* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KINGDOM
  • Availability : Available
  • Translators : UDAY BHIDE
  • ISBN : 9788184984477
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 384
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN THE ABBOT SPOKE, HIS VOICE WAS THIN AND RESIGNED. ‘IT IS THE END OF OUR MONASTERY. BY NIGHTFALL I WILL BE DEAD AND OUR WALLS WILL LIE SHATTERED. A TERRIBLE EVIL IS COMING FROM THE FOREST . . .’ A MONASTERY IN TIBET IS OVERRUN WITH CHINESE SOLDIERS SEARCHING FOR A SACRED RELIC. THE MONKS FLEE TO SEEK REFUGE IN HIDDEN CAVES, BUT THEIR PROGRESS IS HAMPERED BY AN INJURED STRANGER, WHOSE PRESENCE THREATENS THEM ALL . . . JOURNALIST NANCY KELLY RECEIVES A PARCEL CONTAINING A MYSTERIOUS TRUMPET MADE OF BONE, AND HEARS AN ACCOUNT OF A WESTERNER PENETRATING INTO A HIDDEN KINGDOM IN TIBET, WHERE ORCHIDS COVER THE EARTH, PAGODAS HUG THE HILLS AND SOARING CATHEDRALS HIDE UNDERGROUND. SOON SHE EMBARKS ON A DANGEROUS JOURNEY INTO AN ANCIENT LAND OF MYTH AND LEGEND, IN SEARCH OF A SECRET OLDER THAN TIME ITSELF . . .
खाली ठेवलेल्या त्या गो-या माणसाकडे एकदा नजर टाकून उपमठाधिपती स्वत:शीच बोलल्यासारखे पुटपुटले, ‘`... पण खरं म्हणजे इथं पिमाकोपर्यंत एक पाश्चिमात्य माणूस आला तरी कसा?’’ मठाधिपती बोलू लागले. त्यांचा आवाज बारीक आणि उदासीन होता. ‘‘आपल्या मठाचे अस्तित्वच नष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत. रात्र होईपर्यंत माझे निधन झालेले असेल आणि आपला मठ उद्ध्वस्त झालेला असेल. या निबिड अरण्यातून महाभयंकर, क्रूर शक्ती झडप घालण्यासाठी येत आहेत.’’ एक पवित्र वस्तू हस्तगत करण्यासाठी तिबेटमधल्या एका मठावर चिनी सैनिकांनी धाड टाकली आहे. प्राणरक्षणासाठी तिथल्या भिक्षूूंनी जंगलात दडलेल्या गुहांकडे धाव घेतली आहे, पण एका परक्या जखमी माणसामुळे त्यांची वाटचाल म्हणावी तशी वेगाने होत नाही आणि तो माणूस बरोबर असण्याने त्यांच्या सगळ्यांच्याच जिवाला धोका उत्पन्न झाला आहे. पत्रकार नॅन्सी केलीच्या नावाने एक पार्सल येते. त्यात एक रहस्यमय असे हाड कोरून बनवलेली तुतारी असते आणि एका पाश्चिमात्य माणसाने जिथे ऑर्किड्सच्या फुलांचे गालिचे जमिनीवर पसरलेले आहेत, उंच डोंगरांंना उंचच उंच जाणा-या छतांचे पॅगोडा मिठी मारून बसलेले आहेत आणि जिथे प्रार्थनामंदिरांचे उंच कळस जमिनीच्या गर्भात दडलेले आहेत अशा तिबेटच्या घनदाट जंगलात कुठंतरी दडलेल्या एका राज्यात प्रवेश केल्याचे वर्णन असते. लवकरच तीदेखील एका कालातीत रहस्याचा शोध घेण्यासाठी अद्भुत दंतकथा आणि आख्यायिकांच्या भूप्रदेशातल्या एका धोकादायक प्रवासाला निघते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VISHWASATTA #KINGDOM ##विश्वसत्ता #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #UDAYBHIDE #उदयभिडे #TOMMARTIN
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    अतिशय जखमी अवस्थेत तो परकीय माणूस वादळी पावसात मठाच्या दारात आला . त्याला त्या अवस्थेत पाहून तिबेटी धर्मगुरूंच्या मनात अभद्र शंकेची पाल चुकचुकली . याचे आगमन म्हणजे मठाचा विनाश हे त्याला कळून चुकले . तरीही त्याने त्या प्रवाश्याला वाचवायचा निर्णय घेतला. काही साथीदारांसमवेत त्याला घनदाट जंगलातील जादूगाराच्या गुहेत पाठविले . तो गेल्यावर काहीवेळातच चिनी सैनिकांचा हल्ला झाला . त्यांनी मठाच्या प्रमुख धर्मगुरूंना ठार मारले . इकडे इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्युन या मान्यवर वृत्तपत्राच्या भारतीय शाखेत नॅन्सी केलीची प्रमुख म्हणून निवड झाली . कारण येथील प्रमुख अंतोन हरगोज तीन महिन्यापासून गायब होता . दिल्लीत आल्याबरोबर पोलिसांकडून नॅन्सीची कसून चौकशी करण्यात आली आणि तिला हरगोजच्या काही वस्तू ताब्यात देण्यात आल्या . त्यात होते एक पुरातन हाड कोरुन तयार केलेली तुतारी . त्यावर आहे तिबेटमधील एक गूढ राज्याचे वर्णन . शांग्रीला नावाच्या राज्याची ती माहिती आहे .लामांच्या काही वयोवृद्ध धर्मगुरूनाच त्याची माहिती आहे . त्या राज्यात गेलेला एकही माणूस जिवंत परत आला नाही असे म्हटले जाते . चीन सरकारही त्या तुतारीचा शोध घेत आहे . नॅन्सी या गूढ अज्ञात राज्याचा शोध घ्यायला निघाली आहे . जगावर नियंत्रण करणारे अदृश्य शांग्री-ला राज्य यांची चित्तथरारक सफर ...Read more

  • Rating StarKiran Borkar‎

    अतिशय जखमी अवस्थेत तो परकीय माणूस वादळी पावसात मठाच्या दारात आला . त्याला त्या अवस्थेत पाहून तिबेटी धर्मगुरूंच्या मनात अभद्र शंकेची पाल चुकचुकली . याचे आगमन म्हणजे मठाचा विनाश हे त्याला कळून चुकले . तरीही त्याने त्या प्रवाश्याला वाचवायचा निर्णय घेतला. काही साथीदारांसमवेत त्याला घनदाट जंगलातील जादूगाराच्या गुहेत पाठविले . तो गेल्यावर काहीवेळातच चिनी सैनिकांचा हल्ला झाला . त्यांनी मठाच्या प्रमुख धर्मगुरूंना ठार मारले . इकडे इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्युन या मान्यवर वृत्तपत्राच्या भारतीय शाखेत नॅन्सी केलीची प्रमुख म्हणून निवड झाली . कारण येथील प्रमुख अंतोन हरगोज तीन महिन्यापासून गायब होता . दिल्लीत आल्याबरोबर पोलिसांकडून नॅन्सीची कसून चौकशी करण्यात आली आणि तिला हरगोजच्या काही वस्तू ताब्यात देण्यात आल्या . त्यात होते एक पुरातन हाड कोरुन तयार केलेली तुतारी . त्यावर आहे तिबेटमधील एक गूढ राज्याचे वर्णन . शांग्रीला नावाच्या राज्याची ती माहिती आहे .लामांच्या काही वयोवृद्ध धर्मगुरूनाच त्याची माहिती आहे . त्या राज्यात गेलेला एकही माणूस जिवंत परत आला नाही असे म्हटले जाते . चीन सरकारही त्या तुतारीचा शोध घेत आहे . नॅन्सी या गूढ अज्ञात राज्याचा शोध घ्यायला निघाली आहे . जगावर नियंत्रण करणारे अदृश्य शांग्री-ला राज्य यांची चित्तथरारक सफर ...Read more

  • Rating StarDAINIK GOMANTAK SHABDSOHALA 02-11-2014

    काही-काही पुस्तकं वाचून सुन्न-बधिर व्हायला होतं. त्यातील अचाट कथानक-शेवटपर्यंत लीलया खेळवलेली रोमहर्षक रहस्यं, आकर्षक मांडणी, गुंगवून टाकणारी शैली, ‘पुढे काय होईल?’ची वाढवत नेलेली उत्कंठा. सर्व काही, तुमच्यावर असं आणि इतकं कोसळतं, की पुस्तक संपल्यावरदेखी कितीतरी दिसव, दुसरं पुस्तक हातात धरवत नाही. कोणाशी काही बोलू नये, कसली चर्चा करू नये, काहीही वाचू नये... अशी ज्ञानोबांच्या शब्दात सांगायचे तर पुस्तकाशी तादात्म्य पावलेली अशी अवस्था होते. अगदी अशीच अवस्था टॉम मार्टिक लिखित ‘किंगडम’ ही कादंबरी वाचून होते. यातील जागांचे, माणसाचे प्रसंगाचे खरेखुरे संदर्भ वाचून कुठेही ही काल्पनिक कादंबरी असेल, अशी पुसटशीही शंका येत नाही. तिबेट राज्य, त्यातील प्रदेश, पॅगोडा आश्रम, तिथल्या दऱ्या-खोरी, माणसं, लामा, बौद्ध धर्म, स्तूप मठ, निसर्ग, औषध व भविष्य सांगणार ज्ञानग्रंथ, पोथ्या, पुराण, चीन, जर्मनी, अमेरिक-रशिया - भारत हे देश - त्यांचे निबेटी लोकांशी संबंध, आर्य लोकांचे मूळ, देवी-देवता, उपासना, साधना, काळी जादू, जगाच्या मन:शांतीवर साम्राज्य करणारे साधक, विनाश ठरवणारा ज्ञानग्रंथ आणि जगावर नियंत्रण करणारे शांग्री-ला हे अदृश्य राज्य... यांची ही चित्तथरारक कथा आहे. न्यूयॉर्कहून पत्रकार नॅन्सी केलीची अचानक दिल्लीला बदली होते. इंटरनॅशनल हेराल्ड, ट्रिब्युन वार्तापत्रात ती नोकरीला असते. ती ज्याच्या जागेवर कामाला येते तो आन्तोन हरझोग हा हरहुन्नरी, एक अत्यंत बुद्धिमान व चमकदार पत्रकार गेले कित्येक महिने काहीही न सांगता गायब आहे. त्याच्यावर हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे व त्याने कुठून तरी नॅन्सीच्या नावे एक पुरातन हाडाची तुतारी पाठवल्याचे पार्सल पोलिसांकडे आहे, म्हणून ते नॅन्सीला पहिल्याच दिवशी अटक करतात. नॅन्सी कशीबशी सुटका करवून घेते, ती हाडाची तुतारी ताब्यात घेते व सुरू होतो तो न संपणार शोध व भटकंती. तिला या खडतर प्रवासात कोण कोण कसे-कसे भेटतात, एकापेक्षा एक पुरावे तिला कसे मिळत जातात, ती त्या आन्तोन हरझोगला शोधत निबेटला कशी पोचते व शेवटी वाटेत येणारे हजार अडथळे दूर करत लक्ष्य साध्य करते का? तो तिला जिवंत सोडतो काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायला ही कादंबरी वाचायला हवी. एक अप्रतिम कादंबरी एवढ्या मोजक्या शब्दांत, तिची सर्व गुणवैशिष्ट्ये समावूच शकत नाहीत. यातील निसर्गवर्णन वाचताना, आपण अक्षरश: तिबेटमधील त्या गूढ दऱ्याखोऱ्यातून जंगलातून प्रवास करतोय अशी अनुभूती येते. पहिले महायुद्ध, दलाई लामा, शांग्री-ला, लामा, त्यांची औषधे-गुहा-भाषा अचूक उत्तरे देणार गूढ ज्ञानग्रंथ, ताओ तत्त्वप्रणाली यातील सर्व संदर्भ कथानकात असे काही जोडले आहेत की शेवटपर्यंत ती एक सत्यकथाच वाटत राहते. या कादंबरीचे सर्व काही अफाटच आहे. जितकी उत्तम कादंबरी तितकाच उत्तम तिचा अनुवाद केला आहे उदय भिडे यांनी. शिवाय अफलातून शेवट, एक धक्का तंत्राने, जिथे कथा संपते तिथेच ती एका नव्या रहस्याला जन्म देवून थांबते... परत वाचकांनी पुढे काय झाले असेलची हुरहूर लावून. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 2-12-2016

    हा किंगडम या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. यात पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटले आहे त्याप्रमाणे जगाच्या मन:शक्तीवर राज्य गाजवणारे साधक, विनाश ठरवणारा ज्ञानग्रंथ आणि जगावर नियंत्रण करणारे अदृश्य शांग्रीला राज्य यांची चित्तथरारक सफर आहे. पत्रकार नॅन्ी केलीच्या नावाने एक पार्सल येते. त्यात एक रहस्यमय तुतारी असते. जमिनीवर पसरलेल्या ऑर्किड्सच्या फुलांच्या गालिच्यांचे, उंच डोंगरांचे, त्यांच्यावर असलेल्या ढगांच्या छतांचे, तिबेटमधल्या घनदाट जंगलांचे, उंच कळस असलेल्या प्रार्थनामंदिरांचे वर्णन असते. त्यानंतर ती एका रहस्याच्या शोधात एका धोकादायक प्रवासाला निघते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more