* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177668865
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NAINA IS BEAUTIFUL, AMBITIOUS AND ADVENTUROUS. AS A SMALL TOWN JOURNALIST FROM JHALAWAR, SHE RUSHES TO DELHI TO JOIN HER LOVE ABHAY DEFYING HER PARENTS. LUCKY TO FIND A JOB IN A DAILY, HER LIFE GETS BUSIER.
या कादंबरीचा विषय पत्रकारितेभोवती फिरणारा आहे. पत्रकारिता व राजकारण यांचं एक बेमालूम रसायन असतं. त्यामध्ये चढाओढ, कुरघोडी, काटछाट, रस्सीखेच, डावपेच ही राजकारणाची अंगप्रत्यंगही पाहावयास मिळतात. विविध प्रलोभनांचीही खिरापत चालू असते. काहीजण त्यात अडकतात अन् स्वत्व गमावून बसतात. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारिता ध्येयवादानं भारलेली होती. कालमानानुसार त्यात बदल झाले, काही चांगले, काही न रुचणारे. महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी सर्व गोठींचा वापर करणारेही अनेक असतात. व्यवसायात प्रवेश करून कालांतरानं राजकारणात उडी घेणारे आणि तेथे हात पोळले की व्यवसायात परतणारेही आहेत. त्याचप्रमाणे प्रवाहात वाहून जाणारे, हात पोळल्यावर सावरणारे, परिस्थितीशी झुंज देणारे, जाळ्यात अडकणारे असे अनेक प्रकार आढळतात. बहुतेकांचं जीवन चाकोरीबद्ध असतं. रेल्वेच्या रूळांसारखे समांतर रेषेत चालणारे अनेक. स्थानक जवळ यायला लागलं की, गाडी रूळांच्या निरनिराळ्या सांध्यावरून वळणं घेत पुन्हा समांतर रूळांवर येते, तशी काहींची स्थिती. काहीजण त्रिकोणात तर काही चौकोनात फिरताना दिसतात; इच्छेनुसार मार्ग आखणारेही असतात; पण सर्वांनाच हवं ते ध्येय गाठता येतं, असं नाही. ’जयपूर पत्रिका’मध्ये काम करणारी नैना अशीच एक पत्रकार. ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल रजपूत यांची उच्चशिक्षित कन्या. अभयच्या प्रेमापायी घरच्यांची पर्वा न करता तिनं दिल्ली गाठली. संसाराला हातभार लावताना ती पत्रकार झाली खरी; पण तिच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर नियतीनं वेगळेच रंग भरले होते. अभयशी लग्न होऊन दहा वर्षं झाली होती. या काळात बरंच पाणी वाहून गेलं होतं. मूलबाळ नसल्यानं तिला घरची तशी ओढ राहिलेली नव्हती. म्हणूनच पत्रकारितेच्या व्यवसायात तिनं पूर्ण झोकून देण्याचं ठरविलं. अभयचा व्यवसाय म्हणावा, तसा ठीक चाललेला नव्हता. तो व्यवसायात स्थिर होत नव्हता. पैशाची नेहमीच ओढाताण होत असे. तिच्या नोकरीमुळे कसंबसं घर चालत होतं. त्यातच पत्रकारितेच्या व्यवसायात असलेली असंख्य प्रलोभनं तिच्याभोवती रुंजी घालीत होती. तिने आजवर त्यांना चार हात दूर ठेवलं होतं, परंतु त्यांना कायमचं दूर ठेवता येईल काय? याचं उत्तर मात्र तिच्याकडं नव्हतं. भोवतालच्या परिस्थितीचा प्रत्येकावर काही न काही परिणाम होत असतो. प्रवाहाच्या उलट दिशेनं जाण्याचं धैर्य फारच कमी लोकांमध्ये असतं. आजवर टिकवून ठेवलेलं धैर्य खचेल काय, अशी शंका तिला येत असे. संघर्ष आणि तडजोड या समांतर रेषेत चालणारं तिचं आयुष्य हळूहळू प्रलोभनांच्या भोवर्यात गुरफटू लागलं. आशा-आकांक्षा अन् महत्त्वाकांक्षा यांची रस्सीखेच सुरू झाली. यातूनच निर्माण झालेल्या त्रिकोणांना ती शेवटपर्यंत टाळू शकली नाही. आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो की अन्य कोणी या प्रश्नाचं उत्तर ती शोधत राहिली.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRIKON #TRIKON #त्रिकोण #FICTION #MARATHI #NAIKVIJAY "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 31-08-2008

    राजकारणाचे रूप... विजय नाईक हे दिल्लीतील मराठी पत्रकार. गेल्या २५ ते ३० वर्षांतल्या बदलांचे साक्षीदार, राजकीय व्यक्तींची सत्तास्पर्धा आणि हेवेदावे यांची कथाचौकट त्यांनी ती ‘त्रिकोण’ कादंबरीत फिट बसवली आहे. ‘त्रिकोण’ कादंबरीपूर्वी त्यांची एक-दोन पुसतके प्रसिद्ध झालेली असली तरी आता ते लेखक म्हणून चांगले स्थिरावतील याची खात्री पटते. नैना ही ध्येयवादी पत्रकार, राजकारणात मुरलेले मंत्री शिवेंद्रराज, सामाजिक मूल्यांची आस धरून चळवळीच्या कामात झोकून दिलेला नैनाचा पती अभय आणि नैनाच्या वाटचालीत सहाकारी झालेला मित्र मनोहर अशा चौकोनात नाट्य खुलते. नाट्यात पत्रकारिता, राजकारणातले ढोंग आणि क्रौर्य तसेच सामाजिक चळवळीतले प्रामाणिक भाबडेपण यावर भाष्य येते. नवी दिल्ली हे राजकारणातले सर्वांत मोठे सत्ताकेंद्र. हे केंद्र सामाजिक सेवेचे क्षेत्र राहिले नसून, ते व्यावसायिक कसे झाले आहे याचा पानोपानी प्रत्यय येतो. परदेशात परिषदा होतात. शिष्टमंडळे जातात. त्यांची निवड कशी होते यावरही मग प्रकाश पडतो. नैना ही या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. ती राजस्थानातल्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी. अभयच्या प्रेमासाठी घरच्यांचा विरोध पत्करून ती त्याच्याशी लग्न करते आणि दोघेही दिल्लीत येतात. संसार रेटण्यासाठी नैना पत्रकार बनते. धडाडीमुळे तिची राजकीय वर्तुळात उठबस वाढते. राजकारणातली मुरब्बी माणसे पत्रकाराला बातम्या देतात ते त्यांच्या फायद्यासाठी. ‘त्रिकोण’मध्ये केंद्रीय मंत्री शिवेंद्रराज यांना नैनाचा सहवास हवासा वाटण्यातून लुब्ध होऊन तिला ते बातम्या देतात. याचसाठी नैना ज्युनिअर असी तरी संपादकाला फोन करून ते परदेशातल्या दौऱ्यात तिची वर्णी लावून देतात. पुढे लंडनालाही घेऊन जातात. पण शिवेंद्रराज यांचा आव असा की, तिच्या अडचणीच्यावेळी ते भल्या माणसासारखे मदतीसाठी सदैव तयार आहेत असा. तिला पैसे मिळण्यासाठी ते अनेकांचा विरोध पत्करून पैसे मिळवून देणाऱ्या माहितीपटाचे कामही देतात. मात्र हे सारे तुम्ही का करीत आहात हे नैना कधीच त्यांना विचारीत नाही. माहितीपटाच्या कामात तिच्या कार्यालयातल्या मनोहर मदत करतो. एखाद्या तरुणीसाठी मंत्र्याने नियम वगैरे तोडून कारभार करण्याचा बभ्रा होण्याला वेळ लागत नाही. योगायोग असा की, इकडे राजकीय पटही बदलू लागतो. शिवेंद्रराज हे नैनाला उमेदवारीही मिळवून देतात. पर्यटन मंडळाचे अध्यक्षपदही देतात पण नैना निवडणूक हरते. ते स्वत: निवडून येतात. याच काळात नैना आणि अभय यांच्यात भांडणे होतात, तेव्हा मनोहर तिच्याजवळ येतो. पुरते जाळे पसरल्यानंतर आणि पैशांनी अंकित केल्यानंतर शँपेनच्या नशेत शिवेंद्राज नैनाचा उपभोग घेतात. त्याहीवेळी नैना संतापत नाही. एकेकाळी संघर्षशील असणारी नैना प्रलोभनाच्या भोवऱ्यात सापडून घसरते. तिच्या आयुष्यात सतत तडजोडच येते. त्या तुलनेत तिचा नवरा सुखांना लाथाडत जातो. आशा-आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा प्रत्येक माणसाला असावी. पण ती गाठताना फरफट होऊ नये. राजकीय लाभ घेतल्याने नैनाची नोकरी जाते. अभय दूर होतो आणि मनोहरला जवळ करताना मूल होणार नाही यावर डॉक्टरी शिक्कामोर्तब होते. तेव्हा मूल दत्तक घेण्याचा निर्णय नैना घेते. अपघातात शिवेंद्रराज मरण पावतात, पण त्यापूर्वीच त्यांनी इच्छापत्र तयार करून नैनासाठी २५ लाखांची तरतूद केलेली असते. नैनाचे आयुष्य कोठून कोठवर येते याची कहाणी म्हणजे ही कादंबरी. राजकारणातील चढाओढ, कुरघोडी, शह आणि काटशह, डावपेच आणि पत्रकाराला वश करण्यासाठी सरकारी खिरापतीची खैरात आपल्याला अस्वस्थ करते. राजकारणाचे अंगप्रत्यंग किती किळसवाणे असते याची जाणीव ही कादंबरी करून देते. नाईक यांनी घटनांचा मालमसाला ठासून भरलाय. तो वाचकांना भोवंडून टाकेल. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    तीन कोनांतून उलगडलेले कथानक… जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्थळ, माणसं, समाज, वेगवेगळ्या समाज व्यवस्था, घडणारे प्रसंग, घटना, त्यांना प्रतिसाद देणारी स्वत:सहित भोवतालची इतर माणसे यांच्यासह जगण्याचे संदर्भ चिकटलेले असतात. स्थळ-काळ यांच्या बरोबरीनेच रूढसाज व्यवस्था आणि व्यक्तिसमूह यांच्यातील क्रिया-प्रतिक्रिया परस्परांची आयुष्यं घडवीत-बिघडवीत असतात. या सर्व गोष्टींचे जगण्यातून भान येणे आणि त्यानंतरचा नवा भोवताल कसा दिसतो/दिसला याचे चित्रण कादंबरीकार कादंबरीतून करत असतो. व्यवस्थेचे, जगण्याचे, जगताना श्रेयस-प्रेयस काय, यांची जाणीव झाल्यानंतर व्यवस्थेशी तडजोड करणे किंवा व्यवस्थेशी जुळवून घेणेच अशक्य आहे हे समजणे, त्यानंतर व्यवस्थेशी झगडणे, असा जाणिवेचा होणारा प्रवास कादंबरीतून व्यक्त होत असतो. कथानक, वेगवेगळ्या घटना, पात्रे, प्रसंग, पात्रांच्या जाणिवेचा विकास या सर्व घटकांच्या एकरूप रचनेतून कादंबरी आकार घेते. प्रसिद्ध पत्रकार विजय नाईक यांच्या ‘त्रिकोण’ या कादंबरीचे सार जाणून घेण्यापूर्वी कादंबरी या साहित्य प्रकाराचे सामर्थ्य आणि तिच्या रचनेचे वैशिष्ट्य कोणते, हे जाणणे निकडीचे वाटते. या कादंबरीला जागतिकीकरणाच्या रेट्यातील प्रसारमाध्यमे, पत्रकारिता, हितसंबंधाची जाणीवपूर्वक जोपासना करीत यशस्वी होण्याचे, अधिकाधिक पैसा मिळवीत श्रीमंत होण्याचे संदर्भभान लाभलेले आहे. विशिष्ट काल-परिस्थितीमधून बदलणारी जीवनमूल्ये माणसाच्या जगण्याचा ताबा घेतात. आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या जगण्यावर अधिकार गाजविणाऱ्या लहान-मोठ्या घटना, एका अर्थाने प्रवापतित होऊन जगावे लागत असल्याची जाणीव होणे, याचा अनुभव आपण घेत आहोत. असा व्यापक समकालीन जगण्याचा संदर्भ ‘त्रिकोण’ या कादंबरीला लाभलेला आहे. परंतु लेखकाला जाणवलेला जगण्याचा अर्थ त्याने कादंबरीच्या चौकटीत कसा मांडलेला आहे, जगण्यातल्या प्रसंगांना मोकळेपणाने भिडणे, त्याच्याबरोबर त्यातले बारकावे टिपत, खोलवर जाणवलेला जगण्याचा अन्वयार्थ मांडण्याचा प्रयत्न लेखकाकडून घडतोय काय, या दोन प्रश्नांच्या उत्तरामधून कादंबरीचे यशापयश निश्चित होत असते. या दृष्टीने विजय नाईक यांच्या ‘त्रिकोण या कादंबरीचा विचार करणे आवश्यक आहे. नैना’ ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल यांची उच्चशिक्षित मुलगी ही कादंबरीची नायिका आहे. अभयच्या प्रेमापोटी आई-वडिलांची पर्वा न करता ती दिल्लीत येते. संसाराला हातभार लावणे, या हेतूने ती पत्रकार होते. कामाच्या निमित्ताने तिच्या आयुष्यात आलेले पुरुष, व्यवसायात यश मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांशी तिने सूत जमविणे, त्याच वेळी अभयबरोबर थाटलेल्या संसारात अपयशी होणे, यांचे चित्रण कादंबरीत आलेले आहे. नैनाला वाटणारी मातृत्वाची ओढ, व्यवसायात यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा, व्यक्तिगत आयुष्यात सहचर असण्याची नैनाला वाटणारी गरज अशा तीन कोनांभोवती कादंबरीचे कथानक रचलेले आहे. कादंबरीत वेगवेगळ्या घटना-पात्रे-प्रसंग-उपप्रसंग परस्परांशी संबंधित नाहीत असे वाटणारी प्रकरणे आलेली आहेत. कादंबरीमध्ये फार मोठ्या परिघात विषयसूत्रे विस्कळितपणे पसरलेली आहेत. कथनपर साहित्यकृती रचण्यासाठी लेखकाजवळ आवश्यक असणारी कल्पकता हा घटकही कादंबरींच्या कथानकाच्या रचनेमध्ये आढळून येत नाही. कथानकाची उकल करणे, पात्रांच्या आंतरिक जाणिवेचा प्रवास उलगडत जाणे, या दोन्हींच्या परस्पररचनेतून एकसंध कादंबरी वाचत असल्याची जाणीव ‘त्रिकोण’ कादंबरीतून जोरकसपणे होत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more