* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A BIOGRAPHY OF SWAMI VIVEKANAND
  • Availability : Available
  • Translators : MADHAV MORDEKAR
  • ISBN : 9788177664898
  • Edition : 12
  • Publishing Year : SEPTEMBER 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE VERY MENTION OF HIS NAME TAKES US TO DIVINE, AUGUST, LOFTY HEIGHTS. A CLOSE OBSERVATION OF HIS LIFE BRINGS US MORE CLOSE TO THE INDIAN CULTURE, ITS MORAL ABODE, ITS LIFE SYSTEM. HIS MESSAGE OF FORBEARANCE IS THE REAL PRESENTATION OF HIS KNOWLEDGE AND WIT. THIS QUALITY MAKES HIM THE IDEAL AND EXEMPLARY SPEAKER OF OUR NATION. HE HAD TARGETED HIMSELF AT COLLECTING A GROUP OF `SANYASI` FOR THE BETTERMENT OF THE COMMON PEOPLE AROUND AND MAINLY FOR THE DOWNTRODDEN. THIS INSIGHT PROVES HIS BEING AS THE PROPHET. IN TODAY`S LIFE ALSO HIS TEACHINGS PROVE THEIR TRUTHFULNESS. TODAY, THE POLITICAL, SOCIAL AND ECONOMICAL ENVIRONMENT OF INDIA IS BECOME VERY UNCLEAR AND FILTHY; THE RELIGIOUS INTOLERANCE HAS REACHED THE EXTREME LEVELS, PEOPLE HAVE LOST THEIR SENSE OF MIND. THIS MAKES ME FEEL THAT SWAMI VIVEKANANDA SHOULD TAKE REBIRTH AND BRING THE FILTHY WORLD OUT OF THIS CHAOS.
स्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एका उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजे भारतीय संस्कृती, तिचे नैतिक अधिष्ठान, तिची जीवनमूल्यपध्दती यांचा अभ्यासच आहे. त्यांनी दिलेला सहिष्णुतेचा संदेश ख-याखु-या ज्ञानाचा आविष्काराचा आहे. त्यामुळे स्वामीजी या देशाचा एक आदर्श, अनुकरणीय प्रवक्तेच ठरतात. त्याशिवाय, आपल्या सभोवतालच्या तळागाळातील जनसामान्यांच्या कल्याणासाटी संन्याशांचा संप्रदाय निर्माण करण्याचे जे व्रत त्यांनी घेतले त्यामुळे स्वामी विवेकानंद एक महान प्रेषित व असाधारण लोकाग्रणी ठरतात. आजघडीला तर त्यांच्या शिकवणुकीतील यथार्थता बावनकशी सोन्यासारखी वाटते. आज भारतातील राजकीय, सामाजिक व आर्थिक वातावरण इतके गलिच्छ व गढूळ झालेले आहे, धार्मिक असहिष्णुता आणि माथेफिरुपणा इतक्या टोकाला आहे की ‘यदा यदा हि धर्मस्य..’ या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदासारख्या महापुरुषाने पुन्हा एकदा भारतात अवतार घेऊन आपल्या देशाला-नव्हे संपूर्ण जगाला या वाढत्या प्रक्षोभातून सुखरुप बाहेर आणावे असे उगीचच वाटत राहते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #MADHAVMORDEKAR #A BIOGRAPHY OF SWAMI VIVEKANAND #आधुनिक भारताचे प्रेषित : स्वामी विवेकानंद #माधव मोर्डेकर #GAUTAM GHOSH
Customer Reviews
  • Rating StarDesaiprasad Desai (FB)

    एक वेळ वाचून बगाच

  • Rating StarYogesh Joshi Degloorkar (FB)

    A pratim pustak

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    चैतन्यमयी चरित्र... या सनातन हिंदुस्थानात तीन माणसं केवळ पाच मिनिटांसाठीदेखील एकत्र येऊन एखादं कार्य पार पाडत नाहीत. प्रत्येकाची धाप-धडपड सत्ता संपादनासाठी. केवळ पोटासाठी भूक शमत नाही म्हणून ती खिश्चन धर्माकडे आकर्षित होतात असा विचार करू नका. त्यांन (दीनदुबळे, दरिद्री, खालच्या जातीत जन्माला आलेले लोक इत्यादी) तुमच्याकडून (हिंदूकडून) सहानुभूती, प्रेम, दयामाया लाभत नाही म्हणून ते धर्मांतर करतात. हे मौलिक विचार आहेत स्वामी विवेकानंदांचे शंभरेएक वर्षांपूर्वी त्यांनी विविध ठिकाणी मांडलेले हे विचार आजच्या समस्त हिंदुस्थानींना विशेषत: राजकारण्यांना लागू पडतात. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं म्हणणाऱ्या आणि धर्मांतराचं राजकारण करणाऱ्या मंडळींनाही स्वामींनी धर्मांतराबद्दल व्यक्त केलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. कट्टर हिंदू धर्माभिमानी असलेल्या द्रष्ट्या स्वामी विवेकानंदांनी आपल्या अमोघ, विद्वत्ताप्रचुर अभ्यासू भाषणाने शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत छाप पाडली. सर्वांची मनं जिंकली. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेले स्वामी ४ जुलै १९०४ रोजी सदेह वैकुंठास गेले. उणेपुरे ३९ वर्ष आयुष्य लाभलेल्या या प्रेषितावर, त्यांच्या विचारांवर अनेक भाषांत पुस्तकं प्रकाशित झाली आहेत असं हे प्रेरणादायी चैतन्यमय चरित्र गौतम घोष यांनी इंग्रजीज लिहिलेलं पुस्तक The Prophet of Modern India : A Biography of Swami Vivekanand प्रकाशित झालं होतं. या सर्वांगसुंदर पुस्तकाचा अनुवाद केला आहे माधव मोर्डेकर यांनी ‘आधुनिक हिंदुस्थानचे प्रेषित स्वामी विवेकानंद’ पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतंच प्रकाशित केलं आहे. एकूण १२ प्रकरणांतून लेखकाने स्वामीचं चरित्र उलगडून दाखवलं आहे. बालपणीचा नरेंद्र कसा हुड होता. अत्यंत तल्लखबुद्धी, चौकसपणा, चिकित्सक वृत्तीच्या तरुणाचं बालपण, त्याच्या घराण्याची परंपरा-रूढी कथन करून लेखकाने गुरू श्री रामकृष्ण परमहंस योग्य शिष्याच्या शोधात (म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या) होते. स्वामींना देवाचं दर्शन हवं होतं. ती त्यांची इच्छा श्री परमहंस यांनी कशी पूर्ण केली याचं बहारदार वर्णन लेखकाने केलं आहे. स्वामींना दिव्यत्वाची प्रचीती आणि त्याची पायाभरणी केव्हा झाली हे वाचनीय आहे. श्री रामकृष्ण परमहंसांसारखा योगी पुरुष सद्गुरुच्या रूपाने भेटल्यावर नरेंद्रचा स्वामी विवेकानंद कसा झाला याचं मनोज्ञ चित्रण यात रेखाटलं आहे. बौद्ध हा हिंदू धर्माचाच एक भाग. या दोन्ही धर्मांच्या परस्परावरील संबंधावर भाष्य करताना स्वामींनी खिश्चन-यहुदी धर्माची तुलना त्यांच्यातील संबंधाशी केली आणि विचारवंतांना सडेतोड उत्तर दिलं. कर्म, भक्ती, राग इत्यादी योगाची महती स्वामींनी पाश्चिमात्त्यांना पटवून दिली. वेद आणि वेदांत या दोघांचं सार म्हणजे सामर्थ्य, स्वामी म्हणत, ‘हिंदूनी आपल्या धर्माचा त्याग बिलकूल करू नये.’ अंधश्रद्धेवर स्वामींनी कडाडून टीका केली. देश-परदेशातील या भटकंतीत स्वामींना भेटलेल्या व्यक्ती, ठिकाण त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले मौलिक विचार इत्यादीचा सचित्र समावेश यात आहे. स्वामीच्या घराण्यातील थोर पुरुष, त्यांचे सद्गुरू, त्यांची पत्नी, शारदा माता, स्वामींचे गुरुबंधू यांच्या जीवनाचा वेध घेऊन लेखकाने परदेशात भेटलेल्या भगिनी निवेदिता आणि अन्य पाश्चिमात्य शिष्यांचा परिचय करून दिला आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यामागील उद्देश,कन्याकुमारीला स्वामींनी केलेली तपश्चर्या इत्यादींचा अनोखा मागोवा यामागील उद्देश, याचं सुंदर चित्रण यात केलं आहे. शेवटच्या प्रकरणात लेखकाने स्वामींचा शेवटचा प्रवास वर्णन करताना त्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यावेळची त्यांची शांत वृत्ती या साऱ्या घटनांची नोंद समस्त वाचकांना करून दिली आहे. दिव्य दूरदृष्टी लाभलेल्या या प्रेषित योगी पुरुषाची सचित्र चरित्रात दुर्मिळ अप्रकाशित अशी छायाचित्रे आहेत. स्वामींचे विविध वस्त्रांतील, विविध मूड दर्शविणारी छायाचित्रे पाहणे हा एक आनंद योग म्हणावा लागेल. हे चरित्र वाचताना हे अनुवादित चरित्र आहे हे अजिबात जाणवत नाही. एवढा सुंदर अनुवाद मोर्डेकरांनी केला आहे. सर्वार्थाने उत्कृष्ट निर्मितीमूल्य लाभलेल्या या ग्रंथाचं देखणं मुखपृष्ठ केलं आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी आज हिंदुस्थानात सर्व स्तरांवरील वातावरण गढूळ, गलिच्छ झालं आहे. अल्पसंख्याकांची वाढती लोकसंख्या, त्यांची वाढती धार्मिकता, माथेफिरूपणा, उपद्रवता, हिंदूची असहायता यात बहुसंख्याक भरडले जात आहेत. बहुसंख्याक हिंदूना पुन्हा मानाने जगवण्यासाठी हा सनातन देश सामर्थ्यशाली, बलशाली व्हावा यासाठी ‘यदा यदा हि धर्मस्य...’ या गीतावचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदांसारख्या द्रष्टा योगी, प्रेषित महापुरुषाने अवतार घ्यावा. अक्षय प्रेरणादायी, चैतन्यमयी स्वामीचं चरित्र सर्वांनीच विशेषत: सर्वधर्मसमभावाची फुकाची पाठराखण करणाऱ्या विचारवंतांनी जरूर अभ्यासावं. -नंदकुमार रोपळेकर ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 29-08-2004

    असामान्य बुद्धिमत्ता... नवजात अर्भकाची सर्वसाधारण ठेवण पाहून दत्त कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. त्याच्याकडे पाहिले की, त्याच्या आजोबांची दुर्गाप्रसादांची आठवण चटकन यावी. त्याचा तोंडावळा बहुतांशी आजोबांच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता होता. त्या आजोबांनी आपल्ा जीवितकालात अचानक संन्यस्त जीवनाचा स्वीकार करून लौकिकाकडे पाठ फिरवलेली होती. या बालाकाच्या रूपाने त्या संन्यस्त जीवाने पुन्हा एकदा या जगात प्रवेश तर नसेल केला, असा एक विचार त्या सर्वांना कळत न कळत चाटून गेला. पहा, काही का असेना घरात वंशचा दिवा तर प्रज्वलित झाला ना! बस्स. नेहमीप्रमाणे मुलाचे नाव काय ठेवायचे याचा खल सुरू झाला. भरपूर घुसळण झाली. काहींनी सुचवले, ‘आजोबांच्या वळणावर गेला म्हणता तर त्यांचेच नाव... दुर्गाप्रसाद ठेवा ना!’ मात्र, मातोश्री भुवनेश्वरीदेवींनी सुचवले, ‘लक्षात घ्या, माझा छकुला साक्षात श्री वीरेश्वराचा प्रसाद आहे त्यामुळे त्याचे नाव ‘वीरेश्वर’ च ठेवायचे. दुसरा विचार नको...! भुवनेश्वरांच्या या सुचनेशी प्रत्येकजण सहमत झाला. अर्थात, आणखी एका रिवाजाप्रमाणे पाळण्यातले नाव पाळण्यातच राहिले. सारेजण त्याला ‘बिल्ले’ या संक्षिप्त नावानेच पुकारू लागले. पुढे त्यातही बदल झाला. कुटुंबातील इतर नावांना शोभा देईल असे आणखी एक नाव पुढे आले... नरेन्द्रनाथ! पुढे त्यातही सोयीप्रमाणे काटछाट होऊन ‘नरेन’ हे नाव जवळच्या लोकांच्या तोंडात बसले. छोटा नरेन स्वभावताच व्रात्य होता. खूपच खट्याळ, खोडकर. इतरांनी दाखवलेली आमिषे, घातलेला धाक आदींना तो बिलकूल बघत नसे. सतत काहीतरी गडबड, धांगडधिंगा, आरडाओरडा चालूच असायचा. गप्प बसणे, उगी राहणे त्याच्या स्वभावातच नव्हते. शेवटी, भुवनेश्वरींनी त्यावर एक इलाज शोधला. नरेनला चूप करायचे झाल्यास त्याच्या डोक्यावर गार पाण्याची धार धरायची आणि धारेबरोबरच ‘शव, शिव’ असा जप करायचा. कधी कधी धाकही घालायचा. ‘सरळ वागला नाहीस ना तर शिवशंकर तुला कैलास पर्वतावर पाऊलही टाकू द्यायचे नाहीत... लक्षात ठेव!’ आणि काय चमत्कार! बिल्ले पुन्हा सुतासारखा सरळ व्हायचा. तितकाच तरतरीत, उल्हसित. थोडक्यात, असा एखादा रागाचा झटका आला, चिडाचीड झाली की आई लगेच म्हणायची, ‘काय नशीब बघा! मुलगा व्हावा, मुलगा व्हावा म्हणून मी शिवशंकरांचे पाय धरले आणि भोलेनाथांनी माझ्या पदरात घातला हा दैत्य! त्यांच्या सेवकांपैकी एक!’ अर्थात, असे स्फोट हे वरकरणीचे होते, प्रत्येक घरात ते होतातच. तेवढा भाग सोडला तर नरेन एक तल्लख, बुद्धिमान, गोड आणि प्रेमळ बालक होता. कोणाकडेही दुडदुडू धावत जावे, त्याच्या मांडीवर खुशाल बसावे ही त्याची रीत होती. सगळ्यावर अगदी बिनधोक विश्वास ठेवणाऱ्या मुलांपैकी तो एक होता. लहान मुलाला भोवतालचे विश्व म्हणजे एक सततचे विस्मयकारी प्रकरणच असते. आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी जगाकडे पाहत क्षणोक्षणी आनंद लुटण्याचा तो एक काळ असतो. बाल नरेन तो आनंद मनमुराद घेत असे. आपल्या दोनही ज्येष्ठ भगिनींची सतत कुरापत काढण्याची त्याला हौस होती. त्या बिचाऱ्या त्याला पुरून उरत नसत. त्याने अनेक प्राणी पाळलेले होते. त्यांच्याशी खेळणे त्याला आवडत होते. त्यातल्या त्यात घरातल्या गायीवर त्याचे भलते प्रेम होते. त्याच्या बहिणी त्या गायीला गोमाता किंवा भगवती मानून तिची पूजा करत. घरातल्या नोकरचाकरात त्याला अधिक प्रिय होता त्याचा टांगेवाला. त्याच्याकडे तो मित्र आणि दैवत म्हणूनच पाहत असे. त्या मोतद्दारचे ते दिमाखदार पागोटे, त्याचा तो किनखापी, भरजरी गणवेश आणि त्याच्या हातातील तो रुबाबदार चाबूक याची त्याला पडलेली बालसुलभ भुरळ वेगळीच होती. लहान मुलांच्या कल्पनाविलासात अशा एखाद्या व्यक्तीला फार मोठे स्थान असते. त्यात ते पूर्णपणे रमलेली असतात. छोटा नरेन त्याला अपवाद नव्हता. फिरस्त्या साधू-संन्याशांचे नरेनला असलेले आकर्षण अद्भुत होते. तसा एखादा साधू वा पवित्र व्यक्ती दत्तांच्या राजवाड्यासारख्या निवासाच्या दारात अली रे आली की नरेश आनंदित होऊन हर्षभरे तिच्याकडे धाव घ्यायचा. एके दिवशी असाच एक साधू आला- ‘ॐ भिक्षांदेहि’... पुकारत! आता त्याला द्यायला नरेनजवळ काय असणार? फक्त कमरेला गुंडाळलेले नक्षीदार नेसू! तसे म्हटले तर त्याच्या ते धोतर आवडीची वस्तू होती कारण ते धोतर म्हणजे त्याची बाल्यावस्था संपल्याची खूणच होती शिवाय हे त्याचे पहिलेवहिले नेसू होते आणि तरीही त्याने मागचापुढचा कसलाही विचार न करता ते तात्काळ फेडून त्या साधूच्या हातावर ठेवलेदेखील. साधूला काय! त्याने ते गुंडाळलेले डोक्याला, नरेनला तोंडभर आशीर्वाद दिला व गेला निघून! नरेनच्या वडिलांना विश्वनाथ दत्तांना... आपले वडील साधू बनून घरातून निघून गेल्याची आठवण चांगलीच होती. ते स्वत: जरी उदार असले, साधूसंतांचा भरपूर आदर व आतिथ्य करणारे असले तरी त्या घटनेनंतर त्यांनी नरेनवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. तेथून पुढे एखादा ‘साधू’ घरात आला तर नरेनची रवानगी थेट कडीकुलूपात. तो साधू निघून गेल्यानंतरच सुटका पण त्यामुळे नरेश बिलकुल विचलित होत नव्हता. दारात आलेल्या भिक्षुकाकडे खोलीच्या खिडकीतून हाताला लागेल ती वस्तू त्याच्या दिशेने फेकायचा. मातेची मांडी हीच कोणत्याही बालकाची पहिलीवहिली शाळा. आपल्या नवसाने झालेल्या पुत्राला उत्तम शिक्षण देण्यास माता भुवनेश्वरीदेवी उत्सुकच होत्या. मातेच्या मुखातून नरेनच्या कानावर हिंदूंच्या देव-देवतांच्या वैभवशाली कहाण्या तर पडल्याच पण त्याचबरोबर त्याला भारतीय ऋषिमुनींची आणि त्यांच्या पूर्वजांच्या महानतेचीही माहिती मिळाली त्याशिवाय भारतीय महाकाव्यातील कथाही त्याने भरपूर ऐकल्या. रोज दुपारी माताजी त्याला रामायण व महाभारतातील मजकूर वाचून दाखवत. नरेनचे त्या वाचनाकडे अगदी बारीक, सावध व एकचित्त लक्ष असे. आपल्या मातोश्रींच्या आईकडूनही त्याला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आजीच्या मातोश्री वैष्णवीपंथी असल्यामुळे त्यांना भगवद्गीता व वैष्णवी लोकगीते व कथा यांची शिकवण मिळालेली होती. दत्त परिवाराच्या प्रसादात अनेक फिरत्या गायकांची झुंबड उडत असे. नरेनच्या मातोश्री त्यांचे जाणीवपूर्वक आगत-स्वागत करत, त्यांच्याकडून भक्तिगीते व गीतमय पुराणकथा गाऊन घेत. त्या मागचा उद्देश एकच होता, बालवयातच नरेनला भक्तिमार्गाची गोडी लागावी. पेशाने ती माणसे भिक्षेकरी असली तरी त्यांच्या गायनातील तन्मयता, सौंदर्य प्रभावशाली होते. त्यात श्रोत्यांच्या धार्मिक भावना उद्दीपित करण्याची ताकछ होती परिणामी त्या भावना अधिक दृढ होत असतं. नरेनच्या आईनेच त्याला बंगाली मुळाक्षरांची ओळख करून दिली. त्याला जोडूनच प्यारीचरण सरकार यांचे ‘द फर्स्ट बुक ऑफ इंग्लिश’ ही त्याच्या हातात ठेवले. जगातील नानाविध, चित्रविचित्र परिस्थितीशी झगडताना आपले नैतिक आचारण कसे शुद्ध ठेवावे आणि प्रसंगी त्यातून निभावून जाण्यासाठी ईश्वराच्या चरणीच कसा आधार शोधावा- माणसाच्या आयुष्यातला सर्वांत खात्रीचा तारणहार परमेश्वरच असतो, हे नरेन आपल्या आईकडूनच शिकला. त्या त्याला नेहमी म्हणायच्या, बाळ, संपूर्ण आयुष्यात सतत निष्कलंक, निर्मळ राहा, आपला स्वत:चा सन्मान, प्रतिष्ठा यांचे जीवापाड रक्षण कर आणि त्याचबरोबर दुसऱ्याची मानहानी करू नको, मर्यादा ओलांडू नको, चित्तवृत्ती स्थिर कशी राहील याची दक्षता घे. हां, मात्र गरज पडेल तेव्हा छातीवर दगड ठेवायलाही हयगय करू नकोस...! आपल्या संपूर्ण आयुष्यात नरेंद्रनाथांनी आईवर अंत:करणपूर्वक प्रेम केले. ते म्हणत, ‘जो कोणी आपल्या आईची अक्षरश: पूजा करत नाही तो कदापिही महान बनू शकणार नाही...’त्यांच्या झंझावाती आयुष्यात आलेल्या अ‍ेनक प्रसंगी त्यांनी मोठ्या अभिमानाने बोलून दाखवलेले आहे. -‘माझ्या ज्ञानाला लाभलेल्या फुलोऱ्याचे, त्याला आलेल्या बहराचे संपूर्ण श्रेय माझ्या मातेचे आहे. मी तिचा परमऋणी आहे...!’ दररोज रात्री निद्रावश होण्यापूर्वी नरेनला एकच विलक्षण दृश्य दिसत होते. झोपण्यासाठी बिछान्यावर पडल्यानंतर डोळे मिटायचा अवकाश ते दृश्य आकार घ्यायचे. ‘त्याच्या भुवयांच्या मध्यभागी एक विलक्षरण शोभायमान असा प्रकाशाचा ठिपका उमटे. हळूहळू त्याचे रंग बदलत, तो पसरत पसरत सर्व शरीर व्यापून टाके. संपूर्ण शरीर त्या विस्फुटित प्रकाशात न्हाऊन निघे. जिकडे-तिकडे स्फटिकशुभ्र तेजाचा पूर लोटे. त्याचे मन या चमत्कारात गढून जात असतानाच त्याचे शरीर निद्राधीन होई. विशेष म्हणजे प्रतिदिनी त्या प्रकाराची पुनरावृत्ती होत होत. त्याने विचार केला की, असा एखादा चमत्कार म्हणजे एक परिपूर्ण नैसर्गिक स्थितीच आहे. प्रत्येकाच्या वाट्याला ती येत असावी आणि म्हणून त्याने त्याची वाच्यता बरेच दिवस कोणाकडेही केली नाही. मात्र, एकदा त्याने आपल्या शाळासोबत्याला विचारले, ‘काय रे, जेव्हा तुला झोप येते तेव्हा तुझ्या भुवयांच्या मध्यभागात तुला कसला तरी प्रकाश दिसतो का?’ मित्राने उत्तर दिले- ‘नाही बाबा! तसले काही नाही दिसत!’ नरेनने त्याला सांगितले, ‘मला तसा प्रकाश दररोज दिसतो. तू देखील आठवून बघ. प्रयत्न कर तसा. बिछान्यावर पडल्या पडल्या झोपून जाऊ नकोस. काही क्षण तरी अगदी सावध रहा. पूर्ण जागा राहा. पूर्ण जागा राहा. तुलाही तो दिसेल. नक्कीच!’ पुढे नंतरच्या काळात नेमका तोच प्रश्न खुद्द नरेनला विचारणारा कोणीतरी त्याला भेटणार होता. ‘नरेन, माझ्या लेकरा, जेव्हा तू निद्रानाश होऊ पाहतोस तेवहा तुला प्रकाशकिरण दिसतात का रे?’ तो प्रश्नकर्ता होता त्याचे आध्यात्मिक गुरू श्री रामकृष्ण! आयुष्याच्या अंतापर्यंत तो साक्षात्कार नरेनच्या सोबतीला राहिला. जरी आयुष्याच्या उत्तरार्धात वारंवार तसे घडत नसले किंवा त्याची तीव्रता लक्षणीय नसली तरी ती सोबत चालूच राहिली. अशा तर्हेची एखादी घटना हे नक्कीच सांगून जाते की, संबंधित व्यक्तीला एक महान आध्यात्मिक वारसा लाभलेला असून तिच्या आत्म्याने स्वत:ला ईश्वराच्या चिंतानात खोल गाडून घेण्याची शिकवण इतकी उत्तम आत्मसात केलेली होती की, त्याची ध्यानावस्था म्हणजे एक उत्स्फूर्त सहाजावस्थाच मानावी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more