* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHARATIYA SAHITYIK
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668445
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF WE WANT TO MAINTAIN OUR POSITION IN THIS GLOBALIZATION, THEN WE HAVE TO TAKE SPECIFIC CARE OF OUR LANGUAGE, CULTURE AND LITERATURE. OTHERWISE, WE WILL NOT BE ABLE TO HAVE INDIVIDUAL EXISTENCE IN THIS WORLD. TODAY, OUR LITERATURE IS AIMING AT ACQUIRING KNOWLEDGE AT THE WORLD LEVELS. THERE IS NOTHING WRONG IN THIS, BUT WE MUST ALSO WIDEN THE HORIZONS OF OUR KNOWLEDGE, LITERATURE, CULTURE, AND LANGUAGE. THE AIM OF OUR LITERATURE FOR THE 21ST CENTURY SHOULD BE CREATING ALL INDIA ACADEMY SOCIETY. FOR THIS, WE NEED TO HAVE A CONSOLIDATED FORM OF INDIAN LANGUAGES AND LITERATURE. THIS CAN BE ACHIEVED ONLY IF WE HAVE THE BASIC KNOWLEDGE OF THE INDIAN LANGUAGES AND LITERATURE. THIS CAN BE FULFILLED BY READING THIS BOOK. INDIA IS A MULTI-LINGUISTIC, AND MULTICULTURAL COUNTRY, AND THIS BOOK WILL HELP YOU TO UNDERSTAND IT BETTER.
आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात जोवर आपण आपली भाषा, संस्कृती, साहित्य टिकवून धरू तोवरच आपले स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता सुरक्षित राहील. जागतिक स्तरावरील ज्ञानाचे संपादन हे आज आपल्या समग्र भाषा व साहित्य व्यवहाराचे उद्दिष्ट होऊ पाहत आहे. ते उद्दिष्ट साध्य करताना आपणापुढे भारतीय ज्ञान, साहित्य, संस्कृती, भाषा जपण्याचे व ते सारे समृद्ध करण्याचेही आव्हान आहे. अखिल भारतीय अकादमीक समाजनिर्मिती हे एकविसाव्या शतकातील आपले साहिाQत्यक लक्ष्य आहे. त्यासाठी भारतीय भाषा व साहित्याचे एकसमन्वायी, समेकित (CONSOLIDATE) रूप तयार करणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता प्रत्येकात भारतीय भाषा व साहित्याची समृद्ध जाण हवी. अशी जाण ‘भारतीय साहित्यिक’ हे पुस्तक तुमच्यात निर्माण करील. भारतासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशात ‘भारतीय साहित्यिक’सारखं पुस्तक आपल्या संग्रही असणं म्हणजे भारतीयतेचं स्पंदन आपल्या हृदयाशी जपण्यासारखंच!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #DR.SUNILKUMARLAVATE #डॉ.सुनीलकुमारलवटे #भारतीयसाहित्यिक #BHARATIYASAHITYIK
Customer Reviews
  • Rating StarSAKAL 16-12-2007

    डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या ‘भारतीय साहित्यिक’ या पुस्तकात पंचवीस ‘भारतीय साहित्यिक’ या पुस्तकात पंचवीस भारतीय साहित्यिकांचा आस्वादक शैलीत परिचय घडविला आहे. यात हिंदू, उर्दू, मराठी, पंजाबी, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांतील साहित्यिकांचा समाेश आहे. यात सर्वाधिक जास्त असे चौदा साहित्यिक हिंदीतील आहेत.‘सकाळ’ (कोल्हापूर आवृत्ती) मध्ये यातील बहुतेक लेख प्रकाशित झाले आहेत. यातील लेख बहुधा प्रासंगिक कारणांनी लिहिलेले आहेत. तरीही ते लेखकाचे जीवन, व्यक्तित्व आणि साहित्यविशेष यांचे नेमकेपणाने दर्शन घडवतात. स्वत: लेखक हिंदीचे प्राध्यापक असल्यामुळे हिंदीतील लेखकांवरील लेख अधिक अभ्यासपूर्ण उतरले आहेत. त्यात लेखकांच्या कलाकृतींची ओळख घडवून देताना वाचकांना लेखकाचे वाङ्मयीन परंपरेतील स्थान लक्षात आणून देण्याची भूमिकाही आहे. ‘‘मैथिलीशरण गुप्तांची साहित्यसाधना ही एकविसाव्या शतकातील भारताला अंतर्मुख होण्याची एक संधी आहे,’’ हे डॉ. लवटे यांचे भाष्य मार्मिक आहे. यात महादेवी वर्मा, अमृता प्रीतम, निर्मल वर्मा, यू.आर.अनंतमूर्ती अशा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यकारांबरोबर पटकथाकार डॉ. राही मासूम रझा, परदेशी हिंदी कवी ओदोलेन स्मेकल, रस्त्यावरचा रंगकर्मी सफदर हाश्मी, ‘मराठी कबीर’ नारायण सुर्वे अशा महत्त्वाच्या लेखकांचाही समावेश आहे. डॉ. लवटे यांची संवेदनशीलता विविध विचारसरणींच्या साहित्यिकांचे वाङ्मयीन कर्तुत्व जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता धारण करू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. मात्र ‘भारतीय साहित्यिक’ या शीर्षकाखालील पुस्तकात सुधाकर प्रभूंचा समावेश खटकतो. खरे तर यात इतर भारतीय भाषांमधील राष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण स्थान असलेले काही साहित्यिक समाविष्ट करायला हवे होते. त्यांच्या अनुवादित साहित्याबाबतची सूचीही दिली असती तर पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढले असते. आहे त्या स्वरूपात हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांची जिज्ञासा वाढवणारे आणि अनुवादकांना मार्गदर्शक ठरणारे म्हणून महत्त्वाचे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book