* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BAPU, IF I TRY TO HAVE A BALANCE SHEET OF MY LIFE, I AM SURE, THE IMMENSE HAPPINESS GIVEN BY YOU AND MOM WILL BE CREDITED TO IT. THERE WILL BE HARDLY ANYTHING ON THE DEBIT SIDE. OUR GLASS OF WATER WAS ALWAYS FULL; YOU NEVER ALLOWED IT TO BE HALF FILLED. WHEN I WAS MARRIED, YOU GAVE A VALUABLE GIFT, YOU REMINDED ME TO MAINTAIN ALL THE GOOD THINGS IN LIFE, WHICH WILL KEEP ME SMILING THROUGHOUT. BAPU, YOU ARE THE ONE WHO HAS GIVEN THIS GIFT OF SMILE TO ME!!!
बापू, आयुष्याचा संपूर्ण हिशेब मांडायचा झाला तर तुम्ही आणि आईने आनंदाचेच क्षण भरभरून आमच्या ओंजळीत टाकलेत. खटकणारे क्षण फारच कमी आहेत. पाण्याचा ग्लास भरलेलाच दिसतो; अर्धा रिकामा तुम्ही ठेवलाच नाहीत. तुम्ही मला माझ्या लग्नातला `घरचा आहेर’ दिलात त्यात म्हटलं होतं, `आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींचं जतन कर म्हणजे आयुष्यभर अशीच हसत राहशील.’ हे हास्य देणारे तुम्हीच तर आहात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #स्वाती चांदोरकर #SWATI CHANDORKAR #BIOGRAPHY #वपु #VAPU #SHESH #ANAHAT #YOUTHNESHIA #PAVITRAM #FORWARD&DELETE #GOLGOLRANI #KALAKBHINNA #HISDE #UTKHANAN #ANIVIKRAMADITYAHARALA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 24-02-2008

    वपुंचे परिणामकारक चित्रण... जनमानसावर आपल्या कथालेखनाने अधिराज्य करणारे लेखक व. पु. काळे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे वर्णन त्यांची कन्या स्वाती चांदोरकर यांनी आपल्या ‘वपु’ या पुस्तकात अतिशय हृद्य शब्दांत केले आहे. या पुस्तकाद्वारे आपल्या आई-वडिलंविषयीवाटणारी कृतज्ञताच जणू त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत लेखिका वपुंचा जीवनपट आपल्यापुढे उलगडत जाते. त्या अनुषंगाने वपुंचे आई-वडील, त्यांचं आजोळ, बालपण या साऱ्याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. वपु व्यवसायाने जरी आर्किटेक्ट असले, त्यांच्यात उपजतच अनेक कलागुण होते. ते आपल्या वडिलांसारखेच उत्तम चित्रकार होते. अगदी लहान वयातच कोणीही न शिकविता ते हार्मोनियम, फ्लूट वाजवायचे. अभिनयही छान करायचे. वपु उत्कृष्ट फोटोग्राफर होते. त्यांनी आपली ही आवड शेवटपर्यंत जोपासली आणि जपलीदेखील! स्वत:आधी दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्तीही त्यांच्यात जन्मजात होती. वाचकांना फारशा परिचित नसलेल्या या गुणांचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकामधून होते. ‘मध्यमवर्गीयांचे’ लेखक म्हणून वपुंना उदंड लोकप्रियता लाभली. त्यांनी माणसंही अमाप जोडली. त्यांच्या चाळीतल्या दीड खोलीच्या घरात कोणत्याही वेळी कोणताही पाहुणा आला तरी त्याचे आनंदानं स्वागत व्हायचे. माणसं जोडण्याच्या या व्यसनात त्यांना साथ होती ती वसुंधराबार्इंची. त्यांच्या लेखनाच्या त्या साक्षेपी टीकाकारही होत्या. सर्वार्थाने त्या वपुंच्या अर्धांगिनी शोभायच्या. वपुंवरील लिखाणाच्या ओघात आपल्या आईचे स्वभावचित्रणही चांदोरकरांनी भावपूर्ण शब्दात केले आहे. आई-वडिलांविषयीचे हळवेपण येथे ठायीठायी व्यक्त होताना दिसते. या चित्रणाच्या ओघात इतरही काही संबंधित व्यक्तींची स्वभावचित्रे लेखिकेने प्रभावीपणे रेखाटली आहेत. पण वडिलांवरील अतीव प्रेमामुळे, भक्तीमुळे कुठेतरी वपुंचे हे चित्रण एकांगी वाटते छायाचित्रं पुस्तकाची शोभा नक्कीच वाढवितात पण ती थोडी कमी असती तर बरं झालं असतं. लेखिकेवर असलेली वपुंच्या भाषेची छाप जाणवल्याशिवाय राहत नाही. एकंदरच एक प्रेमळ कर्तव्यदक्ष मुलगा, समजूतदार पति-सहचर, वत्सल पिता, सहृदय बंधू, लोकप्रिय लेखक, हरहुन्नरी कलाकार असं विविधांगी व्यक्तिमत्त्व असलेल्या आपल्या वडिलांचे परिणामकारक चित्रण ओघवत्या भाषेत करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. -स्वाती दामले ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 05-08-2007

    वपु : कन्येने रेखाटलेले भावचित्र... व. पु. काळे हे मराठीतील एक लोकप्रिय कथाकार. कथाकथनकार म्हणून ते अधिक प्रसिद्ध झाले. कथाकथनाच्या प्रयोगाला ‘उपयोजित कला’ (परफॉर्मिंग आर्ट) म्हणून त्यांनी मान्यता मिळवून दिली. देखणं व्यक्तिमत्त्व भाषाप्रभुत्व या दोनदेणग्यांबरोबरच त्यांना अनेक कला प्राप्त झाल्या होत्या. ते जानेमाने वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) होते. मुंबई महापालिकेतील त्यांची नोकरी याच विषयाशी संबंधित होती. त्यांनी आरेखित केलेल्या मुंबई महापालिकेच्या अनेक वास्तू आजही मुंबईच्या वैभवात भर घालत आहेत. असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या व. पु. काळे यांच्या साहित्यिक, कलामय आणि त्यापेक्षाही प्रापंचिक व्यक्तिमत्वाचा मागोवा त्यांची कन्या स्वाती चांदोरकर यांनी वपु या छोटेखानी पुस्तकात नेमकेपणानं घेतला आहे. रूढार्थाने हे चरित्र नाही तर प्रसिद्ध असलेली एक व्यक्ती वडील म्हणून किंवा इतर सांसारिक नात्यात कशी दिसली त्याचे हे ‘भावचित्र’ आहे. व. पु. काळे ही त्यांची संक्षिप्त ओळख व. पु. या आद्याक्षरांपेक्षा ‘वपु’ या एका नावानेच प्रचलित झाली. म्हणून पुस्तकालाही तेच शीर्षक दिले आहे. वपुंचे वडील पु. श्री. काळे हे जुन्या जमान्यातील नामवंत नाट्यचित्र नेपथ्यकार होते. कलेचा हा वारसा वपुंकडे आला. त्यांनी सुमारे चौतीस वर्षांपूर्वी आपल्या पिताश्रींचे चरित्र ‘सांगे वडिलांची कीर्ती’ या नावाने प्रसिद्ध केली. तोच वारसा पुढे नेत वपुंच्या कन्येने आपल्याही पित्याचे जीवनचित्र शब्दांतून रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रामाणिक म्हणण्याचे कारण, जवळच्या व्यक्तीबद्दल आणि त्यातही तिचे समाजात काही वेगळे स्थान असेल अशाबद्दल लिहिणे तसे अवघड असते. पण चांदोरकर यांनी प्रेम आणि तटस्थता प्रस्तुत पुस्तकात चांगल्या प्रकारे एकत्रित केली आहे. लेखिकेचे आजाबो, अण्णा (पु. श्री. काळे) सांगत असलेल्या एका छोट्याशा बोधकथेने पुस्तकाची सुरुवात होते. पुढच्या दहा पंधरा पृष्ठात आजोबा, आजी इतर माणसं, पुण्यातल्या ‘श्रम साफल्य’ बंगल्यातलं वास्तव्य, तिथल्या आठवणी, वपुंच्या लहानपणाच्या काही गोष्टी अशा स्वरुपात हे शब्दचित्र गती घेतं. अगदी थोडक्यात अनेक नाती या कॅन्व्हासवर शब्दांच्या माध्यमांतून उमटत राहतात. वपुंना मुलं बापू म्हणत, त्यामुळे पुढे बहुतेक उल्लेख त्याच नावानं होतो. त्याचं आर्किटेक्टरवरच शिक्षण मुंबईच्या जे. जे. मध्ये झालं आणि पुढचं सगळं आयुष्य ते ‘मुंबईकर’ म्हणूनच जगले. कुटुंबात वावरताना त्यांनी अगदी सहजतेने आपलं घर बहिणीला ‘भाऊबीज’ म्हणून देऊन टाकलं, असे त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे अनेक नमुने पुस्तकात जागोजागी आढळतात. नोकरी व्यवसायातूनच त्यांनी लेखन चालू ठेवलं आणि पुढे त्यातूनच कथाकथन जन्माला आलं. त्याबद्दल लेखिका लिहिते, ‘कथाकथन बापूंना जमलं. नुसतं जमलं नाही, तर त्यात ते बादशहाच झाले. कुठलीही गोष्ट असू दे. कधीही सांगू देत, बापू त्यातल्या पाचांची नावं कधीही विसरले नाहीत. तीस-चाळीस गोष्टी तरी बापू सांगत असतच. (पृष्ठ १७) हा स्मरणशक्ती प्रत्यक्ष भेटलेल्या माणसांच्या बाबतीत मात्र दगा देत असलेल्या नमूद करतात. पण ही स्मरणशक्ती हा त्यांच्या आईचा वारसा असल्याचेही त्या सांगून जातात. वपुंची पत्नी वसुंधरा, लेखिकेची आई, तिचंही व्यक्तिचित्रण यात येणं ओघात आलंच. पण जवळपास ते निम्म्यानं आलंय. अर्थात तेही आवश्यक आहे. पण पुस्तकाचं नाव वपु-वसुंधरा या अद्वैताच ‘वपुंधरा’ असं एकत्रित केलं असतं तर ते अधिक उठून दिसलं असतं. चाळीतल्या जीवनापासून नंतर सुस्थितीतील निवासस्थान असा प्रवास आणि त्यातील मध्यमवर्गीय गृहिणी म्हणून त्याचं स्थान, स्वभाव यांचं एक चांगलं चित्रण येतं. पती-पत्नीचं एकमेकांवरचे प्रेम आणि संसाराला समर्पित अशी भारतीय गृहिणी, मुलांवरच्या संस्काराचं महत्त्व अशा अनेक गोष्टी यात येतात. त्या लिहितात, ‘आई स्वत: एक कलाकार होती. ती गायची छान (पृ. ३७) त्यांना नाटकात काम करण्याची संधी मिळत होती. पण कुटुंबासाठी त्यांनी स्वत:हून ते नाकारलं. उत्तम समीक्षक म्हणून वसुंधरा याच वपुंच्या पहिल्या वाचक होत्या. त्यांनी इतरही अनेक नाट्परीक्षणं लिहिली; त्याचं ‘दहाव्या रांगेतून’ हे पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे. त्यामानानं त्या लवकर गेल्या. त्यांचे एक उद्गार विदारक चित्र उभं करतं. त्या वपुंना म्हणाल्या होत्या, आधी मी मेली तर सुटले. पण एक विनंती, घर माझ्या नावावर ठेवा. तुम्ही माझ्या आधी गेलात तर माझं आयुष्य त्या नटसम्राटासारखं भरकटू नये म्हणून (पृ. ३८) ही अनिश्चितता शब्दात पकडून स्वारी लिहितात, आईला विश्वास अविश्वासाचा प्रश्न भेडसावला नाही. हा प्रश्न निर्माण होण्याआधीच तिच्या जाणिवा लुप्त झाल्या आणि नंतर ती स्वत:च लुप्त झाली. (पृ. ३९) आईच्या मृत्यूचे वर्णन वाचताना माणसातली सहृदयता जागी होते. (पृ. ११८-११९) कुटुंबातल्या आई-वडिलांच्या बहिण भावंडांच्या इतर अनेक आप्तांच्या, स्नेह्यांच्या आठवणी या सर्वसाधारणपणे सर्वच मध्यम वर्गीयांच्या जीवनाप्रमाणे आहेत. पण अकृत्रिम, सहजसुंदर भाषाशैलीने त्या उठावदार झाल्या आहेत. वपु आणि वसुंधरा त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग इथे चित्रपटाप्रमाणे पुढे येतात. ह कालानुरूप नसले तरी पुस्तकाच्या चित्रमयतेला आणि वाचनीयतेला बाधा आणत नाहीत. वपुंच्या अनेक साहित्यिक मित्रांची आणि अन्य स्नेहींची शब्दचित्रेही अतिशय उत्कट उतरली आहेत. वपुंचा पत्रव्यवहारही मोठा होता. त्यातून जोडली गेलेली अनेक नाती आपल्याही परिचयाची होऊन जातात. त्यातला एखादा पेडणेकर असेल किंवा विजय लोटके. पण लक्षात राहतो, विक्रमसिंह धनंजय कुलकर्णी. ही सगळी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली पण सगळ्यांचा वीकपॉइंट वपु हाच! साहित्यिक पिढी ग. वा. बेहरे, पु. रा. बेहरे, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, अरविंद गोखले, विंदा करंदीकर इ. अनेकांच्या अनेक आठवणींमधून बऱ्याच गोष्टींचे संचित हाती येते. वसुंधराबार्इंचं आणि वपुंचं दोघांचंही निधन चटका लावणार होतं. ते हृदयस्पर्शी वर्णन वाचून मन हेलावतं. एक महिला डॉक्टर आणि तिचे पती हे दांपत्य वपुंचे स्नेही. काही कारणानं ते वपुंच्याकडे वास्तव्यास आले. वपुंना डॉक्टराचं वास्तव्य नको होतं असं लेखिकाला खूप उशिरा कळलं. हा प्रसंग मोघमपणे येतो. शेवटी इडली खाण्याची वपुंची इच्छा अपुरी राहिली. पण त्या डॉक्टरबार्इंनी त्या त्यांनीच आणलेल्या इडल्या त्यांच्या मृत्यूनंतर लगेच खाल्या. त्या बाईबद्दलची भावनाही तशा सौम्य शब्दात करताना स्वाती चांदोरकर म्हणतात. संकटसमयी तुम्हाला (वपु) एकटं करणाऱ्या डॉक्टरांना आम्ही नाही मान्य करू शकलो. त्या इडल्या डॉक्टर खाऊ शकल्या असतील. पण आम्ही कुणीच नाही खाऊ शकलो. तुमची इडली खायची इच्छा होती आणि तुम्ही न खाता तसेच गेलात. मग आम्ही कशी खाणार होतो. आता तर आयुष्यभर इडली म्हटलं की. (पृ. १३२) पुस्तकाचा शेवट गंभीर होते. लेखिकेनं आपल्या वडिलांची अनेक वैशिष्ट्य भावना शैलीत सांगितली आहे. अनेक ना विणलं गेलेलं वपुंचं जीवनवस्त्र, पोते किती अस्सल होता हे पुस्तकामुळे समजतं. काही ठिकाणी चुकीची विराम चिन्हं वगळता, पुस्तकाची मांडणी प्रगटीकरण वेधक आहे. पुस्तक १६।।१६।। सेंमी. हा आकार आणि आतली कागदावरची पण् सुंदर कृष्णधवल छायाचित्रे पुस्तकाच्या आकर्षक भर घालतात. वपुंचं विविधा उत्तम शैलीत लिहिणाऱ्या चांदोरकरांकडून लिखाणाची आर्तता वाढवणारं हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 19-04-1991

    वपु पाहता पाहता या माणसानं अर्धशतक पार केलयं. पहिल्या काही दशकांच्या वेळेचा काळ बिकट होता. एकेक वर्ष-धाव उरकणं हे कष्टाचं-जिकीरीचं-काम ठरलं असलं पाहिजे. वडील फार मोठे कलावंत. त्यांनी रंगवलेल्या पडद्याच्या दर्शनानंच लोक टाळ्यांचा कडकडाट करायचे. प्रसिदध कलादिग्दर्शक नुसते नाटकातलेच नव्हे, तर राजकमलच्या उत्कृष्ट बोलपटातले सेट्स शांताराम बापूंसारख्या बोलपट दिग्दर्शक-निर्मात्याच्या चोखंदळ दृष्टीला पसंत पडतील असे बनवणं म्हणजे एक बिकट कामगिरी होती, पण तीही त्यांनी पार पाडली. पण कला-जगातलं यश त्याकाळी तरी प्रचंड आर्थिक यशाचं यमक नव्हतं. दिवसभर स्टुडिओत राबायचं व रात्री नाटकातले पडदे आणि सेट्स तयार करायचे. हे सारं आटोपून पु. श्री. काळे यांना रोज पुण्याला मुंबईहून जाणं आणि परतणं शक्यचं नव्हतं. परिणामी मुलानां पितृछायेची आल्हादता रोज लाभणं शक्यच नव्हतं. मुलांना स्वत:च्या विकासाकरिता स्वत:वरच अवलंबून राहणं आलं. यशाच्या पायऱ्या, बाल-स्थितीत चढायला, गुणी आणि वत्सल असलेल्या पित्श्सख्स आधार लाभणं परिस्थितीनंच अशक्य करुन टाकलं होतं. एक-एक वर्ष धाव म्हणूनच जमेला धरणं ही प्रत्येक वेळीच एक परीक्षाच होती- स्वत:च्या नुसत्या कठीण प्रयत्नांचीच नव्हे, तर पुढच्या कामगिरीबाबतच्या दूरदृष्टीची स्वतंत्र प्रज्ञेची, कल्पकशक्ती आणि मुख्य म्हणजे धीराचीही! या साऱ्या काळात बाकी या मुलाला खूप काही शिकवलं असलं पाहिजे. स्वकष्टानं विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अमाप अनुभव येतात, फक्त त्याचं अवलोकन डोळस हवं! इथे या मुलाला आणखी एक लाभ होता-- प्रतिभेचा! त्यामुळेच मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एकक अनुभवात या लेखकाला कथाबीज दिसलं. साधारणत: फसली आहे, अशी एकही कथा वपूंची आपल्याला दिसत नाही. प्रत्येक कथा एकदम वाहवा घेते. मला फॅण्टसी या वेगळ्या स्वरूपात त्यांनी लिहिलेल्या कथा म्हणा- मद्य काव्य म्हणा- फारसं आवडलं नाही; पण ही माझी दृष्टी झाली. इतरांना त्या खूपच आवडल्या. जे वातावरण माहितीच नाही, त्या वातावरणावर उगीच पाडायची म्हणून कथा वपूंनी पाडली असे दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण जीवन, मजूर-शेतकऱ्याचं जीवन, दलितांचं करुण-भयाण परिस्थितीच जीवन, यावर वपुंनी कथा लिहिलेल्या दिसत नाहीत. शहरी- त्यातही मुंबई-पुण्यातल्या- मध्यमवर्गीय कुटुंब-जीवनातल्या गुंतागुंती, त्यांचं भावविश्व, त्यांचे हर्ष-विमर्ष यावरच्या त्यांच्या कथा बघून घ्या! एकेक कथा म्हणजे आनंद देणारी सुबक कलाकृतीच. आणि वाचकांचंही वपूंना किती प्रेम लाभावं? एका तरुणानं वपूंची ‘पार्टनर’ ही कादंबरी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात संपूर्ण लिहून देऊन त्यांना अर्पण केली! कथा खूप जण चांगल्याही लिहितात, त्या वाचवतात; पण त्या कथा त्याच लेखक/लेखिकांना सांगायची वेळ आली, की भट्टी फसते! त्याच कथा त्यांच्याच निर्मात्याकडुन ऐकणं म्हणजे एक शिक्षाच वाटू लागते. चुळबुळ करत श्रोते ऐकतात आणि त्यांच्या सहनशीलतेचं कथानिवेदक जणू अंतच बघतो. कथा-कथन ऐकावं ते वपुंचंच. अशी कीर्ती या माणसानं मिळवली. मुळात कथा आहे, त्यापेक्षा सुंदर वाटले ती त्यांच्याच तोंडून ऐकताना. त्या कथेच्या डौलदार, देखण्या वृक्षातल्या टवटवीत पालवीची वेगवेगळी देखणी रुप आपली नजर हलू देत नाहीत! मला पुष्कळदा वाटतं, वपू जणू कथा जगतातच. मोठ्या कलावंताचं हे लक्षण नाही काय? स्वत:च्या कलाप्रकाराच्या समाधीत तो सदैव मग्न असतो. अल्लारखाँवरची डॉक्युमेंटरी आठवते? कारमध्ये बसून मानेवर हाताचे पंजे ठेवून जाणाऱ्या या तबलानवाजाचं पाठमोरं चित्रीकरण केलंय. त्याची बोटं सारखी वळवळत असतात. वाटतं एक एक तबल्याचा न ऐकू येणारा बोल ऐकून घ्या! श्री. जितेंद्र अभिषेकी सतत गायनाच्या धुंदीत विचारमग्न दिसतात. वपुंबरोबर तुम्ही फिरा, काही वेळ घालवा. तेवढ्यात वपूंकडून तुम्हाला सुंदर कथा ऐकायला मिळेल. वपु काळे मोठा कथा-लेखक, पण हा माणूस फार भाव खातो. ते फारच पैसे घेतात. ते फार लहरी आहेत. इ. वपूंबद्दल मी खूप ऐकलं आहे. ‘स्वत:च्या कथांशिवाय ते दुसऱ्या कुणाची कथा ऐकायलाच तयार नाहीत’ हेही ऐकलं! पण असं बोलणाऱ्यांना मी सांगतो, मला स्वत:ला असा मुळीच अनुभव नाही. आता दुसरं पैसे घेण्याबद्दल. आज त्यांच्या कलाकृतीला मागणी आहे. त्यांनी मोबदला ठरवावा. ऐन हिवाळ्यात चार आणे किलो मिळणाऱ्या टोमॅटोला तुम्ही एका काळी चार रुपये दरही देता की नाही? ही तर साधी भाजीची गोष्ट झाली. उद्या भीमसेन वृद्धत्वामुळे त्याच दमानं गाऊ शकले नाहीत, तर त्याचं गतवैभव आठवून तुम्ही त्यांना आदरानं बोलवाल काय? त्यांना घसघशीत मानधन द्याल काय? आज गान तपस्विनी बसलेल्या, हिराबार्इंना तुम्ही मुद्दाम बोलावता काय? हा तर व्यवहार आहे. आज वपू शेकड्यानं मानधन अपेक्षित असतील, पण हा माणूस माणुसकी सोडून वागल्याचं मला तरी दिसलं नाही. अगदी गतवर्षी आमच्या विद्यार्थिनींना, तयांनी कसलीही अपेक्षा न ठेवता, सुंदर कथा सांगितल्या. तुमचा स्वत:चा प्रत्यक्ष अनुभव सांगा म्हटलं की, मग कुणीच बोलत नसतं! आपल्या नागपूरच्या सौ.सुनीती आफळेंच्या कथाकथनाला त्यांनी दाद दिलेली मी स्वत:च बघितलीय. आणि बाराव्या वर्गात शिकणाऱ्या मुग्धा चिटणीस या उदयोन्मुख कथानिवेदिकेला वपूंनी मार्गदर्शन केलंय्, हेही मला माहिती आहेच. पु. भा. भाव्यांची एक कथा ‘नादान’, वपूंनीच तिच्याकडून उत्तम बसवून घेतल्याचं मी ऐकलं आहे. तर असा हा कलाप्रेमी, कथाच जगणारा मस्त, रसिक, मजेत केशरी अबोली रंगाची गाजरं खात रस्त्यानं भटकण्याची खोटी लाजमुक्त न मानणारा फक्कड माणूस, त्याचं अक्षर मोत्यासारखं. कंपोझिटरला तर अक्षर-मोत्यांनी मढवलेला त्याचा कागद हाती घेताना संकाच वाटत असेल! संगीताचा हा दर्दी. त्याचं घरकूल म्हणजे एक देखणा सेटच जणू! असो. २५ मार्चला वपुंनी पन्नाशी ओलांडली. आज ते नागपुरात आहेत. त्यानिमित्तानं ही दोस्ताची आठवण. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.