* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DNYANSURYACHI SAWALI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985238
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DNYANSURYACHEE SAWALI IS A NOVEL BASED ON THE LIFE OF SOPANDEO, A THIRTEENTH CENTURY SAINT AND THE YOUNGER BROTHER OF SAINT DNYANESHWAR. SOPANDEO LIVED UNDER THE SHADOW OF THE ELDER BROTHER. LIKE HIS SIBLINGS – NIVRUTTINATH, DNYANESHWAR AND MUKTABAI -- SOPANDEO ALSO SUFFERED IN THE CHILDHOOD. HE WAS STUDIOUS BY NATURE AND THE CONVERSATION BETWEEN NIVRUTTINATH (THE ELDEST BROTHER WAS THE SPIRITUAL GURU OF BOTH DNYANESHWAR AND SOPANDEO) LED TO HIS WRITING THE SOPANDEVI WHICH IS THE TRANSLATION OF THE BHAGWAD GEETA . SOPANDWO’S WORK DIFFERS FROM THE DNYANESHWARI WHICH IS ALSO THE RENDERING OF THE BHAGWAD GEETA INTO MARATHI IN THAT IT IN A DIFFERENT FORM OF MARATHI. LIKE DNYANESHWAR, FEELING THAT HIS AIM OF LIFE HAS BEEN REALIZED, SOPANDEO ALSO UNDERTOOK SANJEEVAN SAMADHI (ENDING ONE’S LIFE VOLUNTARILY) AT A VERY YOUNG AGE. THE FLASHBACK STYLE OF NARRATION WHICH BEGINS WITH THE SANJEEVAN SAMADHI OF DNYANESHWAR AND ENDS WITH THAT OF SOPANDEO TRACING IN BETWEEN THE LIFE OF THE YOUNG SAINT AND HOW HE ATTAINED THE SAINTHOOD IS EFFECTIVE.
...नामदेव पुढे झाले. त्यांनी सोपानाच्या पायांवर लोळण घेतली. सोपानानं डोळे उघडले. वाकून त्यानं नामदेवांना उठवलं. दुसऱ्या क्षणाला नामदेवांनी सोपानाला घट्ट मिठी मारली. इतकी घट्ट, की जणू ती कुणी सोडवणं शक्य नव्हतं. जणू ते सोपानाला जाऊच देणार नव्हते. एका मिठीला इतके अर्थ असू शकतात? काय नव्हतं त्या मिठीत? सोपानाला अडवण्याची जिद्द, तो समाधी घेणार म्हणून होणा-या वियोगाचं दु:ख, आपण त्याला थांबवू शकत नाही म्हणून वाटणारी असाहाय्यता, त्याच्या वियोगाची वेदना, एवढ्या लहान वयातली त्याची स्थितप्रज्ञता बघून वाटणारं कौतुक, त्याचा निरागस चेहरा बघून पोटातून तुटून येणारी माया, त्याच्या अलौकिक बुद्धिसामथ्र्याला केलेलं वंदन, या पुण्यात्म्याचा सहवास आपल्याला लाभला म्हणून वाटलेली धन्यता, आपल्यापेक्षा वयानं कितीतरी लहान असलेल्या या पोराला समाधी घेताना बघण्याचं करंटेपण आणि या सर्वांवर कळस, म्हणजे मनात अतिपूज्य भावना असल्यामुळे ज्ञानोबा माउलीला आपण अशी घट्ट मिठी मारू शकलो नाही, म्हणून आता त्या ज्ञानसूर्याचीच सावली असलेल्या सोपानाला आपण घट्ट मिठी मारतो आहोत, याची सार्थकता. एका मिठीमध्ये एवढ्या भावभावना सामावलेल्या असतात, हे नामदेवांनाही उमजलं नसेल; पण नामदेवांनी सोपानाला कडकडून मारलेली मिठी भिजलेल्या डोळ्यांनी बघणा-या जनाबार्इंना मात्र हे सगळे सगळे अर्थ समजले....
अश्वमेध ग्रंथालय आयोजित `अक्षरगौरव पुरस्कार` २०१४ . * महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६- किरण संजीवनी पुष्पलता रानडे परितोषिक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MANJUSHRIGOKHALE #TUKYACHIAVALI #JOHARMYBAAPJOHAR #OMKARACHIREKHJANA #DNYANSURYACHISAVALI
Customer Reviews
  • Rating StarManda Kulkarni

    हे पुस्तक वाचताना मुक्ताई आणि तीन भावंडाचे जे हाल झाले त्या बद्यल लेखिकेन(मंजुश्री गोखले)लिहताना जे शब्दप्रयोग केले आहेत,त्यामुळे नजरे समोर त्यांच सगळ जीवन ऊभ रहात . आईवडीलानी देहत्याग केल्या नंतर सुद्धा कर्मठ लोकांनी त्याना किती त्रास दिा ते वाचताना मला तर खरोखर गहिवरुनच येत होत.मन ऊद्वीग्न झाल वाचुन.एवढा त्रास सहन करुन सुद्धा किती शांततेन,सयंमान हे चार भावंड राहीले. पुस्तक पुर्ण झाल तरी डोक्यातुन जात नाही,वाचनिय पुस्तक. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 02-11-2018

    मंजुश्री गोखलेलिखित ‘ज्ञानसूर्याची सावली’ ही कादंबरी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या मराठी माणसाच्या काळजाचा विषय असलेल्या चार भावंडापैकी सोपानदेवांचं चरित्र रेखाटते. वडील विठ्ठलपंतांचा संन्यास, गुरूच्या आज्ञेने परत गृहस्थाश्रम स्वकारणं, मग समाजाने केलेल्या हेटाळणीमुळे पत्नी रुक्मिणीसह केलेला देहत्याग या सगळ्यातून ‘संन्याशाची पोरं’ म्हणून हिणवली गेलेली ही चार मुलं... प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं तरीही एकमेकांमध्ये विरघळलेलं आणि त्यांच्यातही ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात ज्ञानसूर्य. त्यामुळेच स्वत:चं व्यक्तिमत्व असूनही इतर भावंडं या ज्ञानसूर्याची सावली ठरली. त्यातल्या एका सावलीचं म्हणजेच सोपानदेवांचं चरित्र या कादंबरीत आहे. या चारही भावंडांचं जगणं आणि ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सोपानदेवांनी घेतलेली समाधी इथवरचा प्रवास कादंबरीत वाचायला मिळतो. या अलौकिक भावंडांचा लेखिकेच्या कल्पनेतून झालेला जीवनप्रवास वाचनीय आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    निवृत्तीनाथांच्या कृपेने गुरूप्रसाद लाभला. ज्ञानेश्वरांच्या छायेत आत्मविकास साधला आणि मुक्ताईच्या सहवासात जिवंतपणीच मुक्तिस्वातंत्र्य अनुभवले असे संतश्रेष्ठ सोपानदेव! त्यांची जीवनगाथा वेगळी काय असणार? चारही भावंडे म्हणजे ‘परब्रह्मीचे ठसे.’ द्वैत राखन अद्वैत साधणारी ही अवतारी मंडळी भागवत धर्मातील कुलदैवते ठरावीत इतकी महान अशा या संतसज्जनांवर लिहिताना चौघांना एकमेकांपासून वेगळे काढता येतच नाहीत, परंतु हा दैवी चमत्कार मंजुश्री गोखले यांनी करून दाखवला आहे. या प्रेरणापूर्तीचे नाव आहे ज्ञानसूर्याची सावली! एक तर संतचरित्रे म्हणजे न संपणारे संशोधन सुमारे सातशे वर्षांपूर्वीचा इतिहास उपलब्ध असला तरी तो श्रीमंत राजामहाराजांचा. साधुसंत निरहंकारी. ते स्वत:बद्दल सांगायला संकोच करतात. संतशिरोमणी नामदेवांनी या भावंडांची चरित्रे लिहिली नसती तर केवढा मोठा काळ अज्ञात राहिला असता. त्याचा धांडोळा घेत मंजुश्रीतार्इंनी याआधी ‘तुकयाची आवली’, ‘जोहार मायबाप’ (चोखामेळा), ‘ओकाराची रेख जना’ (जनाबाई) या जीवनगाथा लिहिल्या आणि अफाट लोकप्रिय झाल्या आहेत. विविध विषयांवरील त्यांच्या सुमारे पंचवीस पुस्तकांनी त्या वाचकप्रिय झाल्या असून अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. अशोक कामत हे संतसाहित्याचे जिव्हाळ्याचे अभ्यासक. त्यांच्या प्रस्तावनेत ‘ज्ञानसूर्याची सावली’चे महत्त्व विशद करताना म्हटले आहे की, तेराव्या शतकातील केवळ तीन दशकांचा दस्तऐवज अस्सल आहे का? हा प्रश्न संशोधकांना कायम अस्वस्थ करतो. लोकाश्रयावर जागृत राहिलेली संतांची समाधिस्थाने जिवंत असली तरी सारे काही श्रद्धेच्या बळावरच कल्पनेला राबवून लेखन करावे लागते. ते मंजुश्रीतार्इंनी पुरेसे समाधानकारक केले आहे. सूर्य दाखवता येतो, पण किरणांचे काय? कवडसे तेजस्वी असतात. सूर्यापासून ते वेगळे नसतात हेच दाखवून सोपानदेव वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. निरनिराळ्या प्रसंगी झालेल्या चर्चेत सोपानदेवांनी आपली प्रज्ञा आणि प्रतिभा यांची वेळोवेळी जी चमक देदीप्यपूर्ण दाखवली आहे ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. यातील दशक्रिया विधीची सूक्ष्म पण महत्त्वाची माहिती आणि संजीवन-समाधीचे रहस्य लेखिकेने यथार्थपणे चित्तारले आहे. हटयोगातील गूढरम्य भाषा अधिक सोपी करण्याचा प्रयत्न केला तरी काही सांकेतिक शब्द तेच ठेवल्याने वाचकांस पुरेपूर अर्थबोध होऊ शकतो. अभ्यासकातील मतभेदांचा आदर करून जसे आहे तसे सत्य शोधण्याचा हा लेखनप्रवास आनंदाच्या इच्छित स्थळी वाचकांस घेऊन जातो आणि आत्मिक समाधान देतो. सोपानदेवांच्या समाधीचा प्रसंग आणि सासवडचा परिसर नामदेवांच्या अभंगांचा आधार घेऊनही लेखिकेची स्वतंत्र कल्पनाशक्ती सहज नजरेत भरते. ‘प्रभात’च्या कृष्णधवल चित्रपटमालिकेत सहज सामावले जाईल असे हे संपूर्ण कथानक प्रत्येक भाविक आणि रसिकाने वाचायलाच हवे. फाल्गुन ग्राफिक्सचे मुखपृष्ठ अप्रतिम आहे. -राम कर्णिक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book