* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARKER
  • Availability : Available
  • Translators : ANIL KALE
  • ISBN : 9788184980295
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 496
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE MASTER OF THE MEDICAL THRILLER RETURNS WITH HIS MOST HEART-POUNDING TALE YET. TWENTY-EIGHT-YEAR-OLD SEAN MCGILLIN IS THE PICTURE OF HEALTH, UNTIL HE FRACTURES HIS LEG WHILE IN-LINE SKATING IN NEW YORK CITY`S CENTRAL PARK. WITHIN TWENTY-FOUR HOURS OF HIS SURGERY, HE DIES. A THIRTY-SIX-YEAR-OLD MOTHER, DARLENE MORGAN, HAS SURGERY TO REPAIR A TORN LIGAMENT IN HER KNEE. AND WITHIN TWENTY-FOUR HOURS, SHE IS DEAD. NEW YORK CITY MEDICAL EXAMINERS DR. LAURIE MONTGOMERY AND DR. JACK STAPLETON ARE BACK, IN ROBIN COOK`S ELECTRIFYING TWENTY-FIFTH NOVEL. LAST SEEN IN VECTOR, THE DOCTORS NOW CONFRONT A BALLOONING SERIES OF PUZZLING HOSPITAL DEATHS OF YOUNG, HEALTHY PEOPLE WHO HAVE JUST UNDERGONE SUCCESSFUL ROUTINE SURGERY. DESPITE INSTITUTIONAL RESISTANCE FROM HER SUPERIORS, AND FROM THE STAFF AT MANHATTAN GENERAL, LAURIE DOGGEDLY PURSUES THE INVESTIGATION AS THE DEATH TOLL MOUNTS. IT SEEMS IMPOSSIBLE TO DETERMINE WHY AND HOW THE PATIENTS ARE DYING, YET SHE COMES TO SUSPECT THAT NOT ONLY ARE THE DEATHS RELATED THEY`RE INTENTIONAL, SUGGESTING THE WORK OF A REMARKABLY CLEVER HEALTHCARE SERIAL KILLER WITH A VERY UNUSUAL MOTIVE, WHICH MAY INVOLVE FRIGHTENING TIES TO BOTH DEVELOPING GENOMIC MEDICINE AND THE ECONOMICS OF MODERN-DAY HEALTHCARE. AS IF TO HEIGHTEN THE TENSION, LAURIE IS DEALT A DOUBLE BLOW: WHILE COPING WITH JACK`S INABILITY TO COMMIT TO THEIR RELATIONSHIP, SHE DISCOVERS SHE CARRIES A GENETIC MARKER FOR A BREAST-CANCER GENE. WITH HER PERSONAL LIFE UNRAVELING, THE NEED FOR ANSWERS BECOMES MORE URGENT, ESPECIALLY WHEN SHE IS INEXORABLY PULLED INTO THE NIGHTMARE AS A POSSIBLE VICTIM HERSELF. TIME WINDS DOWN, AND LAURIE AND JACK MUST RACE TO CONNECT THE DOTS-AND SAVE HER LIFE. WITH HIS SIGNATURE BLEND OF SUSPENSE AND SCIENCE, ROBIN COOK DELIVERS AN ELECTRIFYING PAGE-TURNER AS VIVID AS TODAY`S HEADLINES. DR. ROBIN COOK IS CURRENTLY ON LEAVE FROM THE MASSACHUSETTS EYE AND EAR INFIRMARY. HE LIVES AND WORKS IN FLORIDA.
धष्टपुष्ट अंगाचा, अत्यंत निरोगी प्रकृती असलेला सीन मॅकगिलिन न्यूयॉर्कमधल्या सेंट्रल पार्कमध्ये स्केटिंग करत असताना धडपडतो आणि त्याचा पाय मोडतो. अठ्ठावीस वर्षांचा हा तरुण पायावरच्या साध्या ऑपरेशननंतर चोवीस तासांच्या आत अचानक मरतो. एका मुलाची आई असलेली छत्तीस वर्षांची डार्लीन मॉर्गन ही अशीच आणखी एक निरोगी स्त्री गुडघ्यावरच्या एका सोप्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि ऑपरेशनला चोवीस तास उलटायच्या आत तीही मरते. न्यूयॉर्क शहरातले डॉक्टर लॉरी माँटगोमेरी आणि डॉक्टर जॅक स्टेपल्टन हे दोघं मेडिकल एक्झॅमिनर असतात. तरुण, निरोगी माणसांच्या साध्या ऑपरेशननंतर पडत चाललेल्या बळींची वाढत चाललेली प्रकरणं पोस्ट मॉर्टेममध्ये त्यांच्या लक्षात येऊ लागतात... ओसीएमई आणि मॅनहटन जनरल हॉस्पिटल या दोन्हींच्या विरोधाला न जुमानता लॉरी या भानगडीचा तपास नेटानं चालू ठेवते... नेमके तरुण आणि निरोगी पेशंटच का मरताहेत, हे गूढ तिला काही केल्या उकलत नसतं, पण एक गोष्ट तिच्या लक्षात येते – हे नैसर्गिक मृत्यू नसून खून आहेत आणि कोणी तरी अत्यंत हुशारीनं, काही तरी बेमालूम पध्दत वापरून हे हत्यांचं सत्र घडवून आणतंय!... ...त्यातच लॉरीला लागोपाठ जबरदस्त धक्के बसतात. जॅकबरोबरच्या प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेल्या मानसिक तणावांना तोंड देत असताना तिला समजतं, की स्तनांच्या कॅन्सरच्या जीनचा मार्कर आपल्यात आहे! त्यातच ती स्वत:च या हत्यासत्रामध्ये अशा पध्दतीनं गुरफटत जाते, की अचानक ती स्वत:च खुन्याच्या हातात सापडते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #प्रमोदजोगळेकर #रोबिनकुक #COMA #TOXIN #SONS OF FORTUNE #FALSE IMPRESSION #CONTAGION #SEIZURE #CRISIS #CRITICAL #NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS #MARKER #कोमा #टॉक्सिन #कन्टेजन #सीजर #क्रायसिस #क्रिटिकल #मार्कर "
Customer Reviews
  • Rating StarRajesh More

    `रॉबिन कुक` यांच्या लेखणीतून उतरलेला अजून एक थरार. न्यूयॉर्क मधील काही हॉस्पिटलमध्ये अचानकपणे तरुण आणि निरोगी, पण काही साध्याश्या उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू व्हायला लागतो. डॉक्टर लॉरी माँटगोमेी आणि डॉक्टर जॅक स्टेपल्टन या सरकारी हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदन म्हणजे पोस्ट मार्टेम विभागात काम करत असलेल्या मेडिकल एक्झॅमिनरना या विषयी शंका येते. शव विच्छेदनात तर मृत्यू तर नैसर्गिक वाटतो. पण यात काहीतरी लपलेले आहे हे कळल्याने , लॉरी अजून खोलात जाऊन मृतदेहांची शास्त्रीय तपासणी करवून घेते. कोण मारत आहे या निरागस लोकांना आणि का? आधुनिक प्रगत चाचण्या आणि त्यामुळे मनुष्याला भविष्यात होणाऱ्या संभाव्य रोगाची माहिती कशा साठी वापरली जाते? त्याचा फायदा कुठल्या क्षेत्रातील बड्या धेंडं उठवतात? काय आहे यांची खून करण्याची पद्धत जी शवविच्छेदन मध्ये सुद्धा सहज सापडू शकत नाही? पाठोपाठ होणारे मृत्यू , त्याचा शवविच्छेदनाच्या चाचण्या, गुन्हेगारपर्यंत पोहचण्याची धडपड.. एक वैद्यकीय क्षेत्रातील एका प्रकारची अपप्रवृत्ती दाखवणारी कादंबरी वाचावी अशी. ...Read more

  • Rating Starवृषाली बोरावके

    नुकतच राॅबीन कुक यांचे "मार्कर" वाचले. राॅबीन कुक यांनी रुढ केलेला "वैद्यकिय थ्रिलर" हा नविन साहीत्यप्रकार यात पुढे येतो. मराठीत एकदोन अपवाद वगळता अशा विषयाचे लिखाण जवळजवळ नाहीच. रवी बापट यांचे "पोस्टमाॅर्टेम"आहे पण ते अजुन वाचायचय... राॅबीन कुक हे ्वतः वैद्यकीय व्यवसायातले! पेशाने डाॅक्टर!...स्वतः डाॅ. असतानाही लेखकाने वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्ती,काळी बाजु समोर आणण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलाय त्याला तोड नाही.मुळात असे काहीतरी लिहीणे हीच खुप धाडसाची गोष्ट आहे कारण जिथे पैसा धो धो मिळतो ,तिथे अनेक लाॅबीज तयार झालेल्या असतात ज्या त्यांच्या मार्गात येणार्‍या गोष्टी संपवण्यासाठी कुठल्याही थराला जाउ शकतात. त्यांच्याविरुद्ध जाणे तसे धोक्याचेच असते.पण राॅबीन कुक यांनी हा धोका पत्करुन अशा अनेक कादंबर्‍या लिहीलेल्या आहेत. वैद्यकीय व्यवसाय हा खुप सेवाभावी व्यवसाय,डाॅक्टर म्हणजे देव,अशा सगळ्या धारणांना राॅबीन कुक यांच्या कादंबर्‍या वाचल्यावर छेद जातो. वरवर सेवाभावी वाटणारा हा व्यवसाय आतुन स्वार्थांधाने कसा पोखरलेला आहे हे या कादंबर्‍या वाचल्यावर लक्षात येते.लेखकाने ते मांडलयही उत्कृष्टरीत्या! स्वतः डाॅक्टर असल्यामुळे त्यांनी अनेक बारीकसारीक संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत.त्याही रंजक स्वरुपात. विषय बर्‍यापैकी सर्वसामान्यांच्या ज्ञानाच्या कक्षेबाहेरचा असला तरी वाचकाला वाचनात गुंगवुन ठेवण्याची शैली लेखकाला छान साधलेली आहे.आपल्याला माहीत असलेला वैद्यकीय व्यवसाय हे जणु हिमनगाचे एक टोक आहे असे वाटावे एवढी प्रचंड आणी वेगळी माहीती लेखक आपल्याला देतात. त्या काळ्या पडद्यापलीकडील सैतानी जग किती क्रुर असते हे लक्षात आल्यावर वाचक हादरुन जातो. त्या जगामधे रुग्ण हा फक्त पैसे कमावण्याचे साधन असतो. सामान्य लोकांना माहीती असलेल्या "कट प्रॅक्टीस"वगैरे बाबी काहीच नाहीत अशा प्रकारे ते लोकांच्या जीवनाशी अक्षरशः खेळत असतात. ही industry प्रचंड पैसा कमावुन देणारी आहे,फक्त गरज आहे एका मेलेल्या मनाची.....!मग सगळे काही साध्य होते. राॅबीन कुक यांच्या अनेक कादंबर्‍यांपैकी नुकतीच वाचलेली " मार्कर"! यातील प्रमुख पात्रे लाॅरी माँटगोमेरी आणी जॅक स्टेपल्टन हे दोघेही मेडीकल एक्झॅमिनर असतात. मेडीकल एक्झॅमिनर म्हणजे "पोस्टमाॅर्टेम" करणारे डाॅक्टर! तिथे परदेशात या ही विषयाची पदवी घ्यावी लागते व या डाॅ.ना मेडीकल एक्झॅमिनर म्हणतात. (आपल्याकडे जे लोक हे काम करतात त्यांना ट्रेनिंग असते की नाही माहीत नाही. हे लोक दारु वगैरे पिउन काम पार पाडतात अस ऐकलय.असो....)तर... या कादंबरीमधील या मेडीकल एक्झॅमिनरचे काम असते रुग्ण दगावल्यावर पोस्टमाॅर्टेम करुन रुग्णाच्या मृत्युची कारणे शोधणे.लाॅरी ला अचानक काम करताना काही वेगळे जाणवते. तिच्याकडे पोस्टमाॅर्टेमसाठी येणार्‍या केसेसमधे एक समान धागा असतो जो एका हत्यासत्राकडे निर्देश करीत असतो. लाॅरी ही गोष्ट जॅकला सांगते पण तो विश्वास ठेवत नाही. तिच्यावर खरतर कुणीच विश्वास ठेवत नाही. पण जसजसा काळ जातो तसतसा काहीजणांना लाॅरी म्हणते ते बरोबर आहे असे वाटु लागते. ते तीला साथ देतात. शेवटी एक वेळ अशी येते की लाॅरी स्वतः त्या हत्याकांडाचा बळी ठरु पाहाते,पण डाॅ.जॅक स्टेपल्टन पराकाष्ठा करुन तिला वाचवतो. यातील थरार ,उत्कंठा अनुभवण्यासाठी ही कादंबरी वाचणेच इष्ट ठरेल.याचा उत्तम मराठी अनुवाद अनिल काळे यांनी केला आहे. कादंबरीतील पात्रे,त्यांची मांडणी,घटनाक्रम कुठेही कृत्रीम,ओढुनताणुन आणलेले वाटत नाही हे लेखकाचे यशच आहे. सो.....नक्की वाचा"मार्कर"बाय राॅबीन कुक!......आणि राॅबीन कुक यांची "टाॅक्सीन,कोमा" आणि इतरही सगळी पुस्तके!....... ©वृषाली बोरावके ...Read more

  • Rating StarDAINIK PRAJAVANI 13-9-2009

    चंगळवादाचा भोगवादाचा अतिरेक स्वभावातील दोष, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यातर माणूस खुनशी बनतो. आपला धर्मच विसरतो, नीतीमूल्ये पायदळी तुडवत जगत राहतो अन् एकाक्षणी मुंगीसारखा चिरडलाही जातो! प्रस्तुत कादंबरी हेच सांगते. जगभर रोजच नवे नवे शोध लागत असतात. कणतेही संशोधन हे दुधारी शस्त्र असते. मार्कर हा असाच एक नवा वैद्यकीय शोध आहे. माणसाला भविष्यात कुठला कर्करोग होईल हे सांगणारा शोध. पण याच मार्करच्या साहाय्याने राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणारी माणसे, काही पैशाला भुलून वाटेल ते काम करणाऱ्या माणसांना हाताशी धरून कंपनीच्या फायद्यासाठी कसे खून सत्र घडवून आणतात याची ही झोप उडवणारी कादंबरी! मराठीत ही आणल्याबद्दल अनिल काळे यांचे मनःपूर्वक कौतुक करायला हवे. मेहता प्रकाशनाचे आभार मानायला हवेत. रॉबिन कुक यांचा कादंबरी लेखनात हातखंडा आहे. ‘कोमा’पासून आपण सर्वजण त्यांना ओळखतो ‘मार्कर’ ही त्यांच्या आजवरच्या लौकिकाला साजेशीच कादंबरी आहे. मला जास्त कौतुक वाटते ते अनिल काळे यांचे फार बेमालूम अनुवाद त्यांनी केलेला आहे. एक रंजक वाचनानंद मार्करने मला दिला. अनिल काळे यांनी फार सुंदर अनुवाद केला आहे. संपूर्ण वातावरण ते लिलया उभे करतात. डॉक्टर नसताना वैद्यक जगताचे सर्व बारकावे त्यांनी छान चितारले आहेत. अमेरिकेत घडणारी ही हॉस्पिटल विश्वातली खून सुत्रांची कादंबरी, मराठीत आणताना अनुवादकाने कौशल्य पणाला लावले आहे. कुठेच ही कादंबरी कृत्रिम वाटत नाही. उत्कंठा पानापानावर वाढतच जाते. वाचक कादंबरी बाजूला ठेवूच शकत नाही हेच या अनुवादाचे खरे यश आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKASHA 9-8-2009

    ‘मार्कर’ ही अमेरिकन लेखक रॉबिन कुक यांची ४७६ पानांची कादंबरी. ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत आणली आहे. अनिल काळे यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. रॉबिन कुक यांची यापूर्वी सिझर ही कादंबरी डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी अनुवादित केली होती. ॉबिन कुक हे पेशाने डॉक्टर आहेत आणि त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्यांतून प्रगत वैद्यकीय सेवा, प्रगत वैद्यकीय संशोधन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या हे विषय हाताळले आहेत. ‘मार्कर’ ही कादंबरी लॉरी आणि जॅक या दोन डॉक्टरांच्या संबंधातली आहे. लॉरी ही वयाच्या ४०व्यात असलेली एक महिला आहे, तर जॅक हा तिच्याबरोबर न्यूयॉर्कच्या शवविच्छेदन केंद्रात काम करणारा सहकारी डॉक्टर आहे. जॅकची पहिली पत्नी आणि दोन मुली विमान अपघातात वारलेल्या असतात. त्यामुळे तो काहीसा आत्मकेंद्रित असतो. लॉरी आणि जॅक यांचे प्रेमसंबंध असले तरी जॅकला आता नव्याने संसार मांडायचा नसतो आणि लॉरीला जॅकपासून मूल पाहिजे असते. मुलाच्या मुद्यावरून लॉरी आणि जॅक यांच्यात ताणतणाव निर्माण झालेला असतो. याच काळात न्यूयॉर्कच्या शवविच्छेदन केंद्रात चकीत करणाऱ्या घडत असतात. किरकोळ ऑपरेशन झालेले लोक मरायला लागतात आणि त्यांचे शवविच्छेदन लॉरीला करावे लागते. शवविच्छेदन करताना मृत्यूची कारणे स्पष्टपणे द्यायची असतात. अशाच कारणाचा शोध घेताना तिला मानवी जिन्समध्ये कसला तरी बदल झाल्याचे वाटायला लागते आणि तिची एक मोठी शोधमोहीम सुरू होते. कादंबरीचे कथानक मानवी शहरातील जिन्समध्ये झालेला बदल केला का घडवून आणला या दिशेने सुरू होते. याच काळात लॉरीला ज्यामुळे माणसाला कर्करोग निर्माण होतो असा जिन्स आपल्या शरीरात असल्याचे लक्षात येते आणि कथानकाला वेगळे वळण मिळते. कादंबरी वाचताना ज्यांना थोडेफार विज्ञानाचे ज्ञान आहे असे वाचक चकीत होऊन जातात. एखादा अवघड विषय तो ललित साहित्याच्या स्वरूपात मांडतानाही लेखक विज्ञानाची कास सोडत नाहीत हे फारच अवघड काम आहे. मार्कर या कादंबरीत रॉबिन कुकने प्रारंभापासून शेवटपर्यंत वैज्ञानिक कादंबरीचे निकष पाळले आहेत. त्याचवेळी कथा प्रभावी राहील, प्रसंग बेजोड होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. मार्कर वाचताना अनिल काळे यांनी वाचकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत असे लक्षात येते. मेहता पब्लिशिंग हाऊसने एक चांगले पुस्तक, चांगल्या पद्धतीने मराठीत आणले आहे. पुस्तकाचा तांत्रिक दर्जा उत्तम आहे. मुद्रण सुबक आहे. वाचकाला आकर्षित करण्यासाठी या बाबी पुरेशा ठरतात. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.