* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: SAMBHAJI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177666519
 • Edition : 17
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 864
 • Language : MARATHI
 • Category : HISTORICAL
 • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO 5 BOOKS
Quantity
SAMBHAJI, THE YOUNG KING, THE SECOND MARATHA CHHATRAPATI WHO SUCCEEDED THE THRONE AFTER HIS FATHER THE GREAT SHIVAJI MAHARAJ, CONTINUOUSLY FOUGHT THE MUGHALS FOR EIGHT CONSECUTIVE YEARS, BUT DID NOT LET THE MOGHUL ARMY CAPTURE EITHER ANY OF THE MARATHA FORTS OR ANY OF THE SHIPS. HE OFFERED HIMSELF BUT DID NOT BOW DOWN IN FRONT OF THE MUGHAL EMPEROR; HE DIED A HERO`S DEATH AT A VERY YOUNG AGE, WHEN HE WAS JUST 32 YEARS OLD. FOR THE PAST 325 YEARS, SAMBHAJI WAS OFTEN PAINTED IN BLACK. HE HAD A POETIC MIND, HE WAS A VERY INTELLIGENT PERSON, HE WAS CONCERNED ABOUT HIS PEOPLE, HE WAS BRAVE, HE WAS A GREAT THINKER, BUT ALL HIS GOOD QUALITIES WERE OVER-LOOKED; HIS PERSONALITY WAS ALWAYS LOOKED UPON WITH SUSPICION. VISHWAS PATIL, THE MOST GIFTED AUTHOR TODAY, TELLS US MORE ABOUT SAMBHAJI RAJE, AS HE HAS SEEN HIM THROUGH THE REFERENCES IN HISTORY, AS HE HAS FOUND HIM IN THE VERY VALUABLE YET IGNORED DOCUMENTS, AS HE HAS HEARD HIM IN THE HILLY REGIONS OF SAHYADRI MOUNTAIN RANGES, AMONG THE CREEKS OF THE ARABIAN SEA. SAMBHAJI, SON OF SHIVAJI MAHARAJ, A NOVEL PERSONALITY WITH HIS EQUALLY IMPRESSIVE, BREATH-TAKING, SPECTACULAR, STORMY YET VERY TRUE STORY.
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंÂवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!
* सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार २००५ * कवी माधव पुरस्कार २००६ * अक्षरगंध पुरस्कार २००६
Video not available
Keywords
#YESUBAI#3SHIVAJI#PUTALABAI#RAJARAMSAHEB#SOIRABAI#EKOJI#DURGABAI#RANUBAI#HARJIRAJEMAHADIK#AMBIKABAI#GANOJISHIRKE#RAJKUNWAR#MAHADJINIMBALKAR#SAKAVRABAI#PILAJISHIRKE#HIROJIFARJAND#HAMBIRAOMOHITE#BALAJIAAWAJI#KHANDOJIBALLAL#MOROPANTPINGALE#KESOTRIMALPINGALE#NILOPANTPINGALE#KAVIKALASH#PRALHADNIRAJI#ANNAJIDATTO#SOMAJIDATTO#KAZIHAIDER#KONDAJIFARJAND#YESAJIGAMBHIRRAO#YESAJIKANK#KRUSHNAJIKANK#JYOTYAJIKESARKAR#DAULATKHAN#DADJIPRABHUDESHPANDE#AURANGZEB#DILERKHAN#SHAHABUDIKHAN##28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर
Customer Reviews
 • Rating StarYogesh Kokil

  पानिपतकार विश्वास पाटील यांची एक अप्रतिम कादंबरी. जवळ पास साडे आठशे पानांची ही कादंबरी सुरुवातीपासून खिळवून ठेवते. शिवाजी महाराजांच्या हत्येसाठी रचलेल्या कटाची खबर घेऊन गोदू रायगडा वर येते आणी संभाजी महाराजांच्या मदतीने कट उधळून टाकते यापासून कादंबरीची सुरुवात होते. संभाजी महाराज आणी अष्ट प्रधान यांच्या मधली दरी हळूहळू वाढत जाते. संभाजी महाराजांचा एकाकी लढा, अष्टप्रधानांच्या कागाळ्या यांचे उत्कृष्ट चित्रण पानिपतकारांनी उभे केलेले आहे. औरंगजेबाची अजस्त्र पाच लाख फौज, पातशाहाचा जामानिमा, सरदार, दरकदार, जनानखाना, तोफा, बारूद यांचे वर्णन विश्वास पाटीलांनी फार बारकाईने केले आहे. संभाजी महाराजांची मनातली घुसमट, त्यांचे कवीमन, कवी कलशांची दोस्ती, सिद्धी बरोबरचा जंजिऱ्याचा लढा, दक्षिणेकडची घोडदौड,पोर्तुगीजांना शिकवलेला धडा यांचे ओघवते वर्णन कादंबरीत गुंतवून ठेवते. पातशहा चे आठ वर्षांच्या महाराष्ट्रातील लढ्यानंतरचे अपयश आणि नैराष्य, मराठ्यांचा कडवा प्रतीकार अधोरेखीत करते. पातशहाचे क्रौर्य, संभाजी महाराज आणी कवी कलशांचे केलेले अपरीमित आणी अमानुष हाल डोळ्यात पाणी आणते.संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे पूर्ण चरित्र विश्वास पाटील खुपच सुंदर चितारतात. जरूर जरूर वाचावी आणी संग्रहीत असावी अशी कादंबरी... ...Read more

 • Rating StarShyam Nivrutti Khelukar

  पुस्तक वाचताना खरच आपण शिवकाळात जातो.काही प्रसंगी रडायलाही येत.शंभुराजेविषयी आजवर फक्त ऐकल होत पण पुस्तक वाचल्यावर समजल की माझा शंभूराजा काय होता😘😘अप्रतिम अस लेखन. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩

 • Rating StarAmruta Kulkarni

  नुकतच पूर्ण केली कादंबरी. विश्वास पाटील तो काळ आणि मोहिमांचा थरार उभा करण्यात यशस्वी झालेत असं मला वाटतं. कादंबरी वाचताना तो क्षण डोळ्यासमोर घडत आहे असं मग्न व्हायला होतं. शिवरायांच्या पोटी जन्म घ्यावा तो शंभुराजांसारख्या छाव्यानेच! शिवराय सूर् आहेत तर संभाजी राजे त्या सूर्याचं तेज आहेत. तुकोबांनी जणू शंभराजेंसाठीच म्हणून ठेवलंय पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा! मुजरा राजे मुजरा ...Read more

 • Rating StarPritam Katkar

  मी आजून पर्यंत खूप इतिहासिक कादंबऱ्या वाचल्या आहेत असं नाही, पण विश्वास पाटील लिखित "संभाजी" कादंबरी मनाला भावली, हृदयाला भिडली.... संभाजी समजायला मद्दत झाली..... अनेक ठिकाणी डोळ्यातून आपसूकच पाणी आलं, तर काही प्रसंगांनी अभिमानाणे छाती भरून आली एकीकडे, स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणारे संभाजी महाराज, तर दुसरीकडे वतनासाठी स्वराज्याशी दगा करणारे ह्या मातीतले. औरंगजेबाच साम्राज्य म्हणजे आशियातील खंडातील सर्वात मोठं साम्राज्य, तर शिवाजी महाराजचं स्वराज्य हे आशिया खंडातील सर्वात लहान स्वराज्य, औरंगजेबाच मन भर सैन्य शिवाजी महाराजांच्या कणभर स्वराज्याला चिरडायला आलं...... तेव्हा हाच संभाजी छातीचा कोट करून त्याच्या समोरा गेला. एकाच वेळी, मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, डच. अश्या चार आघाडीवर हा अजिंक्य सेनापती लढत राहिला, शेवटी एकही लढही न हरलेला सेनापती अशी इतिहासाला पण नोंद करावी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (१९८०) मृत्यूनंतर प्रचंड शक्तीनिशी म्हणजे ५लाख सैन्य, तेवढेच घोडदळ, पायदळ, उंट,हत्ती, तोफखाने, आणि तेवढाच प्रचंड खजिनासह स्वराज्य जिंकण्यासाठी, मातीत मिळवण्यासाठी आलेला औरंगजेब स्वतः मातीत मिळाला, पण स्वराज तसच अजिंक्य राहील... शिवाजी महाराजांनी स्वराज्य जरूर उभं केलं, पण त्याच संवर्धन त्यात अंकीन भर संभाजी महाराजानी टाकली. रामशेज सारखा एक लहानसा किल्ला तब्बल ५ वर्ष झुंजवला, मग असे महाराष्ट्रात ३६० किल्ले, मग हे सर्व किल्ले जिंकायला औरंगजेबाला किती जन्म घ्यावे लागले असते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीतील लोकांना जगायचं कस ते शिकवल, तर संभाजी महाराजांनी मातीसाठी मारायचं कस ते दाखवल..... जय भवानी! जय शिवाजी! जय संभू राजे. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PARIGH
PARIGH by SUDHA MURTY Rating Star
Ashutosh Digambar Kulkarni

पैसा आला की माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुण-अवगुण बाहेर येतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की बाहेर येतात.... पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की लोभी बनतो. अधाशी माणूस जमीन जुला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो. ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना पैसा असला काय नसला काय; काहीच फरक पडत नाही. पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. ...Read more

ASHRU
ASHRU by V. S. KHANDEKAR Rating Star
Indrajeet Lokmate

खूप छान कादंबरी आहे मानवी जीवनाचा लेखाजोखा उत्तम पध्दतीने मांडला आहे