* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL REALISTICALLY PRESENTS THE CURRENT PROBLEMS OF RURAL UNTOUCHABLES. ON ONE HAND ONE MEETS DEVA MAHAR- A RESPRESENTATIVE OF THE LAST GENERATION WHICH NATURALLY ACCEPTED AND SUFFERED THEIR DESPICABLE POSITION IN THE SOCIETY AND ON THE OTHER TUKAR.
एका शहरात हरिजनवाडा जाळला गेला. त्यात दोन माणसं मृत्युमुखी पडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना अनेक गावांमधून घडत गेल्या. ही घटना लेखक रणजित देसाई यांच्या मनाला व्यथित करून गेली. त्यांनी गावोगाव फिरून अशा घडलेल्या घटनांचे तपशील मिळवले आणि त्यातून साकार झाली ’समिधा’... सामाजिक विषमता, जातिवाद यांनी समाज पोखरून टाकला आहे. अनेक निष्पापांचे जीवन यातून उद्ध्वस्त झाले आहे. अशा उद्ध्वस्त मनांची व्यथा मांडणारी कादंबरी ’समिधा.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarManjusha Raut

    व्वा....सुंदर.

  • Rating StarPushkraj Ghatge

    आजपर्यंत मी वाचलेली विलक्षण अशी कादंबरी म्हणजे समिधा... अस्पृष्यतेवर केलेले जळजळीत भाष्य म्हणजे समिधा... मे 2016 मध्ये मी रणजीत देसाईंच्या शेकरा, बारी,समिधा,लक्षवेध,पावनखिंड,प्रतीक्षा या कादंबर्या सलग 4 दिवसांत वाचल्या होत्या पण त्यात मनाला भावल्यात्या दोनच कादंबर्या- प्रतीक्षा आणि समिधा... ...Read more

  • Rating StarDarshana Chaphekar

    `अस्पृश्यता` हा हिंदू धर्माला लागलेला कलंक. त्यामुळे दलितांवर नेहमीच अपमानीत जीवन जगण्याची वेळ आली. शहरापेक्षा ग्रामीण भागातील दलितांना अधिक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंपरागत अन्याय-अत्याचाराला विरोध करणार्या दलितांना कोणत्या प्रकारच्या संकटांना ामोरे जावे लागते याचे प्रभावी चित्रण `समिधा`मध्ये आढळते. "समिधा"वाचून सुचलेले थोडे..... "पापींच्या जगात जळणारी समिधा वेचित चालले मी वणव्यातला निखारा धर्माचा कलंकी अस्पृश्य नाव देती माणूस जन्मताही अवहेलना करीती लाचार हे जीवन कसा गुजारा करावा वेचित चालले मी, वणव्यातला निखारा बाईची अब्रु लुटली निर्दोष सारी सुचली खऱ्या ची मान झुकली खोटे मानाने हसती निर्दयी माणसात कंठ सत्याला फुटेना वेचित चालले मी, वणव्यातला निखारा उद्ध्वस्त करा सारे घरदार ही जाळा संपवून आम्हा तुम्ही शांती द्या जीवाला अपमानी जगण्याचा राहिला तिटकारा वेचित चालले मी, वणव्यातला निखारा स्वातंत्र्य आणि समता पुस्तकाची भाषा ह्या समाजात नसे हक्क आणि जागा पापींच्या जगात जळणारी मी समिधा वेचित चालले मी, वणव्यातला निखारा" ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more