* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CELEBRATION
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667837
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NA
निसर्गाने दिलेला आनंद आणि निसर्गानेच दिलेलं संकट, नक्की महत्त्वाचं काय? खरं तर काहीच नाही. ‘निसर्ग’ एकमेव महत्त्वाचा. या निसर्गाच्या साक्षीने पृथ्वीवर अखंड न संपणारं नाटक चालू आहे. ह्या नाटकाच्या रंगभूमीवर वावरणारा प्रत्येकजण कलाकार आहे. ह्या कलाकारांच्या वेगवेगळ्या भूमिका म्हणजे माणसांच्या वृत्ति आणि प्रवृत्ति. प्रत्येक कलाकार प्रत्येक वृत्तीची भूमिका निभावतो. त्या वृत्तींच्याच ह्या गोष्टी. त्या कुणा एखाद्या व्यक्तीवर नाहीत. वृत्ती परिचयाच्या असतात, म्हणून गोष्टी आपल्याशा वाटतात. ह्या रंगभूमीवर प्रत्येक कलाकार निसर्गाने दिलेल्या संकटातून बाहेर पडून आनंदाच्या शोधात दिवस-रात्र फिरत असतो. आनंद नाही गवसला तर नैराश्य आणि गवसलाच तर त्या तेवढ्या काळापुरतं ‘सेलिब्रेशन.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 19-08-2007

    स्वाती चांदोरकर या तरुण, कल्पक, मानवी मनाच्या इंद्रधनुषी भावोत्कटतेप्रमाणे हळव्या, दुखऱ्या सलांना अलगद स्पर्श करणारी उत्तम कथनकार लेखिका, ख्यातनाम साहित्यिक कै. व. पु. काळे यांच्या या कन्यकेच्या कथा आणि मांडणी, शब्दांचा व कथनशैलीचा ढंग एकदम व. पु. ढंाचा. व. पु. आहेत आणि अजूनही स्वातीच्या लेखणीतून बोलत आहेत- निरखत आहेत- टिपण्या करीत हसवत तर कधी हळवे करून सोडत आहेत असंच जाणवत राहावे अशा या बारा कथांचा सेलिब्रेशन हा स्वातीचा दुसरा कथासंग्रह. तिचा गोल गोल राणी या पहिल्या कथासंग्रहाचे पाऊल ठरणारा. लेखक, वाचक, वृत्ती प्रवृत्ती, अंगाई, जिंदाबाद, रंगभूमी, बी हॅपी, जोशी, कुरकुरे, लालसा, स्मॉल स्केल बिझिनेस फ्रॉम रेसिडन्स, पाऊसपाणी, सेलिब्रेशन, भातुकलीचा खेळ अशा स्वाती चांदोरकरने लिहिलेल्या या कथासंग्रहातील बाराही कथा संवाद प्रधान आणि नाट्यपूर्ण आहेत. मानवी वृत्ती आणि प्रवृत्ती जाणवत ठेवणाऱ्या या कथा रंगभूमीवर किंवा रजतपटावर शोभाव्यात अशा भावोत्कट प्रसंगाबरोबरच जीवनातील नैराश्याची गडदता आणि आनंदोत्साहाच्या सेलिब्रेशनची आनंदमयी कोवळीक जाणवत सुखावणाऱ्या आहेत. खुदकन् हसवणारी गंमत, कौटुंबिक जिव्हाळा, आत्मगौरव - स्वाभिमान - तडजोड - समंजसपणाच्या जोडीने दुखावलेल्या अहंकार - हटवाद - या सगळ्या ओळखीच्या स्वभाव वैशिष्ट्याच्या तटस्थ तरीही आत्मीयता लपून राहत नाही अशा समरसतेने नेमक्या शब्दात केलेले व्यक्तिमत्त्व रेखाटन स्वातीच्या मनोज्ञ कल्पना चातुर्याइतकेच कुशल लेखनप्रभुतेची साक्ष पटवणारे आहे. वाजवी किंमत, उत्तम छपाई, बोलके मुखपृष्ठ ‘सेलिब्रेशन’ पाहताच उचलून घ्यावे असेच वाटायला लावणारी आणखी एक जमेची बाजू! -ललिता बापट ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more