* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984415
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NOBEL PRIZE, THE HIGHEST CIVILIAN AWARD IN THE WORLD, HAS BEEN AWARDED EVERY YEAR, SINCE 1901, FOR THE OUTSTANDING ACHIEVEMENTS IN PHYSICS, CHEMISTRY, PHYSIOLOGY OR MEDICINE, LITERATURE AND FOR PEACE. THE NOBEL PRIZE IS AN INTERNATIONAL AWARD, ADMINISTERED BY THE NOBEL FOUNDATION IN STOCKHOLM, SWEDEN, IN MEMORY OF SIR ALFRED NOBEL, THE FOUNDER OF THE NOBEL PRIZE. EACH PRIZE CONSISTS OF A MEDAL, PERSONAL DIPLOMA, AND HARD CASH. THE NOBEL PRIZES ARE AWARDED IN ACCORDANCE WITH THE LAST WILL SIGNED BY ALFRED NOBEL ON NOVEMBER 27, 1895, IN PARIS. 35 OUT OF THE 801 ( ABOUT 4.4 % ) NOBEL PRIZES AWARDED TILL 2007, HAVE BEEN WON BY THE WOMEN. THESE 35 NOBEL PRIZES HAVE BEEN WON BY 34 WOMEN, AS MARIE CURRIE WON THE NOBEL PRIZE TWICE. ALTHOUGH 34 MAY APPEAR TO BE A SMALL FIGURE, CONSIDERING THE ENUMERABLE ODDS AGAINST WHICH THESE WOMEN HAD TO STRUGGLE AND THE IMPORTANCE OF THEIR WORK , THE REAL QUESTION WOULD BE WOW, HOW COME SO MANY? AND NOT WHY SO FEW HAVE WON THE AWARD SO FAR ?. NEVER BEFORE, SO FEW HAVE CONTRIBUTED, SO MUCH, UNDER SUCH TRYING CIRCUMSTANCES. EACH OF THESE 34 NOBEL WOMEN, HAS MADE IMMENSE CONTRIBUTION TO THE MANKIND BY THE VIRTUE OF HER SELFLESS, DEDICATED AND UNTIRING WORK, DESPITE UNSURMOUNTABLE ODDS. AS ENGRAVED ON THE NOBEL MEDAL ITSELF, THEY REALLY BETTERED LIFE ON THE EARTH. SO FAR, THERE WAS NO BOOK AVAILABLE IN ANY LANGUAGE, GIVING CONSOLIDATED DETAILS OF THE WORK DONE BY EACH OF THE 34 NOBEL WOMEN. NOT MANY KNOW ABOUT THESE 34 WOMEN, THE DIFFICULTIES THEY FACED AND THE IMMENSE CONTRIBUTIONS THEY MADE TO THE HUMANITY. COMMON KNOWLEDGE ABOUT THESE NOBEL WINNERS NORMALLY DOES NOT GO BEYOND A FEW LIKE MARIE CURIE, IRENE CURIE, PEARL BUCK AND MOTHER TERESA. THIS BOOK IS THE FIRST ATTEMPT TO BRIDGE THE WIDE GAP. A SINCERE ATTEMPT HAS BEEN MADE TO UNEARTH THE HIDDEN TREASURES IN THE LIVES OF THESE NOBEL WOMEN AND UNFOLD THE INTRICACIES OF THEIR STRUGGLES. IN FACT, THEY DID NOT WORK TO WIN THE NOBEL PRIZE, BUT THEY HONESTLY BELIEVED AND TRULY ENJOYED WORKING FOR THEIR CHOSEN CAUSE. THEIR DEDICATED, UNTIRING PERSEVERANCE WON THEM MANY ACCOLADES AND THE NOBEL PRIZE CAME THEIR WAY. THIS BOOK ATTEMPTS TO CAPTURE THE WORK OF EACH OF THE NOBEL WOMEN, ALONG WITH THEIR SOCIAL, POLITICAL, HISTORICAL AND ECONOMIC CIRCUMSTANCES PREVAILING THEM. OF THE 34 WOMEN 11 HAVE BEEN AWARDED THE NOBEL PRIZE FOR THEIR CONTRIBUTIONS IN THE FIELD OF SCIENCE. THIS BOOK BRINGS OUT HOW THEY WORKED DURING THE TIMES WHEN WOMEN WERE LOOKED DOWN, EVEN IN THE WESTERN COUNTRIES, WITH GREAT CONTEMPT AND SUSPICION ABOUT THEIR BASIC CAPABILITIES TO WORK IN THE SCIENTIFIC FIELDS WITH MATHEMATICAL & LOGICAL THINKING COMPETENCIES. THEY WERE DEPRIVED OF BASIC EDUCATION, RESEARCH AND FINANCIAL NEEDS. HOWEVER, DESPITE HEAVY ODDS, THEY STOOD OUT AND MADE SIGNIFICANT CONTRIBUTIONS, DEFINITELY BETTERING LIFE ON THE EARTH. OTHER 11 WOMEN HAVE BEEN AWARDED THE NOBEL PRIZE FOR THEIR CONTRIBUTIONS IN THE FIELD OF LITERATURE. MANY OF THEM DID NOT EVEN RECEIVE ANY PRIMARY EDUCATION. MANY FACED INNUMERABLE DIFFICULTIES AND VERY TRYING SITUATIONS TO OVERCOME ALL OBSTACLES DUE TO VARIOUS PREJUDICES AND DISCRIMINATIONS OF ALL KINDS. THIS BOOK DRAWS THEIR LIFE SKETCHES FOR THE BENEFIT OF THE PEOPLE TO DERIVE INSPIRATION FOR GOOD CAUSE. THE REMAINING 12 WOMEN HAVE BEEN AWARDED THE NOBEL PRIZE FOR THEIR CONTRIBUTIONS IN THE FIELD OF PEACE. THEY HAD TO WORK WITH GREAT COURAGE AGAINST TERRORISM, VIOLENCE AND BLOODBATH. THEY DID UNTIRING WORK IN SPITE OF MANY SETBACKS FOR THE HELPLESS AND DOWNTRODDEN OF THE MANKIND. THIS BOOK BRINGS OUT THEIR STRUGGLES FOR THE NEEDY AND DOWNTRODDEN, AGAINST THE INJUSTICE. THEY FOUGHT RELENTLESSLY, MANY TIMES EVEN DIRECTLY GOING ON THE BATTLE FIELDS. THEY NEVER LOST HOPES, NEVER GAVE UP, AGAINST DIFFICULT OBSTACLES. THEY WERE FULLY CONVINCED THAT LASTING PEACE CAN ONLY SAVE THE HUMANITY. THESE ARE 34 SELF RADIATING WOMEN, WHO WON THE NOBEL PRIZES BY VIRTUE OF THEIR NOBLE DEEDS. THEY STAND OUT THEIR, AS THE LIGHT HOUSES INSPIRING MANY OTHERS BY THEIR SELF RADIATING LIGHT. WHILE STUDYING THEIR LIFE SKETCHES THROUGH NUMEROUS NATIONAL AND INTERNATIONAL REFERENCES, I WAS TOTALLY ENGROSSED AND OVERWHELMINGLY IMPRESSED BY THESE GREAT WOMEN OF SUBSTANCE. THERE UPON, I FELT A VERY STRONG NEED TO BRING OUT THESE ADORING, SORE AND SWEET MEMORIES, HITHERTO UNKNOWN TO THE READERS AND THE DISCERNING CONNOISSEURS. IN THIS BOOK I HAVE MADE AN HONEST ATTEMPT TO CAPTURE AND BRING OUT THE GREAT WORK DONE BY THESE NOBEL WOMEN FOR THE PEOPLE. EVEN IF AT LEAST A FEW, ARE INSPIRED TO DO SOMETHING NOBLE, FOR THE BETTERMENT OF MANKIND, I WILL CALL THIS BOOK A REAL SUCCESS.
आपल्या अंतर्मनात लागलेल्या प्रकाशाच्या शोधाने उजळणा-या या सर्व स्वप्रकाशरूपा. प्रत्येकीचे कार्यक्षेत्र वेगळे.प्रत्येकीचे कर्तृव वेगळे. परंतु कर्म हीच तृप्ती हा समाधानाचा मंत्र जपल्यामुळे आंतरिक शांती, आत्मविश्वास आणि आनंद त्यातील प्रत्येकीलाच लाभलेला.जगातील सर्वोच समजला जाणारा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला खरा पण त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाकडे आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा त्यांचा प्रवास कोणत्याही पुरस्काराच्या क्षितिजापार होता.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEERA SIRSAMKAR #SIR ALFRED NOBEL #MARIE PIERRE CURIE #BERTHA FELICITAS SOPHIE #FREIFRAU VON SUTTNER #JANE ADDAMS #SELMA OTTILIA LOVISA LAGERLOF #GRAZIA DELEDDA #SIGRID UNDSET #IRENE JOLIOT - CURIE #PEARL BUCK #GABRIELA MISTRAL #EMILY GREENR BALCH #GERTY CORI #NELLY SACHS #BETTY WILLIAMS #ALVA MYRDAL #AUNG SAN SUU KYI #TONY MORRISON #NOBEL LALANA - PART 1
Customer Reviews
  • Rating StarDAINIK DESHDOOT 18 -01 -2008

    स्वयंप्रकाशित शलाकांचा आलेख… वंदना चिकेरूर स्वप्नांना प्रत्यक्ष सत्यात उतरविण्यासाठी केलेली अविश्रांत मेहनत. कर्म हाच देव मानून केलेली कर्मपूजा. नोबेल पुरस्कृत चौतीस महिलांना सौदामिनीचे प्रखर तेज बहाल करून जाते. असामान्य कर्तृत्व, अफाट आणि विलक्षण ार्यक्षेत्र की ज्याला क्षितिज सुमार नाही, असे जीवापाड प्रयत्न यांचा संयोग म्हणजे या चौतीस स्वयंप्रकाशित शलाका आजवरच्या नोबेल पुरस्कारप्राप्त महिलांची अतिशय समर्पक आणि विषयावर दखल ‘नोबेल ललना’ या पुस्तकात आहे. आजपर्यंत आपल्याला फक्त मेरी क्यूरी, मदर तेरेसा, पर्ल बक, वँगरी मुटा मथाई एवढ्याच ३-४ जणींची आणि तीही त्रोटक माहिती होती. परंतु या पुस्तकाच्या निमित्ताने ३४ नोबेल पुरस्कारप्राप्त महिलांचा संपूर्ण जीवनपट आपल्यापर्यंत सोप्या, अभ्यासपूर्ण विवेचनातून लेखिकेने कुशलतेने मांडला आहे. या असामान्य, अलौकिक कर्तृत्ववान महिलांची पूर्वपीठीका कौटुंबिक, सामजिक आणि बौद्धिक जीवन यांचे संपूर्ण दर्शन यातून उलगडते. अर्थार्जन करताना कौटुंबिक जबाबदाऱ्या व इतर अनेक कामे सांभाळून ज्यांनी स्वत:बरोबर समाजाचे, देशाचे हित पाहिले अशा न थकणाऱ्या या किरणशलाका तुम्हाला दिपवून टाकतील. स्त्रियांनी विज्ञान व साहित्य याबरोबरच ‘शांततेसाठी’ अथक प्रयत्न केले. पृथ्वी ही माता मानून तिच्या सुखशांती आणि विकासासाठी केवळ शांतता हेच मोठे वरदान आहे. हे जगाला पटवून देणारे काम काही महिलांनी केले अन् ते वाचून आपल्याला थक्क व्हायला होते. या स्त्रियांमध्ये ही समज कुठून आली असेल? कसे होते ते प्रयत्न? किती तळागाळापासून त्यांनी ही प्रेरणा रूजवली? कशी यशस्वी केली? हे सगळं वाचताना या महिलांबद्दल आदर दसपट वाढतो. मेरी क्यूरी, बार्था व्हॅन सुत्नेर, ग्रॅझिया डेलेझ, जेन अ‍ॅडम्स, सेलमा लँगर प्लॉफ, आईची वारसदार आयरिन क्यूरी, पर्ल बक, एमिली ग्रीन बाल्थ, गर्टी कोरी, मारिया गोपर्ट मायर, डोरोथी क्रोफुट हॉजकीन, नेली सॅक्स, विल्यम्स, रोझालिन यॅलो, अल्वा मिरॅडल, विश्वमाता मदर तेरेसा, बार्बरा मॉटिक, रिटालेव्ही, मॉन्टॅलसिनी, नॅडिन गॉर्डिमेर, धैर्यशालिनी आंग सान सू क्यी, रिंगोबटमिंच तम, टॉनी मॉरिसन, क्रिस्टिन व्होलार्ड, जॉडी विल्यम्स, शिरीन इबादी, वांगरी मुथा मुथाई, लिंडा बक, डॅरिस लेसिंग इत्यादी. या साऱ्या पुरस्कारप्राप्त महिलांची माहिती नोबेल ललना या पुस्तकात मीरा सिरसमकर यांनी प्रस्तुत केली आहे. विषयावर मांडणी, त्यांचे जीवन, कर्मावरील भक्ती आणि मानव कल्याणासाठीचे अथक शोधप्रयत्न या साऱ्यांचे लेखिकेने सुंदर, प्रामाणिक असे मुद्देसूद विश्लेषण केले असून त्या व्यक्तीचे छायाचित्र, कौटुंबिक छायाचित्र व प्रत्यक्ष पुरस्कार घेतानाचे छायाचित्र यांची देखणी जोड दिली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचे ‘नोबेल ललना’ हे पुस्तक मीरा सिरसमकर यांचे आहे. उत्कृष्ट भाषाशैली, अभ्यासपूर्ण विवेचन यामुळे मीरा सिरसमकर यांचे हे पुस्तक फक्त पुस्तक न राहता तो एक प्रेरणाग्रंथ झालाय. या प्रेरणाग्रंथांमुळे मनात प्रकाशाचा कवडसा झिरपतो, ही फार मोठी उपलब्धी आहे. याची किंमत १८० रूपये आहे. प्रत्येकाच्या ग्रंथालयात हे ‘नोबेल ललना’ हवेच हवे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.