* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KALAKABHINNA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669770
  • Edition : 2
  • Publishing Year : MAY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 18 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE HUMAN IS THROUGH THE DARKEST TUNNEL; HE COMES OUT THROUGH THE WOMB AND CRIES FOR THE FIRST TIME, HE TAKES ENTRY INTO THE WORLD. HE FINDS COMPANY OF MOTHER-FATHER, RELATIVES, FRIENDS, COLLEAGUES, AND SO MANY OTHERS. HIS LIFE BLOSSOMS FROM ALL SIDES. AT TIMES, HE COMES ACROSS FRIENDS AND FINDS NEW MEASURES OF HAPPINESS. HE FORGETS ABOUT PAST AND PRESENT. ALL OF A SUDDEN, ONE DAY, HE JUST GETS FRUSTRATED WITH EVERYTHING. HE FINDS FRIENDS IN THE MACHINES. SOMETIMES, HE REALIZES THE TRUTH WHEN HE SEES SOMEONE DEAR LOST UNDER `HAVE YOU SEEN THEM?` THE RELATIONS BETWEEN HUMANS TURNS INTO SETTLING OF ACCOUNTS. BODY LOSES ITS FRESHNESS AND MIND LOSES ITS FRAGRANCE. BOTH BECOME WORN OUT, HOLLOW. THEY FIND NOTHING TO KEEP THEM BUSY. THE FREE TIME COMES TO KILL THEM, BUT DOES NOT KILL AT ALL. THEY TRY TO PASS TIME WITH THE FOND MEMORIES THROUGH THE OLD `ALBUMS`; WHICH IN TURN PRESENTS THE RAINBOW COLOURS OF THEIR YOUTH AND CHILDHOOD, WITH SHADOWY VISIONS.
‘काळाकभिन्न’ काळोख आणि त्यातूनच होणारा मनुष्याचा जन्म! मग ‘टाहो’ फोडत या ‘आटपाट नगरी’त होणारा जीवनाचा प्रवास! या प्रवासात मिळतात आई-वडिल, नातेवाईक, सखे-सोबती. जीवन फुलतं जातं. वळणावर भेटते ‘सहेलियोंकी बाडी’. मन गुंग होतं. स्तिमित होतं. ‘अल्याड-पल्याड’ची जाणीव राहत नाही. मग कधीतरी मनुष्याचा उबग येतो आणि यंत्रं मित्र होतात. ‘मी आणि चॅमी’ मैत्री जुळते. ‘हरवले आहेत’ या मथळ्याखाली जेव्हा नावांची यादी फोटोंसकट वर्तमानपत्रांतून वाचनात येते तेव्हा ‘वस्तुस्थिती’ची जाणीव होते. मनुष्य आणि मनुष्य जातींची आपापसातली नाती म्हणजे केवळ ‘हिशोब’ होऊन राहतात. शरीर आणि मन म्हातारं होतं. रिकामंही होतं, कारण आता काय शोधायचं हा प्रश्न आऽ वासून उभा राहतो. रिकाम्या वेळेचा चाळा म्हणून अनेक वर्षं धूळ खात पडलेला ‘अल्बम’ बाहेर काढला जातो आणि त्या पिवळ्या पडत जाणाऱ्या फोटोंमधून आठवणींचं इंद्रधनुष्य स्वत:च्या बालपणाच्या याऽऽ टोकापासून ते स्वत:च्या मुलांच्या तारुण्याच्या त्याऽऽ टोकापर्यंत अर्धगोल उमटतं. अंधुकसं, धूसरसं, चष्म्याच्या काचा थेंबाथेंबाने ओलावत!

No Records Found
No Records Found
Keywords
#HARAVLE AAHET#TAHO#SAHELIYON KI BAADI#ALBUM#ALYAD PALYAD#KALAKABHINNA#AATPATNAGARI#VASTUSTHITI#MI ANI CHAMY#HISHOB
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more