* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: TATVAMASI
 • Availability : Available
 • Translators : ANJANI NARAVANE
 • ISBN : 9788177664058
 • Edition : 4
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 192
 • Language : Translated From GUJRATI to MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :DHRUV BHATT COMBO 5 BOOKS
Quantity
"This book is English translation of Tatvamasi, the Sahitya Academy Award-Winning Gujarati Novel by Dhruv Bhatt. It is sure that all those who could not read it in Gujarati will enjoy reading it. It will be definitely appreciated by all those who love India and its great ancient culture. Shri Dhruv Bhatt has written seven novels so far. The themes of each of his novels are very different from the usual novels. In all this novels there are undercurrents suggesting unexpressed tender feeling between the hero and the heroine, but there are no love-stories as such. And yet, all his novels hold the reader’s interest throughout, with gripping stories which are beautifully worded and thought provoking. Shri Druv Bhatt always emphasises the basic decency and value of life, which are found in Indians all over the country at the grass level. He attributes these commendable properties not to any religion but to the deep-rooted spirituality among the people. "
"परदेशात शिक्षित कथानायक अठरा वर्षांनी भारतात परततो ते अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांनी ग्रासलेल्या प्रजेला योग्य दिशा दाखवण्याच्या उद्देशाने. प्रजेतील सुप्त शक्ती शोधून त्याचा समाजाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात कथानायकाला आदिवासी प्रदेशात काम करीत असताना अनेक लोक भेटतात. या लोकांच्या संस्कृती, परंपरा इत्यादींचा परिचय करून घेत असताना त्याच्या मनात अनेक प्रश्‍नांची द्वंद्वे उभी राहतात. आधुनिक ज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहताना या संकल्पना त्याला कशा दिसतात? धु्रव भट्ट हे गुजराती साहित्य जगतातील प्रसिद्ध नाव आहे. समुद्रान्तिके आणि तत्त्वमसि या त्यांच्या पहिल्या दोन कादंबर्‍यांना गुजरात साहित्य अकादमी तसेच तत्त्वमसिला केंद्रिय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. "
Video not available
Keywords
TATWAMASI, DHRUVA BHATT, ANJANI NARVANE
Customer Reviews
 • Rating Starविंग कमांडर प्रभाकर सहस्रबुद्धे

  ‘तत्वमसि’ ही कादंबरीचे अतिशय प्रभावी लेखन अन् तितकाच प्रभावी अनुवाद. भारतीय संस्कृतीमागचे मूळ विचार, परंपरांमागचे तत्त्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात मनावर बिंबवणारं लिहिलेलं कुठंच नसेल.

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 05-10-2003

  अठरा वर्षे परदेशात राहून ‘तो’ परत आलाय. भारतातल्या ग्रामीण भागात जाऊन ‘तो’ राहतो. तिथल्या आदिवासींच्या अडीअडचणी समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यांची मानसिकता, श्रद्धा यांचा प्रथम वैचारिक (व्यावहारिकपणे) विचार करतो. हळूहळू ‘तो’ या लोकांमध्ये गुंतत जातो त्यांचे जीवन त्याचे कधी होते ते त्यालाही कळेनासे होते. नर्मदेकाठी राहून या आदिवासींच्या राहणीमानाचा शोध घेण्यासाठी ‘हा’ इकडे आलेला असतो. या लोकांची संस्कृती, परंपरा, नर्मदा तिची रूपे यातून त्यांच्या मनात प्रश्नांची द्वंद्वे निर्माण होतात. ‘मी कोण आहे?...’ ह युगानुयुगे मानवाला पडणारा सवाल त्यालाही पडतो. ‘तत्त्वमसि’ ही गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांची कादंबरी आहे. तिचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. ही कादंबरी आणि ‘समुद्रन्तिका’ या भट्ट यांच्या दोन कादंबऱ्यांना गुजरात साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. विषयाचं नाविन्य हे ध्रुव भट्ट यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. या कादंबरीत रूढार्थाने प्रेमकथा वगैरे नाही. एखाद्या कुटुंबाची कहाणीही नाही. अगदी ‘त्याचं नावही इथं लिहिलेलं नाही. समोर येतं ते साधं सुधं नर्मदेकाठचं आयुष्य. तिथल्या आदिवासींचं जिणं आणि त्याचं या साऱ्या पसाऱ्यात वावरणं. नर्मदेची परिक्रमा याआधी मराठी वाचकांनी गोनिदांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ तून अनुभवली आहे. इथे समग्र परिक्रमा नसली तरी वळणावळणावर नर्मदा भेटत राहते. तिचे अस्तित्व सातत्याने जाणवणारे आहे. यातली पात्रे, त्यांचे सारे चित्रण हे नजरेसमोर उभे राहते. नर्मदेकाठची भाषा, तिथले रितीरिवाज सहजगत्या चित्रित होतात. आदिवासींच्या गूढ चित्रांनी ‘त्याला’ काही प्रश्न पडतात. पुनर्जन्म, हा जन्म त्रिकालाचे ज्ञान असे नाना प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. हे सारे प्रश्न उरात घेऊन तो आदिवासींच्या पाठीशी उभा राहतो. शेवटपर्यंत ही कादंबरी मनावरची पकड कायम ठेवते. कथाओघात येणारे साधे आदिवासी, त्यांची संस्कृती दिसून येते. भारतीय संस्कृतीचे प्रतीक असणारी नर्मदा जिवंत मानली जाते. तिच्या परिसरात घडणाऱ्या अद्भूत रम्य घटना या विचारांबरोबरच मनोरंजनही करतात. मेहता पब्लिशिंग हाऊसने अन्य भाषांतले समृद्ध साहित्य मराठीत आणण्याचा वसा उचलला आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्यच आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यावरची मानवाकृती, गूढ रेखाटने लक्ष्यवेधी आहेत. ‘मी कोण?’ या अदिम सत्याचा शोध कथानायकाबरोबर आपणही घ्यायला लागतो. -राधिका कुंटे ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-02-2005

  भारतीय संस्कृतीची वैभवगाथा... गुजराती साहित्यांत ध्रुव भट्ट यांचे नाव आहे. त्यांच्या ‘समुद्रान्तिके’ या पहिल्या कादंबरीला गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘तत्त्वमसि’ ही त्यांची दुसरी कादंबरी. यालाही गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आे. विषयाचे पूर्ण नावीन्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. प्रेमकथा नाही. एका कुटुंबाची कथा नाही. खरंतर आपल्या कथानकाचे नावही आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही. ही कादंबरी लेखकाने नर्मदेला अर्पण केली आहे. भारतवर्षाच्या उत्तर व दक्षिण भागांना जोडणाऱ्या, एकत्र बांधणाऱ्या त्या भवनमोहिनी नर्मदेस अशी ही अर्पण पत्रिका आहे. लेखकाचे या देशावर, या देशाच्या सुंदर निसर्गावर आणि येथील अशिक्षित, अडाणी वाटणाऱ्या पण ज्यांच्या श्रद्धेने अन् प्रेमाने मन भारावून जाईल अशा भोळ्याभाबड्या जनतेवर त्यांचे प्रेम आहे. पराकोटीचे प्रेम आहे. वेगळ्या भाषा, वेगळे रीतीरिवाज, वेगळे धर्म अशा अनेक भिन्नता असताना या देशाच्या रहिवाशांकडे असे काय आहे की जे आम्हा सर्वांना एकत्र बांधून ठेवते, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा लेखकाचा सतत प्रयत्न चालू असतो. या जिज्ञासेनेच लेखकाला ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा दिली आहे. पूर्ण कादंबरीचे ‘प्रथमपुरुषी’ लेखन आहे. अठरा वर्षांनी कथानायक नर्मदेच्या खोऱ्यात, आदिवासी भागात चालू असलेल्या कामांत भाग घेण्यासाठी संशोधन करण्यासाठी येतो. इथे काम करताना त्याला अनेक प्रश्न पडतात. ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधताना या विविध लोकांमधील श्रद्धा व प्रेम त्याला कायम बुचकळ्यात टाकते. नर्मदा ही एक अशी जलवाहिनी आहे जिला या देशातले लाखो लोक ‘जिवंत’ समजतात. वर्षानुवर्षे अनेक हालअपेष्टा सोसून या देशांतले किती लोक नर्मदेची परिक्रमा करतात. १२०० मैल लोक नर्मदेची परिक्रमा करतात. १२०० मैल लांब पसरलेल्या या नदीची अशी परिक्रमा करताना ती सतत आपल्याबरोबर आहे. ती आपले रक्षण करील मार्ग दाखवील, आसरा देईल एवढेच काय, प्रत्यक्ष दर्शनसुद्धा देईल अशी या सर्वांची श्रद्धा असते. तीरावरची माणसे या परिक्रमावासींची सर्व सोय बघतात. सेवा करतात कारण ऋषीमुनींनी घालून दिलेली हजारो वर्षांची ही परंपरा खंडित होऊ नये अशी त्यांची इच्छा असते. सारे रेवाखंड हे काम करीत असते. अर्धपोटी आदिवासीसुद्धा! त्या भागात लहानाची मोठी झालेली, कॉलेज शिक्षण घेऊन पुन्हा आदिवासींसाठी काम करणारी सुप्रिया (त्यांच्या भाषेत सुपरिया) या अडाणी, घाणेरड्या, गावंढळ लोकांवर इतकं मनापासून प्रेम कसं करू शकते, याचे त्याला सुरुवातीला खूप आश्चर्य वाटते, पण नंतर त्याचे एकेक गुण जसे त्याच्या लक्षात येतात तसा तोही मनामध्ये त्यांना मानायला लागतो. सुप्रियाच्या कामाचे अनेक प्रसंग त्याला आश्चर्यचकित करतात. एका स्त्रीवर डाकीण झाल्याचा आरोप होतो. त्यातून तिचा मृत्यू टाळून त्यांना पटेल अशा मार्गाने दूर अंतरावर तिचे होणारे पुनर्वसन. हा प्रसंग कथानायकाच्या मनावर खूप परिणाम करतो. दारावरून जाणाऱ्या सुपरियाला अडवून एक अस्थिपंजर असा म्हातारा आदिवासी, जेवण म्हणून तिला मिठाचे दोन खडे (जे त्याच्या जवळचे सर्वकाही असते.) देतो. ते मीठ खाल्ल्यावर आता माझे जेवण झाले. आता मी जेवणार नाही. असं म्हणणारी सुप्रिया आपल्याही मनात ठसते. वृक्षांमध्ये असणारा वृक्षदेव आपले रक्षण करतो. ही आदिवासींची श्रद्धा सुरुवातीला कथानायकाला योग्य वाटत नाही, पण जेव्हा त्याला स्वत:लाच नदीच्या जवळून चालताना अभय मिळते, तेव्हा त्यांची श्रद्धा चूक कशी असा त्याला प्रश्न पडतो. मृगनक्षत्रातला व्याधाचा तारा हा जोडतारा आहे. (एकाऐवजी दोन तारे) हे त्या आदिवासींना कसे कळले असेल? याचा त्याला थांग लागत नाही. कर्ज घेणारे आदिवासी ज्या प्रामाणिकपणे व्याज व मुद्दल फेडत असतात हे बघून कथानायकाला आश्चर्य वाटते. घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे परत करणे हाच त्याचा धर्म. हीच त्याची संस्कृती जी साधी, सरळ समज लोकांच्या मनात आहे ती प्रामाणिक वृत्ती त्याच्या मनाला भारावून टाकते. हीच प्रामाणिक वृत्ती बाबरियाची बायको दाखवते. कामाच्या ठिकाणी अपघात झाल्याने नवरा हॉस्पिटलमध्ये आहे, असे कळल्यावर ती कथानायकाला सांगते ‘तुमचे पैसे मी मजुरी करून फेडीन.’ नरभक्षक वाघाच्या हल्ल्याने मोठा भाऊ मरतो. तेव्हापासून लहान भाऊ वाघाच्या मागावर असतो. वाघ एकेठिकाणी डोके अडकून बंदी हातो. त्याच्याजवळ मारायला जाऊनही तो आदिवासी वाघाला सोडून देतो कारण ती वाघीण असते. ‘आई इथे, बच्चे जंगलात’ अशी ताटातूट नको असे त्याला वाटते. हा सर्वच प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी लिहिला गेला आहे. अशा कितीतरी प्रसंगांतून जाताना शेवटी कथानायकाला वाटत राहते की ‘कोण शहाणे? कोण सुसंस्कृत?’ मी त्यांना शिकवतोय की त्यांच्याकडून शिकतोय. मधुमक्षिका पालन केंद्र सुरू करण्यासाठी अवघड नाही चढून मध काढणाऱ्या आदिवासींचे मतपरिवर्तन व्हावे म्हणून अतिशय धीराने काम करणारा लक्ष्मण शर्मा, बनात लागलेला वणवा, लोकांच्या पुनर्वसनासाठी झटणारे, विष्णू व विद्या, त्यांना फुलशेती शिकवण्यासाठी चर्चचे काम सोडून आलेले थॉमस, घनदाट अरण्यात वसलेली टोळी, त्यांचे नियम अशा अनेक घटनांचा पट या कादंबरीत विणला आहे. आपल्या संस्कृतीवरील भाष्य गणेशशास्त्री या व्यक्तिरेखेने अतिशय सहृदयतेने केले आहे. सप्तचिरंजीवांपैकी (महर्षी व्यास) बियास मुनी कधीही आपल्या दारी येतील म्हणून त्यांच्या बसण्याची सोय, पायाला लावायला तेलाची सोय करणारी ही प्रजा आणि त्यांची बांधिलकी मनाला भावते. कथानकाची परदेशी मैत्रीण हे सर्व अद्भुत बघायला इथे येते. ती एकदा म्हणते ‘एवढं मोठं हे विश्व एकाच मूलतत्त्वापासून निर्माण झालंय हा विचार किती रोमांचकारी आहे नाही?’ हाच अनुभव त्याला नर्मदातीराने चालताना येतो. त्याला वाटते, ‘या ठिकाणी जड व चेतन वेगळे नाहीत. हे खडक, हे वृक्ष मी आणि नर्मदा सर्वजण प्रत्येक क्षणी एकमेकांच्या रूपात बदलत आहोत.’ ही कादंबरी सुरुवातीपासूनच मनाची पकड घेते. नर्मदेच्या खोऱ्यातील अरण्यं, निसर्ग, तेथे वसणारे आदिवासी, त्यांची हिंदू धर्माची नव्हे, धर्मातीत असणारी आणि भारतीय संस्कृती या प्रदेशातील अद्भुत जीवनदायीनी नर्मदा आणि तिच्या कुशीत विसावलेली तिची लेकरं, यांची ही कहाणी वाचून झाल्यावरही मनात रेंगाळते. या साऱ्याचे श्रेय कादंबरीला आहे. तसेच अनुवादालाही आहे. अतिशय सुंदर, तरल भावविश्व, निसर्गाची जादू अन् सामान्य माणसांचा विश्वास या साऱ्याचे अद्भुत दर्शन या अनुवादाने झाले आहे. संवादात वापरलेली छोटी गुजरातील वाक्येही कादंबरीचा आशय वाचकांपर्यंत पोचवतात. सर्वांना मनापासून आवडेल अशीच ही कादंबरी आहे. -रजनी मुकुंद वैद्य ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 30-11-2003

  नर्मदापुत्राच्या संघर्षाची कथा… गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळलेली, तत्त्वमसि’ ही ध्रुवभट्ट यांची कादंबरी परदेशी वास्तव्य करणारा, मूळ भारतीय वंशाचा एक आधुनिक तरुण आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतो. भारताच्या संस्कृतीविषयी, परंरांविषयी त्याच्या मनात काही ठाम पूर्वग्रह आहेत. या अडाणी लोकांना जरा सुशिक्षित करायला पाहिजे. ही त्याची विचारपद्धती आहे. पण नर्मदेच्या काठावरची निसर्गाच्या हातात हात घालून जगणारी आदिवासींची जीवनपद्धती त्याला त्याचे पूर्वग्रह सोडायला भाग पाडते. भारताची परंपरासिद्ध संस्कृती आणि आधुनिक पाश्चात्य जीवनशैली यांची द्वंद्वे त्याच्या मनात उभी राहतात. स्वत:च्या बालपणाच्या हळव्या स्मृती, ठाम झालेले पूर्वग्रह आणि चित्ताला शांतता देणारी आदिवासी संस्कृती यांच्या घुसळणीतून तो स्वत:च्या आयुष्याबद्दलचे प्रश्न सोडवू पाहतो. अखेर नर्मदामैय्याच्या कुशीत एक परिक्रमावासी म्हणून स्वत:ला झोकून देतो. त्याच्या मनातल्या संघर्षाची ही गोष्ट ती वाचताना ‘नर्मदा बचाव’ आंदोलनातल्या आदिवासींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काहीशा गूढ पद्धतीने उलगडत जाणारा हा अनुवाद मराठीतून वाचताना अजिबात उपरा वाटत नाही. -मेघना ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
Shruti Tambe

फोरसीझन्स वाचली. आवडली. पुरवून वाचली. बरेच दिवस ती संपूच नये असं वाटत होतं. अभयारण्यं पाहिलेली आहेत. पण ग्रासलॅन्डचं नैसर्गिक, वरवर अनाकर्षक वाटणारं सौंदर्य, अभयारण्यामुळे उखडून टाकले गेलेले साधेभोळे लोक, निसर्गासोबत जगणारे आदिवासी-राक्षसी विकासाचया कल्पना आणि अतिशय संवेदनशीलतेनं हे पाहून बदलणारी एमराल्ड!-हे सुरेख बांधलं गेलंय. सगळ्यात मनाला भिडली उभ्याआडव्या पसरलेल्या माळरानांची वर्णनं-टोचऱ्या, खुरट्या गवतापासून ते मोठ्ठ्या वृक्षांपर्यंतची सगळी दुनिया सांभाळणारं माळरान. भारत हा खरं तर निम्मापाऊण माळरानच आहे. या माळरानाची शान असणारे तरस, कोल्हे, लांडगे, हरणं, ससे-सगळंच मनोहारी. तुम्ही हे सगळंच रेखाटलंयत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदरबन, मुंबई, माळरान आणि इटली ही जगं वेगळीही आहेत आणि एकात्मही. हे तुम्ही मनाला भिडेल आणि पोहचवेल असं सांगितलंय. कादंबरीचे तुकडे वाचतावाचता मुंबईकर विकासवादी मुलगी ते मानवी जीवन, स्थलांतरं, शोषण, अगतिकता, नैसर्गिकता, प्रयत्नवाद हे समजून घेणारी एक प्रगल्भ शहाणिव हळूहळू तिच्यात कशी येते ते तुम्ही उलगडून दाखवलंय. कामासाठी सध्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अभयारण्यात फिरत्येय. ओसाड होत चाललेली माळरानं, बेमुर्वत फोफावणारी ऊसशेती, जंगलात माणसं घुसत गेल्यानं धुपणारा निसर्ग, "मोठ्ठ्या" विकासाच्या स्वप्नात आंधळी झालेली मध्यमवर्गीय लक्षावधीची झुंड यात तुमची फोर सीझन्स एक समजुतदार, प्रगल्भ असा सूर लावते. इतकं सुरेख प्रवाही गद्य बऱ्याच दिवसांनी वाचायला मिळालं ते तुमच्या या कादंबरीमुळे. त्याबद्दल थॅंक्यू. आणि तुम्ही यापुढेही असंच सकस आणि सरस लिहित राहाल अशी शुभेच्छा. आपली, श्रुती तांबे ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
Veena Gavankar

ब-याच दिवसांनी एक खूप छान कादंबरी वाचायला मिळाली.शर्मिला फडकेंची फोर सीझन्स.लेखिकेची भाषा अतिशय समृद्ध. ओघवती शैली.वर्तमान आणि भूतकाळाच्या अनुभवांचा सुंदर गोफ.भविष्याचं सकारात्मक सूचन.लेखिकेचा पर्यावरणाचा अभ्यास,`निसर्गाचं शहरीकरण `होण्यातील धोक्यांच इशारा..सारं काही वाचताना खिळवून ठेवतं.खूप तयारीनं अभ्यासून लिहिलेली ही कादंबरी मला अतिशय आवडली.अभिनंदन शर्मिला फडके. खूप लिहा.शुभेच्छा. ...Read more