* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GIRLS OF RIYADH
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184981056
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 286
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN RAJAA ALSANEA BOLDLY CHOSE TO OPEN UP THE HIDDEN WORLD OF SAUDI WOMEN—THEIR PRIVATE LIVES AND THEIR CONFLICTS WITH THE TRADITIONS OF THEIR CULTURE—SHE CAUSED A SENSATION ACROSS THE ARAB WORLD. NOW IN ENGLISH, ALSANEA’S TALE OF THE PERSONAL STRUGGLES OF FOUR YOUNG UPPER-CLASS WOMEN OFFERS WESTERNERS AN UNPRECEDENTED GLIMPSE INTO A SOCIETY OFTEN VEILED FROM VIEW. LIVING IN RESTRICTIVE RIYADH BUT TRAVELING ALL OVER THE GLOBE, THESE MODERN SAUDI WOMEN LITERALLY AND FIGURATIVELY SHED TRADITIONAL GARB AS THEY SEARCH FOR LOVE, FULFILLMENT, AND THEIR PLACE SOMEWHERE IN BETWEEN WESTERN SOCIETY AND THEIR ISLAMIC HOME.
त्या गुप्त जगातील एक दृश्य : चार तरुण मुलींचा प्रेम, अभिलाषा आणि इस्लामिक रूढी ह्यांच्या अरुंद खाडीतून केलेला तो प्रवास. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारची प्रार्थना संपल्यावर एक ई-मेल ऑनलाईन नेटवर्कवरील सदस्यांत प्रसारित केली जाते. रियाधमधील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गाम्राह, मिचैल्ली, सादीम आणि लामीस या चार उच्च स्तरीय विद्यार्थिनींच्या आयुष्यातील विदारक वास्तव वर्षभराच्या कालावधीत समोर आले. एकीकडे उच्च स्तरात आणि दुसरीकडे रूढींमध्ये अडकलेल्या या मुली आहेत. या पेचातून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या नकळत केलेले डेटिंग, अनुभवलेले शहरी जगणे, सेक्स आणि यातून त्यांच्या आयुष्याची झालेली पडझड आपल्यासमोर येते. एकविसाव्या शतकातील सुशिक्षित तरुणीला अजूनही जुन्या पद्धतीने जगणाऱ्या समाजात वाढत असताना, न संपणाऱ्या सांस्कृतिक मतभेदांना सामोरे जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या तरुण सौदी स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या जीवनातून प्रकटलेली एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय जाणीव म्हणजे ‘गल्र्स ऑफ रियाध’! त्यांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याहून कितीतरी वेगळ्या असणाऱ्या संस्कृतीच्या समाजात प्रकट होत आहेत, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #RAJJAALSANEA #SNEHALJOSHI #MYNAMEISSALMA #GIRLSODRIYADH #गर्ल्सऑफरियाध
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVSHAKTI 20-6-10

    मुस्लीम जगतातील अनेक महिला लिहित्या होत आहेत तसतशा अनेक वेगवेगळ्या अनुभूती जगापुढे येत आहेत. या शृंखलेतील दोन लक्षवेधी प्रयत्न म्हणून `गर्ल्स ऑफ रियाध’ आणि `सर्कल ऑफ लाईट’ या अनुवादांकडे पाहता येतं. मध्यपूर्वेतील मुस्लिम समाज आजही स्त्रियांनामोकळेपण, स्वातंत्र्य द्यायला तयार नाही. इराण वगैरे देशात काही काळ स्त्रियांना शिक्षण, कलांची आराधना, नोकरी व्यवसायनिमित्त स्वतंत्र आणि एकटे राहण्याची मुभा वगैरे सुधारणावादी पर्व येऊन गेले; परंतु खोमेनीच्या अमदानीत पुन्हा जुने मूलतत्ववादी वातावरण स्त्रियांना घरातच बंदिस्त करण्याच्या दिशेने अधिकाधिक कडवे आणि कडक बनत गेले. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेने पुस्तक लिहून आपल्या व्यथा-वेदना मांडल्या आणि सौदी अरेबियातील सनातनी लोक खवळून उठले तर नवल नाही. `गर्ल्स ऑफ रियाध’ या मूळ अरेबिक भाषेत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद २००७ मध्ये प्रसिद्ध झाला आणि आता त्याचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे बाजारात आला आहे. हे पुस्तक रजा अल्सानिया या महिलेने लिहिले आहे. सौदी स्त्रियांची प्रतिमा डागावण्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. पण तिने त्याला भीक घातली नाही. तिचे धाडस थक्क करणारे आहे. ती लिहिते, जिथे दाढीवाले शेख आपल्या तंबूत जनान्यातील सुंदर स्त्रियांच्या घोळक्यात शृंगार करत बसलेले असतात असा देश म्हणजे सौदी अरेबिया. पाश्चात्य माणसाच्या मनात अरेबियन नाइट्सचा देश, पेट्रोलच्या प्रचंड साठ्यांमुळे श्रीमंत झालेला देश अशी सौदी अरेबियाची प्रतिमा घट्ट स्थिरावली आहे. ही प्रतिमा बिन लादेनच्या दहशतवादाने काहीशी डळमळली खरी; पण स्त्रियांच्या बाबतीत कायमच राहावी अशीच सद्यस्थिती आहे. परंतु या सनातनी, कर्मठ राजवटीला आता खिंडार पडत आहेत हेही खरे आहे. रुढीवादी समाजातल्या मुली आता उच्च शिक्षणासाठी कॉलेज वसतिगृहात राहतात. गोषा वगैरे न पाळता तरुण मुलांबरोबर मोकळेपणाने वावरतात, नोकरी व्यवसाय करतात. पुरुषांच्या अधिपत्त्याखाली राहूनही आपली अस्मिता जपतात, प्रेमात पडू शकतात आणि प्रेमभंगाचाही सामना करु शकतात. `गर्ल्स ऑफ रियाध’ या कादंबरीतील गामराह, मिचैल्ली, सादीम आणि लामीस या चार श्रीमंत इस्लामी घराण्यातील तरुणी रियाध विद्यापीठात पाठ्यपुस्तकाबरोबर प्रेमाचे पाठही गिरवतात आणि आपल्या पालकांनाही कळवतात. हे करताना काही फासे उलटे पडतात आणि अनर्थही घडतात. परंतु पालकांच्या मनमानीला आव्हान देण्याचे आणि आपण केलेल्या कर्माची जबाबदारी घेण्याची परिपक्वताही दाखवतात. अरब राष्ट्रातील या बंडखोर तरुणी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा जीवनाच्या आणि कृतीच्या माध्यमातूनच प्रकट करतात. इस्लाममध्ये परिवर्तन होत आहे, असा निष्कर्ष या कादंबरीवरुन काढणे योग्य ठरेल असे नाही. पण ते होत आहे हे लक्षात येते एवढे खरे. या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे इंटरनेटयुगाला साजेसे तंत्र. ई-मेल्स सीदेहवेनफदाने सीदेहवेनफदा या याहू ग्रुपला १३ फेब्रुवारी २००४ ते १८ फेब्रुवारी २००५ या दरम्यान पाठवल्या आहेत. या ५० पत्रांतून चार मैत्रिणींच्या एका वर्षातील बऱ्यावाईट घटनांची नोंद घेतली गेली आहे. निझार या तरुणावर लामीस प्रेम करत होती. त्याच्याशी निकाह करुन ती कॅनडामध्ये छोट्या बाळासह पदवी परिक्षेची तयारी करत आहे. मिचैली बीएमडब्ल्यू कार दिमाखात चालवते. लामीसबरोबर शांपेनची मजा लुटते. पहिल्याच पत्रात गामराहच्या विवाहाचं वर्णन येतं. लग्नानंतर चुंबन घेण्याचा आग्रह होतो. इटलीत हनीमून. हनिमूनला जाण्याआधी आई तिला पुरुषांची आसक्ती पेटवण्याचा कानमंत्र देते. नवरा शिकागोला डॉक्टरेट करणारा, सादीम बिझनेस मॅनेजमेंटची पदवीधर. दिसायला सुंदर. बालीदशी तिचं लग्न होतं. नवऱ्याला सुख देण्यासाठी काहीही करण्याची प्रतिज्ञाच तिने केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षेत ती नापास होते. या ई-मेल पत्रांच्या विषयांवरुन या चौघां मैत्रिणींच्या जीवनातील घडामोडींची कल्पना येते. पहिल्याच पत्रात `मी माझ्या मित्रांबद्दल लिहिणार आहे असे स्पष्ट करुन हे संकेतस्थळ उघडे नागडे सत्य वाचण्याचं धैर्य असणाऱ्या आणि ह्या वेडेपणाच्या साहसात टिकून राहण्याची चिकाटी असणाऱ्या सहनशील सदस्यांसाठी आहे’ असे स्पष्ट केले आहे. मैत्रिणींचा सल्ला न घेता आपण या ई-मेल लिहिण्यास आरंभ केला आहे कारण, या मैत्रिणी पुरुषांच्या छायेत दबकून, घाबरुन कशाबशा जगत आहेत. कारागृहातल्या बंदिनीसारखं त्यांचं आयुष्य शुष्क झालं आहे. कुलूप लावून बंद केलेल्या जनानखान्यातल्या झगझगीत कपड्यात नटलेल्या बाहुल्यांप्रमाणं त्या वावरत आहेत. स्फटिकपात्रात मरणाऱ्या फुलपाखरांसारख्या गुदमरत आहेत. त्यांच्या घोट्याभोवती रक्ताळलेल्या साखळ्या बांधलेल्या आहेत. रात्री त्यांना पुरुषी विनवण्यांना इच्छेविरुध्द सामोरे जावे लागते. त्या सर्वांबद्दल या ई-मेल मध्ये मोकळेपणाने लिहिण्याचा इरादा पहिल्याच पत्रात स्पष्ट केला आहे. विनोदी, तिरकस, उपरोधपूर्ण शेरेबाजी करण्यात लेखिकेचा हातखंडा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more