* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171616107
  • Edition : 5
  • Publishing Year : 1947
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A SHORT EASSY COLLECTION OF RENOWN AUTHOR ANANT KANEKAR EDITED BY V.S.KHANDEKAR. THESE ARE ESSAYS WHERE AUTHOR HAS PRECISELY POINTED OUT VARIOUS ASPECTS OF PERSONALITIES. THESE ARE INTELLECTUAL THOUGH HUMOUROUS ESSAYS.
सुप्रसिद्ध आणि सिद्धहस्त लघुनिबंधकार अनंत काणेकर यांचा वि.स. खांडेकरांनी संपादित केलेला हा छोटासा लघुनिबंधसंग्रह. आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीचे अथवातत्त्वाचे वैगुण्य वीक पॉर्ईंट निबंधकार सुखासुखी मान्य करणार नाही. मात्र लघुनिबंधकार त्या वैगुण्याची मनमोकळेपणानं मीमांसा करु शकतो. निबंधकार हा वक्त्यासारखा असतो. व्याख्याता कितीही प्रामाणिक असला, तरी मनातल्या सर्वच गोष्टी काही त्याला व्यासपीठावरुन बोलून दाखविता येत नाहीत. उलट, लघुनिबंधकार हा खासगी बैठकीतल्या संभाषकासारखा असतो. त्यामुळं त्याला कुठलीही गोष्ट आपल्या वाचकांपासून लपविण्याची आवश्यकता वाटत नाही. श्री. काणेकर कुठल्याही गोष्टीकडे केवळ कल्पनेच्या दुर्बिणीतून पाहत नाहीत. अनुभवाच्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून तिचं निरीक्षण करीत असतात. त्यामुळं त्यांच्या लघुनिबंधांना बोरांसारखी आबंटगोड लज्जत येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #नवे किरण
Customer Reviews
  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    पिकली पाने, शिंपले आणि मोती, तुटलेले तारे, उघड्या खिडक्या या काणेकरांच्या पुस्तकांतून निवडलेल्या वीस लघुनिबंधाचे हे संपादन. प्रत्येक लघुनिबंधात प्रारंभी परिचयात्मक मजकूर जोडला आहे. शिवाय बारा पृष्ठांची प्रस्तावनाही आहे. मराठी लघुनिबंधाचा उगम, गुजगोषटी व प्रा. फडके यांचे संदर्भ देऊन काणेकरांच्या लघुनिबंधांच्या लोकप्रियतेची खांडेकर मीमांसा करतात. समकालीन लघुनिबंधकार किंवा इंग्लिश लेखक यांच्याकडे लक्ष न देता, काणेकरांनी स्वतची शैली विकसित केली. कुणाचे अनुकरण केले नाही. स्वतच्या विचारांचा व भावनांचा प्रांजल आविष्कार केला. त्याला योग्य अशी शैली आपोआप त्यांना साधली. पिकली पाने मध्ये त्यांची सामाजिक जाणीव प्रकट होते, त्यामुळे कोणी त्यांना ‘प्रचारक लघुनिबंधकार’ असेही म्हणत. साध्या विषयातले व अनुभूतीतले उपेक्षित सौंदर्य हे हसतखेळत दाख्वतात. त्यांचा निबंध आंब्यासारखा आहे. त्यात मोठी कोय असते. ती तत्त्व-प्रतिपादनाची. खांडेकर हे ओढून-ताणून आणलेले तत्त्वप्रतिपादन रसपारिपोषक होत नाही असे मानणाऱ्यांपैकी आहे, परंतु काणेकर हे केवळ प्रचारक नाहीत, कलावंतही आहेत असे सांगून खांडेकर सुख स्वप्नांचे कारखानदार आणि देविदास व चक्रवाक या निबंधांचा निर्देश करतात. समाज व जीवन यावर टीका हे काणेकरांच्या निबंधाचे लक्षण असूनही ते रूक्ष, गंभीर, हेतुप्रधान होत नाहीत याचे श्रेय त्यांच्या विनोदबुद्धीला आहे. दंतकथा, चुटके, आख्यायिका आणि उपहास-उपरोध यांचा वापर करून ते लघुनिबंधाची लज्जत वाढवतात. गणूमामा हे त्यांचे सनातनी पात्रही वाचकांना आवडते. काणेकरांचा आशावादही वाचकांना लुब्ध करतो. ...Read more

  • Rating StarPUDHARI 09-02-1997

    खांडेकरी शैलीतले अप्रतिम लघुनिबंध .... वि. स. खांडेकर संपादित ‘नवे किरण’ या लघुनिबंध संग्रहात अनंत काणेकर यांचे अप्रतिम असे निवडक वीस (२०) लघुनिबंध खांडेकरांनी संपादित केलेले आहेत. वाङमयीन व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू यथार्थपणे सदर लघुनिबंधात प्रतिबिंित झालेले आहेत. कलावंतांच्या प्रतिभेचे वैशिष्ट्य, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि कालाचे आवाहन यांचा मनोहर मेळ त्यांच्या लघुनिबंधात साकारलेला आहे. ‘नवे किरण’ या लघुनिबंध संग्रहातील सर्वच वीसच्या वीस लघुनिबंध अप्रतिम आहेत. ‘दोन मेणबत्त्या’ या पहिल्या निबंधात जीवनातील खरा सुखाचा क्षण दुसऱ्यासाठी जगण्यात आहे. जो दुसऱ्यासाठी जगला तोच जगात मरणावर मात करतो. हे सत्य प्रकट केले आहे. घड्याळाचे गुलाम या दुसऱ्या निबंधात विनोदाने चांगली रंगत साधली आहे, याचे दर्शन होते. तिसऱ्या अमृत व विष या लघुनिबंधात माणुसकी कशी नाहीशी होत चालली आहे याचे सुंदर चित्र काणेकरांनी उभे केले आहे. सामाजिक विषमतेचे भयानक स्वरूप छोटे चोर, मोठे थोर या चौथ्या लघुनिबंधात प्रतिपादित झाले आहे. मानवी स्वभावाचे प्रभावी चित्रण ‘माझा स्वभाव असा आहे’ या पाचव्या लघुनिबंधात काणेकरांनी केले आहे. चमत्कारी कल्पना लघुनिबंधात ध्येयवादाची आवश्यकता प्रतिपादित केली आहे. त्यावरून काणेकर कुठल्याही गोष्टीकडे कल्पनेच्या दुर्बिणीतून पाहत नाहीत, तर अनुभवाच्या सूक्ष्म यंत्रातून ते निरीक्षण करतात याचा प्रत्यय येतो. ‘गप्पा आणि गप्पी’ या लघुनिबंधातून खेळाडू वृत्तीच्या प्रेक्षकाचे दर्शन लेखकाने घडविले आहे. ‘माणसाचे जग’ या लघुनिबंधामध्ये माणसाचे निसर्ग, मंत्र, देव यापेक्षा असणारे मोठेपण सिद्ध केले आहे. काणेकरांना समतेची आवड खूप असून ती ‘समतेची आवड’ या लघुनिबंधातून प्रकट होते. देवदास व चक्रवाक या लघुनिबंधातून तत्त्वचिंतन व प्रचार हे विशेष वाचकास जाणवतात. ‘यथेच्छ झोपा’ या लघुनिबंधातून काणेकरांची विनोदी वृत्ती प्रकट होते. असे अनेक लघुनिबंध ‘नवे किरण’ या पुस्तकात खांडेकरांनी संपादित केलेले आहेत. काणेकर प्रचारक लघुनिबंधकार आहेत. त्यांच्या लघुनिबंधात सामाजिक प्रक्षोप असून त्यांच्या लघुनिबंधाच्या पाया प्रचलित विचारांचा नसून जीवनदर्शनातून निर्माण झालेले तत्त्विंचतन आहे असे दिसते. ते आपल्या भोवतालचे सामाजिक जीवन सूक्ष्म नजरेने न्याहाळतात. त्यातील लहान-मोठ्या ढोंगा-सोंगाचा मार्मिक रीतीने स्फोट करतात आणि जाता-जाता पटलेले पण बोलून दाखविण्याचे धैर्य नसलेले एखादे तत्त्व परिणामकारक रीतीने वाचकाच्या गळी उतरवतात. काणेकरांची वाङमयीन व्यक्तिमत्त्वाची बैठक केवळ प्रचारकाची नाही, तर ती कलावंताचीही आहे. सुख-स्वप्नाचे कारखानदार व देवदास आणि चक्रवाक या दोन निबंधावरून सौंदर्यवृत्तीचे दर्शन सहज घडते. त्यांच्या विनोदी बुद्धीचे अपत्य म्हणजे त्याच्या लघुनिबंधातून वावरणारे गप्पूमामा. ते सनातनी असूनही वाचकास प्रिय वाटतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more