आहे. जणू चिंतनाच्या डोहातूनच ती जन्मते. जवळ जवळ २५३० वर्षे पाटलांची कथा वाटचाल करीत आहे. तिने मराठी कथेला ‘श्रीमंत’ केले आहे हे कुणाला नाकारता येईल काय! –डॉ. भालचंद्र फडके
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KUSTI# KARWAT# RIT-RIVAJ# VECHANI# NHAVRA#YEDTAAK#VAVRI SHENG# PURAVA# ISAALA# KHOD #SHANKAR PATIL
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मराठी साहित्यात प्रामुख्यानं पांढरपेशा मध्यमवर्गियांच्या आयुष्याचं चित्रण कथा-कादंबऱ्यांतून रंगवलं जायचं. या अनुभवविश्वाला पहिला तडा दिला तो ग्रामीण साहित्यानं आणि पाठोपाठ दलित साहित्यानं. १९५०-६० च्या दशकात व्यंकटेश माडगुळकर, द. मा. मिरासदार, वसंत सनीस यांच्या ग्रामीण ढगांच्या कथांनी मराठी साहित्याची एक वेगळीच धारा येऊन मिळाली. या ग्रामीण साहित्यात मोलाची अन लक्षणीय भर टाकली ती शंकर पाटील यांच्या ग्रामीण कथांनी. शहरी जीवनानुभवापेक्षा या ग्रामीण कथांमधून रेखाटलेलं सामान्य माणसाचं जगणं पांढरपेशा मध्यमवर्गासाठी नवं होतं. त्यांच्या जगण्याच्या झगडा, दैन्य-दारिद्र्य, शोषकांची दांडगाई, शोषितांची परिस्थिती शरणता हे सारंच धक्कादायक होतं. दलित साहित्यानं तर कल्पनेपलीकडचं जीवन वास्तव, अनलंकृत भाषेत, थेटपणे मांडल्यानं मराठी साहित्याचं सारं सौंदर्यशास्त्रच कोलमडून पडलं. अन् या साहित्याच्या मूल्यमापनासाठी नव्या निकषांची निकड भासू लागली. ग्रामीण साहित्याचं लेखन विपुलतेनं झालं. नवनवे लेखक लिहिते झाले. त्या ग्रामीण साहित्यात शंकर पाटील यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य मोठं आहे. शंकर पाटील यांनी केवळ विनोदापेक्षा ग्रामीण जीवनातील रोजच्या जगण्याचा, सामान्य माणसाचा झगडा, परिस्थितीशी दोन हात करत जीवनाला सामोरं जाण्याची विजिगिजू वृत्ती, माणसातील माणुसकी जपणारी नाती, (अन् त्यांच्याबरोबर त्याचं पशुत्व), मानवी स्वभावाची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या साऱ्यांचं चित्रण आपल्या कथांमधून केलं. त्यांच्या कथांमधून ग्रामीण जीवनाचं प्रातिनिधक चित्रण दिसतं. तसं जीवनाची नीतिमूल्यं, तत्व यांचही दर्शन होतं. मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी शंकर पाटील यांच्या कथांचं कालातीत महत्त्व लक्षात घेऊन त्याचं ‘वावरी शेंग’, ‘बंधारा’ आणि ‘घालमेल’ या कथासंग्रहाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. या कथासंग्रहामधून शंकर पाटलांची चित्रमय वर्णनशैली प्रकर्षानं जाणवते. बारीक तपशिलासह ते सारं चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं करतात. ग्रामीण भाषा, बोलके शब्द, म्हणी यांचा वापर, ग्रामीण वातावरण त्याचं जीवन, दैन्य-दारिद्र्य तपशिलानं वर्णन करतात. त्यांच्या काही कथांमध्ये नाट्यमय शेवट आहे. कथांतर्गत लेखकानं निर्माण केलेला समज शेवटच्या धक्क्यातून पार उधळला जातो आणि कथा वेगळ्याच वळणानं रंजक ठरते. उदा. ‘पुरावा’ (वावरी शेंग). आत्यंतिक दैन्य-दारिद्र्याचं चित्रण ते करतात, पण त्यावर आपलं भाष्य करीत नाहीत. शंकर पाटलांच्या उपमाही ग्रामीण वातावरणाशी, जीवनाशी निगडित येतात. उदा. ‘पदर आलेली गजरा कापसाच्या बोडागत उमलून आली होती. पृ. ६२ (वावरी शेंग) विंâवा आतला गाभाच जर कडू, तर वरचं टरपाल घेऊन काय काराययं?’ पृ. ८७ (खोड). ग्रामीण कथांमधून येणारे इरसाल नमुनेही या कथांमधून दिसतात. शंकर पाटलांच्या कथांतून ग्रामीण जीवनाच्या चित्रणाबरोबरच मानवी जीवनाची गुंतागुंत, जगण्याची आस, नीतिमूल्यं सारं जाणवतं. त्यांच्या कथांकडे म्हणूनच गांभीर्याने पहायला हवं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more