* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789968
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NANA PHADNIS WAS A SHREWD POLITICIAN. MAHADAJI SHINDE WAS A GREAT BRAVE MARATHA WARRIOR. THEY BOTH WERE ABLE-MINDED PERSONS WITH HIGH CALIBER. THE MARATHAS GAINED CREDIT, PRESTIGE AND SUCCESS OWING TO THE WORK ACCOMPLISHED BY THESE TWO. FOR THESE TWO, THE WELFARE OF THEIR COUNTRY WAS GREATER THAN THEIR PERSONAL OPINION, DIFFERENCES, ASPIRATIONS, ETC. THIS NOVEL BRINGS INTO LIGHT THE JOINT EFFORTS BY THE SELFLESS DUO. THEIR POLITICAL CAREER SPANS ABOUT HALF CENTURY, OF WHICH THE NOVEL GIVES US JUST A GLIMPSE; THAT DURING 1772 TO 1784.
राजकारणमुत्सद्दी नाना फडणीस आणि समशेरबहाद्दर महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील कर्तबगार पुरुष होते. खरेतर या दोघांच्या कार्य-कर्तृत्वामुळेच संपूर्ण हिंदुस्थानात मराठे प्रबळ झाले व मराठेशाही कळसाला पोहोचली! या दोघांनी केवळ राष्ट्रहिताकरिता वैयक्तिक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून बजावलेल्या संयुक्त कामगिरीला उजाळा देणारी कादंबरी! अर्थात, या दोघांची राजकीय कारकीर्द सुमारे पन्नास वर्षांइतकी प्रदीर्घ असल्याने, ही केवळ त्यांच्या कामगिरीची झलक म्हणावी लागेल. कारण या कादंबरीमध्ये सन १७७२ ते १७८४ असा एका तपाचाच काळ आला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NANA#MAHADJI#THORLEMADHAVRAO#BALAJIVISHWANATHPAHILAPESHWA#CHIMAJIAPPA#RAGHOBADADA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 08-NOV-2019

    गारद्यांनी नारायणराव पेशव्यांची हत्या केल्यानंतर पेशवाई रसातळाला जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली असताना नाना फडणवीस आणि महादजी शिंदे पेशवाईचे तारणहार ठरले. त्यांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे मराठेशाही कळसाला पोहोचली. त्यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा कुदन तांबे यांची ‘नाना आणि महादजी’ ही कादंबरी घेते. थोरल्या माधवराव पेशव्यांचा १९७२मध्ये वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे गादीवर आले. मात्र काका रघूनाथरावांकडून भित्र्या स्वभावाच्या नारायणरावांची हत्या केली जाते. त्यासाठीची कटकारस्थाने, गारद्यांना लावलेली फूस यांनीच कादंबरीची सुरुवात होते. त्यानंतर गादीवर बसण्याचे रघुनाथराव उर्फ राघोबादादांचे मनसुबे नाना फडणवीस आणि रघूनाथरावांकडून कसे उधळले जातात याचे वर्णन आहे. नारायणरावांच्या हत्येनंतर राघोबादादांमुळे मराठेशाहीत फूट पडली, मात्र नाना फडवीसांच्या मुत्सद्देगिरीमुळे मराठेशाही तरली हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने या कादंबरीत केला आहे. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांमध्ये नाना फडणवीसांना अर्धे शहाणे समजले जाते. कारण तलवारबाजीत ते वाकबगार नसले तरी त्यांची चतुराई व मुत्सद्देगिरी वाखाण्याजोगी होती. प्रत्यक्ष युद्धात भाग न घेताही कुटनीतीमुळे अनेक लढाया त्यांनी जिंकलेल्या आहेत. राघोबादादांना रोखण्यासाठीचे त्यांचे राजकीय डावपेच या कादंबरीत उलगडून दाखवले आहेत. खरे म्हणजे नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांची कारकिर्द ५० वर्षांची. मात्र या कादंबरीने माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतरचा म्हणजे १७७२ ते १७८४ या एका तपाचा काळ वर्णिला आहे. रघुनाथरावांना पेशवाईपासून दूर ठेवण्यासाठी केलेले बारभाईचे कारस्थान या कादंबरीत सविस्तरपणे देण्यात आले आहे. या कादंबरीत नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा असला तरी कादंबरीतील बहुतेक भागांत नानांचे कर्तृत्व दाखवण्यात आले आहे, तरीही महादजी शिंदे यांची मुत्सद्दी आणि शौर्य यांचीही माहिती कादंबरीत देण्यात आली आहे. ही कादंबरी नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्यावर आधारित असली तरी पेशवाईच्या इतिहासातील अनेक व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे स्वभाववर्णन कादंबरीत देण्यात आले आहे. रघूनाथरावांची कपटनीती, साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले सखारामबापू बोकील यांची गोंधळलेली स्थिती, न्यायमूर्ती रामशास्त्री यांचा करारी बाणा, पतीच्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांच्या कूटनीतीत समील झालेल्या आनंदीबाई, पेशवाईतील गोंधळाचा फायदा घेण्यासाठी आतुर इंग्रज गव्हर्नर हॉर्नबी या विविध स्वभावांच्या व्यक्तींचा आढावाही या कादंबरीत घेण्यात आला आहे. सखारामबापू बोकील हे पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक मानले जातात. मात्र कठीण प्रसंगी त्यांचा झालेला गोंधळ लेखकाने उत्कृष्टरित्या मांडला आहे. सखारामबापूंना आपल्या बाजूने वळवण्यात नानांनी दाखवलेली चाणाक्षनीती लेखकाने मांडली आहे. बापूंच्या मनात इंग्रजांविषयी चीड निर्माण व्हावी यासाठी नाना त्यांना सांगतात, ‘‘पुण्यश्लोक अहिल्याबाईनी म्हटल्याप्रमाणे इंग्रज हा अस्वलासारखा महाभंयकर शत्रू आहे. एकवेळ वाघ परवडला कारण तो मर्दाप्रमाणे लढून मारेल! म्हणून आपण सर्वांनी मिळून टोपीकर इंग्रजांना नेस्तनाबूत केलं पाहिजे.’’ त्याशिवाय कोणाचीही भीड न बाळगणार्या न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूणे यांच्या निष्पक्ष न्यायदानावर लेखकाने प्रकाशझोत टाकला आहे. हे चरित्र नसून कादंबरी असल्याने काल्पनिक प्रसंगांचा वापर केल्याची कबुली लेखकाने प्रस्तावनेतच दिली आहे. मात्र काही प्रसंग इतिहासाशी विसंगत असल्याचे जाणवते. ‘नारायणरावांना धरा’ असे आदेश रघूनाथरावांनी केल्यानंतर आनंदीबाईनी ‘ध’ चा ‘मा’ केला, असे इतिहास सांगतो. मात्र या कादंबरीत सुमेरसिंग गारद्याने रघुनाथरावांनी दिलेल्या चिठ्ठीत खाडाखोड करून ‘धरावे’च्या ऐवजी ‘मारावे’ केली, अशी नवी माहिती देते. कादंबरीतील काही काल्पनिक प्रसंग इतिहासाशी विसंगत वाटत असले तरी वस्तूस्थितीशी पूर्ण फारकत घेणारेही नाहीत. मराठेशाहीतील या दोन्ही कर्तबगार पुरुषांचे कर्तृत्व कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. इतिहासाशी विसंगत नाही घटना वगळता कादंबरी नाना आणि महादजी या दोन्ही कर्तबगार व्यक्तींना न्याय देणारी आहे. केवळ राष्ट्रहितासाठी वैयक्तिक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी बजावलेल्या संयुक्त कामगिरीला ही कादंबरी उजाळा देते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 23-09-2018

    पेशवाई काळावरील ऐतिहासिक कादंबरी... आजवर इतिहासातील निरनिराळे कर्तबगार पुरुष आणि स्त्रिया, तसेच घटना-प्रसंग-युद्धे यांवर अनेक नाटके-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. याच प्रकारातील नुकतीच प्रकाशित झालेली ऐतिहासिक कादंबरी म्हणजे कुंदन तांबे यांची ‘नानाआणि महादजी’. मेहता पब्लिशिंग हाऊसने ही कादंबरी प्रकाशित केली असून, ती या दोन व्यक्तिमत्त्वांचा मागोवा घेते. नाना फडणीस व महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील अत्यंत कर्तबगार पुरुष. जर हे दोघे नसते, तर थोरल्या माधवराव पेशव्यांच्या दुर्दैवी मृत्यूबरोबरच मराठेशाही संपुष्टात आली असती. या दोघांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे मराठेशाहीचा अंत नुसता लांबला नाही, तर मराठेशाही कळसाला पोहोचली. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मराठे प्रबळ झाले. या इतिहासातील नानांच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक त्यांच्या शत्रूंनीही करून ठेवले आहे; पण साहित्यात त्यांची म्हणावी अशी दखल घेतली गेली नाही. तसेच बादशाहीचा कारभार आपल्या हाती ठेवून मराठेशाहीवरील संकटप्रसंगी आपल्या तलवारीचे पाणी दाखविणाऱ्या महादजी शिंद्यांविषयीही फारसे काही लिहिले गेले नाही. काहींनी त्यांना अनुल्लेखाने मारले, तर काहींनी त्यांना एकमेकांचे शत्रू ठरवले. या कादंबरीत काल्पनिक प्रसंगांना भरपूर स्थान आहे. तरीही ती वाचनीय झाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more