* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOMAD
  • Availability : Available
  • Translators : PRAJAKTA CHITRE
  • ISBN : 9788184984460
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NOMAD IS A PHILOSOPHICAL MEMOIR, TELLING HOW AYAAN HIRSI ALI CAME TO AMERICA IN SEARCH OF A NEW LIFE, AND THE DIFFICULTIES SHE FACED IN RECONCILING HER TWO WORLDS. WITH VIVID ANECDOTES AND OBSERVATIONS OF PEOPLE, CULTURES, AND POLITICAL DEBACLES, THIS NARRATIVE WEAVES TOGETHER HIRSI ALI`S PERSONAL STORY X INCLUDING HER RECONCILIATION WITH HER DEVOUT FATHER WHO HAD DISOWNED HER WHEN SHE DENOUNCED ISLAM X WITH THE STORIES OF OTHER WOMEN AND MEN, HIGH-PROFILE AND NOT, WHOM SHE ENCOUNTERS. WITH A DEEP UNDERSTANDING AND INTIMATE PERSPECTIVE OF THE SITUATION OF MUSLIM WOMEN AND MODERATES IN THE WORLD TODAY AND HER SINGULAR, UNWAVERING INTELLECTUAL COURAGE, HIRSI ALI OFFERS HER ALWAYS NOTABLE, OFTEN CONTROVERSIAL ANALYSIS OF ISLAM VIS A VIS THE SUPERIORITY OF WESTERN DEMOCRATIC VALUE
‘इन्फिडेल’ हे आयान हिरसी अलीचे पहिले पुस्तक. या वादळी आत्मकथनामुळे आयान अलीने साऱ्या जगात खळबळ माजवली. ‘नोमॅड’मध्ये तिने अमेरिकेत आल्यावर नव्याने आयुष्याला कशी सुरुवात केली त्याबद्दल लिहिले आहे. युरोपमधील कडव्या इस्लामी लोकांच्या जीवे मारण्याच्या धमक्यांपासून दूर, तिच्या आजूबाजूच्या जगातील संघर्ष आणि तिच्यामधील अंतर्गत संघर्ष, या साऱ्यापासून दूर जाऊन तिने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. ही कथा शारीरिक आणि भावनिक स्तरावरील स्वातंत्र्याच्या प्रवासाची आहे. स्त्रीच्या आचारविचारावर बंधने घालणाऱ्या मागास जमातीतल्या स्त्रीचे रूपांतर एका खुल्या समाजातील स्वतंत्र आणि समानतेची भावना मनात असणाऱ्या नीडर स्त्रीमध्ये कसे झाले, त्याबद्दलचे हे अनुभवकथन आहे. तिने सांगितलेल्या वास्तववादी गोष्टींमधून तिला किती आव्हानांचा सामना करायला लागला, हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत इस्लाममधील विरोधाभास दाखवणाऱ्या जीवनपद्धती आणि पाश्चिमात्यांची जगण्याची मूल्ये यांचा कुठेच मेळ बसत नाही, हे तिने दाखवून दिले. कुटुंबापासून दूर झाल्यावर आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक स्थित्यंतरांच्या गोष्टी आयान अलीने सांगितल्या आहेत. पाश्चिमात्य समाजात एकरूप होताना तिला पूर्वायुष्यातील गैरसमजुती, अंधश्रद्धा यांपासून स्वत:ला वेगळे करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचेही यात चित्रण आहे. वडील मृत्यूशय्येवर असताना झालेल्या भेटीचे हृद्य वर्णन यात आहे. ९/११च्या घटनेनंतर तिने इस्लामचा त्याग केल्यावर तिच्या वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले होते. त्या पाश्र्वभूमीवर त्यांची अखेरची भेट मन हेलावून सोडते. त्यांच्याप्रमाणेच तिची आई, सोमालियातील आणि युरोपमधील इतर नातेवाईक या सर्वांपासूनच आयान दुरावली. ‘नोमॅड’ हे सांस्कृतिक संघर्षात वाताहात झालेल्या कुटुंबाचं चित्रण तर आहेच, पण त्याचबरोबर एका स्त्रीच्या अमेरिकेतील पदार्पणाचे तेथील हृद्य, काही वेळा मजेशीर अनुभवाचे, तिथल्या संस्कृतीचे, तिने केलेल्या विश्लेषणाचे चित्रण आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INFIDEL #NOMAD #नोमॅड #INFIDELMYLIFE #PRAJAKTACHITRE #इन्फिडेल #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR #नीलाचांदोरकर #AYAANHIRSIALI"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 08-05-2015

    स्त्रीच्या रूपांतराचं अनुभवकथन… आयान हिरली अली यांचं ‘नोमॅड’ हे पुस्तक विविध मानसिकतेचा शोध घेणारं आहे. अमेरिकेत आल्यावर नव्याने आयुष्य जगण्याबद्दल आयानने या पुस्तकात लिहिले आहे. युरोपमधील कडव्या इस्लामी लोकांच्या जिवे मारण्याच्या धमक्या, जगाशी संघरष, तिचा अंतर्गत संघर्ष अशा सगळ्यांपासून दूर जात तिने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. स्त्रीवर बंधनं घालणाऱ्या मागास जमातीतील एका स्त्रीचे खुल्या समाजातील स्वतंत्र आणि नीडर स्त्रीमध्ये झालेल्या रूपांतराचे ‘नोमॅड’ हे अनुभवकथन आहे. कुटुंबापासून ते समाजापर्यंत अनेकांचा सामना करत तिला वेळोवेळी आव्हानं स्वीकारावी लागली, तरी जिद्दीने सगळ्यांशी लढा देत स्वत:च्या विचारांना तिने वाट मोकळी करून दिली. तिच्या वडिलांसोबतची अखेरची भेट, ९/११ च्या घटनेनंतर तिने इस्लामचा केलेला त्याग, आई आणि युरोपमधील काही नातेवाइकांपासून दुरावणं अशा कौटुंबिक दु:खांनाही ती सामोरी गेली. ‘नोमॅड’ हे पुस्तक स्त्रीच्या अमेरिकेतील पदार्पणाचे, तेथील हृद्य, मजेशीर अनुभवांचे, संस्कृतीचे, तिथल्या लोकांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे, मानसिकतेचे विश्लेषणात्मक चित्रण आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.