SIDNEY SHELDON

About Author

Birth Date : 11/02/1917
Death Date : 30/01/2007


THE LATE NOVELIST AND SCREENWRITER REMAINS ONE OF THE WORLD’S TOP BESTSELLING AUTHORS, HAVING SOLD MORE THAN 300 MILLION COPIES OF HIS BOOKS. ARE YOU AFRAID OF THE DARK? WAS HIS MOST RECENT IN A LONG LINE OF HUGE HITS ON BESTSELLER LISTS EVERYWHERE. HE IS ALSO THE ONLY WRITER TO HAVE WON AN OSCAR, A TONY AND AN EDGAR.

जगप्रसिद्ध लेखक सिडनी शेल्डन जगभरात त्यांच्या गुन्हेगारी आणि सूड कथांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या १८ कादंबऱ्यांचे ५१ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत आणि या पुस्तकांच्या ३ दशलक्ष प्रति विकल्या गेल्या आहेत. वयाच्या ५० व्या वर्षानंतर शेल्डन यांनी शृंगारिक आणि रहस्यमय कथा लिहायला सुरुवात केली. शेल्डन यांच्या सर्वच कादंबऱ्या कायम जगातील दहा सर्वात जास्त खप असलेल्या पुस्तकांमध्ये गणल्या जातात. शेल्डन हे फक्त महान कादंबरीकारच नव्हते तर उत्कृष्ट नाटककार आणि पटकथाकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ३० जानेवारी २००७ मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी न्यूमोनिया ने या महान लेखकाला काळाच्या पडद्याआड नेले. त्यांच्या मृत्यूनंतर आजही त्यांची लोकप्रियता तितकीच टिकून आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHASING TOMORROW Rating Star
Add To Cart INR 450
TBC Classic Book

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे