* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL BHAG 3
  • Availability : Available
  • Translators : AVANTI MAHAJAN
  • ISBN : 9789386745132
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL II OFFERS MORE INSPIRING STORIES TO HELP YOU MASTER THE GAME WE CALL LIFE. TODAY`S TEENS HAVE EVER MORE ISSUES AND SOCIAL PRESSURES TO JUGGLE THAN YOUNG ADULTS JUST 20 YEARS AGO. THIS BOOK, LIKE ITS PREDECESSOR, CAN BE YOUR GUIDE - A BEACON IN THE DARKNESS, A SAFE HAVEN IN A STORM, A WARM HUG IN THE COLD AND A RESPITE FROM LONELINESS. THERE`S NO PREACHING AS TO WHAT YOU SHOULD AND SHOULDN`T DO. INSTEAD, THIS BOOK IS FULL OF TEENS SHARING THEIR EXPERIENCES ON LEARNING TO ACCEPT LIKE, BECOMING THE BEST PERSON YOU CAN BE, BEING HAPPY WITH WHO YOU ARE, AND LOVING YOURSELF - NO MATTER WHAT.
पौगंडावस्था हा माणसाच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. पौगंडावस्था म्हणजे मानवी मनोव्यापारांच्या उत्कट भावांदोलनांची सुरुवात असते. तर अशा या उत्कट भावांदोलनांचं वास्तव आणि व्यामिश्र चित्रण ‘चिकनसूप फॉर टीन एज सोल भाग ३’मधील कथांमध्ये केलं आहे. यातील काही कथा पौगंडावस्थेतील प्रेमभावना अधोरेखित करतात, तर काही प्रेमातील विफलता अधोरेखित करतात. काही कथा करुण रसाचा प्रत्यय देतात, तर काही हळुवारपणाचा. पौगंडावस्थेतील मुलांनाही विपरीत परिस्थितीला सामोरं जावं लागतं, असाही सूर काही कथांमधून दिसतो. जसं व्यसनी पालक वाट्याला येणं, त्यांचे अत्याचार सोसायला लागणं, आई-वडिलांचा घटस्फोट, आई किंवा वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर सावत्र आई किंवा सावत्र वडिलांकडून छळ सोसावा लागणे, पाठच्या भावंडांची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागणे, भावंडांपैकी कोणाला कॅन्सर झाल्यामुळे ते दु:ख बघायला लागणे, आई-वडिलांपैकी कोणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे दु:ख होणे अशा वास्तवतेचाही प्रत्यय देणाऱ्या काही कथा आहेत. त्या मनाला चटका लावून जातात. यातील काही कथा अतूट मैत्रीच्या आहेत. तर काही मैत्रीत आलेल्या वितुष्टाच्याही आहेत. यातून मैत्र भावनेतील उत्कटता आणि मैत्री तुटल्यानंतर झालेलं दु:ख अशा दोन्ही छटा चित्रित केल्या आहेत. पौगंडावस्थेतील मुलांच्या भावविश्वाचं दर्शन घडवणाऱ्या या कथांचं हे संकलन वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरच्या भावभावनांचं उत्कट दर्शन घडवतं. साध्या, सोप्या भाषेतील या कथा वाचनीय अशाच आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHICKENSOUPFORTHETEENAGESOULBHAG3 #CHICKENSOUPFORTHETEENAGESOULBHAG3 #चिकनसूपफॉरदटीनएजसोल -भाग #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AVANTIMAHAJAN #MARKVICTORHANSENKIMBERLYKIRBERGER "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 15-06-2018

    टीनएजर्सच्या मनाचा आरसा... टीनएजर्सनाच नव्हे, तर प्रौढ वाचकांनाही आपलेसे वाटणारे ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ हे पुस्तक म्हणजे, तारुण्याकडे झुकणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या मनाचा आरसाच आहे. यातल्या कथा छोट्या असल्या तरी मुलांच्या मनात खळबळ माजवण्याची आणित्यावर विचार करायला भाग पाडण्याची ताकद यांच्यात आहे. टीनएज म्हणजेच साधारण पौगंडावस्थेतलं वय. म्हणजे म्हणावं तर अल्लड आणि काहीसं परिपक्वतेच्या मार्गावर आलेलं. या वयात मुलांमुलींमध्ये अनेक मानसिक, शारीरिक, भावनिक आंदोलनं सुरू असतात. पौगंडावस्थेतल्या म्हणजेच टीनएजर्सच्या मनातली हीच आंदोलनं ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकाच्या तिसऱ्या भागात आपल्याला जवळून अनुभवता येतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या कोणत्याही मुलाला वा मुलीला आपल्याच वाटतील अशा या कथा आहेत. जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन आणि किम्बर्ली किर्बर्जर यांच्या चिकन सूप फॉर दे सोल या मूळ इंग्रजी सिरिजमधलं हे पुस्तक अवंती महाजन यांनी आपल्या खास शैलीत मराठीत अनुवादीत केलं आहे. टीनएजमध्ये असलेल्या मुलांच्या मनात शिरताना आलेले अनुभव पुस्तकाच्या चार भागात कथात्मक रूपात मांडले आहेत. कुटुंब, धडा शिकणे, बदल घडवताना आणि परिपक्व होताना अशा चार भागांत विभागलेलं हे पुस्तक टीनएजर्सच्या मनाचा ठाव घेतं, त्याचं सर्वांगसुंदर दर्शन घडवतं. पुस्तकातल्या ‘खुलं मन’, ‘ठसा’, ‘जास्त घट्ट जमीन’, ‘केवढ्याला पडलं’ यांसारख्या आणखीही काही कथा अशाच खूप काही देऊन जाणाऱ्या. आशयाला साजेशी अभिव्यक्ती आणि उत्कृष्ट, मनाला भावणाऱ्या अनुवादाची जोड यामुळे या कथांच्या माध्यमातून पौगंडावस्था उलगडत जाते. टीनएजर्सनाच नव्हे तर, प्रौढ वाचकांनाही आपलेसे वाटणारे हे पुस्तक म्हणजे, तारुण्याकडे झुकणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या मनाचा आरसाच आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या सगळ्याच कथा छोट्या असल्या तरीही मुलांच्या मनात खळबळ माजवण्याची आणि त्यावर विचार करायला भाग पाडण्याची ताकद यांच्यात आहे. कोणत्याही वयातल्या वाचकाला या पुस्तकातल्या प्रत्येक कथेत ‘मी’ नक्कीच दिसतो. वाचताना कुठे तरी ‘अरे, आपल्यालाही असं वाटलं होतं कधी तरी’ ही भावना वाचकाच्या मनात येते, तिथेच हे पुस्तक यशस्वी झाल्याचं समजतं. – चारुता बापट गानू ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर