* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RANGANDHALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669497
  • Edition : 7
  • Publishing Year : OCTOBER 1977
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL OF A SUDDEN, HE GOT UP IN THE MIDDLE OF THE NIGHT AS HE HEARD SOME PROMINENT SOUND AS IF SOME GLASS BROKE SOMEWHERE. HE SEARCHED THE ROOM TO FIND THE ORIGIN OF THE SOUND. WHEN HE REALISED THAT THE SOUND WAS OF THE DOOR BOLT, HE WAS SHOCKED. HE REMEMBERED THAT HE HAD BOLTED THE DOOR SECURELY BUT NOW THE BOLT HAD COME OFF AUTOMATICALLY. THE DOOR STARTED OPENING SLOWLY, AGAIN AUTOMATICALLY. JAGANNATH WAS CONFINED TO THE PLACE WHERE HE WAS, THERE WAS A VERY OLD MAN STANDING AT THE DOOR. HE WAS TOTALLY BALD, NOT EVEN A SINGLE HAIR ON HIS ABNORMALLY LONG HEAD. HIS FACE WAS OVER WRINKLED. THE HIGH CHEEK BONES WERE VERY PROMINENT. HIS BODY RESEMBLED A SKELETON. BUT HIS EYES, THEY WERE SPARKLING AS IF LIKE FIRE. THE OLD MAN LOOKED INTENTLY AT JAGANNATH. JAGANNATH SCREAMED LOUDLY, BUT TO HIS SURPRISE NO VOICE CAME OUT. THE OLD MAN GESTURED HIM TO FOLLOW HIM. JAGANNATH STARTED WALKING. HE DID NOT WANT TO BUT HE HAD LOST ALL CONTROL OVER HIS WILL POWER. HE WANTED TO GATHER ALL HIS STRENGTH, HE WANTED TO RUN AWAY, BUT HIS LEGS WERE NOT OBEYING HIS MIND. WHERE WERE THE TWO LEADING? RATNAKAR MATKARI TAKES HIS READERS TO A NOVEL PLACE, TOTALLY DIFFERENT FROM THE USUAL SIGHTS; HE TAKES THEM TO AN UNKNOWN DESTINATION; TO A FEARSOME, MYSTIC, ANONYMOUS LAND. THE READERS ARE EQUALLY THRILLED. THEY KEEP ON READING PAGE AFTER PAGE HAUNTINGLY.THE STORIES HERE WILL SURELY HYPNOTIZE THE YOUNG READERS.
मध्यरात्री त्याला अचानक जाग आली, ती कसल्यातरी ‘खळ्ळ्’ आवाजाने. अंधारातच त्याने खोलीभर नजर फिरवली. आणि एक गोष्ट लक्षात येऊन, त्याच्या छातीत धस्स झाले! आवाज झाला होता, तो दरवाजाच्या कडीचा. त्याने पक्की लावलेली कडी आपोआप निघाली होती. —आणि दार सावकाश उघडू लागले होते.... जागच्या जागी खिळल्यासारखा, जगन्नाथ ते दृश्य पाहत राहिला. दारात एक जख्ख म्हातारा उभा होता. बोडका. लांबुडक्या डोक्याला तुळतुळीत टक्कल पडलेले, चेहरा सुरकुत्यांनी मढलेला. गालाची हाडे वर आलेली, आणि अस्थिपंजर शरीर. डोळे मात्र निखाऱ्यासारखे चमकत होते. नजर जगन्नाथवर रोखलेली होती. जगन्नाथने किंकाळी मारली, पण ती ओठातून बाहेर फुटलीच नाही. त्या बोडक्या म्हातायाने त्याला आपल्याबरोबर चलण्याची खूण केली. जगन्नाथ चालू लागला. खरेतर त्याला जायचे नव्हते, पण स्वत:च्या इच्छाशक्तीवर जणू त्याचा ताबाच राहिलेला नव्हता. ....सर्व शक्ती एकवटून तिथून पळून जावे, असे वाटत होते, पण मनाचे सांगणे पाय मानत नव्हते. कुठे निघाले होते ते दोघे? अगदी नेहमीच्या वास्तवातून रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका अद्भुत प्रदेशात घेऊन जातात. गूढ, भयप्रद, अनामिक. त्यांचे बोट धरून वाचक झपाटल्यासारखा पानांमागून पाने उलटत जातो... तरुण मनाच्या वाचकांना संमोहित करणाया, मतकरींच्या वैशिष्ट्यपूर्ण आगळ्यावेगळ्या गूढकथांचा संग्रह.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#रंगांधळा #रत्नाकरमतकरी #कथासंग्रह #वारस #पुलावरचामाणूस #बाकीराहिलाकाळोख #चिखल #हातमोजे #हेड-स्टडी #दोन मुलं #तळ्याकाठचीहिरवळ #झुंबर #म्हातारीचीतरुणमुलगी #इंटरव्ह्य #वशीकरण #जळमटं #तडागेलेलीकाच #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #RANGANDHALA #RATNAKARMATKARI #VARAS #PULAVARACHAMANUS #BAKIRAHILAKALOKH #CHIKHAL #TIDONMUL #ZUMBAR #JALMAT #TADAGELELIKACH #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    थरारक गूढकथा… रत्नाकर मतकरी यांनी गूढकथा लेखनात वेगवेगळे प्रयोग केले. वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या. गूढकथा हा लेखन प्रकार घाऊक लेखनाचा नाही; त्यातील कल्पना साचेबंद होता कामा नयेत. त्यात प्रत्येक वेळी काहीतरी नावीन्य हवे याबद्दल ते जागरुक आहेत. मतकरंच्या या कथांमध्ये अतींर्दिय पातळीवरचे वैशिष्टपूर्ण अनुभव येतात. एखाद्या व्यक्तीच्या अकाली व अपघाती मृत्यूनंतर तिच्या अतृप्त इच्छापूर्तीसाठी वा आधीच्या जन्मातील हिशेब वा सूड पूर्ण करण्यासाठी कोणातरी व्यक्तीच्याद्वारे पुन्हा अस्तित्व जाणवणे हा प्रकार मतकरींना बराच विश्वासार्ह वाटत असावा. त्याची वेगवेगळी रूपे त्यांनी अनेक कथांमध्ये दाखवलेली आहेत. ‘रंगांधळा’ मधील आरंभीचीच रंगांधळा हा कथा एका चित्रकाराच्या जीवनावर आहे. रंगनाथ महिंद्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मॉडर्न शैलीतला रंगाशी ताकदीने खेळणारा चित्रकार. त्याच्या चित्रांबद्दल आकर्षण असाणाऱ्या विज्ञानाची प्रध्यापिका असाणाऱ्या तरुणीला वाटते की त्याच्या चित्रातल्या रंगामध्ये एक जिवंतपणा आहे. चित्रात त्या रंगांना एक अपूर्व तेज चढल्यासारखे दिसायचे. त्या रंगांचे एकमेकांशी काही नाते आहे, त्यांची भाषा एकमेकांना समजते आहे. कॅनव्हासवर हा चित्रकार नुसते रंग चोपडीत नाही तर तो रंगांची एक नवी सुष्टी निर्माण करतो आहे असे तिच्या लक्षात येते. त्याच्या लँडस्कोपमध्ये देऊळ, झाड, पाणी, डोंगर यांच्याऐवजी नुसते रंग असत. ‘तुमची चित्रं मला आवडतात पण समजतात असं नाही. ती दृष्टीच मला नाही.’ तेव्हा रंगनाथ तिला आपल्या कलेचे एक गुपित सांगतो. ‘तू हुशार आहेस. मी काही सांगितलं तर ते तुला समजेल... कुणाकडे तरी बोलावे असं खूप वाटायचं, पण ते समजू शकेल असं माणूसचं भेटलं नाही. तुला सांगायचं होतं की मी नॉर्मल नाही. माझे डोळे नॉर्मल नाहीत. इतरांना नसलेली एक चमत्करीक दृष्टी त्यात आहे. मला रंग दिसतात. इतरांना दिसतात तेवढेच नाहीत. तर फार वेगळे, फार मोठ्या प्रमाणावर दिसतात.... हे हलत असतात; श्वासोच्छ्वास करीत असतात. जिवंत असतात. नेहमीच्या जगातले रंग रेषांनी बांधलेले असतात. माझ्या चित्रातले रंग रेषांची बंधने सोडून बाहेर पडतात. मला रेषांनी बांधलेल्या वस्तूंची चित्रं काढता येत नाहीत. रेषा पुसट झाल्या आणि रंगांनीच माझा ताबा घेतला. आणि तेव्हाच मॉर्डन आर्टिस्ट म्हणून माझा लौकिक वाढू लागला. आता मला रंगांवाचून वेगळं मीपण राहिललं नाही. आंधळ्याला काळोख दिसावा, तसा मला रंगाचा स्वत:भोवती पूर आलेला दिसतो. नुसते रंगच मला दिसतात. रेषा कमीत कमी दिसतात. एक प्रकारचा आंधळेपणा म्हणा हा! नुसती चित्रं काढतानाच नव्हे, एरव्हीसुद्धा मला रंगांखेरीज दुसरं काही दिसत नाही. कधी हर्ष होतो कधी भीती वाटते. काय होईल माझं? मी कदाचित रंगांधळा होईल. काही बरंवाईट तू मला आवडतेस. मला समजेल असं वाटतंय म्हणून हे सर्व मी तुला सांगतो आहे. ...लँडस्केप पेंटिंगसाठी रंगनाथ तिला बरोबर घेऊन एका पहाडावर जातो. आकाशात मावळतीच्या वेळी सोनेरी छटा आवरतात. हे बघ लखलखत्या ज्वाला पाऊस, निळा सोनरी पाऊस, गोल्डन ब्ल्यू... धीस इज लाइफ, धीस इज ब्यूटी... करीत तो म्हणतो, ‘मी चाललो! रंगांकडे चाललो’ आणि कड्याच्या टोकावरून पुढे जात राहतो. दुसऱ्या दिवशी खालच्या दरीत त्याचे प्रेत मिळते. छिन्नविच्छिन्न देह. रक्ताचा शिडकावा होऊन लालकाळे पडलेले दगड... ....उजेडात रक्ताने माखलेले ते दगड बघताना तिला विचित्र अनुभव येतो. दगडावरचे वाळलेले ते काळे रक्त पुन्हा लाल होत आहे. आपल्या रोखाने रंगांची लाट चालून येत आहे असे तिला जाणवते. ती बेशुद्ध पडते. ...रात्री तिला आवाज येतो. ‘तू ऐकते आहे ना? इथं दाट काळोख आहे. मी त्या गुदमरतोय. मला रंग हवे आहेत. ‘मी तुझ्या नजरेतून आता रंग पाहीन.... आपल्यात एक नातं आहे. मला रंग पाहू देत. तुझ्या नजरेतून..’ ती घाबरून किंचाळते, ‘नाही नाही... आपल्यात कसलंही नात नाही. तू येऊ नकोस. काळोखातून परत येऊ नकोस.’ ...पण तिला कळून चुकते, तो आपल्या नजरेत आला आहे. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला जाते. सर्वत्र रंगच रंग तिला जाणवतात. ती गॉगल घालते तरी रंग गर्दी करतात. ‘मी आलो आहे. असा आवाज येत राहतो. तो आता जाणार नाही. तो आपल्या डोळ्यात कायमचा राहणार. आपण रंगांधळी होणार रंगाची गुलाम होऊन सारे आयुष्य घालवावे लागणार. ती कॉलेजच्या प्रयोगशाळेत जाते. सारे धैर्य एकवटून डोळ्यात अ‍ॅसिडचे थेंब टाकते. तिची दृष्टी जाते. रंगांच्या त्या लाटांपासून दूर होते. नित्य काळोख तिला सुखाचा वाटतो. ‘या काळोखात रंगनाथाचा आत्मा तडफडत असेल, पण माझ्या डोळ्यांची दारे त्याला बंद केली आहेत.’ असे ती म्हणते. आता ही तिची कहाणी डेड एन्डला येऊन पोहचली आहे असे वाचक म्हणून आपल्याला वाटते. पण नाही. ही कहाणी इथे संपत नाही. एका पार्टीत ही दृष्टीहीन, गॉगल लावलेली तरुणी बघून कोणातरी तरुणाला तिच्याजवळ जावेसे वाटते. त्याला आपल्याबद्दल वाटणारे कुतूहूल तिला जाणवते; आणि आपली ही कहाणी त्याला सांगते. ती कहाणी ऐकल्यावर आपल्यात व तिच्यात एक नवे नाते निर्माण झाले आहे, असे त्याला वाटते. पार्टीहून घरी पोहचल्यावर तो दार उघडतो. खोलीत काळोख नसतो. संबंध खोली निळ्याजांभळ्या रंगांनी झगमगत आहे, असे त्याला दिसते. मतकरी यांनी या कथेला शेवटी दिलेले हे वळण त्यांच्या गूढकथाकारांच्या प्रतिभेची खरी कमाल दाखवते. त्या तरुणीने रंगनाथच्या डोळ्यांना आपल्या डोळ्यातून बघण्यास मज्जाव केला खरा, पण तिच्याच माध्यमातून नवपरिचित तरुणाच्या डोळ्यांचा ताबा घेऊन रंगनाथ आपले अस्तित्व सिद्ध करायला सज्ज झाला होता! रत्नाकर मतकरी यांच्या अत्यंत नावजलेल्या गूढकथामंध्ये ‘रंगांधळा’ गणली जाते. तिची केंद्रीभूत कल्पना खरोखरच नावीन्यपूर्ण आणि चमत्कृतीपूर्ण आहे. वाचकांना शेवटी आणखी एक धक्का देणारी मतकरींचा मास्टर स्ट्रोक या कथेची परिणामकारकता वाढतो. रंगांशी निगडित असणाऱ्या परिचित संवेदनेला मतकरींनी उलटेपालटे करून, ‘रंगाच्या अभावाऐवजी रंगांच्या अतिरंजित जाणिवेचे परिणाम दिले आहे; त्यामुळे चित्रकाराच्या चित्रांवर पडलल्या प्रभावाचे स्वरूपही दाखवले आहे. रंगाचा हा मुक्तसंचार बघणारे रंगनाथचे डोळे, ते त्याच्या मृत्यूनेही बंद होत नाहीत. अतृप्त आत्म्याने आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस संचार करावा त्याप्रमाणे रंगनाथचे हे डोळे त्या तरुणीच्या डोळ्यांचा उपयोग करू पाहतात; तिने ते डोळे निकामी करून घेतल्यावर तिच्यात रस घेणाऱ्या अन्य तरुणाचा ताबा ते घेऊन टाकतात. असा आपल्या पारंपारिक कल्पनेचा वेगळा अविष्कार या कथेत दिसतो. चित्रकाराला दिसणाऱ्या रंगांच्या अचाट वैभवाची चुणूक रंगनाथच्या संवदेनक्षमतेद्वारे मतकरी लक्षात आणून देतात. एखादी कल्पना चौफेर फुलवण्याची,निसर्ग-व्यक्तीरेखा कलाविशेष- भावाविष्कार- भाषविशेष अशा विविध घटकांचे एकजीव रसायन साधण्याची मतकरींची करामत वाचकांना मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी ठरतो. तिच्या अंधत्वाची कल्पना असूनही तो जेव्हा तिच्याजवळ जातो तेव्हा ती त्याला विचारते, ‘तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? नसेल तर नको करू. प्रेमात माणूस फसतं. इतकी सुंदर वाटणारी आणि इतकी डेड्ली गोष्ट जगात दुसरी नसेल. नाही आणखी एक गोष्ट जगात आहे. रंग.. कथा वस्तूत रंग भरायलाही अशी विधाने केली जातात असे वाचकाला वाटते, पण या रंगांचे वेगळे जे अस्तित्व नंतर जाणवते त्यामुळे अशा विधानातले खरे रहस्य पुढे लक्षात येते....‘आयरनी’चे दैवदुर्विलासाचे हे प्रलयकारी दर्शन असते. या संग्रहातील ती दोन मुलं, चिखल, पुलावरचा माणूस, झुंबर कथांमध्येही अशाच कल्पना वापरलेल्या आहेत. उत्कंठावर्धक निवेदनशैलीमुळे आणि थरारक कथा कल्पनांमुळे या गूढकथा वाचकांना गुंतवून ठेवतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more