Shop by Category BIOGRAPHY (142)HORROR & GHOST STORIES (14)COOKERY, FOOD & DRINK (6)EDUCATION (2)POEMS (25)PHILOSOPHY (6)AUTOBIOGRAPHY (61)NOVEL (8)MIND BODY & SPIRIT (5)BIOGRAPHY & TRUE STORIES (89)View All Categories --> Author MEERA NANDGAONKAR ()MARCIA HIGGINS WHITE ()ACHARYA ATRE ()GEETA PIRAMAL ()SUDHA RISBUD ()Dr.GOGATE VIKAS ()NALINI JAMEELA ()S. V. KASHYAPE ()TODD BURPO AND LYNN VINCENT ()VAIJYANTI PENDSE ()RAJANI BHAGWAT ()
Latest Reviews TARPHULA by SHANKAR PATIL Vijay Patil `टारफुला` ......आज ग्रामीण कथालेखक शंकर पाटील यांचं `टार फुला `पुस्तक वाचण्यात आलं.या पुस्तकात स्वातंत्र्य पूर्वीच्या व काही स्वातंत्र्य उत्तर काळात महाराष्ट्रात असलेल्या खेडे गावाची परिस्थिती वर्णन आपल्याला दिसून येते.यात वर्णन केलेल्या खेड हे महारष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आहे. सुरुवातीला या गावात सुभानराव पाटील या नावाच्या गाव पाटलांचा खूप वचक असतो आणि त्याच्याच वचकांमुळेच गावात चोरीमारी खून दरोडा या गोष्टी कमी होत असतात आणि गाव व्यवस्थित नांदत असतं...पण त्याच्या अचानक मृत्यू गावात कसं गावगुंडांचा हैदोस वाढतो.म्हणतात ना.... वाघाच्या मेल्यानंतर, कोल्ही सुद्धा वाघ बनतात... गावात कुणाचा कुणाला पायपूस राहत नाही आणि गावात अराजक माजत...याच काळात पाटील मेल्यामुळे पाटलीन ही एकाकी होते.पाटलाला मूल नसल्यामुळे कुणाचा मूल पाटलांना दत्तक जाणार यासाठी गावात दोन तट पडलेले असतात एका बाजूला केरू नाना दुसऱ्या बाजूला, देसायांचा गट असतो.. पाटलांचे जुने सहकारी गाव वतन दार कुलकर्णी यांना मात्र यातून काहीच निर्णय घेता येत नसतो तो जरी वतनदार माणूस जरी असला तरी त्यांच्या कडे काहीसे करण्याची काही धमक नसते व गाव गुंडांना सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यात नसते, त्यांच्या पाठीमागे उभा होणारा तसा कोणताच माणूस नसतो...पाटलीन बाई घाबरून गाव सोडून जातात आणि आपल्या भावाच्या मुलाला दत्तक विधान करण्यासाठी कोल्हापूरातच रहतात. या दरम्यानच्या काळात गावातील गुंडांना वाटते की कुलकर्णी यांनी पाटलीणबाई ना सल्ला दिला आणि भावाच्या मुलाला दत्तक घ्यायला लावलं.त्यामुळे त्यांचाही खून होतो गावात परत एकदा आणखी अराजक माजते...आणि याच दरम्यान गावातील लोक पाटलांची शेती बळकावतात काही शेती केरू ना ना काही देसाई यांचा पण नंतर गावात बदली पाटील येतात, बदली पाटील परशुराम आणि त्याची तीन भावंडं त्याचा सगळा लवाजमा आल्यानंतर गावातील पूर्ण परिस्थिती बदलून जाते त्यांनी गावावर एकछत्री अंमल करायला सुरुवात करतात आणि गावातील सर्व गावगुंडांना सगळ्यांनाच धडा शिकवतात पण त्याच बरोबर त्यांची नियत काही साफ नसते, गावातल्या गरिबांना कसे नाड तात, वेळोवेळी पोलिसांचा वापर करून कसे ते गावातील लोकांना अडकून आपला गावावर कसा हक्क राहील वर्चस्व राहील याचा प्रयत्न सुरू होतात. यानंतर गावात गट पडल्यामुळे, गरिबांना कोणीच वाली राहत नाही पण एक वेळ अशी येते की ते परशुराम पाटील यांना सुद्धा त्यांच्या तालमीत तयार झालेला हिंदुराव आव्हान देतो आणि परशुरामना सुद्धा असे दिसून येते की शेरास सव्वाशेर हा कोणी तरी असतो एकंदरीत काय या गावगाड्यात चालणारी उलाढाल आणि गावाकडचे तिरक व बेरकी राजकारण शंकर पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे मांडले आहे.खोबरं तिकडं चांगभलं म्हणणारी म्हादू कोळी सारखी मंडळी व गादीची इमानाने चाकरी करणारी महादू तराळ सारखी माणसं ही गावात भेटतात....म्हणजेच गावातील राजकारण हे कोणत्या पद्धतीने खेळलं जातं,गावातील मंडळी कशी एकमेकाची जिरवा जिरवी करण्यासाठी, कुठल्या थराला जातात आणि या गावातला मोठ्या मंडळी च्या नादात जी गावातील लहान मंडळी किंवा सरळ मंडळी असतात त्यांचा कसा बळी दिला जातो हे अतिशय वेधक पणे मांडले आहे गावात होणारे सण, समारंभ जत्रा याचाही त्यांनी अचूक वर्णन केलेले आणि यामुळे गावातील मातीचा गंध आपल्याला आल्यावाचून राहत नाही. ..... विजय पाटील ...Read more AIK SAKHE by V.P.KALE Sumitabh SP ऐक सखे… वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्टी सांगत जाणारे, ‘अरेबियन नाइट्स’सारखे त्याचे स्वरूप आहे. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्ाळ्याचे, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही असामान्य नाहीत. आवतीभोवती असणाऱ्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे. `ऐक सखे` पुस्तक म्हणजे दहा कथांचा संग्रह. प्रत्येक कथा मनाला भिडणारी, विचार करायला लावणारी. प्रत्येक कथेमध्ये वपुंनी दिलेली उदाहरणं आणि दाखले वाचकाला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. माणूस कुठेतरी त्या दाखल्यांची/उदाहरणांची तुलना स्वतः अनुभवलेल्या गोष्टींवर करतो. नक्की वाचावे असे पुस्तक. वपुंच्या लेखनिकाचं काम बघणाऱ्या सौ. अनघा पत्की ह्यांचं विशेष कौतुक आणि आभार. सौ. अनघा पत्की ह्या व्यावसायिक लेखनिक नसून रसिक होत्या म्हणूनच, ठाणे ते परळ - टाटा हॉस्पिटलपर्यँत प्रवास. तिथे कॅन्सरवर ट्रीटमेंट, तसेच रेडिएशन. परळ ते वांद्रा प्रवास मग अर्धा तास विश्रांती. आणि मग रात्री साडेआठपर्यंत लेखन. हे सगळं त्या करू शकल्यात. "पावसाचं पाणी साठून झालेला तलाव आणि गाभ्यात पाण्याचा जिवंत झरा असलेला तलाव यात फरक असतोच" ...Read more
TARPHULA by SHANKAR PATIL Vijay Patil `टारफुला` ......आज ग्रामीण कथालेखक शंकर पाटील यांचं `टार फुला `पुस्तक वाचण्यात आलं.या पुस्तकात स्वातंत्र्य पूर्वीच्या व काही स्वातंत्र्य उत्तर काळात महाराष्ट्रात असलेल्या खेडे गावाची परिस्थिती वर्णन आपल्याला दिसून येते.यात वर्णन केलेल्या खेड हे महारष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आहे. सुरुवातीला या गावात सुभानराव पाटील या नावाच्या गाव पाटलांचा खूप वचक असतो आणि त्याच्याच वचकांमुळेच गावात चोरीमारी खून दरोडा या गोष्टी कमी होत असतात आणि गाव व्यवस्थित नांदत असतं...पण त्याच्या अचानक मृत्यू गावात कसं गावगुंडांचा हैदोस वाढतो.म्हणतात ना.... वाघाच्या मेल्यानंतर, कोल्ही सुद्धा वाघ बनतात... गावात कुणाचा कुणाला पायपूस राहत नाही आणि गावात अराजक माजत...याच काळात पाटील मेल्यामुळे पाटलीन ही एकाकी होते.पाटलाला मूल नसल्यामुळे कुणाचा मूल पाटलांना दत्तक जाणार यासाठी गावात दोन तट पडलेले असतात एका बाजूला केरू नाना दुसऱ्या बाजूला, देसायांचा गट असतो.. पाटलांचे जुने सहकारी गाव वतन दार कुलकर्णी यांना मात्र यातून काहीच निर्णय घेता येत नसतो तो जरी वतनदार माणूस जरी असला तरी त्यांच्या कडे काहीसे करण्याची काही धमक नसते व गाव गुंडांना सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यात नसते, त्यांच्या पाठीमागे उभा होणारा तसा कोणताच माणूस नसतो...पाटलीन बाई घाबरून गाव सोडून जातात आणि आपल्या भावाच्या मुलाला दत्तक विधान करण्यासाठी कोल्हापूरातच रहतात. या दरम्यानच्या काळात गावातील गुंडांना वाटते की कुलकर्णी यांनी पाटलीणबाई ना सल्ला दिला आणि भावाच्या मुलाला दत्तक घ्यायला लावलं.त्यामुळे त्यांचाही खून होतो गावात परत एकदा आणखी अराजक माजते...आणि याच दरम्यान गावातील लोक पाटलांची शेती बळकावतात काही शेती केरू ना ना काही देसाई यांचा पण नंतर गावात बदली पाटील येतात, बदली पाटील परशुराम आणि त्याची तीन भावंडं त्याचा सगळा लवाजमा आल्यानंतर गावातील पूर्ण परिस्थिती बदलून जाते त्यांनी गावावर एकछत्री अंमल करायला सुरुवात करतात आणि गावातील सर्व गावगुंडांना सगळ्यांनाच धडा शिकवतात पण त्याच बरोबर त्यांची नियत काही साफ नसते, गावातल्या गरिबांना कसे नाड तात, वेळोवेळी पोलिसांचा वापर करून कसे ते गावातील लोकांना अडकून आपला गावावर कसा हक्क राहील वर्चस्व राहील याचा प्रयत्न सुरू होतात. यानंतर गावात गट पडल्यामुळे, गरिबांना कोणीच वाली राहत नाही पण एक वेळ अशी येते की ते परशुराम पाटील यांना सुद्धा त्यांच्या तालमीत तयार झालेला हिंदुराव आव्हान देतो आणि परशुरामना सुद्धा असे दिसून येते की शेरास सव्वाशेर हा कोणी तरी असतो एकंदरीत काय या गावगाड्यात चालणारी उलाढाल आणि गावाकडचे तिरक व बेरकी राजकारण शंकर पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे मांडले आहे.खोबरं तिकडं चांगभलं म्हणणारी म्हादू कोळी सारखी मंडळी व गादीची इमानाने चाकरी करणारी महादू तराळ सारखी माणसं ही गावात भेटतात....म्हणजेच गावातील राजकारण हे कोणत्या पद्धतीने खेळलं जातं,गावातील मंडळी कशी एकमेकाची जिरवा जिरवी करण्यासाठी, कुठल्या थराला जातात आणि या गावातला मोठ्या मंडळी च्या नादात जी गावातील लहान मंडळी किंवा सरळ मंडळी असतात त्यांचा कसा बळी दिला जातो हे अतिशय वेधक पणे मांडले आहे गावात होणारे सण, समारंभ जत्रा याचाही त्यांनी अचूक वर्णन केलेले आणि यामुळे गावातील मातीचा गंध आपल्याला आल्यावाचून राहत नाही. ..... विजय पाटील ...Read more
AIK SAKHE by V.P.KALE Sumitabh SP ऐक सखे… वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्टी सांगत जाणारे, ‘अरेबियन नाइट्स’सारखे त्याचे स्वरूप आहे. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्ाळ्याचे, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही असामान्य नाहीत. आवतीभोवती असणाऱ्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे. `ऐक सखे` पुस्तक म्हणजे दहा कथांचा संग्रह. प्रत्येक कथा मनाला भिडणारी, विचार करायला लावणारी. प्रत्येक कथेमध्ये वपुंनी दिलेली उदाहरणं आणि दाखले वाचकाला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. माणूस कुठेतरी त्या दाखल्यांची/उदाहरणांची तुलना स्वतः अनुभवलेल्या गोष्टींवर करतो. नक्की वाचावे असे पुस्तक. वपुंच्या लेखनिकाचं काम बघणाऱ्या सौ. अनघा पत्की ह्यांचं विशेष कौतुक आणि आभार. सौ. अनघा पत्की ह्या व्यावसायिक लेखनिक नसून रसिक होत्या म्हणूनच, ठाणे ते परळ - टाटा हॉस्पिटलपर्यँत प्रवास. तिथे कॅन्सरवर ट्रीटमेंट, तसेच रेडिएशन. परळ ते वांद्रा प्रवास मग अर्धा तास विश्रांती. आणि मग रात्री साडेआठपर्यंत लेखन. हे सगळं त्या करू शकल्यात. "पावसाचं पाणी साठून झालेला तलाव आणि गाभ्यात पाण्याचा जिवंत झरा असलेला तलाव यात फरक असतोच" ...Read more