* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HALT STATION INDIA
  • Availability : Available
  • Translators : ROHAN TILLU
  • ISBN : 9789353173661
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HALT STATION INDIA CHRONICLES THE DRAMATIC RISE OF INDIA’S ORIGINAL RAIL NETWORK, THE ARRIVAL OF THE FIRST TRAIN, AND THE SUBSEQUENT EMERGENCE OF A PIONEERING ELECTRIC LINE—ALL IN THE PORT CITY OF BOMBAY. TRAINS THAT ONCE PROVOKED AWE AND FEAR—THEY WERE VIEWED AS FIRE CHARIOTS, SMOKE-SPEWING DEMONS—HAVE TODAY BECOME A NATION’S LIFEBLOOD. TAKING A WALK ALONG INDIA’S FIRST RAIL LINES, THE AUTHOR STUMBLES UPON FRAGMENTS OF THE PAST—A CLOCK AT VICTORIA TERMINUS THAT OFFERS A RARE VIEW OF A CITY; A CANNON NEAR MASJID BUNDER STATION THAT IS WORSHIPPED AS A GOD; A WATCHTOWER OVERLOOKING SION STATION, BELIEVED TO HAVE HOUSED A WITCH. EACH PIT-STOP COMES WITH STORIES OF DESIRE AND WAR, AMBITION AND DEATH—BY DOCKYARD ROAD STATION, FOR INSTANCE, AUTHOR LAURENCE STERNE’S BELOVED, ELIZA DRAPER, FOLLOWED A SAILOR INTO THE SEA; OR CLOSE TO PAREL STATION, THE WIFE OF INDIA’S GOVERNOR GENERAL, LORD CANNING FOUND A GARDEN RICH IN TROPICAL VEGETATION; THIS, SHE REPLICATED AT BARRACKPORE. DRAWING FROM JOURNALS, BIOGRAPHIES, NEWSPAPERS AND RAILWAY ARCHIVES—AND WITH NOSTALGIC, FIRST-TIME ACCOUNTS OF THOSE WHO TRAVELLED BY INDIA’S EARLIEST TRAINS—THE BOOK CAPTURES THE ECONOMIC AND SOCIAL REVOLUTIONS SPURRED BY THE COUNTRY’S FIRST TRAIN LINE. IN THIS, HALT STATION INDIA IS NOT JUST ABOUT THE RAILWAYS—IT IS THE STORY OF THE GROWTH OF INDIA’S BUSINESS CAPITAL AND A RARE STUDY OF A NATION.
भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वे धावली. या शोधाने भारतीय जनजीवनाचा चेहरामोहरा बदलला. या पहिल्या आगीनगाडीच्या आगमनाची कहाणी अनेकानेक रोचक गोष्टींनी भरलेली आहे. . रेल्वेच्या विस्तारित जाळ्याबरोबरच अनुषंगिक प्रसंग,रेल्वे स्थानकाच्या निर्मितीचा इतिहास आणि त्या संदर्भातील छोटे उपकथानक या सर्वांचा रोचक, ऐतिहासिक वृत्तान्त या पुस्तकात समाविष्ट आहे. मुंबईतलं पहिलं वाफेचं इंजिन,आगगाडीला भुताटकी समजणारा भोळा समाज आणि त्यावेळच्या गमतीजमतींसह तत्कालीन अद्भुत व चित्ताकर्षक तपशीलवार गोष्टींमुळे त्या सोनेरी दिवसांचं चित्रच जणू डोळ्यांसमोर उभं राहातं.
INDIAN AUTHORS AWARD 2021 - HISTORY & TRAVEL
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HALT STATION INDIA #RAJENDRA AKLEKAR #ROHAN TILLU #FIRSTINDIAN RAILWAY #MARATHITRANSLATION #ONLINEBOOKS #MUMBAILOCAL #CST #RAILWAYHISTORY #कहाणीपहिल्याआगीनगाडीची #राजेंद्रआकलेकर #रोहनटिल्लू #मुंबईरेल्वे #मराठीअनुवादितपुस्तके #
Customer Reviews
  • Rating Starडॉ. ओंकार सुमंत

    वाफेच्या इंजिनचा क्रांतिकारक शोधाने समस्त विज्ञान जगताने गरुड भरारी घेतली आणि वेगवेगळे शोध लागायला सुरुवात झाली. पारतंत्र्यात हालपेष्टा भोगणाऱ्या भारताला रेल्वे , पोष्टखात, तरायंत्र, रस्ते , वीज, अशा वेगवेगळ्या माध्यमातून विज्ञानाने आपल्या कवेत घेतलंआणि नवनवीन गोष्टी भारतात यायला सुरुवात झाली. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी ३ इंजिन आणि १४ डब्यांसह बोरीबंदर ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या मार्गावर धावली आणि भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेला. “ झुक झुक आगिनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी “ अशी गाणी म्हणत बालपणापासूनच रेल्वे ह्या गोष्टीच कुतुहुल आपल्या सगळ्यांच्या मनात कायम आहे. या रेल्वे कशा धावल्या , रेल्वे लाईन कुठे टाकल्या, त्या टाकताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेल्या उपाययोजना अश्या अनेक गोष्टी जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर हे पुस्तक उत्तम आहे. रेल्वे इंजिन, रेल्वे पूल, भुयारी मार्ग , पादचारी मार्ग, रेल्वे मार्ग, वेगवेगळ्या स्टेशनचा तसेच त्यांच्या नावाचा इतिहास अश्या अनेक गोष्टींचा इतिहास ह्या पुस्तकात दडलेला आहे. जेम्स जॉन बर्कले हा सातासमुद्रा पार भारतात आलेले इंजिनिअर माणूस ह्याने रेल्वेलाइनची सुरुवात केली. असंख्य अडचणीवर मात करुन तसेच कठोर परिश्रम करुन ह्या माणसाने भारतातील पहिला रेल्वे मार्ग प्रस्तावित किंमतीपेक्षा २०% कमी किंमतीत उभा केला तसेच नियोजित वेळेच्या आधी देखील पूर्ण केला. ह्या सगळ्या वृत्तांत प्रस्तुत पुस्तकात लेखकाने दिलेला आहे. भारतात पिकणार कापूस हा आपल्याकडील रेल्वे जाळ विकसित करण्यासाठी कारणीभूत झाला हया विषयीची संपूर्ण माहिती आपल्याला ही पुस्तकात वाचायला मिळते. त्या काळी स्थानिक लोकांना रेल्वे हा चमत्कार होता तर रेल्वे गाडी ही देवतेप्रमाणे होती. कोणत्याही दृश्य शक्तीशिवाय वाफेच्या इंजिनवर सुरु झालेली ही रेल्वे त्या काळी अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडली आणि तिच्या विषयी अनेक कंड्या पिकल्या. पण सरळ साधा व सोप्या प्रवासाची थोड्या दिवसांनी लोकांना भुरळ पडली आणि अंधश्रद्धा मागे पडल्या. ह्याच वर्णन वाचताना गंमत वाटते. २०१६ साली “ लातूर “ या शहरात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीसाठी रेल्वेच्या माध्यमातून लातूर शहराची तहान भागवण्यात आलेली होती. ही बातमी आपण वर्तमानपत्रात वाचलेली होती. मुंबई च्या इतिहासात सुद्धा अशाप्रकारे पाणी रेल्वेने पुरवल्याचा उल्लेख आहे. ह्या पुस्तकात त्याच्या विषयी संपूर्ण माहिती वाचायला मिळते . इसवी सन १८५६ साली रेल्वेने एकूण २३ गाड्या पाण्यासाठी सोडल्या होत्या , त्याचा खर्च १०,७०० ₹ इतका आला होता अशी रेल्वे दफ्तरी नोंद देखील आहे. १७० वर्षाच्या रेल्वे चा इतिहास हा या पुस्तकाचा गाभा आहे. १७० वर्षात रेल्वे आणि रेल्वे विभागाने टाकलेली कात ह्याच पूर्ण वर्णन ह्या अनुवादित पुस्तकात आहे. २१ व्या शतकात अंतराळात बागडणारा माणूस परग्रहावरील जीवन, पर्यावरण, वातावरण ह्याचा अभ्यास करताना दिसतो. ह्या सगळ्या मध्ये दळणवळणाचे वेगवेगळे पर्याय आपण सध्या वापरतो आहे. कदाचित रस्ते , विमान, यामध्ये प्रगत देशात रेल्वे हरली असेल किंवा मागे पडली असेल पण अजूनही तग धरून आहे. तर भारता सारख्या विकसनशील देशात आपल्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी रेल्वे खस्ता खात आहे अस मला वाटत. आपल्या बहुरंगी आणि बहुढंगी देशाला जोडण्याच काम तसेच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याचा काम रेल्वेने केलेले आहे, करत आहे आणि तसेच करत राहील. भारतीय रेल्वेच्या जन्माची कहाणी, विकासाचे टप्पे , काळानुसार झालेले बदल ह्या सर्वांचा धावता आराखडा ह्या पुस्तकात घेतलेला आहे. ...Read more

  • Rating StarMadhav Jogdand

    Hello Everyone... एका छान पुस्तकाचा पुस्तक परिचय... कहाणी पहिल्या आगिनगाडीची... ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सात बेटांवर भर घालून तयार झालेलं हे शहर मुंबई.. त्यानंतर 1853 ला इथेच भारतातली पहिली रेल्वे धावली मुंबई म्हणजे तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे ्हणजेच सालसेत.( साष्टी) . त्या रेल्वेची ही कहाणी.... भारतात रेल्वे यायची हे कसं ठरलं कधी ठरलं त्यानंतर प्रत्यक्ष रेल्वे सुरू व्हायच्या आधी रेल्वे मार्ग कसा बांधला गेला तो बांधताना काय काय अडचणी आल्या... इथपासून ते पहिली रेल्वे कशी धावली याची माहिती आहे. त्यानंतर बोरीबंदर स्टेशन म्हणजेच आत्ताच CSTM Station हे बांधले जाताना चा इतिहास आणि त्याची माहिती... त्यानंतर लेखक अक्षरशा आपल्याला पुस्तकातूनच रेल्वे रुळावरून मुंबई पासून ते कल्याण पर्यंत घेऊन येतात येताना वाटेत येणार प्रत्येक स्टेशन प्रत्येक रेल्वे मार्ग याची माहिती आणि त्यांचा सुंदर इतिहास सांगतात.... त्यानंतर GIPR म्हणजेच आत्ताची मध्य रेल्वे आणि Harbor Railway. आणि BB &CI म्हणजे आत्ताची पश्चिम रेल्वे यांची अशीच सुंदर माहिती आहे. त्याचबरोबर बॉम्बे इम्प्रोवमेंट ट्रस्ट बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यांच्या थोड्या किस्से कहाण्या... मुंबईच्या विकास कसा झाला याचा इतिहास आणि काही कथा या सुद्धा या पुस्तकात आहेत. मुंबई आणि रेल्वे यांवर ज्यांचे प्रेम आहे आणि ज्यांना जुन्या इतिहासात रस आहे त्यांनी हे पुस्तक नक्की नक्की वाचावं त्यांना खूप आवडेल.... मी हे पुस्तक माझ्या मोबाईल वरील Kindle app वर वाचलं इतक्या छान पुस्तकाची माहिती माझ्या मित्रांना मिळावी म्हणून हि पोस्ट! ...Read more

  • Rating StarSubhash Joshi

    जेमतेम सहा महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या आजच्या पुस्तकालाही ‘मुंबई`चाच संदर्भ आहे. मूळ इंग्रजी पुस्तक आहे Halt Station India, लेखक राजेन्द्र आकलेकर आणि रोहन टिल्लू यांनी मूळ पुस्तकाला न्याय देणारा यथोचित अनुवाद केला आहे. भारतात आगिनगाडी सुूं करण्याचा विचार 1840 पासूनच सुरूं झाला होता आणि भारतातलीच नव्हे तर आशियातली पहिली रेल्वे गाडी 16 एप्रिल 1853 रोजी तीन इंजिन्स आणि चौदा डब्यांसह बोरीबंदर ते ठाणे या चौतीस कि.मी.च्या मार्गावर धांवली. अशी रेल्वे सुरूं करण्याच्या संकल्पनेपासून ती प्रत्यक्ष धांवेपर्यंतची सगळी प्रक्रिया अतिशय रोमांचकारक आहे. या पुस्तकासाठी लेखकाने अक्षरशः हजारो कागदपत्रांचा, संदर्भ पुस्तकांचा, देशभर फिरून दस्तावेजांचा अभ्यास केला आहे आणि या रेल्वे मार्गावरून शेकडों वेळां पायी फिरून अभ्यास केला आहे. हे पुस्तक हलकेफुलके किस्से सांगत नाही तर अनेक संदर्भ आणि पुराव्यांसकट अनेक किचकट ऐतिहासिक तपशील सांगते. त्या निमित्ताने आपल्याला ब्रिटिश राजवटीबद्दलही बरंच कांही वाचायला मिळतं. हे पुस्तक इतक्या क्लिष्ट तपशीलाने भरलं आहे कीं आपण कंटाळून बाजूला ठेवायचा विचार करतो... पण तरीही हे पुस्तक आपल्याला ते बाजूला ठेववत नाही हे विशेष. हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने आणि अनुवादकाने घेतलेले परिश्रम वाचूनच आपली दमछाक होते, छाती दडपते, तरीही आपण ते वाचून पुरं करतोच. एक पराकोटीचा रोमहर्षक संदर्भग्रंथ असं मी त्याचं वर्णन करीन. - सुभाष जोशी, ठाणे ...Read more

  • Rating StarMaharashtra Times Samwad 24-2-2020

    लोकलशिवाय मुंबईची कल्पनाच करता येत नाही. आज मुंबईची लोकसंख्या १ कोटी ८२ लाख आहे आणि लोकलनं रोज सुमारे ७५ लाख माणसं प्रवास करतात. एवढ्या अवाढव्य प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आगगाडीचा जन्म झाला १६ एप्रिल १८५३ रोजी. देशातीलच नव्हे तर, आशिया खंडातल पहिली आगगाडी बोरीबंदर (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे अशी धावली. तत्पूर्वी १८२५ साली इंग्लंडमध्ये पहिली आगगाडी सुरू झाली, त्यानंतर देशोदेशी आगगाडी सुरू करण्याचे प्रयत्न झाले. अमेरिकेत रेल्वेमार्ग बांधले गेले आणि त्यानंतर तिसरा नंबर भारताचा लागला. तेव्हा आपल्यावर इंग्लंडचं अधिराज्य होतं. हिंदुस्तानातला कच्चा माल इंग्लंडला पाठवणे आणि तिकडचा माल विक्रीसाठी हिंदुस्तानात आणणं, हा रेल्वे बांधण्यामागचा सरकारचा मुख्य हेतू होता. त्यासाठी हिंदुस्तानातील बंदरं अंतर्भागाशी जोडणं आवश्यक होतं. यातून मुंबई, कलकत्ता आणि मद्रास (आता चेन्नई) या बंदरांपासून रेल्वेमार्ग टाकायचं इंग्रज सरकारनं ठरवलं. हिंदुस्तानासारख्या मागास देशात रेल्वे चालवणं फायदेशीर होईल, याचा अनेकांना विश्वास वाटेना आणि सामान्यांना तर बिनबैलाची, बिनघोड्याची गाडी चालेल आणि सामान व माणसं वाहून नेईल असंच वाटेना. याबाबत लोकांना नीट माहिती देण्यासाठी म्हणून तेव्हाच्या टाऊन हॉलमध्ये एक मोठी सार्वजनिक सभा झाली. नाना शंकरशेटांसारख्या समाजधुरिणांची भाषणंही झाली, पण तरीही पुरेसा प्रतिसाद मिळेना. शेवटी सरकारनं कंपनीत पैसा गुंतवणाऱ्या भागीदाराना त्यांच्या गुंतवणकीवर ५% एवढ्या परताव्याची खात्री दिली. म्हणजे कंपनीला तोटा झाला, तरी त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर ५% व्याज मिळेल याची खात्री दिली. शिवाय कंपनीला लागणारी सर्व जमीन, म्हणजे रूळ टाकण्यासाठी आणि इमारती, स्थानकं. पूल इ. साठीची सर्व जमीन सरकारनं फुकट देण्याचं कबूल केलं. त्यानंतर मात्र रेल्वेचं काम भराभर होऊ लागलं आणि १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली आगगाडी धावली... भारतीय रेल्वेची अशी विविध स्वरूपाची माहिती `कहाणी पहिल्या आगीनगाडीची` या या राजेंद्र आकलेकर लिखित पुस्तकात वाचायला मिळते. या मू‌ळ इंग्रजी पुस्तकाचा तेवढाच रंजक आणि माहितीपूर्ण अनुवाद रोहन टिल्लू यांनी केला आहे. आजमितीला मुंबईत १३६ लोकल स्थानकं आहेत आणि त्यावरून रोज २३४० पेक्षा अधिक लोकल गाड्या धावतात. या सगळ्या गाड्यांची आणि स्थानकांची माहिती पुस्तकात देणं शक्य नाही, पण त्यातल्या काही विशेष स्थानकांची आणि त्यांच्या आसपासच्या विशेष जागांची, तिथल्या इतिहासाची माहिती पुस्तकात आवर्जून देण्यात आली आहे. उदा. आजच्या सी.एस.एम.टी.च्या जवळच म्हणजे आधीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसजवळ, म्हणजेच बोरीबंदरजवळ पूर्वी `फोर्ट जॉर्ज` किल्ला होता. या जॉर्ज किल्ल्यातूनच पहिल्या आगगाडीला तोफांची सलामी दिली गेली होती. आकलेकरांनी मुंबईमधल्या अनेक लोकल स्थानकांची आणि आसपासच्या भागांची अतिशय रंजक महिती पुस्तकात दिलेली आहे. तसंच `इतिहासाच्या पाऊलखुणा` या शीर्षकाखाली त्या भागांची जुनी माहितीसुद्धा दिली आहे. त्यामुळे पुस्तक एखाद्या कथा-कादंबरीसारखं रोचक झालं आहे. आकलेकर हे खरे रेल्वेप्रेमी आणि मुंबईप्रेमीही आहेत, असं त्यांचं हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच जाणवतं. आपली पहिली आगगाडी ज्या मार्गानं धावली तो मार्ग प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ते त्या मार्गानं पायी चालले आहेत. अजूनही ते रेल्वेमार्गानं चालत असतात (अर्थात आवश्यक त्या सर्व परवानग्या काढून). त्यामुळेच मार्गाचं काम सुरू असतानाच्या अडचणी, वेगवेगळ्या स्थानकांचं वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम, आसपासच्या ऐतिहासिक खुणा, काही जुन्या गोष्टी, फार माहीत नसलेल्या भागांची माहिती, असा खूप तपशील या पुस्तकात वाचायला मिळतो. पुस्तकातील ही सगळी माहिती अतिशय रंजक आहे. मात्र पुस्तकाला सलग कथानक नसल्यामुळे ही माहिती काहीशी विसकळीत वाटते. म्हणजे आगीनगाडीची कथा वाचताना अनेक छोटे छोटे भाग एकामागून एक वाचत जावं लागतं. एका भागाचा पुढच्या भागाशी संबंध असेलच असं नाही. मुंबईतल्या १३६ लोकल स्थानकापैकी एखाद्याची माहिती वाचायची असेल, तर ती कुठे आहे ते आधी शोधून काढावं लागतं. म्हणजे हव्या त्या स्थानकाची, किंवा इतर विशेष काही गोष्टींची माहिती पुस्तकात नेमकी कुठे सापडेल, हे कळण्याचा काही तरी सोपा मार्ग असायला हवा होता. अनुक्रमणिका जर विस्तारानं दिली असती, तर ही अडचण कदाचित दूर होऊ शकली असती. तेढी उणीव सोडली, तर रेल्वेविषयक माहितीचा एक खजिनाच या पुस्तकात दडलेला आहे. पुस्तकात बरीच छायाचित्रंही आहेत. मात्र त्यांपैकी बरीच काळपट आहेत. जुन्या छायाचित्रण तंत्रामुळे कदाचित तसं झालं असावं. परंतु काही चित्रं बरीच सुस्पष्ट आहेत. मुखपृष्ठावरील गाडीचं छायाचित्रही आकर्षक आहे आणि नावाला अगदी शोभेसं आहे. मुंबई बेटांचा आणि मुंबईतल्या रेल्वेचाही नकाशा पुस्तकात आहे. एकंदरीत रेल्वेप्रेमींनी जरूर संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book