* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANDRA, THE SARASWATI SAMMAN WINNER FOR 2010, IS ONE OF THE MOST ACCLAIMED EPIC NOVELS OF BHYRAPPA. THOUGH IT TAKES ITS THEME FROM THE CLASSICAL QUESTION OF ART VERSUS MORALITY, MANY MORE SUBTLER AND COMPLEX ISSUES HAUNTING HUMAN LIFE ARE MARVELOUSLY INTERWOVEN. ROOTED DEEPLY IN THE HARSH REALITIES OF THE WORLD, THE GOVERNING THEME EVOLVES LIKE A BANYAN TREE IN ALL DIRECTIONS AND PICTURES MANY HOME-TRUTHS THAT ARE INSEPARABLE WITH ART, ARTIST, ART-TRADITION, ART-CRITICISM AND THE WORLD OF CONNOISSEURS.
किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, `कलेच्या क्षेत्रात यानं आपल्याला स्वर्ग भेटवला! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास?` ‘मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो!’ कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस्. एल्. भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून!
के.के.बिर्ला फौंडेशन तर्फे २० व सरस्वती सन्मान २०१०

No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarDarshana Chaphekar

    कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस.एल.भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून !

  • Rating StarPriyanka Deshpande

    #मंद्र -एस. एल. भैरप्पा. मी वाचलेलं एस. एल. यांचं पहिलं पुस्तक. खरं तर लायब्ररी मधून एस. एल. याचं असल्यामुळे, translated आणि मेहता पब्लिकेशन हे वाचून आणल. पहिली 2 3 पानं आणि मलपृष्ठ वाचलं की विषय काय आहे हे लगेच समजते. कलाकार म्हटल की त्याचा स्व्छंदी स्वभाव आलाच. नैतिकतेच्या चौकटीतून बाहेर पडल्यावरच कलाकार त्या कलेतील सर्वोत्कृष्ट होऊ शकतो का? आणि हे सगळं मर्जीने की मनाविरुद्ध? की एक गोष्ट मिळवताना काहीतरी देऊन ती मिळवली पाहिजे हा शुद्ध व्यवहार? एक गायक जो गुरूला दिलेला शब्द पाळत फक्त देवालयात स्वर साधना करतो. त्याचा शिष्य जो त्याच्या वेळचा सर्वोत्कृष्ट गायक बनतो पण नैतिकतेची चौकट सोडून वागतो. आणि एक शिष्या जीला स्वरज्ञानासाठी आपल सर्वस्व द्यावं लागत पण अंतिम टप्प्यावर गुरूकडून डावलली जाऊन स्वतः स्वरसाधना करून सर्वोत्कृष्ट होते. पुस्तकाचा विषय एकाच वर्तुळात असला तरीही नंतर काय होणार ही उत्सुकता आणि मधू या शिष्येच नंतर काय झालं हे कळण्यासाठी ही कादंबरी वाचली च पाहिजे. एकूणच कलाकार आणि त्याच जीवन हेच या कादंबरी मध्ये आहे. ...Read more

  • Rating StarJaideep Shinde

    मंद्र - एका मनस्वी गायकाची कहाणी ऐस एल भैरपा हे कन्नड साहित्यातील अत्यन्त अग्रगण्य नाव, या सिद्धहस्त लेखकाचं हे पुस्तक. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी एक मुलगा घराबाहेर पडतो , अनेक मान अपमान पचवून अनेक गुरूंच्या पायाशी डोकं ठेवतो पण खरा सांगीतिक गुरूमिळायला अनेक वर्षे जातात , पण राजेसाहेबांच्या रूपाने शेवटी त्या मुलाला म्हणजेच मोहनलालला शास्त्रीय संगीतातला मोठा गुरू मिळतो आणि त्याची गायकी बदलते , कुठल्याही घराण्याला बांधील अशी त्याची गायकी राहत नाही आणि सगळ्यातल चांगलं घेणारा हा गायक भारतातला सगळ्यात मोठा गायक होऊन जातो , पण राजे साहेबांच्याकडे शिक्षण घेत असताना त्याला कामभावना छळायला लागते आणि त्यातून त्याच्या आयुष्यात पहिली स्त्री येते ती म्हणजे चून्नी , आणि तिथून तपुढे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया म्हणजे मधू, मनोहारी, रामकुमारी, चंपा आणि मग ही कथा फक्त मोहनलाल ची राहत नाही तर हि या स्त्री पात्रांचीही हऊन जाते, मोहनलाल वर नाही त्याच्या कलेला समर्पण करणाऱ्या या स्त्रिया , त्यांचं भाव विश्व भैरप्पानी फारच सुक्ष्म पद्धतींनी उलगुडून दाखवलं आहे . नात्यामध्ये होणारी फसगत त्यातून येणारं दुःख ,होणारे वाद अनेकदा त्यातून होणारं कलेचं सर्जन ,त्यातून मिळणारी अनुभूती आपल्या कमालीच्या शैलीने भैरप्पानी मांडली आहे . कलाकाराचं वयक्तिक आयुष्य खूप मोठ्या विवंचना , राग , मोह, द्वेष यांनी भरलेलं असतं ,कदाचित ते चांगला मनूष्य या चौकटीत बसत नसेल पण म्हणून त्याची कला दुय्यम दर्जाची ठरत नाही. मानवी मनाचा खूप सूक्ष्म विचार मांडला गेला आहे. भैरप्पांची काठ , पर्व , वंशवृक्ष इत्यादी पुस्तके आहेत त्याबद्दल विस्ताराने लिहिनच . हा अप्रतिमअनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे . मानवी मनाचे पदर ज्यांना हळूवार पणे उलगडून समजून घ्यायचे असतील त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे . ...Read more

  • Rating StarNeha Joshi

    मंद्र मधे स्वतः गायक नसूनही गाण्यातले जे काही बारकावे भैरप्पानीं दिले आहेत, त्यातून त्यांचा अभ्यास किती दांडगा आहे, तेच दिसून येतं. मला मंद्र आवडली नाही ती त्यातील नायक मोहनलाल मुळे. पूर्ण कादंबरीमध्ये त्याने आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीचाएक भोगवस्तू म्हणून कसा वापर करून घेतला, ते वाचून मला उबग आला. अर्थात, हा राग त्या नायकाबद्दल आहे, पण एकूणच कादंबरी आणि लेखकांनी मनावर एक वेगळी छाप सोडली, हे नक्की! तुम्ही पर्व पण वाचून बघा, उत्तम कादंबरी आहे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.