BABY HALDER

About Author

Birth Date : 19/06/1973


BABY HALDER IS AN INDIAN AUTHOR. HER BEST KNOWN WORK IS HER AUTOBIOGRAPHY AALO AANDHARI WHICH DESCRIBES HER HARSH LIFE GROWING UP AS A DOMESTIC WORKER, LATER TRANSLATED INTO 21 LANGUAGES, INCLUDING 13 FOREIGN LANGUAGES.

बेबीचे वडील सैन्यात असल्याने, साधारण बत्तीस वर्षांपूर्वी, जम्मू-काश्मीर-मधल्या कुठल्याशा गावात बेबीचा जन्म झाला. तिचे वडील कधी घरात पैसे द्यायचे तर कधी द्यायचे नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमीच पैशांची अडचण असायची. त्यावरून भांडणेही व्हायची. म्हणूनच तिची आई घर सोडून निघून गेली. काही दिवसांनंतर बेबीच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. आणि त्यानंतर तिसरेही. सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या. अखेर ते दुर्गापूरला स्थायिक झाले. बेबी तेरा वर्षांचीसुद्धा झाली नव्हती तेव्हाच तिचे लग्न, तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या मुलाशी लावून देण्यात आले. त्यामुळे तिला सातवीतूनच शाळा सोडावी लागली. पुढे बारा-तेरा वर्षांनी तिला तिचे घरही सोडावे लागले. कारण नवऱ्याचे वागणे तिला असह्य झाले. तीन मुलांना घेऊन तिने दुर्गापूर सोडले आणि फरीदाबादची रेल्वे पकडली. काही दिवस फरीदाबादला काढून ती गुडगावला आली. मोलकरीण म्हणून तिने आयुष्य कंठायला सुरुवात केली. आपल्या मुलांना स्वत:ची ओळख सांगताना अजिबात लाज वाटणार नाही, हा विचार मनात आल्यावर बेबीला अतिशय आनंद वाटतो.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ALO-ANDHARI Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे