* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHAME
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184982060
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN SHE WAS FOURTEEN, JASVINDER SANGHERA WAS SHOWN A PHOTO OF THE MAN CHOSEN TO BE HER HUSBAND. SHE WAS TERRIFIED. SHE’D WITNESSED THE TORMENT HER SISTERS ENDURED IN THEIR ARRANGED MARRIAGES, SO SHE RAN AWAY FROM HOME, GRIEF-STRICKEN WHEN HER PARENTS DISOWNED HER. SHAME IS THE HEART-RENDING TRUE STORY OF A YOUNG GIRL’S ATTEMPT TO ESCAPE FROM A CRUEL, CLAUSTROPHOBIC WORLD WHERE FAMILY HONOUR MATTERED MORE THAN ANYTHING – SOMETIMES MORE THAN LIFE ITSELF. JASVINDER’S STORY IS ONE OF TERRIBLE OPPRESSION, A HARROWING STRUGGLE AGAINST A PUNITIVE CODE OF HONOUR – AND, FINALLY, TRIUMPH OVER ADVERSITY.
‘‘तू आम्हाला मेलीस... तू आम्हाला मेलीस... मेलीस.’’ जन्मदात्या आईबापांनी मला स्वत:पासून कायमचं तोडून टाकावं, एवढा भयंकर अपराध खरोखरच घडला होता का माझ्या हातून? त्यांचा माझ्याविषयीचा जिव्हाळा करपून गेला होता? माझ्या अवघ्या आयुष्याची आहुती देण्याइतका मोठा आहे का हा गुन्हा...?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SHAME #SHAME #शेम #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #JASVINDERSANGHERA "
Customer Reviews
  • Rating StarGayatri Vilas Jadhav

    "शेम” या पुस्तकामध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि वाढवलेल्या जसविंदर संघेरा या भारतीय मुलीचे आत्मचरित्र आहे. ही कथा सत्य असून याच्या मुळ लेखिका जसविंदर संघेरा असून त्याचा मराठी मध्ये अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे हि कहाणी भारतीय आणि पा्चात्य संस्कृतींच्या संघर्षावर आधारित आहे.ब्रिटीश आशियाई महिलांवरील गुन्हेगारीसाठी सांस्कृतिक पद्धतींचा कसा वापर करतात हे जगाला सांगणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. जसविंदरचा जन्म डर्बीमधील शीखच्या पारंपारिक घरात झाला होता. तिचे पालक पंजाबमधील परप्रवासी आहेत. त्यांच्या संस्कृतीनुसार पुरुष मुलांना प्रथम प्राधान्य दिले आहे तर महिलांना कुटुंबातील दुय्यम सदस्य मानले गेले. तिच्या घरच्यांना घराण्याची प्रतिष्ठा या गोष्टीचं मोल इतर कुठल्याही गोष्टी पेक्षा अगदी मुलींच्या जिवापेक्षाहि अधिक वाटत होत . इंग्लंडमध्ये जेथे ती मोठी झाली, जसविंदरने तिच्या शाळेतून परदेशी कल्पना आणि वैशिष्ट्ये शिकली. वयाच्या १४ व्या वर्षी जस्सीला तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवला ती घाबरली.आपल्या थोरल्या बहिणीचे लग्न करून झालेला छळ तिने पाहिलं होत . जस्सीला लग्न न्हवत करायचं म्हणून ती घरातून पळून जाते इथून पुढे तिच्या आयुष्यातला प्रवास खूप कठीण होतो खूप वाईट परिस्थिती येते त्याला ती कशी सामोरी जाते , आत्मसन्मानासाठी , एक चांगल मनासारखं जीवन जगण्यासाठीची संघर्ष करणारी कहाणी आहे. या पुस्तकामधला एक परिच्छेद - " या डर्बीच्या रस्त्यावरून आम्ही चालू शकत नाही. तु पळून गेल्यामुळे, हे होत आहे. गुरूद्वारात जाणं तर बंदच झालय. लोक उघड बोलतात. तुझ्यामुळे लोक थूंकतात माझ्या तोंडावर !"काही सेकंद आईचा आवाज थांबला. मला वाटल .झाल वाटत हीच बोलून, पण ती केवळ आवंढा गिळन्यासाठी थांबलेली होती." मेले घराण्याचा नाश केलास... भोगशिल आपल्या कर्माची फळं! बघत रहा.तु आणि तो तुझा चांभांरडा यार, गटारात लोळाल.. तीच लायकी आहे तुमची...!! आयुष्यात काही काही मिळणार नाही तुम्हाला. ऐकतीयेस ना? जेव्हा तुला मुलगी होइल आणि ती अस छिनालपणाने वागेल तेव्हा कळले तुला, की असल्या वेश्येला जन्म देऊन वाढवल्यावर काय वाटतं ते!!!" नक्की वाचा.. ...Read more

  • Rating StarZEE MARATHI DISHA 18 MAY - 24 MAY 2019

    ‘घराण्याची प्रतिष्ठा क्रूर वास्तव... भारतातील, पंजाबमधील काही कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झाली होती. आपल्या मातृभूमीपासून दूर गेलेल्या, कुटुंबाविना एकट्या पडलेल्यांसाठी जवळची, वेळप्रसंगी आधार देऊ शकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्यांचा ज्ञातिसमाज. पजाबमधून इंग्लंडला येऊन स्थायिक झालेले त्यांच्या जातीचे लोक. इंग्लंडमध्ये डर्बी येथे स्थायिक झालेल्या अशाच एका पंजाबी कुटुंबातील मुलीची – जसविंदर संघेराची – ही सत्यकहाणी आहे. ‘शेम’ हे तिचं पुसतक वाचलं की तिच्या संघर्षाची कल्पना येते. चौदा वर्षांची असताना जसविंदरला, तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवण्यात आला. ती घाबरली. ठरवून केलेल्या लग्नानंतर थोरल्या बहिणीचा झालेला छळ तिनं प्रत्यक्ष पाहिला होता. म्हणून ती घरातून पळून गेली. तेव्हापासून तिच्या आईवडिलांनी तिचं नावच टाकलं. ती पळून गेली नसती तर सासरी छळ सोसत जगावं लागलं असतं आणि लग्न मान्य केलं नसतं, तर तिला श्वास कोंडून मारून टाकलं असतं. श्वास कोंडून मारून टाकणाऱ्या क्रूर कुटुंबव्यवस्थेपासून तिनं पळून जाऊन स्वत:ची कशी सुटका करून घेतली, त्याची ही विलक्षण सत्यकहाणी आहे. आईवडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचं अमान्य करून जसविंदरनं तिची मैत्रीण अवतार हिच्या भावाशी, जस्सीशी, एका चांभार मुलाशी लग्न केल्यानं घराण्याच्या प्रतिष्ठेला चिखल फासला म्हणून तिच्या कुटुंबानं तिला वाळीत टाकलं होतं. जमीनदार समजली जाणारी जाट घराण्यातील ही माणसं चांभारांना अस्पृश्य समजतात. अशाच एका हीन कुळातील मुलाशी जसविंदरनं लग्न केलं म्हणून आईवडील खूप संतापले होते. आपल्या अवतीभवती असंही घडत असतं. याची जाणीवही नसलेल्यांनी जसविंदरची ही आत्मकहाणी जरूर वाचावी. ‘घराण्याची प्रतिष्ठा’ ही मुलींच्या जिवापेक्षाही अधिक असते, असं वाटणाऱ्या मनोवृत्तीविरुद्ध लढणारी, आत्मसन्मानासाठी केलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. तशीच या परिस्थितीवर मात करून, अशा पीडित स्त्रियांसाठी आधारभूत होण्याचं धाडस दाखवणाऱ्या जसविंदरच्या विजयाची ही कहाणी आहे! - मंगला गोखले ...Read more

  • Rating StarPranjali Gangurde Kolarkar

    जसविंदर संघेरा या ब्रिटन मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेने/लेखिकेने तिथे होणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार बद्दल आणि तिने सुरू केलेल्या महिला मदत केंद्र बद्दल आपले अनुभव लिहले आहेत. स्वतः वयाच्या 16 व्या वर्षी मनाविरुद्ध लग्न होणार म्हणून घरसोडून जाऊन प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन महिला आधार केंद्र सुरू केलीत ही स्तुत्य गोष्ट आहे. शेम नावाचे पुस्तक नक्की वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more