* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619269
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1990
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MAHADEO MORE COMBO SET - 19 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PEOPLE WERE GATHERING IN GROUPS WHILE TALKING AT THE HIGHEST PITCH. WITHIN AN HOUR THE NUMBER CROSSED A THOUSAND THOUGH NO ONE HAD PARTICULARLY GIVEN A CALL. IT TURNED INTO A HUGE MARCH. “STOP THIS ‘ROAD-BLOCK’!” “SAVE NIGAVANI!” “SHAME ON AGITATION!” PEOPLE WERE FED UP AND HENCE WERE JOINING IN TO SHOW THEIR SUPPORT. THIS CONTINUOUSLY SWELLED UP THE SIZE OF THE MARCH. NOW, IF THE FARMERS FROM SANGRAM NAGAR AND THESE PEOPLE COME FACE TO FACE THEN SURELY THERE WOULD BE A GREATER TROUBLE. PEOPLE ON BOTH THE SIDES ARE EXTREMELY DISSATISFIED AND ANGRY. NO ONE CAN TELL THE END RESULT.
लोक घुपळ्या घुपळ्याने जमत होते... सभेत भाषण दिल्यागत तावातावाने बोलत होते..तासाभरातच तेथे तीन-चार हजारांचा जमाव जमला! कुणी हाकारे-कुकारे न घालता एक प्रकारच्या चिडीने लोक जमले होते... जमत होते...आणि मग हा मोर्चा निघाला... ‘रास्ता रोको’ हटाओ...‘निगवणी बचाओ!’‘आंदोलनाचा...’‘धिक्कार असो!’वैतागलेले नागरिकही या मोर्चात अधे-मधे रस्त्यात सामील होत होते व मोर्चाची लांबी आणखीन फुगीर करीत होते. हे मोर्चातील नागरिक व संग्रामनगरातील शेतकरी आमनेसामने आले तर कदाचित अनावस्था प्रसंग ओढवेलही! कारण दोन्हीकडील लोक चिडलेत, खवळलेत! काय होईल सांगता येत नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ZOMBADA #ZOMBADA #झोंबडं #FICTION #MARATHI #MAHADEOMORE #महादेवमोरे "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    श्री महादेव मोरे यांची ‘झोंबड’ ही कादंबरी एकाच विषयाला धरून लिहिलेली नाही. त्यांनीच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कादंबरीतील रूढसंकेत व ठोकताळ्यांना बगल देऊन कादंबरीच्या फॉर्ममध्ये काही वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात हे वेगळं देताना अनेक विष एकत्र आल्याने सुसूत्रतेचा अभाव या कादंबरीत जाणवल्यावाचून राहत नाही. मुळात कादंबरीचा विषय विडी कामगारांचा. विडी कामगारांचे प्रश्न हाताळून एक युनियन पुढारी जन्माला येतो हे खरं. तो जन्माला येणं हेच जर दर्शवायचं होतं तर विडी कामगारांचा प्रश्नांना कादंबरीची पन्नास एक पृष्ठ खर्ची घालायचं कारण नव्हतं, त्यानंतर जोगतिणीचे प्रश्न. शेवटी तंबाखूचे भाव वाढवून मिळावेत म्हणून होणारं आंदोलन. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची रेलचेल भरपूर. ती पात्रं वास्तविक जगातील कुणावरून बेतलेली आहेत हे सहज ओळखता येतील, इतकं त्यांच्या नावाशी असलेले साधम्य जाणवतं. आता उदाहरणंच द्यायची झालीत तर कादंबरी न वाचताही ओळखता येतील. अशी काही नावे डॉ. आबा आडारकर, समाजवादी कार्यकर्ते. एक गाव एक मसणवटाचे प्रणेते ग. बा. हेगडे. संपादक, पत्रकार त्यांचे चार चार दिवाळी अंक उमेश कुलकर्णी - बटाटा आंदोलन कुलकर्णी आणि जोशी उदंड असल्याने नाव लगेच समजून येणार नाही, पण शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे एखादे दुसरेच जोशी असतात, तर अशी अनंत पात्र कादंबरीत आहेत. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. निगवणी गावातील विडी कामगारांचे, यात स्त्रियांचा भरणा जास्त. प्रश्न हाताळण्यासाठी एका कॉलेजातील प्रा. सतीश कुलकर्णी हे पुढाकार घेतात, त्यात यशस्वी होतात. त्यांचं नाव होतं. ते युनियन पुढारी म्हणून उदयास येतात, त्यामुळे ज्यावेळी जागतिणी भगिनीचं अधिवेशन घेतलं जातं, त्यावेळीही सतीश कुलकर्णीला आपोआपच मान मिळतो. त्यानंतर तंबाखू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संघटना करावी आणि त्यांना तंबाखूचा रास्त भाव मिळावा. यासाठी प्रयत्न सुरू होतात. धरणं मोर्चा, आंदोलन, रास्ता रोको अशा वाटेने जात कादंबरी शेवटी अशा निष्कर्षाप्रत येते. कशा ते लेखकाच्याच शब्दातून वाचा. ‘‘खरं सत्य आहे तरी काय मग ?’’ ‘‘ते सारं अशा ओझरत्या भेटीत सांगून संपणार नव्हे, तो एक स्वतंत्र व्याख्यानाचाच विषय आहे म्हणा ! थोडक्यात म्हणजे दोन तालेवारांमधील झोंबडं. हेच केवळ त्यात सत्य आहे ! भारतातील कुठल्याही भागात जा, तिथं बुडाखाली बक्कळ पैसा असलेले निदान दोन तालेवार तरी असतातच व पैशाच्या जोरावर समाजकारण, राजकारण करण्याचं निमित्त करून त्यांचं कायम झोंबडं चालू असतं. एकमेकांवर मात करावयाची बंधनं म्हणून हे लोक माणसं वापरत असतात. काही इकडे असतात काही तिकडे असतात. हे ‘छू’ घालतात. त्याच्या त्याच्यात आणि झोंबड लावून रिकामे होतात. एखाद्याकडील हरला की, दुसरा विजयोन्मादाने थय-थय नाचायला लागता, तोवर पराजित मनात काही डावपेच ठेवून परत त्याला भिडतो ! सुटलं-सुटलं. संपलं-संपलं, असं वाटतंय तोवर परत झोंबडं सुरु होतं ! त्यात वेगळं काय नाही गायकवाड ! लोकशाही भारतात किंवा भारतातील तथाकथित निरोगी लोकशाहीत आढळणारी रोजाना स्टोरी आहे ही ! इथं एका भिडूचं नाव आहे जयपुरीया, तर दुसऱ्याचं जीवजी भाय ! आणि ह्यांचं हे झोंबडं दोघातील कुणी एक ‘संपेल’ तेव्हाच खऱ्या अर्थानं संपायचं !!’’ इतं कादंबरी संपली आहे. खरं तर दोन-तीन विषय एकत्र घेऊनही कादंबरी छानचं रंगली असती. कादंबरीचा आवाका मोठा, परंतु वास्तव जगातील पात्रांना कादंबरीत घुसडण्याचा अट्टाहास केल्यानं विषयाची कुतरओढ झाली आहे. वास्तविक जगातील पात्रं त्यांच्या त्यांच्या परीनं कार्य करीत आहेत. त्यांच्यातही गुणदोष आहेत. पण त्या सगळ्या पात्रांना कादंबरीत आणल्यानं विषयांतर होत राहून वाचकाची मुख्य विषयापासून ताटातूट होत राहिल्यानं रसभंग होतो. डॉ. सुनील अचलापूरकर याला बोकड छापदाढी कशासाठी ? तर केवळ वास्तव पात्राची ओळख पटावी म्हणून. एकंदरीत ‘झोंबडं’ ही कादंबरी वेगळ्या विषयावरील असूनही घाईघाईत लिहिल्यासारखी वाटते. अर्थात ग्रामीण वाचकांना ही कादंबरी आवडायला हरकत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more