* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INSIDE THE COCA-COLA
  • Availability : Available
  • Translators : PRADEEP SINDEKAR
  • ISBN : 9788184989519
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE FIRST BOOK BY A COCA-COLA CEO TELLS THE REMARKABLE STORY OF THE COMPANY`S REVIVAL. NEVILLE ISDELL WAS A KEY PLAYER AT COCA-COLA FOR MORE THAN THIRTY YEARS, RETIRING IN 2009 AS CHAIRMAN AFTER REBUILDING THE TARNISHED BRAND IMAGE OF THE WORLD`S LEADING SOFT-DRINK COMPANY. INSIDE COCA-COLA TELLS AN EXTRAORDINARY PERSONAL AND PROFESSIONAL WORLDWIDE STORY, RANGING FROM NORTHERN IRELAND TO SOUTH AFRICA TO AUSTRALIA, THE PHILIPPINES, RUSSIA, GERMANY, INDIA, SOUTH AFRICA, AND TURKEY. ISDELL HELPED PUT OUT HUGE PUBLIC-RELATIONS FIRES (INDIA AND TURKEY), OPENED MARKETS (RUSSIA, EASTERN EUROPE, THE PHILIPPINES, AND AFRICA), CHAMPIONED MUHTAR KENT, THE CURRENT TURKISH-AMERICAN CEO, ALL WHILE LIVING THE IDEAL OF CORPORATE RESPONSIBILITY. ISDELL`S?AND COKE`S?STORY IS NEWSY WITHOUT BEING GOSSIPY; PRINCIPLED WITHOUT BEING PREACHY, AND FILLED WITH STORIES AND LESSONS APPEALING TO ANYONE WHO HAS EVER TAKEN "THE PAUSE THAT REFRESHES." IT`S ALSO A READABLE AND IMPORTANT LOOK AT HOW COMPANIES CAN MARKET AND GOVERN THEMSELVES MORE?ETHICALLY AND TO GREAT SUCCESS.
भाषेच्या,संस्कृतीच्या सीमा ओलांडणारा जगातला सर्वपरिचित यशस्वी ब्रॅन्ड. या ब्रॅन्डच्या घडणीची, वृद्धीची, विपणनाची, नवर्नििमतीची ही कहाणी. या कहाणीला दोन बाजू आहेत – एक म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातल्या बदलांची, नव्याप्रयोगांची, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची; तर दुसरी आहे ती, नफ्याचा वापर करून समाजासाठी विधायक कार्य करण्याची, त्यासाठी झटण्याची. साधा ‘बॉटलर’ म्हणून काम करू लागलेला एक तरुण ‘कोका-कोला’ च्या सर्वोच्चपदी कसा पोहोचतो आणि मोडकळीस आलेल्या कंपनीची वंव्यवस्थित घडी कशी बसवून देतो, याची ही थरारक कहाणी यात आहे. सहज सोप्या भाषेत, मनापासून सांगितलेलं हे अनुभव कथन आपल्याला रंजकपणे उद्योगविश्वातल्या सहसा फार माहीत नसलेल्या गोष्टी आणि त्यातल्या खाचा खोचा उलगडून सांगतं; अनुभवांतून आलेलं शहाणपण आपल्यापुढे मांडतं; एकवेगळाच दृष्टिकोनदेतं. त्यामुळे नव्याने व्यवसाय करणाऱ्यासाठी तरुणांसाठी आणि जिज्ञासू व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANTARANGCOCA-COLACHE #INSIDETHECOCA-COLA #अंतरंगकोका-कोलाचे #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRADEEPSINDEKAR #NEVILLEISDELLWITHDAVIDBEASLEY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 08-05-2016

    भाषेच्या, संस्कृतीच्या सीमा ओलांडणारा जगातला सर्व परिचित यशस्वी ब्रँड. या ब्रँडच्या घडणीची, वृद्धीची, विपणनाची, नवनिर्मितीची ही कहाणी. या कहाणीला दोन बाजू आहेत. एक म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातल्या बदलांची, नव्या प्रयोगांची, उत्पादनक्षमता वाढवण्याची केलल्या प्रयत्नांची, तर दुसरी आहे ती, नफ्याचा वापर करून समाजासाठी विधायक कार्य करण्याची, त्यासाठी झटण्याची. साधा ‘बॉटलर’ म्हणून काम करू लागलेला एक तरुण कोका कोलाच्या सर्वोच्चपदी कसा पोहोचता आणि मोडकळीस आलेल्या कंपनीची व्यवस्थित घडी कशी बसवून देतो, याचीही थरारक कहाणी यात आहे. सहजसोप्या भाषेत, मनापासून सांगितलेलं हे अनुभवकथन आपल्याला रंजकपणे उद्योगविश्वातल्या सहसा माहीत नसलेल्या गोष्टी आणि त्यातल्या खाचाखोचा उलगडून सांगतं, अनुभवांतून आलेलं शहाणपण आपल्यापुढे मांडतं, एक वेगळाच दृष्टिकोन देतं, त्यामुळे नव्याने व्यवसाय करणाऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि जिज्ञासू व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more