* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: NAVARA MHANAVA AAPALA
 • Availability : Available
 • ISBN : 9788177668940
 • Edition : 17
 • Publishing Year : APRIL 1997
 • Weight : 100.00 gms
 • Pages : 100
 • Language : MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
OUR DAILY LIFE IS FULL OF RAYS, IT DOES NOT HAVE ANY BIG EVENT OR A SERIOUS STRUGGLE OF ANY TYPE, THAT IS THE ONLY PROBLEM. OTHERWISE, OUR ROUTINE LIFE GOES ON AS IT IS. ACTUALLY, OUR MINDS ARE PREPARED FOR THE TRAUMAS OF LIFE, BUT THEN WE COME ACROSS SOMEONE WHO SEES US THROUGH IT. BUT THIS VERY MIND SET OF OURS IS NOT AT ALL PREPARED FOR THE SMALL TRAUMAS IN DAYTODAY LIFE, WHICH ACTUALLY HAVE THE UTMOST POWER OF DISASTER. THEY ATTACK SEPARATELY WHILE WE ARE ALONE AND TAKE OUT LIVELINESS FROM OUR MIND AND SOUL. WE HAVE TO SUFFER ALONE, THERE IS NO ONE TO COME ALONG WITH US. A HUMAN MIND THUS ATTACKED, GETS TERRIBLY UPSET, HIS COURAGE FAILS HIM, HE THEN PAUSES FOR SOME TIME, RESTS FOR A WHILE AND ONCE AGAIN GATHERS HIS STRENGTH WITH NEW HOPE AND DESIRE. NO ONE NOTICES HIS TIREDNESS, NO ONE DETECTS HIS RECOVERING. HIS JOURNEY CONTINUES. EVERYONE HAS TO CONTINUE HIS OR HER OWN JOURNEY, SOMETIMES FALLING AND THEN GETTING UP, WITH A NEW HOPE EVERY TIME, WITH A GLANCE AT THE PAST OVER AND OVER, THE JOURNEY HAS TO BE CONTINUED. THIS IS A GLIMPSE OF SUCH SUFFERINGS, OF THOSE WALKING AND TRUDGING, BY YOU AND OF COURSE BY ME!!!
आयुष्यात काही प्रसंग आपल्यावर आघात करतात. एकट्यानंच ते सोसून पुन्हा नव्या उमेदीनं उभं राहायचं असतं. त्या एकल्या प्रवासाच्या या व्यथा... या तुमच्या आमच्या कथा. दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटेछोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही! नव्या उमेदीनं, मागं पाहतपाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा! त्यांच्या या कथा. तुमच्या आणि माझ्याही!!!आयुष्यात काही प्रसंग आपल्यावर आघात करतात. एकट्यानंच ते सोसून पुन्हा नव्या उमेदीनं उभं राहायचं असतं. त्या एकल्या प्रवासाच्या या व्यथा... या तुमच्या आमच्या कथा. दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटेछोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही! नव्या उमेदीनं, मागं पाहतपाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा! त्यांच्या या कथा. तुमच्या आणि माझ्याही!!!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
 • Rating StarShrikant Adhav

  मूल जन्माला आलं की त्याला आई बाप जन्मभर पुरायला हवेत. दोघांच्याही प्रेमात जमीन अस्मानाचा फरक असतो. मूलाला काय हवयं ते आईला न सांगता समजतं. तर बापाला ती गोष्ट मागतिल्याशिवाय समजत नाही. म्हणूनच हट्ट करून गोष्ट वसूल केल्याचा आनंद बापाच्या प्रेमामुळे मिळो. मुलाच्या हातून एखादी चूक झाली तर आईला तो स्वत:चा अपमान वाटतो. पण बापाला, त्या चुकीचे परिणाम मूलालाच जास्त भोगावे लागतील याची चिंता वाटते. वार झाला तर आई जखमेवर फुंकर घालते. बाप वरच्यावर वार पेलुन धरतो. म्हणूनच बालवयात एखादं मूल आईच्या प्रेमाला पारखं झालं तर गाभार्‍यातली समई विझल्यासारखं वाटतं आणि त्या मूलाला जर बाप दुरावला तर त्याच देवळाचा कुणीतरी कळस काढुन नेल्यासारखं वाटत. म्हणुनच आईच्या मायेची शालीवर बापचं भरभक्कम ब्लॅकेट हवं. ...Read more

 • Rating StarDAINIK KESARI 13-07-1965

  खुसखुशीत कथांचा संग्रह... श्री. काळे हे एक यशस्वी कथालेखक आहेत. त्यांनी ‘नवरा’ या नावाभोवती गुंफलेल्या पंधरा कथा या संग्रहात आहेत. या सर्व कथांची गुंफण सांसारिक स्त्री आणि पुरुष यांच्याभोवती गुंफलेली आहे. .... प्रधान आणि खुसखुशीत गप्पा या कथा आहेत. ेखक सुरुवातीला एखाद्या रोजच्या सामान्य घटनेला घेऊन त्यातून आपल्या कन्येचा आशय प्रकट करतो. नवरा म्हणावा आपला’ या कथेत एका विवाहीत स्त्रीच्या भावना यासुद्धा लेखकाने मोठ्या खूशीने उलगडला आहे. ‘घरोघरी’ सर कथ्रेत मुंबईच्या पांढरपेश्या घरात रोज घडत असलेली ... शब्दबद्ध करून या कथेत मांडली आहे. ‘भांडण्यात मजा आहे’ या कथेत एका कारकून महाशयाला लोकलमध्ये एक गृहीणी दिसते आणि त्या मुलींना पुन्हा गुन्हा घडण्यासाठी हे महाशय काय करतात आणि कसे बेचैन होतात त्याचे वर्णन आहे. ‘श्रावणी सोमवार’ या कथेत एखादे दिवशी उपवास नसूनसुद्धा तोंडात पाणी पडायचे नसले तर दिवसभर कशा घटना घडून येतात. त्याचे चित्रण लेखकाने केले आहे. ते चित्रण काहीसे अतिशयोक्तीचे वाटते. प्रातिनिधिक कथाविश्व ‘आठ त्रिक चोवीस’ या कथेत प्रेम करणाऱ्या श्रीमंत नसलेल्या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात प्रेमाचा पाढा चुकल्यामुळे कसा फजितवाडा होतो त्याचे चित्रण आहे. ‘वसा-वसाचा वसा’ या कथेत पत्नीने कोणता वसा घेतला असता संसार सुखाचा होतो त्याचे खुमासदार पण अतिशयोक्तीचे वर्णन आहे. ‘किक् ’ या कथेत स्टार्ट न होणारी स्कुटर आणि माणसांचे स्टार्ट न होणारे मन प्रसंगाच्या किकमुळे कसे स्टार्ट होते त्याचे वर्णन आहे. ‘भित्यापाठी’ या कथेत मुंबईहून पुण्याला टॅक्स चुकवून रेडिओ नेण्याची भीती आणि त्या भीतीपाठी घडलेल्या अतिशयोक्तीपूर्ण घटनांचे वर्णन आहे. ‘किल्ली,’ ‘दोनच,’ ‘तूर्त दान महापुण्य’, ‘वह कौन थी’, ‘घास’, ‘मी दिवाळी अंक विकत घेतो’ या कथांत जीवनात घडणाऱ्या विविध प्रसंगाचे परिचित दर्शन वाचकाला घडते. लेखकाची भाषा सोपी असून त्याच्या अवलोकन शक्तीमुळे त्याचे हे कथाविश्व मर्यादित असले तरी बरेचसे प्रातिनिधिक झाले आहे. ...Read more

 • Rating Starश्रीराम कृष्ण बोरकर

  जीवनाचा अन्वय लावणाऱ्या धडपडीचे कौटंबिक चित्रण... मराठी कथाप्रदेशांतील बिनीच्या वीरांबरोबर दमदार आगेकूच करून श्री. वसंत पुरुषोत्तम काळे यांनी अवघ्या चार वर्षांत चार चढ पार केले. ‘‘नवरा म्हणावा आपला–’’ हा त्यांचा पांचवा चढ. चार वर्षांच्या अल्पावधीत पच कथासंग्रहांची पल्लेदार ‘चढण’ चढून काळ्यांच्या लेखणीने आपला ‘वेग’ जसा प्रगट केला तसाच मध्यमवर्गीयांच्या अगणित मनोव्यथांबद्दलचा ‘आयेग’ ही अपरंपार सहानुभूतीने शब्दबद्ध केला आहे. त्या व्यथा हाच प्रस्तुत संग्रहांतील पंधरा कथांचा चित्रण-विषय. मध्यमवर्गीय सुसंस्कृत थरांतील सुविद्य आणि तरुण स्त्री पुरुष, मुंबईच्या दोन खोल्यांतील त्यांचे चिमुकले संसार व त्या मर्यादित संसारांमील अमर्याद सुख-दु:खे हा काळे यांच्या अनुभूतीचा ‘कॅन्व्हॉस’ आहे; आणि तोच त्यांच्या कथेचाही आता एकमेव ‘परिघ’ होऊन बसला आहे. या ‘परिघां’तून काळ्यांची कथा बाहेर पडू इच्छित नाही. तथापि, त्याच ‘परिघा’चा अधिकाधिक सूक्ष्म छेद करण्याचा, तेथल्या खोल कडेकपारीतील सुप्त कण नेमके वेचून घेण्याचा मात्र तिचा यत्न आहे. तोही प्रतिभावंतांच्या परिपक्व जाणतेपणाने आणि कलावंतांच्या समर्थतेने. प्रस्तुत संग्रहांत त्या सामर्थ्याची प्रचीति येते. प्रपंचातील रोजच्या घडामोडींतून, हर्ष-खेदाच्या नित्य प्रसंगांतून जीवनाचा ‘शोध’ घेण्याची एक धडपड येथे जाणवते. या संग्रहामध्ये ‘मोठे संघर्ष’ किंवा ‘मोठे आघात’ असलेल्या कथा नाहीत’ ही गोष्ट प्रस्तावनेमध्ये लेखकाने अगोदरच कबूल करून टाकलेली असली तरी मोठ्या संघर्षाचा अभाव हा काही कथेच्या उणेपणाचा निदर्शक ठरू शकत नाही. उलट संघर्ष जेवढा मोठा तेवढे त्याच्या उगमामागील दु:खाचे स्वरूप प्राय: ढोबळ नि एकजिनसी असते. मध्यमवर्गीयांच्या जीवनांतले संघर्ष लहान आहेत हे अगदी खरे; पण ते सारे विशिष्ट भावनात्मक अंत:कलहां (इमोशनल कॉन्फिक्ट) तून प्रस्फूरित होत असल्यामुळे त्यांचे स्वरूप जसे सूक्ष्म व जटिंल आहे तसेच त्यांचे उगम आणि अन्वयार्थ उमजण्यास अवघड आहेत. वरवर क्षुल्लक, निरर्थक आणि सरावांतील वाटणाऱ्या अशा अनेक मानसिक व्यथांमधून एकमेकांशी संबद्ध असलेले भावनेचे अगोचर पदर काळे येथेही नेहमीच्या सहजतेने कधी उकलून व उलगडून दाखवितात नि कधी मोठ्या कलात्मकतेने सूचित करतात. एरवी अगम्य व अनाकलनीय वाटणाऱ्या घटनांमागील अर्थ एकदम कळल्यासारखा प्रत्यय याच ठिकाणी ते वाचकाला देऊन जातात. काळ्यांच्या कथेला अर्थपूर्णता किंवा हेतुगर्भता येते ती अशावेळीच. हे सारे पुष्कळदा नकळत घडून येते. संसारांतील गद्य, परिचित नि मामुली अशा अगणित घडामोडींमागे लपेटून असलेला मनोव्यापार काळे अचूक पकडतात व त्यात पुन्हा दडून असणारे -सूत्र’, ‘परंपरा’,किंवा ‘मूळ’ शोधण्याचा क्वचित् जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. (उदा. ‘किक्, ‘प्रमोद’) यालाच मी काळ्यांच्या कथासंदर्भात. ‘अन्वय लावण्याची शक्ति’ असे म्हणतो. ती शक्ति काळ्यांच्या ‘नवरा म्हणावा आपला’ मध्ये अधिक मुरब्बी व अधिक शोधकतेने प्रगट झाली आहे असे मला वाटते. म्हणूनच, येथे काळ्यांनी सादर केलेल्या ‘तुमच्या नि माझ्या’ दैनंदिन व्यथांतून, व्यथेतील दु:खबीज हळुवार मनानं व सदा कलात्मकतेच्या ‘पातळी’वर राहूनच फुलविले असल्याने त्यांना एक उंची प्राप्त झालेली आहे. त्या व्यथा जसं काहीएक सांगतात तसंच दु:खाच्या गाभ्याला हात घालून मनावर खोल परिणाम करतात. प्रस्तुत कथासंग्रहांतील प्रत्येक ‘व्यथा’ नवरा-बायकोची आहे. एका दृष्टीने यांना ‘संसार’ कथा म्हणायला हरकत नाही. संसारात हरघडी वाट्यास येणारे हर्ष-खेद, रागलोभ, हेवे-रुसवे आणि आशा-निराशा कधी नवरा सांगतो, कधी बायको. या कथनांत जसा प्रांजळपणा आहे. तशीच एक प्रकारची पोटतिडीक आहे. द्वेष आणि तिरस्कार काही तसा कुठलाही कडवटपणा नाही जे काही आहे ते सरळ, खरे, निरागस आणि निकोप चित्रण. त्या चित्रणामागे एक हळवे, सूज्ञ, सोशिक आणि चिंतनशील मन आहे आणि विलक्षण समजूतदारपणा हा त्या मनाचा ठळक गुण आहे. कंटाळा आला म्हणून स्वत:च्या घरांत बरे न वाटणारी अरुणा ‘ताई’च्या श्रीमंत घरी जाते नि तिथे फारच -बरं वाटतं म्हणून पुन्हा घरी परतते– (घरोघरी). नवऱ्याशी कडाडूनभांडून कामावर गेलेल्या वसूला ऑफिसमध्ये साहेबांची बोलणी निष्कारण सहन करावी लागतात तेव्हा तिला प्रेमांतल्या हक्काची एक वेगळीच जाणीव होते– (नवरा म्हणावा आपला.) आवडती भाजी केली नाही म्हणून बायकोवर संतापून न जेवताच उपाशी राहणाऱ्या नवऱ्याला संध्याकाळी बायकोच्या माणुसकीचे नवे दर्शन घडते. (श्रावणी सोमवार) मुलाने किल्ली हरवल्यामुळे तीन तास दाराशी रखडावं लागून बाप चिडतो. पण त्याचमुळे पाहुण्यांची ब्याद आपोआप टळते नि आपत्ति ही इष्टापत्ति ठरते (किल्ली)... अशा सामान्य घटनांतून कथेची बीजे सहज फुलविणाऱ्या कोळ्यांनी याच संग्रहांत ‘धुंडण्यात मजा आहे,’ ‘वसा वसा’चा वसा–’’ आणि भित्यापाठी’’ सारख्या मिश्कील आणि मजेदार कथाही सादर केल्या आहेत. त्यांत केवळ गम्मत आहे. ‘दोनच’ ही एक अतिशय चटकदार, गोडी धक्याचीनि बांधेसूद कथा आहे. – असा हा काळ्यांचा पांचवा संग्रह. जेवढा रंजक तेवढाच अंतर्मुख बनविणारा. काळ्यांची शैली प्रवाही, प्रसन्न आणि खेळकर आहे. घर ऑफिस, लोकलगाडी आणि हे नसेल तेव्हा मुंबईची चौपाटी किंवा रस्ता हेच काळ्यांच्या कथेचे संचा़रक्षेत्र. त्यांची कथा घाटदार नि आटोपशीर असते. कुठे थांबायचे. ते तिला बरोब्बर समजते. आकर्षकपणा आणि रेखीवपणा हा तिचा गुण. सहजता हा तिचा स्वभाव. पात्रांची अनावश्यक गर्दी आणि संवादाचा अतिरेक कित्येकदा असह्य होतो. चाळ, ऑफिस, गाडी आणि रस्ता येथील माणसांची गर्दी कथेतही घुसते. तेच्हस कथेतले मुख्य चेहरे हरवतात. काळ्यांच्या कथेला रचनेचा ‘घाट’ आहे पण कथा विषय बनलेल्या ‘पात्रां’चे व्यक्तिमत्त्व मात्र ‘घाटदार’ बनत नाही. त्यांना अवश्य तेवढे ‘शेअरिंग’ येत नाही. विविध भावछटांवर भाळणारी आणि प्रसंगांची नाना रंगी बेरंगी पिसे एकाच वेळी पकडण्याचा उपजत हव्यास असणारी काळ्यांची तरल नि तीक्ष्ण कल्पकताच त्यांना पात्रांवर ‘स्थिर होऊ देत नाही असे वाटते. परिणामी, काही वेळा त्यांची कित्येक पात्रे धुक्यांतून गेल्याप्रमाणे विरळ भासतात. असे काही दोष वगळले तर काळे यांच्याजवळ समर्थ कथाकारांचे सारे गुण प्रकर्षाने बसत असल्याची साक्ष या संग्रहामुळे अधिक ठळक बनते आणि वाचकांच्या अपेक्षा खचितच उंचावतात. ...Read more

 • Rating StarBAHUSHRUT

  ‘नवरा म्हणावा आपला’ हा कथासंग्रह प्रसिद्ध करून श्री. वसंत पुरुषोत्तम काळे यांनी आपल्या कथालेखनाच्या वाटचालीतला पाचवा विषयी टप्पा गाठला आहे! आपल्या सहजसुंदर, खेळकर कथेद्वारे काळे जेव्हा बोलूं लागतात, मध्यमवर्गीयांच्या दैनंदिन जीवनांतल्या छोट्या समस्याचे, वरून साध्या वाटणाऱ्या परंतु सामान्य माणसांच्या वृत्तीला व्यापून टाकणाऱ्या सुखदु:खाचे पापुद्रे जेव्हा आपल्या रसाळ आणि आकर्षक भाषा शैलीने उलगडू पाहतात. तेव्हा वाचकाला वाटू लागते, या कथाकाराची आणि आपली फार जुनी ओळख आहे! श्री. काळे यांच्या कथा हलक्याफुलक्या असतात. त्यांतले विषय कथाकाराच्या मर्यादित जगापलीकडे आणि आखीव चाकोरी बाहेर जात नाहीत. त्यांच्या भाषाशैलीला मानवी जीवनाचं किंवा वृत्तीचं खोलवर विश्लेषण करण्याचं गांभीर्य पेलत नाही. तरीही त्यांच्या कथांमध्ये जे घडतं, जे व्यक्त केलं जातं ते सगळं खरंखुरं असतं. ‘‘मी जी सांगतो आहे ती माझी सुखदु:ख आहेत. आणि तुमचीही’’ हे कथाकारांचे अव्यक्त आवाहन मध्यमवर्गीय वाचकाला पटतं, आवडतं आणि म्हणूनच दिलखुलास हसून तो काळ्यांच्या कथांमध्ये रंगून जातो. या संग्रहातल्या बहुतेक कथा लेखक आणि त्याचा छोटासा परिवार या वर्तुळांत फिरतांना दिसतात. ‘घरोघरी’सारख्या कथेंत नेहमीच्या चाकोरीला कंटाळलेल्या एका गृहीणीची व्यथा शब्दबद्ध करताना काळे एखाद्या तत्वज्ञांचा आव आणून म्हणतात ‘‘आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा, मला कापराचं जळणं आवडत नाहीं. कारण मागे काहीच उरत नाही. तसं जळणं नको. राखेच्या रूपानं कां होईना माग काहीतरी राहायला हवं. त्या राखेतूनच काहीतरी निर्माण होण्याची आशा असते.’’ अरुणेची व्यथा अशीच पुन्हा आशांकित होते आणि मग थोड्या वेळापूर्वी पको वाटणारी चाकोरी तिला आपलीशी वाटू लागते. ‘नवरा म्हणावा आपला’ ही सुद्धा एका व्यथित गृहीणीची कथा. सूर हरवलेल्या दिवसाची कथा. ही वैतागाची कहाणी काळे मोठ्या मिष्किल पद्धतीनं सांगतात. विशेष कारण नसतांना कधी कधी माणूस उगाचच चिडतो. पण एखादी गृहीणी अशी उगाचच चिडली की घरांतल्या वातावरणाचा मूड कसा बिघडतो, त्याचं हे वर्णन वाचतां वाचतां वातावरणाप्रमाणे वाचकही तंग होतो. परंतु ‘‘नवरा म्हणू नये आपला– पण छे नवरा आपलाच असतो.’’ या वाक्यानं काळे सभेवर येतात आणि वाचकाला हायसं वाटतं! श्रावणी सोमवार, वसावसा’चा वसा, मित्यापाठी, किल्ली, दोनच, घास, या कथाही अशाच चेहरा गंभीर ठेवून ओठांतल्या ओठांत हसवणाऱ्या! ‘‘श्रावणी सोमवार’’ या कथेत मिरच्यांची भाजी खायला आतुरलेले काळे, वसावसा’चा वसा या कथेत पृथ्वीवरील तमाम नवरे लोकांना, नको वसावसा ओरडूं नये म्हणून एक वसा सांगतात! अगदी कहाण्यांच्या रसाळ भाषेत! तर ‘भित्यापाठी’ या कथेंत नवीन रेडिओची खरेदी आणि त्याचा पुण्यापर्यंतचा खडतर प्रवास याचं खुसखुशीत र्वान करतात. ‘किल्ली’ या कथेंतली लेखकाची फजिती पाहून चुकचुकावं की त्या फजितीमागच्या विनोदाला हंसावं हेच कळेनासं होतं! ‘वह कौन थी’ ‘धुंडण्यात मजा आहे’ वगैरे कथांमध्ये काळे थोडेसवे घराबाहेर पडतात. पण हे बाहेर पडणं ऑफिस आणि घर यांच्यामधलंच असतं. इथंही त्यांची खेळकर शैली, विसंगत घटनांवर मार्मिकपणे बोट ठेवून त्यांतून विनोद निर्माण करणारा तिचा सुंदर ओघ मनाची पकड घेतो. काळ्यांच्या कथांमधल्या घटना आणि विषय गंभीर असले तरी त्यांच्या लेखनाचा पिंड विनोदी आहे हे पदोपदी जाणवते. दैनंदिन जीवनांतल्या अप्रिय घटनांकडे बघण्याची त्यांची दृष्टी चिडचिडी नाही. घटनांमधून ते गमतीदार अर्थ शोधतात. त्यांच्यावर खुसखुशीत भाष्य करतात. कधी भाष्य करण्याचा हा हव्यात उगाच वाढल्यासारखा वाटतो. दोन-दोन तीन-तीन परिच्छेद या हव्यासापोटी खर्ची पडतात. कधी त्यांची आवश्यकता असते कधी नसते. या भाष्यांमधली भाषा कृत्रिमतेचा वसा घेत येते. आणि त्यामुळे कथेवरही नकळत कृत्रिमतेची छाया पडते. पण काळ्यांच्या भाषेतील सहजसौंदर्यामुळे कृत्रिमता नाहीशी होते. एकंदरीत या सगळ्या कथांमधून होतं होतं ते काळ्यांचे भावदर्शी स्वप्नाळू ...... जीवनाकडे पाहायची निकोप, खेळकर आशावादी वृत्ती, जीवनाचा उपयोग हा रसिकतेनं घेणारे रंगेल व्यक्तिमत्व! ‘नवरा म्हणावा आपला’ हा काळे यांचा पाचवा कथासंग्रह. पहील्या चार कथांपेक्षा या कथाविश्वाची कक्षा व्यापक अशी अपेक्षा असणं साहजिक होतं. तसं झालेलं दिसत नाही. अगोदरच्या रचनेमधल्या त्याच ढोबळ कल्पना आणि यांच्या आवर्तात काळे अजूनही अडकताना दिसतात. मानवी जीवनाचा अधिक ....वेध घ्यायला त्याची लेखणी सरसावलेली नाही. आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात कथांना मोठाले संघर्ष नाहीत हीच व्यथा आहे. मोठाले संघर्ष नाहीत हीच एक व्यथा आहे. मोठा आघात सहन करण्यासाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असून लहान आघात एकट्याने सहन करण्यासाठी असतात. त्यांत भागीदार नाहीत. मनाला थांबतो खेचतो- पण सावरतो. नव्या उमेदीने प्रवास चालू होतो, चालू ठेवावा लागणाऱ्या त्या वाटेवरच्या या व्यथा. त्यांच्या या कथा. हे खरं असलं तरी हे झालं सारं माणसांबद्दल. जीवनांतले मोठे आघात हे त्यांचा अर्थ लावायला, त्यांतला सूर ओळखायला काळ्यांची लेखणी समर्थ आहे. आणि म्हणूनच मानवी जीवनांतील अथांग व मोडीशी झुंज द्यायला तिनं कच खाऊ पुढील कथासंग्रहांत श्री. काळे या लेखणीचा अधिक व्यापक संसार पहायला-वाचायला मिळेल अशी रसिकांनी आशा केल्यास ती गैर ठरणार नाही. -वंदना विटणकर ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more