* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CUTTING FREE
  • Availability : Notify Me
     
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980677
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 267
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BEGINNING WITH A PRIVILEGED CHILDHOOD IN AN ELITE FAMILY OF PRE-PARTITION INDIA, TO A TROUBLED YOUTH IN PAKISTAN, THIS IS THE INSPIRING STORY OF SALMA AHMED--A WOMAN WHO SURMOUNTED FORMIDABLE ODDS TO ACHIEVE EXTRAORDINARY SUCCESS IN BUSINESS AND POLITICS. IN THIS STRIKINGLY HONEST AND CANDID ACCOUNT, SALMA TALKS OF HER THREE MARRIAGES - TO A NAVAL OFFICER, A SCION OF A LEADING FEUDAL FAMILY, AND A CRICKETING STAR; HER CONFLICTS AS A MOTHER AS SHE MAKES THE AGONISING DECISION TO GIVE UP TWO OF HER SIX CHILDREN, AND HER EFFORTS TO BUILD A CAREER AS A BUSINESS ENTREPRENEUR AND POLITICAL FIGURE IN AN EMERGING PAKISTAN. AS SHE RECOUNTS THE EVENTS OF A LIFE FILLED WITH DRAMATIC HIGHS AND EQUALLY PAINFUL LOWS, SHE DOES NOT SPARE HERSELF ANY MORE THAN SHE DOES OTHER PLAYERS IN HER STORY. THIS IS A BOOK THAT UNABASHEDLY REVEALS MANY OF THE HIDDEN TABOOS OF CONTEMPORARY PAKISTANI SOCIETY, BRINGING INTO QUESTION CUSTOMS THAT ARE AN INTEGRAL, IF UNPLEASANT, PART OF SUBCONTINENTAL CULTURE. SALMA AHMED`S GRIPPING NARRATION OF HER POLITICAL CAREER IS FAST-PACED AND OFTEN AMUSING. THE BOOK RELATES EVENTS OF THE 1985 ASSEMBLY WHICH NO OTHER AUTHOR HAS YET COMMENTED ON. HER INTERACTION WITH THE LATE PRESIDENT ZIAUL-HAQ AND PRIME MINISTER MOHAMMAD KHAN JUNEJO, MQM LEADER ALTAF HUSSAIN, THE CHARISMATIC PIR SAHIB PAGARO, AND SEVERAL OTHERS, GAVE HER A UNIQUE OPPORTUNITY TO WITNESS FIRST-HAND THE INTRIGUE, POWER PLAYS AND UNFOLDING DRAMA OF PAKISTANI POLITICS. HER FREQUENT VISITS TO INDIA BROUGHT HER INTO CONTACT WITH INDIRA GANDHI, HER SON RAJIV, AND MANY OTHER LEADING FIGURES OF THE SUB-CONTINENT. THIS IS THE ABSORBING TALE OF A WOMAN WHO WAS A PAMPERED CHILD, AN UNHAPPY WIFE, A REPENTANT MOTHER--BUT ONE WHO EMERGED TRIUMPHANT AS A WOMAN OF SUBSTANCE, IN BUSINESS AND POLITICS.
ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपेक्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांनी त्यांच्या बिझनेस, राजकीय कारकीर्द व कौटुंबिक जीवन यांबद्दल, यशापयश, भावनिक आंदोलनं यांबद्दल अतिशय प्रामाणिक व मनमोकळं कथन केलं आहे. सलमा अहमद यांच्या जीवनातले अतिशय उत्तुंग नाट्यमय क्षण वाचकाला रोमांचित करतात तर त्यांच्या जीवनातल्या अनेक काळ्याकुट्ट क्षणी त्यांनी दाखवलेलं विलक्षण धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच या कथनातून उपखंडातील संस्कृती, तत्कालिन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन आदींचेही विविधांगी पदर वाचकासमोर उलगडतात. बिझनेस व राजकारण या दोन्ही क्षेत्रांत ‘वूमन ऑफ सबस्टन्स’ ठरलेल्या सलमा अहमद यांचं हे विलक्षण अनुभवकथन वाचकाला एका निराळ्या विश्वाची व स्त्रीशक्तीच्या अफाट सामथ्र्याची ओळख करून देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CUTTINGFREE #CUTTINGFREE #कटिंगफ्री #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #SALMAAHMED "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    CUTTING FREE by Salma Ahmed सलमा अहमद यांनी स्वानुभवावर लिहिलेले ‘कटिंग फ्री’ हे विलक्षण पुस्तक आहे. याचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. सलमा अहमद यांचाजन्म १० सप्टेंबर रोजी शुक्रवाी ४.३० वाजता ग्रँडचेस्टर मेडोज, केंब्रिज येथील ग्रँडचेस्टर हॉस्पिटलमध्ये झाला. तिचं नाव ठेवलं इंदिरा सलमा हुसेन. तिचे पिता अख्तर हुसेन यांनी तिच्या आईला इंग्रजी शिकायला केंब्रिजला नेलं होतं. तिथं ते कॉर्पस ख्रिस्तीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करीत होते. त्याच दरम्यान तिचा जन्म झाला. तिची आई शाकिरा बेगम. तिचं बाळंतपण अवघड गेलं. ती बुटकी, लहानखुऱ्या चणीची होती. इंदिरा सलमा हुसैन तिचं पहिलंच अपत्य होतं. त्या फाळणीपूर्व काळात इंग्लंडमध्ये जन्म होणे ही फार विशेष गोष्ट मानली जात असे. तिच्या आई-वडिलांनी तिला जहाजातून भारतात आणलं. परतीच्या प्रवासात तिची आई विचार करीत होती की, तिच्या नावातील ‘इंदिरा’चं घरातल्यांना काय स्पष्टीकरण द्यायचं त्यासाठी ती टोपण नाव शोधत होती.इंदिरा सलमा हुसैनचे वडील देशभक्त होते, पण सनातनी मुस्लिम कुटुंबात हे नाव रुचलं नसतं. तिच्या मम्मीला एक नाव सुचलं, इंदु बाला. पण तेही नाव चांगलं नसल्यामुळे तिच्या वडिलांनी तिचं टोपणनाव इनी ठेवलं. तिचे वडील तेव्हा सहारनपूमध्ये ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट’ होते. भारतीय मुलकी सेवेतील आयसीएस सदस्य. तिची मम्मी मोराबादच्या सरंजामशाही घराण्यातली होती. उत्तर प्रदेशातील मानकुला हे त्यांचं वडिलोपार्जित खेडं होतं. तिच्या वडिलोपार्जित घराला ‘डेरा’ म्हटलं जात असे. तिच्या घराण्याच्या पठाणी पार्श्वभूमीमुळं बहुधा हे नाव पडलं असावं. वयाच्या सहाव्या वर्षीच भारताच्या फाळणीनंतर सलमा हुसैनला आपल्या कुटुंबियांबरोबर पाकिस्तानमध्ये जावं लागलं. त्यानंतरची तिची विलक्षण जडणघडण या पुस्तकात मांडण्यात आली आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपेक्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांच्या जीवनातले बिझनेस, राजकीय कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन, अतिशय उत्तुंग, नाट्यमय क्षण रोमांचित करतात तर काळयाकुट्ट क्षणी त्यांनी दाखविलेलं धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच तत्कालीन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन वाचकांसमोर उलगडले जाते. सलमा अहमद यांचे बालपण राजकारण व्यक्ती आणि मुत्सद्दी मंडळींच्यात गेले आहे. वडील राजदूत असल्यामुळे लहानपणापासून राजकीय घटनांमधील अन्वयार्थ त्यांना चांगल्या पद्धतीने समजत होता. तो त्यांनी राजकीय पक्षांशी संलग्न होताना अधिक परिपक्व केला. उद्योग, व्यवसाय आणि राजकारण यात यशस्वी होत असताना याचा उपयोग झाला. इंदिरा गांधी, तसेच राजीव गांधी यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भेटी तसेच पुस्तकात असलेली त्यांची छायाचित्रे, वाचकांशी होत असलेला संवाद अधिकच मनोहारी करतात. खरेतर सलमा अहमद यांनी १९७० मध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यापूर्वी १९६७ मध्ये स्वतःची पहिली इंडस्ट्री त्यांनी स्थापन केली. जहाज मोडणीच्या कामात त्यांनी मिळवलेलं यश हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च यश होतं. कारण अशा प्रकारचे काम करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. त्यांनी पाकिस्तान ‘असोसिएशन ऑफ विमेन’ची स्थापना केली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ५० वर्षांमधील सर्वांत यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांना प्रियदर्शनी पुरस्कार देण्यात आला. कालांतराने त्यांनी राजकारण प्रवेश केला. १९७७ मध्ये ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षात त्या सामील झाल्या. त्यांचा हा प्रवास नाट्यमय आणि वाचकांना रोमांचित करणारा आहे. बिझनेस आणि राजकार या दोन्ही क्षेत्रात वूमन ऑफ सबस्टन्स ठरलेल्या सलमा अहमद याचं हे विलक्षण अनुभव कथन स्त्रीशक्तीच्या अफाट सामर्थ्याची ओळख करून देणारे आहे.सलमा अहमदनी हे आत्मवृत्त तिच्या मुलीच्या वियोगामुळे लिहिलं आहे. १९९९ साली ब्रेनट्यूमरनी तिची मुलगी नेहमी म्हणायची, ‘ममी, तू तुझ्याबद्दल लिहिलं नाहीस, तर मी लिहिन’ मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या स्त्रीमनातील गुंत्याचा मानसिक निचरा म्हणून लिहिलेलं आत्मवृत्त म्हणजे ‘कटिंग फ्री’. बीनाच्या स्मृतीस वाहिलेलं हे आत्मकथन प्रसिद्ध आंग्ल कवी लॉर्ड बायनरच्या जगप्रसिद्ध कवितेचा निर्देश करून सुरू होतं. ``She walks in beauty like the night.`` स्त्रीवर्गाने आणि भारतातील सर्वांनीच वाचावं असं हे पुस्तक असून ते मराठीत आणलं गेल्यामुळे सर्वांची सोय झाली आहे. ते जरूर वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarPRABHAT 3-1-2010

    सलमा अहमद यांनी स्वानुभवावर लिहिलेले ‘कटिंग फ्री’ हे विलक्षण पुस्तक आहे. याचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपे्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांच्या जीवनातले बिझनेस, राजकीय कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन, अतिशय उत्तुंग, नाट्यमय क्षण रोमांचित करतात तर काळयाकुट्ट क्षणी त्यांनी दाखविलेलं धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच तत्कालीन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन वाचकांसमोर उलगडले जाते. सलमा अहमद यांचे बालपण राजकारणी व्यक्ती आणि मुत्सद्दी मंडळींच्यात गेले आहे. वडील राजदूत असल्यामुळे लहानपणापासून राजकीय घटनांमधील अन्वयार्थ त्यांना चांगल्या पद्धतीने समजत होता तो त्यांनी राजकीय पक्षांशी संलग्न होताना अधिक परिपक्व केला. उद्योग, व्यवसाय आणि राजकारण यात यशस्वी होत असताना याचा उपयोग झाला. इंदिरा गांधी, तसेच राजीव गांधी यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भेटी तसेच पुस्तकात असलेली त्यांची छायाचित्रे, वाचकांशी होत असलेला संवाद अधिकच मनोहारी करतात. खरेतर सलमा अहमद यांनी १९७० मध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यापूर्वी १९६७ मध्ये स्वतःची पहिली इंडस्ट्री त्यांनी स्थापन केली. जहाज मोडणीच्या कामात त्यांनी मिळवलेलं यश हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च यश होतं. कारण अशा प्रकारचे काम करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. त्यांनी पाकिस्तान ‘असोसिएशन ऑफ विमेन’ची स्थापना केली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ५० वर्षांमधील सर्वांत यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांना प्रियदर्शनी पुरस्कार देण्यात आला. कालांतराने त्यांनी राजकारण प्रवेश केला. १९७७ मध्ये ‘ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग’ या पक्षात त्या सामील झाल्या. त्यांचा हा प्रवास नाट्यमय आणि वाचकांना रोमांचित करणारा आहे. बिझनेस आणि राजकार या दोन्ही क्षेत्रात वूमन ऑफ सबस्टन्स ठरलेल्या सलमा अहमद याचं हे विलक्षण अनुभव कथन स्त्रीशक्तीच्या अफाट सामर्थ्याची ओळख करून देते. ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 6-6-2010

    एका उच्चभ्रू पाकिस्तानी महिलेचं विलक्षण अनुभवकथन हे सलमा अहमद लिखित ‘कटिंग फ्री’ या आत्मवृत्ताचं मुखपृष्ठवर्णित उपशीर्षकच त्यातील सारं थोडक्यात सांगून जातं. खरं तर मूळ इंग्रजी आत्मकथेला असं उपशीर्षक नसल्यामुळे ‘कटिंग फ्री’ त्या शीर्षकाचाच विचार वाचका्या मनात प्रथम सुरू होतो. ‘मुक्तता, पण कशापासून?’ असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात त्याचं साधंसं उत्तर म्हणजे : पुरुषाच्या गुलामगिरीपासून; परंतु पुस्तक वाचत असताना मात्र पुरुषप्रधान संस्कृतीची पार्श्वभूमी घडणाऱ्या घटनांना अजूनही जळजळीत स्त्रीवादी दृष्टिकोन लिखाणात फार जाणवत नाही. एकूणच हे पुस्तक स्त्रीवादी आणि त्यातून येणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांची चर्चा व्हावी, या हेतूने लिहिलेले नसून, मराठी अनुवादाच्या उपशीर्षकास जणू अनुरूप ठरावे म्हणून एका उच्चभ्रू पाकिस्तानी महिलेचं फक्त विलक्षण अनुभवकथन, हेच स्वरूप धारण करून समोर येतं. स्त्रीच्या दु:खाची ज्वलंत कहाणी मांडण्यापेक्षा आपल्या अनुभवाचा वाटा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी एक स्त्री म्हणून सलमा अहमदचं हे आत्मवृत्त जास्त पसंतीस उतरते, असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. एका अर्थाने ही आत्मकथा त्याआधी प्रसिद्ध झालेल्या तशाच प्रकारच्या दोन आत्मवृत्ताच्या धर्तीचीच वाटते. तेहमीमा दुराणी यांचे ‘माय फ्यूडल लॉर्ड’ आणि असरा नोमानी यांचे ‘स्टॅडिंग अलोन इन मक्का’ ही ती दोन आत्मवृत्ते होत. त्या दोन्ही पाकिस्तानी महिलांनी इस्लामी समाजव्यवस्थेत पुरुषप्रधान संस्कृतीत होणारी मुस्लीम स्त्रियांची गळचेपी मानहानी प्रभावीपणे मांडली होती. सलमा अहमदही तेच कथन पुढे चालवीत असल्या तरी स्त्रीचे एक आगळेवेगळे आणि प्रभावी रूप ही आत्मकथा समोर मांडते. फाळणीपूर्व भारतातील पतियाळामध्ये बालपण गेलेल्या एका श्रीमंत मुस्लीम कुटुंबातील स्त्रीचे तरुणपणी पाकिस्तानमध्ये झालेले हाल आणि त्यानंतर त्यातून बाहेर पडून, राखेतून पुनर्जन्म झालेल्या फिनिक्स पक्षाप्रमाणे, तिने व्यावसायिक जगतात, कमावलेले नाव आणि पाकिस्तानी राजकारणात मिळविलेले स्थान हे सारे स्तिमित करणारेच ठरते. स्त्रीच्या व्यक्तिगत जीवनातील दु:खाबरोबरच तिच्या सामाजिक जीवनपर्वातील अनुभव त्यातील तपशीलासह तितक्याच तन्मयतेने आणि तरीही त्यापासून स्वत:ला दूर ठेवून कथन करीत असताना सर्व सत्य जगासमोर मांडण्यात हे आत्मवृत्त यशस्वी झालं आहे, असे म्हणता येईल. एका स्त्रीची आत्मकथा असूनही जे स्त्रीरूप आपल्यासमोर येते ते मात्र पारंपारिक वाटत नाही. ही स्त्री श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबातील असून केंब्रिजला शिकलेली, जगभर फिरलेली, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या उच्चभ्रू वर्गात मोडणारी आहे. तरीही तीन विवाह संबंधातून जाताना ती प्रवाह पतित भासते. आपल्या चुकांमधून ती फारसे शिकत नाही, असे वाटते. उच्च राहणीमानाचा, पैशाचा, समृद्धीचा मोह तिला सोडता येत नाही आणि सर्वांत न रूचणारी बाब म्हणजे तिचं आपल्या मुलांकडे झालेलं दुर्लक्ष. सहा मुलांची ही आई आपल्या पहिल्या दोन मुलांचा त्याग करते, हे पटत नाही. स्वत:च्या सुखासाठी ती हे करते, हे समजू शकते. पण वाचकांच्या स्त्रीत्वाच्या कल्पनेला धक्का देऊन जाते. त्यामुळेच या आत्मकथेतील स्त्री ही मर्यादाच्या पलीकडे जाऊन जीवन आपल्या पद्धतीनेच जगणारी आहे. स्त्रीचे असेही रूप असते, तेही तितकेच खरे असते, प्रामाणिक असते, हा विचार त्या आत्मकथेतून पुढे येतो. आणि त्यामुळे लेखिका स्वत:च्या दु:खात बुडून न जाता धैर्याने त्यास सामोरी जाते. वडिलांच्या राजकीय पार्श्वभूमीचा व आर्थिक सुबत्तेचा योग्य तो उपयोग करीत ती ‘शिप-ब्रेकिंग’ या नव्या व्यवसायात धडाडीने उतरते व यशस्वी होते. जहाज मोडणीच्या व्यवसायातील पहिली यशस्वी महिला ठरण्याचा मानही मिळविला. अत्यंत लाडावलेली उच्चभ्रू कुटुंबातील मुलगी, तीन विवाहबंधनातून यातनांचे चटके सोसलेली पत्नी आणि एक पश्चात्तापदग्ध आई अशी व्यक्तिगत जीवनातील तीन रूपे बाजूस सारून सलमा अहमद यांनी सामाजिक व पुढे राजकीय जीवनात प्रवेश केला. १९८५ सालच्या पाकिस्तानी राष्ट्रीय असेंब्लीच्या सभासद झाल्या. त्यावेळच्या पंतप्रधान मोहम्मदखान जुनेजो यांच्याबरोबर काम करताना आलेल्या अनुभवातून त्यांनी पाकिस्तानच्या राजकीय जीवनातील आंतरिक घडामोडीवर प्रकाश टाकला आहे. प्रेसिडेंट झिया-उल-हक यांच्याबद्दलचे अनुभवही त्यांनी पुस्तकात मांडले आहेत. वैयक्तिक व सामाजिक जीवनातील अनुभव सांगताना त्या कोठेही डगमगलेल्या वाटत नाहीत. भावनेला लगाम घालून सत्य कथनाचा प्रामाणिक वसा घेऊन लिहिलेले हे आत्मवृत्त त्यामुळेच वाचायला हवे. आत्मवृत्ताचा मूळ हेतू अनुभव कथनातील सत्यता हा असल्याने लिखाणतील परिणामकारकता थोडीशी कमी होऊन ते एकसुरी, माहितीपटासारखे काहीवेळा वाटते. लेखिका व्यक्तिगत जीवनातील चुकाही स्पष्टपणे स्वीकारताना दिसते. त्यामुळे एकूणच ती कोणतीही आग्रही भूमिका घेताना दिसत नाही. स्त्रीवादी दृष्टिकोनाचा आग्रह नाही. स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाबद्दल चीड, संताप नाही, सामाजिक-राजकीय जीवनात होत असलेल्या ऱ्हासाबद्दल हळहळ वा तिरस्कार व्यक्त करणे नाही, यामुळे सत्य फक्त ‘कथन’ केले जाते. त्यामुळे निवेदनात कोरडेपणा, निरसता आल्यासारखी जाणवते. ही भावना मराठी अनुवादात प्रकर्षाने येत असावी. मूळ इंग्रजी पुस्तक वाचताना कदाचित भाषेच्या अभिव्यक्तीतील भिन्नतेमुळे तसे जाणवत नसेलही. अर्थात अनुवाद करण्याचे काम खूप कठीण असते. सुप्रिया वकिलांनी त्यांचे काम उत्तम प्रकारे पार पाडले आहे. यात शंकाच नाही. आजकाल मराठी अनुवाद करताना इंग्रजी शीर्षक तसेच ठेवण्याची ‘प्रथा’ रूढ झाली आहे. ते जरूर ठेवावे, पण काही वेळा त्याबरोबरच मराठी शीर्षकही दिल्यास अनुवादाची आकर्षकता वाटू शकेल, असे म्हणावेसे वाटते. ‘कटिंग फ्री’ हे पुस्तक वाचायला हवं, कारण भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रातील ताणतणावाबद्दल ते अप्रत्यक्षरित्या भाष्य करते आणि दोन्ही देशातील लोकांना तितक्याच अप्रत्यक्षपणे पण निसंदिग्धपणे माणुसकीचा संदेश देऊन जाते. भारतात जन्मलेल्या सलमा अहमदचं भारतप्रेम या आत्मकथेत पानापानावर व्यक्त झालेलं दिसून येतं. पाकिस्तानी व इस्लामधर्मी असूनही भारताबद्दलची मानसिक गुंतवणूक जन्मापासून, त्यांनी बाळगलेली आहे. सलमाचं नाव ठेवलं होतं ‘इंदिरा सलमा’ परंतु ते स्वीकारलं जावं म्हणून सलमा झाली ‘इनी’, आयुष्यभरासाठी. तिच्या बहिणीचं नावही मीनल. अशी ही भारतवंशीय लेखिका अनेकदा भारतात येऊन गेली. तिचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी परिचय झाला. परराष्ट्रखात्यातील कार्यकर्ते रोमेश भंडारी यांच्याशी सलमा अहमदचे जवळचे संबंध होते. पाकिस्तानातील सर्वांत यशस्वी महिला उद्योजक म्हणून त्यांना प्रियदर्शनी पारितोषिकानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे हे भारतप्रेम आपली अपुरी आत्मकथा संपवतानासुद्धा दिसून येते. त्यांचे अखेरचे वाक्य आहे, ‘मी अंतिम विश्रांतीसाठी ठिकाण निवडून ठेवले आहे.. दिल्लीत, दर्गाह हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याच्या परिसरात भारत-पाकिस्तान मैत्रीचा हा मानवी हात आपण सर्वांनी धरला पाहीजे, हे अनुभवातून सांगणारं आत्मनिवेदन ‘कटिंग फ्री’ला भारतीयांच्याही जवळ जाण्यास त्यामुळेच प्रवृत्त करतं. अशा या लक्षवेधी, आगळ्या आत्मकथेला भावनेचा ओलावा त्यामागील प्रेरणेमुळे मिळाला आहे. सलमा अहमदनी हे आत्मवृत्त तिच्या मुलीच्या वियोगामुळे लिहिलं आहे. १९९९ साली ब्रेनट्यूमरनी तिची मुलगी नेहमी म्हणायची, ‘ममी, तू तुझ्याबद्दल लिहिलं नाहीस, तर मी लिहिन’ मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या स्त्रीमनातील गुंत्याचा मानसिक निचरा म्हणून लिहिलेलं आत्मवृत्त म्हणजे ‘कटिंग फ्री’. बीनाच्या स्मृतीस वाहिलेलं हे आत्मकथन प्रसिद्ध आंग्ल कवी लॉर्ड बायनरच्या जगप्रसिद्ध कवितेचा निर्देश करून सुरू होतं. ``She walks in beauty like the night.`` स्त्रीवर्गाने आणि भारतातील सर्वांनीच वाचावं असं हे पुस्तक असून ते मराठीत आणलं गेल्यामुळे सर्वांची सोय झाली आहे. ते जरूर वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarDAINIK MATRUBHUMI 3-1-2010

    सलमा अहमद यांनी स्वानुभवावर लिहिलेले ‘कटिंग फ्री’ हे विलक्षण पुस्तक आहे. याचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपे्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांच्या जीवनातले बिझनेस, राजकीय कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन, अतिशय उत्तुंग, नाट्यमय क्षण रोमांचित करतात तर काळयाकुट्ट क्षणी त्यांनी दाखविलेलं धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच तत्कालीन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन वाचकांसमोर उलगडले जाते. सलमा अहमद यांचे बालपण राजकारणी व्यक्ती आणि मुत्सद्दी मंडळींच्यात गेले आहे. वडील राजदूत असल्यामुळे लहानपणापासून राजकीय घटनांमधील अन्वयार्थ त्यांना चांगल्या पद्धतीने समजत होता तो त्यांनी राजकीय पक्षांशी संलग्न होताना अधिक परिपक्व केला. उद्योग, व्यवसाय आणि राजकारण यात यशस्वी होत असताना याचा उपयोग झाला. इंदिरा गांधी, तसेच राजीव गांधी यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भेटी तसेच पुस्तकात असलेली त्यांची छायाचित्रे, वाचकांशी होत असलेला संवाद अधिकच मनोहारी करतात. खरेतर सलमा अहमद यांनी १९७० मध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यापूर्वी १९६७ मध्ये स्वतःची पहिली इंडस्ट्री त्यांनी स्थापन केली. जहाज मोडणीच्या कामात त्यांनी मिळवलेलं यश हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च यश होतं. कारण अशा प्रकारचे काम करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. त्यांनी पाकिस्तान ‘असोसिएशन ऑफ विमेन’ची स्थापना केली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ५० वर्षांमधील सर्वांत यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांना प्रियदर्शनी पुरस्कार देण्यात आला. कालांतराने त्यांनी राजकारण प्रवेश केला. १९७७ मध्ये ‘ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग’ या पक्षात त्या सामील झाल्या. त्यांचा हा प्रवास नाट्यमय आणि वाचकांना रोमांचित करणारा आहे. बिझनेस आणि राजकार या दोन्ही क्षेत्रात वूमन ऑफ सबस्टन्स ठरलेल्या सलमा अहमद याचं हे विलक्षण अनुभव कथन स्त्रीशक्तीच्या अफाट सामर्थ्याची ओळख करून देते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more