* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE BONES OF GRACE
  • Availability : Available
  • Translators : SARITA ATHAWALE
  • ISBN : 9789353173760
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 384
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :TAHMIMA ANAM COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FROM THE AWARD-WINNING, NATIONALLY BESTSELLING AUTHOR OF A GOLDEN AGE AND THE GOOD MUSLIM COMES A LYRICAL, DEEPLY MOVING MODERN LOVE STORY ABOUT BELONGING, MIGRATION, TRAGEDY, SURVIVAL, AND THE MYSTERIES OF ORIGINS. ON THE EVE OF HER DEPARTURE TO FIND THE BONES OF THE WALKING WHALE—THE FOSSIL THAT PROVIDES A MISSING LINK IN OUR EVOLUTION—ZUBAIDA HAQUE FALLS IN LOVE WITH ELIJAH STRONG, A MAN SHE MEETS IN A DARKENED CONCERT HALL IN BOSTON. THEIR CONNECTION IS IMMEDIATE AND INTENSE, DESPITE THEIR DIFFERENCES: ELIJAH BELONGS TO A PROTOTYPICAL AMERICAN FAMILY; ZUBAIDA IS THE ADOPTED DAUGHTER OF A WEALTHY BANGLADESHI FAMILY IN DHAKA. WHEN A TWIST OF FATE SENDS HER BACK TO HER HOMETOWN, THE INEVITABLE FORCE OF SOCIETY COMPELS HER TO TAKE A VERY DIFFERENT PATH: SHE MARRIES HER CHILDHOOD BEST FRIEND AND SETTLES INTO A TRADITIONAL BANGLADESHI LIFE. WHILE HER FAMILY IS PLEASED BY HER OBEDIENCE, ZUBAIDA SEETHES WITH DISCONTENT. DESPERATE TO FINALLY FREE HERSELF FROM HER FAMILIAL CONSTRAINTS, SHE MOVES TO CHITTAGONG TO WORK ON A DOCUMENTARY FILM ABOUT THE INFAMOUS BEACHES WHERE SHIPS ARE DESTROYED, AND THEIR REMAINS SALVAGED BY LOCALS WHO DEPEND ON THE GOODS FOR THEIR SURVIVAL. AMONG THEM IS ANWAR, A SHIPBREAKER WHOSE STORY HOLDS A KEY THAT WILL UNLOCK THE MYSTERIES OF ZUBAIDA’S PAST—AND THE POSSIBILITIES OF A NEW LIFE. AS SHE WITNESSES A SHIP BEING TORN DOWN TO ITS BONES, THIS WOMAN TORN BETWEEN THE SOCIAL MORES OF HER TWO HOMES—BANGLADESH AND AMERICA—WILL BE FORCED TO STRIP AWAY THE VESTIGES OF HER OWN LIFE . . . AND MAKE A CHOICE FROM WHICH SHE CAN NEVER TURN BACK.
झुबेदा- बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात मोलाची कामगिरी केलेल्या, एका लब्धप्रतिष्ठित जोडप्याची दत्तक मुलगी. आपल्या जन्मदात्यांची पाळेमुळे जाणून घेण्याचा पराकोटीचा ध्यास घेऊन आत्मशोधाच्या प्रवासाला निघालेल्या झुबेदाची ही कहाणी. झुबेदा हार्वर्ड युनिव्हर्सिटीत जीवशास्त्राचे शिक्षण घेत असते. इथेच तिची एलिजा या तरुणाशी गा` पडते आणि ती त्याच्या प्रेमात पडते. शिक्षणादरम्यान उत्खननाची संधी मिळालेली असतानाही, ते काम अर्धवट सोडून तिला मायदेशी परतावं लागतं. निराश मनःस्थितीत कुटुंबाच्या दबावाखाली तिला बालमित्राशी- रशीदशी लग्न करावं लागतं. आपल्या जन्मदात्यांच्या शोधासाठी. झुबेदाला कोणत्या दिव्यातून जावं लागतं आणि तिला त्यासाठी नात्यांनाही कसं पारखं व्हावं लागतं, याचं वास्तव चित्रण करणारी कादंबरी आहे, ‘द बोन्स ऑफ ग्रेस.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #दबोन्सऑफग्रेस #तमिमाअनम #कादंबरी #सरिताआठवले #नांदी #उत्खनन #पुनर्मिलन #प्रॉस्पेरिटी #शिपब्रेकिंगकंपनी #अन्वरचीकर्मकहाणी #तुझेआगमन #आईचाशोधघेताना #पुन्हाएकदाग्रेस #अंतिमसत्य #झुबेदा #डायना #पॅकीसीटस #जींजरीच #गिंजरीच #टेथिससमुद्र #डिडॅगबलोच #खोंडकरव्हिला #बेलाल #गॅब्रिएल #एलिजा #रशीद #अन्वर #मेघना #मोहना #MARATHIBOOKS# ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarTARUN BHARAT BELGUAM 22.3.20 / SATISH GAVKAR

    झुबेदाच्या आत्मशोधाची व्यामिश्र कहाणी... झुबेदा बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात मोलाची कामगिरी केलेल्या, एका लब्धप्रतिष्ठित जोडप्याची दत्तक मुलगी. आपल्या जन्मदात्यांची पाळेमुळे जाणून घेण्याचा पराकोटीचा ध्यास घेऊन आत्मशोधाच्या प्रवासाला निघालेल्याझुबेदाची ही कहाणी. झुबेदाची हार्वर्ड युनिव्हर्सिटीत जीवशास्त्राचे शिक्षण घेताना मुक्त जीवनशैलीशी ओळख होते. इथेच तिची एलिजाशी गाठ पडते. तिच्या प्राणप्रिय एलिजाला, तिच्या या आत्मशोधाच्या प्रवासाची कहाणी तिने ‘द बोन्स ऑफ ग्रेस’ या प्रदीर्घ पत्रातून सांगितली आहे. या प्रदीर्घ पत्राचा मराठीत अनुवाद केला आहे. सरिता आठवले यांनी. मराठी अनुवादाचं शीर्षक आहे ‘झुबेदा’. झुबेदाच्या या पत्रकहाणीत एक व्हेल, एक जहाज, एक पियानो, भरकटलेला पण भानावर आलेला प्रियकर आणि त्याची हतबल झालेली प्रेयसी यांच्या व्यथांचाही गुंता आहे. अमेरिकेची आधुनिक आणि बांगलादेशाची परंपरावादी संस्कृती यांच्या संघर्षात भांबावून गेलेल्या प्रतिष्ठित घराण्यातील दत्तक मुलगी असलेल्या झुबेदाला एलिजाच्या संपन्न अमेरिकन वंशवृक्षाचे अप्रूप वाटते. शिक्षणाच्या दरम्यान तिला पाकिस्तानात एका जीवश्माच्या उत्खननाची संधी मिळते. काही अकल्पित घटनांमुळे हे उत्खनन अर्धवट टाकून तिला मायदेशी परतावे लागते. या अयशस्वी मोहिमेनंतरच्या निराश मन:स्थितीत कुटुंबाच्या दबावाखाली ती बालमित्राशी - रशीदशी लग्न करते. या सगळ्या घडामोडींमुळे तिचे खरेखुरे प्रेम तिला विसरून जावे लागते. पण स्वत:चे वादग्रस्त जन्मरहस्य उलगडताना सासरच्या ख्यातनाम घराण्याची प्रतिष्ठाही तिला पारखी होते. घरच्या भुकेल्या तोंडात चार घास घालण्यासाठी, नौकाविखंडनाचे खडतर, प्रसंगी जिवावर बेतणारे काम, नाइलाजाने पत्करणाऱ्या अशिक्षित मजुरांपैकी अन्वर, अचानकच झुबेदाच्या जीवनात येऊन ठेपतो आणि तोच तिच्या घराण्याचा शोध घेण्यात महत्त्वाचा दुवा ठरतो. पण नशिबाच्या फेऱ्यात सगळेच अडकतात. झुबेदा,रशीद, एलिजा, अन्वर, मी आणि शौना. झुबेदाच्या जन्मरहस्याच्या धाग्यादोऱ्याची गुंफण म्हणजे ‘द बोन्स ऑफ ग्रेस.’ ग्रेस हे पंचतारांकित जहाज व झुबेदाचे सुखवस्तू आणि प्रतिष्ठित आयुष्य यांच्यातील साम्यस्थळे तहमिमा अनमच्या रचनाकौशल्याने, प्रकर्षाने जाणवतात. कॅप्टनची आत्महत्या आणि जहाजावर झालेला साथीच्या रोगाचा उद्रेक यामुळे ग्रेसला विखंडनाच्या निर्णयाला सामोरे जावे लागते. दिमाखदार ग्रेसचे वैभव दर दिवसागणिक ओरबाडले जात असताना अमेरिका आणि बांगलादेशातील सांस्कृतिक तफावत झुबेदाला न परतीच्या एकाकी वाटेवर नेऊन सोडते. झुबेदा, एलिजाविषयी वाटणाऱ्या वेड्या प्रेमात स्वत:ला झोकून देते आणि आपल्या जन्मदात्या आई-वडिलांच्या शोधात एलिजाचे भावुक प्रेम आणि रशीदची जन्मभराची साथही गमावते. कादंबरीच्या भाषेचा आत्मकेंद्रित स्वर नायिकेच्या चढेल व्यक्तिमत्वाशी सुसंगत वाटतो आणि त्यामुळेच तिच्या जन्मदात्रीच्या, जुळ्या बहिणीच्या व बहिणीच्या प्रियकराच्या अन्वरच्या विकल आयुष्यांची कहाणीही अधिकच भेसूर वाटू लागते. अमेरिकेतील मुक्तजीवन, आशियातील दहशतवाद आणि बांगलादेशातील सामाजिक असमतोलाचे यथार्थ वर्णन करण्यात तहमिमा अनम कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. कादंबरीची कथा उलगडत जाताना, पेरलेले अनेक धागेदोरे शेवटी सुसूत्रपणे गुंफण्याचे अप्रतिम कौशल्य लेखिकेला साधले आहे. चार सहा वाक्यात सामावलेल्या या कथावस्तूचा व्यापक आविष्कार तहमिमा अनमच्या भाषेच्या सक्षम हाताळणीने नटला आहे. त्यामुळेच ‘द बोन्स ऑफ ग्रेस’ अर्थात ‘झुबेदा’ ही प्रदीर्घ कादंबरी वाचनीय ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more