* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: VIKASAN
 • Availability : Available
 • ISBN : 9788177662511
 • Edition : 3
 • Publishing Year : SEPTEMBER 2002
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 136
 • Language : MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
THIS COLLECTION INCLUDES V. S. KHANDEKAR`S SHORT STORIES WRITTEN DURING 1971 TO 1973. THEY ARE A PURE MIXTURE OF IMAGINATION, FEELINGS AND THOUGHTS. THE STORIES IN "VIKASAN`` HAVE A PURE YET SACRED STRENGTH OF ENTERTAINMENT. THEY LINGER INTO OUR MINDS FOR A LONG PERIOD OF TIME. THEY MAKE US VERY INTROSPECTIVE. THESE STORIES REFLECT NOT ONLY KHANDEKAR`S ARTISTIC DEVELOPMENTAL APPROACH BUT ALSO REFLECT HIS DEEP PONDERING OVER LIFE. THESE STORIES PICTURE THE CHARACTERS THAT ARE NOW QUITE OLD.THEY HAVE ACCEPTED THE DUALITY OF THEIR PRESENT LIVES UNWILLINGLY, BUT THE MEMORIES OF THEIR SWEET PAST LIVES LINGER IN THEIR MINDS. IN A WAY, THESE STORIES ARE THE LIGHT HOUSE FOR THE FUTURE GENERATION, BURNING WITH THE OIL OF EXPERIENCE AND MEMORIES OF THE OLDER GENERATION. THESE STORIES TRY TO TEACH US THAT `GRIHASTA DHARMA` WHICH IS THE THIRD STAGE OF LIFE IS ACTUALLY REBIRTH.NOBODY EVER REMEMBERS PAST LIFE. BEFORE MARRIAGE, OUR LIVES ARE CAREFREE LIKE THAT OF BUTTERFLIES, MARRIAGE CHANGES US INTO BIRDS, BUILDING NESTLES FOR THE YOUNG ONES, CARING FOR THEM. WE GET INVOLVED INTO THE ADJUSTMENTS WHILE TRYING TO GET THROUGH OUR NEW ROLES, AUTOMATICALLY FORGETTING OUR PAST LIVES. IS NOT MARRIAGE A REBIRTH AS IT MAKES US FORGET OUR PAST LIFE?
‘विकसन’ वि. स. खांडेकरांच्या सन १९७१ ते १९७३च्या काळात लिहिलेल्या भावकथांचा संग्रह. या कथांत कल्पना, भावना नि विचारांचा सुरेख संगम आढळून येतो. ‘विकसन’मधील कथांची सात्त्विक रंजनाची स्वत:ची अशी आगळी शक्ती आहे. या कथा वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत रहातात, त्या कथांतील वाचकांना अंतर्मुख करण्याच्या क्षमतेमुळे. खांडेकरांनी आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात काहीशा स्वास्थ्यानी लिहिलेल्या ‘विकसन’मधील कथांत कला विकासाबरोबर गहरं असं जीवन चिंतनही आहे. जीवनातील वानप्रस्थाचं चित्रण करणाया या कथांतील पात्रांचं जीवन गतकालातील मधुर स्मृतींना जागवत वर्तमानाचं वैषम्य, कटु सत्य स्वीकारतं. येणाया नव्या पिढीला आपलं जीवनसंचित बहाल करणाया या संग्रहातील कथा भूतकाळाने वर्तमानास दिलेलं जीवन पाथेय होय. गृहस्थजीवन पुनर्जन्म असतो असं समजाविणाNया या कथा सांगतात की पुढच्या जन्मात माणसास मागच्या जन्माचं थोडंच आठवतं ? लग्नापूर्वी आपण फुलपाखरं असतो... लग्नानंतर पाखरं होतो... पाखरांना घरटी बांधावी लागतात... पिलांना सांभाळावं लागतं... एका मागून एक तडजोडीत पूर्व जीवन विस्मरून नव्या जीवनात रममाण होतो. पूर्व जीवन विसरायला लावणारं लग्न पुनर्जन्मच नाही का ?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #दोन मने #दोन ध्रुव #विकसन
Customer Reviews
 • Rating StarDAINIK PUDHARI 17-11-2002

  आठवणीत राहणाऱ्या वास्तवकथा ‘विकसन’... वि. स. खांडेकरांच्या कथा वाचणे हा एक सात्विक आनंदाचा भाग असतो. जीवनसंदेश देणाऱ्या, मनावर सुसंस्कारांचा ठसा उमटविणाऱ्या अशा १९७१ ते १९७३ या तीन वर्षांतील काळात त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह ‘विकसन’च्या नव्या रपात आपणासमोर येत आहे. या कथांचे संपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी खूप परिश्रम घेऊन केले आहे. वि. स. खांडेकरांच्यावर त्यांची श्रद्धा, भक्ती त्यांच्या मनोगतामधून व्यक्त होते. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणतात त्याप्रमाणे या कथासंग्रहातील कथा वाचून झाल्यानंतर खरोखर मनात रेंगाळत राहतात. यामध्ये भावना आविष्कार, कल्पना आणि विचार यांचा सुंदर मेळ घातलेला दिसून येतो. ‘जीवनासाठी कला’ हे ध्येय जोपासण्यासाठी वि. स. खांडेकरांनी उत्तमोत्तम कथा लिहिल्या. समाजप्रबोधन करण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले, याची साक्ष या कथांतून पुन्हा मिळते. या कथासंग्रहात एकूण बारा कथा आहेत. प्रत्येक कथा स्वतंत्र आणि संपन्न आशय घेऊन उभी ठाकते. ‘शरीर’ या कथेत नोकरीसाठी मुंबईला गेलेल्या आपल्या मुलाची दिनूची वाट पाहणाऱ्या आई-वडिलांच्या व्यथेची कथा साकारली आहे. शंकरभाऊ आणि गिरिजाबाई यांच्या आशेचा किरण दिनू असतो. फुटलेला थर्मामीटर टाकून दुसरा आणण्याचे धैर्य त्यांना होत नाही. टाचगं वस्त्र नेसून एखाद्या बाईने आपली लाज सांभाळण्याचा प्रयत्न करावा, तसा त्यांचा संसार सुरू असतो. दिनू येणार म्हटल्यावर दोघांना चैतन्य येते. मुलाच्या बॅगमध्ये त्याच्या मैत्रिणीचा ब्लाऊज सापडतो तोही तुकारामांच्या गाथेशेजारी, साप दिसावा तसे ते दचकतात. योग आणि भोग यांच्या प्रतिकांचा उत्तम मेळ कथेत दिसतो. ‘मनोरा’ ही कथा ही सामाजिक कार्यांचे पोकळ ढोंग उघडकीस करते. मध्यमवर्गीयांची बेगडी सहानुभूती कशी कुचकामी असते ते दाखवून देते. समाजातील ताळागाळातील मुलींनी शिकावे. आता आग्रह धरणाऱ्या सरोजिनीबाई प्रत्यक्षात मात्र अंजली आजगावकरला मदत करू शकत नाही. अध्यात्माची जीवनाशी सांगड घालणारी ‘मुंगी उडाली आकाशी’ ही कथा समाजातील उच्चभ्रू वर्गाचे खरे रूप प्रकट करते. स्मगलर, कॉन्ट्रॅक्टर, डॉक्टर ही सर्व पात्रं आजच्या समाजाचे खरे रूप समोर ठेवतात. ‘स्फोट’ ही कथा सध्याच्या घसरलेल्या नैतिक मूल्यावर प्रकाश टाकते. मालमत्तेवर कर बसू नये यासाठी पती-पत्नी घटस्फोटाचे नाटक करतात. ‘प्रीती’ ही कथा केवळ प्रेमकथा न राहता मानवाच्या मनाचा वेध घेणारी, विचार करावयास लावणारी दर्जेदार कथा आहे. तशीच ‘पुनर्जन्म’ हीसुद्धा एक प्रेमकथाच आहे. विवाहानंतर पूर्वजीवनातील प्रेम विसरून नवा संसार नव्या उमेदीनं थाटावा लागतो. लग्नानंतर त्याचा पुनर्जन्म होतो, असा सूर या कथेचा आहे. ‘विकसन’ ही कथा आई-मुलगा-आजी यांच्या प्रेमाचे भावबंधनाचे चित्रण करणारी आहे. आजीची खरी माया कळताच नातवाला आपली आजी रूपानेही सुंदर दिसू लागते. ‘तिला नोकरी कशी मिळाली’ ही कथा आजही मार्गदर्शक ठरते. जतुभाऊ आणि भाऊसाहेब उषाच्या वडिलांचे मित्र; पण ते तिला नोकरी देत नाहीत, प्रयत्नही करीत नाहीत. अभिनेत्री सुलक्षणा तिला नोकरी मिळवून देते. त्याचे श्रेय मात्र जतुभाऊ आणि भाऊसाहेब घेऊ पाहतात. जग हे ‘मयसभा’ कसे ठरते ते दाखवून देणारी ही वास्तव कथा ठरते. अशा या जगरहाटीच्या, ढोंगीपणाच्या, लबाडीच्या अनुभवातून नवजीवनासाठी जागृती देणाऱ्या कथा आहेत. वि. स. खांडेकरांच्या या कथा सोज्वळ, सुबोध आहेत. त्या बेगडी किंवा चटपटी नाहीत. जे जे जगात चालते त्याचे नेमके रूप टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कथात दिसतो. आजच्या काळात अशाच मूल्यांचे शिकवण देऊन समाजप्रबोधन करणारे साहित्य हवे आहे. ती कामगिरी ‘विकसन’ मधून उत्तम प्रकारे पार पाडली आहे. हेच या पुस्तकाचे मूल्य होय. -ज्ञानेश्वर म. कुलकर्णी ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL 03-04-2005

  परिणतप्रज्ञ प्रतिभेचा आविष्कार : विकसन... वि. स. खांडेकरांनी कादंबऱ्यांसोबतच अनेक कथाही लिहिल्या. त्या सर्व कथांचे संग्रहही वेळोवेळी प्रकाशित झाले. १९७२ मध्ये प्रकाशित झालेला ‘ढगाआडचं चांदण’ हा त्यांचा शेवटचा कथासंग्रह. तथापि त्यानंतरही त्यांनी आणखीकाही कथा लिहिल्या आहेत. दृष्टी अधू झाल्यामुळे त्यांचे कथालेखन काहीसे मंदावले होते; परंतु दिवाळी अंकांच्या संपादकांच्या आग्रहाखातर त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या पर्वातही काही कथा लिहिल्या. असंकलित स्वरूपात विखुरलेल्या त्या कथा डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ‘विकसन’ या कथासंग्रहाच्या रूपाने संकलित केल्या आहेत व त्या संग्रहाला मार्मिक प्रस्तावनेची जोडही दिली आहे. हा कथासंग्रह वाचताना एक बाब ठळकपणे लक्षात येते की, या कथासंग्रहातील प्रत्येक कथा हा खांडेकरांच्या परिणतप्रज्ञ प्रतिभेचा आविष्कार आहे. इतकी वर्षे सातत्याने कथा, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इत्यादी स्वरूपाचे विपुल लेखन करणाऱ्या लेखकाने आयुष्यात जे अनेक अनुभव घेतले, ज्या वाटा धुंडाळल्या, त्यातून त्याला जे सत्य गवसले आणि त्या निमित्ताने त्याचे जे चिंतन झाले, त्याचे पाठबळ या कथांना आहे. त्या दृष्टीने या कथासंग्रहाचे शीर्षकही बोलके आहे, असे म्हणावे लागेल. अर्थात त्या शीर्षकाची एक कथा या संग्रहात आहेच. उदाहरणार्थ : पहिल्याच ‘शरीर’ या कथेत आई-वडील आणि मुले यांच्यातील भावनिक संबंधांचे ताणतणाव चित्रित केले जातात. एका अर्थानेही दोन पिढ्यांमध्ये कसे मानसिक अंतर पडत गेलेले असते, हे दर्शविणारी चिंतनशील कथा आहे. मुलांकडून आपल्या अपेक्षांची पूर्ती व्हावी ही प्रत्येकच आई-वडिलांची इच्छा असते; परंतु प्रत्येक वेळी तसे घडतेच असे नाही. उलट अशी अपेक्षा बाळगणे हेच काही वेळा अनाठायी ठरते; परंतु प्रत्येकाला हे कळतेच असे नाही. त्यामुळे अपेक्षाभंग पदरात पडतो. अशा अपेक्षाभंगाचे चित्रण खांडेकरांनी या कथेत केले आहे. खांडेकरांच्या साहित्यातून प्राध्यान्याने मध्यमवर्गीय समाजाचे, त्याच्या आशा-आकाक्षांचे आणि जाणिवांचे चित्रण येते. हा कथासंग्रही त्याला अपवाद नाही. मध्यमवर्गीयांच्या जाणिवांना असणाऱ्या मर्यादांचेही त्यांनी फार चांगले चित्रण काही कथांतून केले आहे. मध्यमवर्गीय माणसे आदर्शांच्या, ध्येयवादाच्या मोठमोठ्या गोष्टी करतात; परंतु प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की, भित्रेपणा दाखवतात. ‘मनोरा’ या कथेतील शाळानिरीक्षक सरोजिनीबाई या एका शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात; परंतु ती एका वेश्येची मुलगी आहे व तिलाही शारीरविक्रय करावा लागतो, हे त्यांना माहीत नसते. एके दिवशी ती मुलगी बाईच्या घरी येण्याची व पडेल ते काम करत शिक्षण करण्याची इच्छा व्यक्त करते. त्या वेळी मात्र त्या गडबडतात व तिच्याकडे कायमची पाठ फिरवतात. ‘प्रीती’, ‘पुनर्जन्म’ या थोड्या वेगळ्या कथा आहेत. विवाह हा मनुष्याच्या जीवनातील पुनर्जन्म आहे अशी कल्पना ‘पुनर्जन्म’ या कथेत त्यांनी मांडली आहे. विवाहापूर्वी फुलपाखरासारखे जगणारा माणूस विवाहानंतर पाखरू बनतो म्हणजे घरटे बनवितो. पूर्वीचे आयुष्य विसरून नव्या जोडीदाराबरोबर नवे आयुष्य जगू पाहतो. एका अर्थाने हा त्याचा पुनर्जन्मच असतो, असे खांडेकरांना वाटते. समाजवास्तव इतके भीषण आहे की शिक्षणाने मिळविलेली योग्यता आणि नोकरी यांचा काही संबंध उरलेला नाही. ‘तिला नोकरी कशी मिळाली?’ या कथेत या वास्तवाचे चित्रण खांडेकरांनी केले आहे. आलेल्या कडवट अनुभवांमुळे नोकरी मिळाल्यानंतर उषेला वाटते की, आपल्या पुस्तकी स्वप्नाळूपणाचे राई-राई एवढे तुकडे होत आहेत. जगाविषयी आपण केलेल्या साऱ्या कल्पना कोसळून पडत आहेत आणि हजारो वेडीवाकडी वळणे असलेले जीवन अत्यंत सत्य; पण दाहक स्वरुपात आपल्यापुढे प्रकट होत आहे. ‘विकसन’, ‘गोफ’ या कथांतून त्यांनी वृद्धांच्या मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी कथेत हे फारसे घडलेले नाही. ‘मनुष्य, पशू आणि दगड’ ही एका अर्थाने रूपककथाच आहे. खांडेकरांच्या एकूणच साहित्याला पडलेली मध्यमवर्गीय जाणिवांची आणि जीवनचित्रणाची मर्यादा या कथासंग्रहालाही आहेच असे असले तरी खांडेकरांचे असंकलित साहित्य संकलित करून ते एकत्रितपणे वाचकांना उपलब्ध करून देणे हा उपक्रम चांगला आहे. त्याबद्दल डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे अभिनंदन केले पाहिजे. -डॉ. रवींद्र ठाकूर ...Read more

 • Rating StarDAINIK SAMANA 03-11-2002

  वि. स. खांडेकरांनी १९७१ ते ७३ या काळात लिहिलेल्या कथांचा संग्रह ‘विकसन’ या नावाने प्रकाशित झाला आहे. खांडेकरांनी लिहिलेल्या या कथा बहुतेक दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेल्या असल्या तरी आजही त्या तितक्याच ताज्या वाटतात याचं कारण त्यातील भावना आणि विचार ांचा सुरेख मेळ हे आहे. ‘विकसन’ ही शीर्षक कथा एक लहान तीन-चार वर्षांचा मुलगा, त्याची कडक शिस्तीची आई, तिच्या मनाप्रमाणे वागणारे वडील आणि आजी या चार पात्रांभोवती गुंफलेली आहे. त्यातही वडिलांविषयी अवघा एकदाच उल्लेख आहे. आई, आजी आणि मूल यांच्या भावबंधांचं चित्रण करणारी ही कथा आहे. आजीकडे पाहण्याचा मुलाचा दृष्टीकोन कसा बदलत जातो ते अगदी बारकाव्यांसह खांडेकर लिहितात. ‘पुनर्जन्म’ ही एक प्रेमाच्या त्रिकोणाची कथा आहे. लग्न हा एका अर्थाने पती-पत्नी दोघांचा पुनर्जन्म असतो. लग्नानंतर पूर्वजीवन विसरून माणूस संसारात रमला पाहिजे, असे खांडेकर सांगतात. शरीर या कथेत मुलाच्या लग्नाची स्वप्नं पाहणारे आई-वडील आणि आर्थिक परिस्थितीमुळे लग्नाच्या बंधनात न पडू शकणारा मुलगा अखेर एका मुलीबरोबर खंडाळ्याच्या हॉटेलमध्ये राहतो हे समजल्यावर वृद्ध आईवडिलांना धक्का बसतो. प्रीती या कथेत शरीरापलीकडे जाऊन केलेले प्रेम कसे श्रेष्ठ ते लेखक सांगतात. खांडेकरांच्या लेखनामध्ये कोणत्याही गोष्टीची चांगली बाजू ते दाखवतात. बऱ्याचदा त्यांचे लेखन आदर्शवादाकडे जाणारे असते ही टीका होते. पण सामान्य माणसे आजही नीतिमूल्ये सांभाळून प्रामाणिकपणे जगणारी असतात. त्यामुळे ही टीका बरोबर नाही. पण ‘मनोरा’मधील सरोजिनीबार्इंसारख्या दांभिक व्यक्तीही समाजात असतात. त्यांचे चित्रण तर खांडेकरांनी केले आहे. ‘मुंगी उडाली’ मध्ये नैतिक अध:पाताचे चित्रण करताना खांडेकर अध्यात्म्य समजावतात. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more