* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CRIMINALS IN UNIFORM
  • Availability : Available
  • Translators : MUKUND KULE
  • ISBN : 9789392482991
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2022
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`CRIMINALS IN UNIFORM` IS AN INTERESTING DISCOVERY OF THE SENSATIONAL INCIDENT IN THE FINANCIAL CAPITAL OF THE COUNTRY. AN UNKNOWN SCORPIO FILLED WITH EXPLOSIVES APPEARS INFRONT OF THE COUNTRY’S RICHEST MAN’S MANSION & THUS THE GAME OF POLITICS STARTS BETWEEN NATIONAL & REGIONAL INVESTIGATION AGENCIES. OFFICER MAHAVIR TOMAR RELIES ON MONEY LAUNDERING FOR THE SAKE OF AMBITION AND FOR THE SAKE OF MONEY. HE FORMS THE TEAM OF POLICE PERSONNEL. DESPITE THE LAW, THE SECURITY APPARATUS, THE MONSTROUS IDEAS ARE ADOPTED ... HE LIVES PROUDLY WITHOUT LEAVING ANY EVIDENCE BEHIND ... FINALLY, ONE DAY, HE IS EXPOSED ...
देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ माजवणाNया घटनेचा ‘आंखो देखा हाल’रंजक अविष्कारात...प्रत्यक्ष कुबेराचाच वरदहस्त असलेला कुबेर... ‘कुबेरिया’ या त्याच्या अलिशान निवासासमोर एक अज्ञात स्कॉर्पिओ आढळते आणि सुरू होतं उत्सुकता आणि थरारानं भरलेलं नाट्य... तरुण मुंबई पोलीस आयपीएस अधिकारी महावीर तोमर आयुक्तपदाच्या अति महत्त्वाकांक्षेपोटी, पैशांच्या हव्यासापोटी पैसा वसुलीतंत्र अवलंबतो. हाताखालच्या पोलीस कर्मचाNयांची गुन्हेगारी टीमच बनवतो...कायदा, सुरक्षायंत्रणांनाही न जुमानता राक्षसी कल्पना अवलंबतो...एकही पुरावा मागे न ठेवता तो मगरूरपणे जगत असतो... अखेर एके दिवशी पर्दाफाश होतोच... हा पोलीस आयुक्त कायद्याच्या अक्राळ-विक्राळ जबड्यात सापडतोच...! कसा...? कुठे...? जाणून घेऊ या... ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’मधून.
PRESTIGIOUS SAHITYA ACADEMY AWARD FOR BEST NOVEL

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #SANJAYSINGH #RAKESHTRIVEDI #MUKUNDKULE #MUMBAIPOLICE #MARATHIBOOK #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तक #संजयसिंग #राकेशत्रिवेदी #मुकुंदकुळे #मुंबईपोलीस
Customer Reviews
  • Rating StarDAINIK KESARI 03/07/2022

    आपल्या दैनंदिन भावविश्वाच्या पलीकडे असे जग आहे, जिथे सतत काही ना काही घडत असते. नवीन उलथापालथ होत असते. घटना घडल्यानंतर त्याचा आढावा प्रसारमाध्यमांद्वारे घेऊन आपण पुन्हा आपल्या कामांकडे वळतो. वरवरचं दिसणं सोडलं तर अंतर्गत घडामोडी किती खोलवर परिणाम करात, त्यात नाहक कसे बळी पडतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी हे दोन्ही लेखक ज्येष्ठ गुन्हे शोध पत्रकार असून यांनी शोध पत्रकारिता करून अनेक हाय प्रोफाइल्स गुन्हे उघडकीस आणले आहेत. या लेखकद्वयींचं पहिलं पुस्तक ‘तेलगी स्कॅम’ खूप गाजलं. या पुस्तकाच्या यशानंतर आता हे लेखकद्वयी वाचकांसाठी रोमांचक, थरारक अशी कहाणी घेऊन आले आहेत. ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ ही कादंबरी चित्तथरारक अशी खाकी वर्दीची कहाणी आहे. मूळ कादंबरी हिंदी भाषेत आहे. त्याचा मराठी अनुवाद मुकुंद कुळे यांनी केला आहे. कादंबरीतील कथानक मुंबई परिसरात घडतं. कादंबरीचं निवेदन तृतीयपुरुषी असून पात्रांच्या संवादातून कथानक आणखी रंजक होत राहते. कादंबरीची सुरुवात होते एका ब्रेकिंग न्यूजने. भारतातील सगळ्यात श्रीमंत आसामी कुबेर. कुबेरच्या घराबाहेर म्हणजे कुबेरियाबाहेर एक स्फोटकांनी भरलेली बेवारस गाडी आढळते आणि तिथून सुरू होतं थरारनाट्य. या प्रकरणी पोलीस दल, बॉम्बशोध पथक, मीडिया सगळे जमा होतात. ही कसे पाहण्यासाठी १७वर्षांपूर्वी पोलीस दलातून निलंबित केलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक यतिन साठेला पाचारन केले जाते आणि त्याला सीआययूचा प्रमुख केले जाते. या प्रकरणाची चौकशी एटीएस, एनआयए, मुंबई पोलीस या सर्वांकडून सुरू होते. एक प्रकारे त्यांच्यात स्पर्धा सुरू होते. कथानकातील प्रसंग वर्तमानातून भूतकाळात पुन्हा वर्तमानात अशा पद्धतीने घटनांची मांडणी केलेली आहे की, वर्तमानातील घटनेचा भूतकाळाशी असलेला संबंध अधोरेखित होतो आणि कथानक जसजसे पुढे जात राहते तसतसे अनेक गोष्टींचा उलगडा होतो आणि वाचकांची उत्कंठा वाढत राहते. या गाडी प्रकरणात आणखी एक प्रकरण घडतं ते म्हणजे हसमुख जैन हत्या प्रकरण. या प्रत्येक घटनेनंतर साठेच्या संशयास्पद हालचाली सगळ्यांच्या नजरेत येतात. खरेच या सगळ्यामागे यतिन साठेचं नियोजन होतं का? हे करून त्याला काय मिळणार होतं? का यामागे खरा सूत्रधार कोणी वेगळा आहे? हे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. या पुस्तकात अनेक सरकारी यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा याविषयी उल्लेख आहे. या यंत्रणांच्या कामकाजाची, नियोजनाची माहिती यातून कळते. कादंबरीत अनेक पात्रे प्रसंगानुरूप भेटतात. मुंबई पोलीस आयुक्त महावीर तोमर हा अत्यंत महत्त्वाकांक्षी अधिकारी. त्याने आपल्या पदाच जोरावर वसुलीतंत्र सुरू केलेलं असतं. तोमर आपल्या पदाचा गैरवापर करून कसे खेळ खेळतो आणि इतरांना अडकवतो पण खरे काय आहे? या प्रकरणाचा सूत्रधार कोण? या गुन्ह्यामागील नेमका हेतू कोणता? तो सूत्रधार सापडतो का? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. एखाद्या गुन्ह्यामागे कसे नियोजन केले जाते आणि आपल्या हाताखालील वक्तींचा प्याद म्हणून कसा वापर केला जातो? आणि प्रकरण अंगाशी आल्यावर स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी कसे दुसऱ्याला उद्ध्वस्त केलं जातं. हे वास्तव यात मांडले आहे. पोलीस दलात ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ ही टीम कोण तयार करते, हा प्रश्न उद्भवतो. ही केस कशा पद्धतीने सोडवली जाते. त्यामागची प्रक्रिया कशी असते. हे वाचताना एखाद्या चित्रपटाची कथा वाचतोय की काय असे भासते. एक प्रकारचं थ्रिल याद्वारे अनुभवता येतं. या पुस्तकाद्वारे कोणत्याही यंत्रणेला बदनाम करण्याचा हेतू नाही. पण काही व्यक्तींमुळे संपूर्ण यंत्रणा कशी बदनाम होते, यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीत यतिन साठी सोबतच सतत उल्लेख येतो तो गुन्हे शोध पत्रकार संजय त्रिवेदी यांचं. तो ही या प्रकरणातील दुवे कसे शोध्तो. हे समजते. यातील बाकीची पात्रे गृहमंत्री सरदेशपांडे, कुबेरचा मुख्या सुरक्षारक्षक अमन चौधरी, निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप वर्मा, एटीएसचा प्रमुख पलांडे, पोलीस निरीक्षक नित्या, आर्य, रोहतगी, जितेंद्र नागपुरे, महेश भोर, शिक्षा भोगणारा पोलीस गजानन झेंडे, कुबेर, कुबेरचा मुलगा ध्रुव, संचिनी, नीना डायस या सगळ्या पात्रांचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन जाणून घेण्यासाठी ही रोमांचक आणि थरारक कादंबरी नक्की वाचा. लेखकद्वयी यांना गुन्हे शोध पत्रकारितेचा ४० वर्षांचा अनुभव आहे. अनेक प्रकरणं त्यांनी जवळून अनुभवली आहेत. अनेक प्रकरणं मिडियासमोर आणले आहेत. त्या निरीक्षणातून, कामाच्या अनुभवातून या कादंबरीची निर्मिती झाली. या कादंबरीच्या आकृतिबंधामुळे ही कथा त्यांना विस्तृतपणे आणि रंजकतेने वाचकांसमोर आणता आली. कादंबरी नक्की वाचा आणि अनुभवा ‘कहाणी खाकी वर्दीची’. – अस्मिता प्रदीप येंडे ...Read more

  • Rating Starमंदार परब , वरिष्ठ पत्रकार

    Both writers Sanjay & Trivedi do not have Marathi as their mother tounge.  And even before in the laungage of their mother tounge (hindi) and commercial launagge English…. They have published book first in Marathi. Hindi & English edition are still aaited. I think they are targeting lower rank of police (constables to Inspector level) for a potential reader for their book. Even though names changed, If I as lay-man knows it then every policeman in Maharashtra will know who are the charecters they are reading about. Is it so difficult to guess the difference between Parambir & Mahavir ??? ...Read more

  • Rating Starव स शेट्टी

    देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते. कथानकाचं वृत्तपत्र आणि टीव्हीवर पाहिलेल्या बातम्यांशी साधर्म्य आहे.तरीही अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. लेखक संजय सिंह आणि राकेश त्रिवेदी यांनी अनेक छुुपे संदर्भ शोधलेत. लोकांन या गोष्टींची कल्पनाच नव्हती. अनेक गुढ गोष्टींना पुढे कथानक वेगानं पुढे घेऊन जातं. त्यामुळं उत्कंठता शेवटच्या पानापर्यंत कायम राहते... ...Read more

  • Rating StarGeeta

    The story is extremely fast-paced and racy. Each chapter carries a certain amount of shock value for the reader. The way an onion reveals its layers as you slowly peel it, similarly four linear stories are revealed one by one at regular intervals. fter each layer of the story is revealed, the truth comes to light, igniting all the senses of the reader. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर