* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHITE MUGHALS: LOVE AND BETRAYAL IN EIGHTEENTH CENTURY INDIA
  • Availability : Available
  • Translators : SUDHA NARAVANE
  • ISBN : 9788177667097
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 476
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
  • Available in Combos :WILLIAM DALRYMPLE COMBO SET
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHITE MUGHALS IS THE LOVE STORY OF LOVERS JAMES ACHILLES KIRKPATRICK AND KHAIR UN-NISSA, TWO PEOPLE BELONGING TO DIVERSE CULTURES AND RACES AT A TIME WHEN INDIA WAS UNDER THE COLONIAL RULE OF THE BRITISH. THEIR LOVE TRANSCENDED ALL THE POLITICAL, SOCIAL AND CULTURAL BARRIERS AS JAMES MARRIED NISSA AND CONVERTED TO ISLAM. BUT IS THIS THE HAPPY ENDING OF THEIR STORY OR THERE IS A DARK SIDE TO IT IS THE THEME OF THE STORY. ALTHOUGH WHITE MUGHALS AT THE CRUX IS A LOVE STORY, THERE IS MORE TO IT IN THE SENSE THAT IT GIVES A DETAILED PICTURE OF THE SOCIO-POLITICAL-CULTURAL LIFE IN INDIA IN THE LATE 18TH AND EARLY 19TH CENTURY. IT IS FILLED WITH INTERESTING DETAILS AS TO HOW SOME OF THE BRITISH PEOPLE IN INDIA IMBIBED A LOT OF OUR CULTURE, OUR CLOTHES AND OUR LANGUAGE. AND HOW BECAUSE OF THE EAST MEETING WEST AND THE CONSEQUENT RELATIONSHIPS BETWEEN BRITISH MEN AND INDIAN WOMEN, A NEW BREED OF ANGLO-INDIAN COMMUNITY FORMED.
’व्हाइट मुघल्स’ हे सुधा नरवणे यांचे पुस्तक मूळ लेखक विल्यम डॅलरिंपल यांच्या याच नावाच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित आहे. खैरुन्निसा, एक असामान्य रूपवान महिला, जेम्स कर्कपॅट्रिकची लाडकी प्रियतमा आणि हेन्री रसेलने त्याग केलेली प्रेयसी, अशा खैरुन्निसाचा हा जीवनप्रवास आहे. तिचं आयुष्य म्हणजे पराकोटीची दुःखगाथाच होती. अत्यंत कोवळ्या, निरागस वयात तिने सर्वांचा विरोध पत्करून आपल्याला आवडलेल्या तरुणाशी लग्न केलं; पण अकाली वैधव्य तिच्या वाट्याला आलं. बदनामीला तोंड द्यावं लागलं, हद्दपार व्हावं लागलं आणि अखेर परित्यक्तेचं जीवन कंठावं लागलं. इंग्रज सरकारने ते हिंदुस्थानात राज्य करत असताना हैदराबादमध्ये रेसिडेन्ट म्हणून जेम्स कर्कपॅट्रिक याची नेमणूक केली होती. तो एक कर्तव्यदक्ष, निःपक्षपाती न्यायबुद्धी असलेला आणि सत्यप्रिय अधिकारी होता. हिंदुस्थानातील मुस्लीम सौंदर्यवती बेगम खैरुन्निसा अशा रुबाबदार व गोऱ्या तरुण अधिकाऱ्याच्या प्रेमात पडली. जेम्सलाही मनापासून खैरुन्निसा आवडली होती. तो काळ असा होता की, जेव्हा स्त्रियांपुढे फारच थोडे पर्याय होते; आवडीनिवडीला विशेष वाव नव्हता. स्वतःच्या आयुष्यावरही त्यांचा हक्क नव्हता, अशा काळात खैरुन्निसाने रूढीरिवाजाविरुद्ध बंड केले आणि जेम्सशी लग्न करण्यासाठी आत्महत्येची धमकी दिली, आपले सर्वस्व पणाला लावले. जेम्स हा वेगळ्या संस्कृतीत वाढलेला, दुसऱ्या वंशाचा आणि प्रारंभी दुसऱ्या धर्माचा होता. त्यानेही खैरुन्निसाशी लग्न करण्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला. आपलं स्वप्न साकार झाल्याच्या आनंदात ती मश्गुल असताना तिची मुलं साहिब अलम ऊर्फ विल्यम जॉर्ज कर्कपॅट्रिक व साहिब बेगम ऊर्फ कॅथरिन ऑरोरा शिक्षणासाठी जेम्सच्या मायदेशात गेली. त्यानंतर जेम्सचं अवघ्या 41व्या वर्षी निधन झालं. त्या वेळी खैरुन्निसा केवळ 19 वर्षांची होती. तिच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये दुही निर्माण झाली आणि ती, तिची आई आणि आजी तिघींचाही सर्वनाश व्हायची वेळ आली. अशा वेळी सहानुभूती दाखवून, अनेक प्रसंगी मदत करणारा हेन्री रसेल हा एक अधिकारी तिच्या आयुष्यात आला. मात्र, रसेल जेम्सपेक्षा खूपच वेगळ्या स्वभावाचा होता. तो अतिशय अहंकेंद्री, घमेंडखोर आणि संवेदनशीलतेचा अभाव असलेला असा होता. एकदा खैरुन्निसाला आपलंसं केल्यावर त्याने तिला नंतर दिलेल्या वागणुकीवरून त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांचं दर्शन घडतं. जेम्स मरण पावल्यावर खैरुन्निसा खूपच एकाकी झाली होती. पुढे आठ वर्षांनी ती मृत्यू पावली. शारीरिक विकाराने तिचा मृत्यू झाला असला तरी हृदयभंग, उपेक्षा आणि दुःख यामुळेही तिची जीवनेच्छा संपुष्टात आली असावी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#WHITE MUGHALS #LOVEANDBETRAYALINEIGHTEENTHCENTURYINDIA # WILLIAMDALRYMPLE # SUDHA NARAWANE #JAMESACHILLESKIRKPATRICK #KHAIRUN-NISSA #BRITISHHYDERABAD #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MAJOR-GENERALCHARLESSTUART #PAMAR #ARTHUR WEASLEY #LORD JOHN HENRY WELLESLEY #CHARLS RUSSEL
Customer Reviews
  • Rating StarAnuradha Joshi

    जेम्सचा एक सहकर्मी होता हेन्री रसेल. तो खैरला बेगम म्हणायचा. त्याच्यासोबत खैर आणि तिची आई , सगळा लवाजमा कोलकात्याला गेला. दुःखात बुडालेली खैर रोज जेम्सच्या थडग्यावर जाऊन रडत बसे. दोनेक महिने हे असेच चालू राहिले. मग मात्र तिला कळून चुकले की आता रडण्याे जेम्स काही परत येणार नाही. तिथे जेम्सची पुतणी इझाबेला बुकर होती. तिच्यासोबत खैरचे खूप मधुर नाते बनले. तसेच जनरल पामर आणि फैज हेपण तिला अधुन मधुन भेटायला येत. पण तिला ह्या काळात कोणी खरंच मदत केली तर ती हेन्री रसेलने. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.