* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KABANDH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665611
  • Edition : 10
  • Publishing Year : NOVEMBER 1975
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS A MYSTERY? IT IS STORY BASED ON A MYSTIC ASPECT OF LIFE. DEATH IS A MYSTERY. WHAT REALLY HAPPENS AT THE TIME OF DEATH? NO ONE COULD EVER ANSWER THIS QUESTION SO FAR. SCIENCE HAS SO FAR SUCCEEDED IN PUTTING FORTH A THEORY FOR THE DESTRUCTION OF THE HUMAN BODY. BUT HUMAN IS NOT ONLY THE BODY, IT IS THE MIND WITHIN, THE SOUL WITHIN, IT HAS FEELINGS, LUST… DO THEY EXTINCT WITH DEATH? OR DO THEY LINGER IN THE UNIVERSE? NO ONE HAS BEEN SUCCESSFUL IN ANSWERING THESE QUESTIONS. THE COMMON PEOPLE ARE ALWAYS ATTRACTED TOWARDS THE DARK SECRET OF LIFE. YET, HOW FAR TRUE IT IS FROM THE SCIENTIFIC POINT OF VIEW? IT IS AGAIN BEYOND ARGUMENTS. IN GENERAL, THE STORIES BASED ON FACTS ARE CONSIDERED TO BE ARTISTIC WHILE THOSE BASED ON MYSTERY ARE SUPPOSED TO BE WITHOUT ANY ARTISTIC VALUE. MATKARI`S MYSTERIES HAVE PROVEN THIS CONSIDERATION WRONG. HE HAS INCREDIBLE STYLE AS A WRITER AND PRODUCES IT WITH AN EARNEST ZEAL, HE FEATURES THE CHARACTERS PERFECTLY WELL, THE THEME IS CAPTIVATING, AND THE AMBIENCE IS SO TRUE THAT WE LIVE IN IT. OF COURSE, THIS IS ALL PHILOSOPHICAL DISCUSSION, BUT PEOPLE WHO DO NOT BELIEVE IN SUPERNATURAL POWERS ALSO HAVE FOUND THEMSELVES ENGROSSED IN THESE STORIES FROM STARTING TO END.
गूढकथा म्हणजे काय? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळया गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले, परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का? याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या सर्व गूढतेचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. परंतु विज्ञानाच्या दृष्टीने या विषयात कितीसे तथ्य असते हा विवाद्य विषय आहे. त्यामुळे वास्तववादी कथा म्हणजे कलात्मक कथा आणि गूढकथा या कलाशून्य असे ढोबळ समीकरण बेतले गेले आहे. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी हे समीकरण चुकीचे ठरवले आहे. उत्तम गूढकथांमध्ये चांगले व्यक्तिचित्रण, मनाची पकड घेणा-या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरणनिर्मिती, या सा-यांची एक स्वतंत्र आकर्षक शैली रहस्य निर्माण करणा-याकडे असावी लागते. आणि ही सर्व वैशिष्ट्ये रत्नाकर मतकरी यांच्या लेखनात असल्याचे वाचकांनीच मान्य केलेले आहे. अर्थात हे सगळे तात्त्विक चिंतन झाले. पण ज्याचा कुठल्याही गूढप्रकारावर विश्वास नाही, अशा माणसालाही हे पुस्तक सबंध वाचावेसे वाटेल एवढी खात्री नक्कीच आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    गूढकथा आणि मतकरी यांचे नाते अतूट आहे . गूढकथा म्हटल्या की रत्नाकर मतकरीच डोळ्यासमोर येतात.आयुष्याच्या एखाद्या मुलखावेगळ्या पैलू विषयी लिहिलेली कथा म्हणजे गूढकथा .यात त्यांच्या बारा गूढकथा आहेत . सर्वच कथा वाचनीय आहेत . यात माझ्या आवडीची सुप्रसिद्ध द्ष्टा ही कथा आहे.काही वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या एका मालिकेत द्रष्टा कथा दाखविली होती . दिलीप कुलकर्णी आणि दिलीप कोल्हटकर यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या . ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 12-06-2005

    विविध पातळीवरील गूढानुभव देणारा कथासंग्रह... ‘कबंध’ हा यशस्वी गूढकथा लेखक रत्नाकर मतकरी यांचा कथासंग्रह. मतकरींनी गेली पन्नास वर्षे अशा गूढकथांचे लेखन केले आहे. त्यांचे खेकडा, निजधाम, मृत्युंजयी, फाशी बखळपासून बारा-पस्तीस या संग्रहापर्यंत पंधरा एक कासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील काहींना राज्यपुरस्कार मिळाले आहेत. मतकरी हे एक चतुरस्र साहित्यिक व कलावंत आहेत. त्यांनी कादंबरी, नाटक, एकांकिका, बालनाट्य, ललित निबंध असे विविध प्रकारचे लेखन केले आहे. गूढकथेच्या क्षेत्रात सर्वाधिक महत्त्वाची कामगिरी त्यांचीच आहे. मराठीतील गूढकथा निर्मितीमागे देखील इंग्रजी साहित्याचा संस्कार व प्रेरणा आहे. एडगर अ‍ॅलन पो आणि नॅथानिएल हॅथार्न यांनी दोनशे वर्षांपूर्वी भूतकथा लिहिल्या आणि ‘गूढकथा’ वाचकप्रिय केली. ब्रॅम स्टोकरची ‘ड्रॅक्युला’ ही कादंबरी जगात प्रसिद्ध आहे. डिकेन्सपासून पर्लबकसारख्या साहित्यिकांनी दर्जेदार गूढकथा लिहिल्या आहेत. मराठीत द. पा. खांबेटे यांनी गूढकथा विशेषत: भयकथा लिहिल्या. त्यानंतर प. ग. सुर्वे, ग. रा. टिकेकर आदी काही लेखकांनी ‘हंस’ व ‘नवल’ मध्ये असे लेखन केले. जी. ए. कुलकर्णी यांनी अंजन, लक्ष्मी, निरोप, राक्षस, स्वामी आदी गूढकथा लिहिल्या आहेत. नारायण धारप यांनीही मतकरींच्या बरोबरीने गूढकथा सातत्याने लिहिल्या. त्यांनी सर्व पिशाच्च करणीचा उपशम करण्यासाठी समर्थ नावाची वाचकांना आश्वासक अशी व्यक्तिरेखा निर्माण केली. ‘गूढकथा’ हा कथेचाच एक प्रकार. गूढ किंवा विलक्षण, अकल्पित असे अनुभव, धूसर, भयसूचक वातावरण, अकस्मात घडणाऱ्या घटना यामुळे तयार होणारे एक अमानुष जग, यातून गूढकथा रूप घेते. रहस्यकथेत कथा संपल्यावर रहस्य उरत नाही. गूढकथेत मात्र कथा संपल्यावरही काहीतरी गूढतेची मन कातर करणारी अस्फुटता रेंगाळतेच. ‘मानवी संज्ञेला व बुद्धीला ज्ञात अशा जगापलीकडच्या, अनाकलनीय, अतर्क्य अशा लोकविलक्षण वास्तवाचे अस्तित्व हे गूढकथेचे अधिष्ठान, मानता येईल. ‘कबंध’ या संग्रहात बारा कथा आहेत. यात रचनेची तसेच आशयार्थाची विविधता आहे. ‘म्हणे मागे कोण आले? या कथेत इच्छापूर्तीचे सूत्र आहे. डॉ. दिवेकर आणि डॉ. सप्तर्षी यांची ही कथा ‘सूडकथा’ स्वरूपाची अमानुषी कथा आहे. नीलिमा या सुंदर नर्सच्या प्राप्तीसाठी दोन मित्रातील स्पर्धेची कथा. डॉ. सप्तर्षीच्या मोटर सायकलचा अपघात होतो. त्याच्या डोक्याचे इमर्जन्सी ऑपरेशन करण्यात येते. पण ऑपरेशन टेबलावरच तो गतप्राण होतो. काही दिवसांनी डॉ. दिवेकर मोटरसायकल वरून जात असता मागे सप्तर्षी पाठलाग करतो, असा भास होतो आणि घाबरलेल्या दिवेकरच्या मोटर सायकलचा अपघात होतो आणि त्याचं एक मायनर ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन टेबलवर घेण्यात येतं. अ‍ॅनास्थेशिया देणारा सप्तर्षी, दिवेकरना दिसतो. तो एकदम किंचाळतो. ‘ही इज सप्तर्षी. ही वांटस् टू किल मी! बिकॉज आय किल्ड हिम!’ मी त्याचा प्राण घेतला! मी त्याला ओव्हरडोस दिला! अ परफेक्ट मर्डर! वाचवा... ऑपरेशननंतर दिवेकर शुद्धीवर आल्यावर त्यांना कळतं डॉ. अष्टीकर यांच्या ऐवजी डॉ. सप्तर्षीनं येऊन त्यांना जिवंत ठेवलं होतं, ‘पुष्कळ वर्षे जगा आणि आपल्या पापाचं प्रायश्चित घ्या.’ यासाठी. ही पिशाच्च कथा आहे, यात सूड आहे पण वेगळ्या प्रकारचा. स्वत:पासून स्वतंत्र होऊन कुठेही संचार करू शकणाऱ्या माणसाच्या इच्छा– देहाची कल्पना ‘इच्छा-देह’ या गूढ फँटसीमध्ये मतकरींनी साकार केली आहे. या कथेचा नायक म्हणतो... प्रत्येकाला एक वेगळा इच्छामय देह असतो आणि क्वचित तो स्वतंत्र होऊन क्षणात कुठंही जातो. विश्रांतीच्या तारुण्याच्या शोधात, जिथं त्याला मनापासून बोलावणारं कुणी असेल– अपघातात मृत्यू आला असताना प्रबल स्वेच्छेच्या सामर्थ्यावर त्याला दूर ठेवून इष्ट कार्यसिद्धीसाठी देहरूपाने जगणाऱ्या माणसाची कथा ‘लांबणीवर’ मध्ये आहे. नानांना आपल्या मुलीचे लग्न जमविण्याचा ध्यास लागलेला. एकाएकी त्यांचे घर कोसळते आणि नाना त्यात सापडतात. ते पंधरा दिवसांनी शुद्धीवर येतात आणि मुलीच्या लग्नाच्या खटपटीला ते पंधरा दिवसांनी शुद्धीवर येतात आणि मुलीच्या लग्नाच्या खटपटीला लागतात. शेवटी एका चमत्काराने लग्न ठरते. लग्न झाले. नाना घरी आले, गोविंदाला आपल्या मित्राला म्हणाले, ‘बिल्डिंग पडली त्याचवेळी माझा प्राण गेला... पोरीनं जीव तोडून हाक दिली. तिचं लग्न राहिलं होतं म्हणून मी परत आलो. इच्छाशक्तीच्या जोरावर कसाबसा हा देह टिकवला. ते बिछान्यावर पडले आणि गोविंदाला तिथे सांगाडा दिसला. ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ या कथेत सामाजिक अंग प्रभावी आहे. हिला वास्तववादी गूढकथा म्हणता येईल. एका कोकणी खेड्यात ही कथा घडते. येथील माणसांच्या मनातील भूतावळ प्रभावी आहे. मूल नसलेल्या प्रेमळ, निष्पाप, स्त्रीला ही मनुष्यरूपी स्वार्थी भूते जखीण ठरवतात. रूढी, परंपरा यांना कवटाळून स्वार्थ साधणाऱ्या या मानवी पिशाच्चांनी या अश्राप स्त्रीचा बळी का घेतला? हे कोडे, कथा निवेदन करणाऱ्या सरळवृत्तीच्या मुलाला भंडावून सोडते. हे सामाजिक व्यवहारातील गूढ कोण उकलणार? ‘लपाछपी’ ही दुभंग व्यक्तिमत्त्व लाभलेल्या विकृत मनोवृत्ती असलेल्या मुलाची कथा आहे. ‘असाही एक कलावंत’ आणि ‘ट्रिंग-ट्रिंग-हॅलो क्लिक’ या कथा खून, व्यभिचार, फसवणूक आदि गंभीर घटनांच्या असूनही त्या विनोदाच्या अंगाने जातात. या पुस्तकाचे शीर्षक बनलेली ‘कबंध’ ही कथा. माणसाने केलेल्या घोर अन्यायाची पापाची टोचरणी कशी पिशाच्चरूप बनून त्याला त्याच्या अंताकडे खेचते याचे या प्रभावी कथेत मतकरींनी नेटके चित्रण केले आहे. या कथेतील डॉक्टर, रविला दिसणाऱ्या कबंधाचे स्पष्टीकरण देण्यात ‘टेरिबल गिल्ट कॉम्प्लेक्स!’ आपण मालतीवर केलेल्या अन्यायाची रुखरुख त्याच्या मनात खोलवर होती. ती कितीही गाडली तरी दुसरं लग्न करताच उफाळून आली. रेल्वे अ‍ॅक्सिडेंटमध्ये दिसलेल्या कबंधाचा त्या भावनेनं आकार घेतला. सगळीकडं ते कबंध त्याला दिसायला लागलं. नथिंग सरप्राइजिंग. आहे पिशाच्चं कसली? माणसाच्या मनातच इतक्या भयंकर गोष्टी दडलेल्या असतात की, यातून कसलीही पिशाच्चं आकार घेऊ शकतात, मला वाटतं मतकरींनी आपल्या गूढकथांच्या एका अंगाचं विवरण येथे केलं आहे, असे विविध प्रकारचे वेगवेगळ्या पातळ्यांवरील गूढ अनुभव व तर्कापलीकडील घटिते मतकरींनी आपल्या कथांतून प्रभावी शैलीने नटवून पेश केली आहेत. त्यामुळे त्यांचे कथासंग्रह वाचनीय झाले आहेत. -प्रा. इनास फर्नांडिस ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 05-06-2005

    भेदक रहस्यांची गुंफण... मराठी सारस्वतात सर्व प्रांतात मुक्त विहार करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांचा ‘कबंध’ हा गुढकथेचा संग्रह. ‘निजधाम’ व ‘खेकडा’ यापूर्वी प्रसिद्ध झालेली त्यांची गूढकथेची पुस्तकं तितकीच लोकप्रिय. मतकरी यांची नाटकं, कादंबरी, ललित लेखनाप्राणे गूढकथाही वाचकप्रिय आहेत. कबंध या पहिल्या कथेत त्याच पद्धतीची वातावरणनिर्मिती, मधुरा आणि रवी हे विवाहित नवदांपत्य मधुचंद्रासाठी लांबच्या बंगल्यात, निसर्गरम्य वातावरणात आलेले. पहिल्याच स्पर्शाच्या ओढीत स्वप्न रंगवणारे, पण रवीला एका स्त्रीचं शीर नसलेलं फक्त धड दिसतं. मुंडकं नसलेली ही स्त्री रवीची पहिली पत्नी. याचा पाठलाग कसा करते व शेवट काय होतो हे रत्नाकर मतकरी यांनी विलक्षण ताकदीनं गुंफलेलं. श्रीमंत कथेत अत्यंत गरिबीत जगणारा रमाकांत व त्याची पत्नी रजनी आहेत. रमाकांतला कामधंदा, नोकरी नाही. औषध न मिळाल्याने त्याच्या लहान मुलीचं निधन. रजनी हताश. त्यात रमाकांत अघोरी मार्गाला जातो, खूप श्रीमंत होण्यासाठी. मग तो श्रीमंत होतो का, त्याला काय अनुभव मिळतात हे थरारक चित्रण या कथेत आहे. दृष्टा अशीच वेगळ्या धाटणीची कथा. सर्वसाधारण बुद्धी नसलेला, पण असाधारण शक्ती लाभलेल्या पंडीतची कथा. म्हणूनच स्वत: आईचं मरण, वकील साने यांनी केलेला सुंदर पत्नीचा खून अशा गोष्टी त्याला आधीच दिसतात आणि या गोष्टीचा शेवटही धक्का देणारा आहे. लहानपणीच जन्म देऊन आई वारल्याने वडिलांचा रोष निर्माण झालेल्या विल्कूची ही कथा. वडील त्याला मुंबईला घेऊन जात नाहीत. तो आजीकडे शहाड या छोट्या गावी राहतो. त्याची खुनशी वृत्ती कशी उफाळते ती या कथेत परिणामकारक पद्धतीने लेखकाने चितारली आहे. प्रेम, माया न मिळाल्याने विल्कू कसा वागतो ते ‘लपाछपी’तून जाणवते. ‘म्हणजे कोण मागे आले’ या कथेत दोन डॉक्टर एकाच सुस्वरूप नर्सवर फिदा झाल्याची कहाणी. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढल्यानंतर डॉ. दिवेकर सुखी झाले का? त्यांना त्यांची प्रेयसी नीलिमा प्राप्त झाली का? हे वाचनीय आहे. ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ ही कथा अंधश्रद्धेवर आधारित आहे. बाबल्या रावळ दुकानदार. त्याची तरुण पत्नी गोकुळा. मूलबाळ नाही म्हणून ती देवदेवस्की किंवा करणी करते असा संशय. होळीला बाबल्या मोठा पेटारा अर्पण करतो. वाद्यं जोरात वाजवली जातात. होळीची बोंब सुरू. त्यात पेटारा टाकला जातो. पेटाऱ्यात काय आहे हे बाबल्याला माहीत. नंतर मात्र कोणीच बोलत नाही आणि गोकुळा गावकऱ्यांना दिसत नाही. ‘एक माणूस आणि एक पशू’ ही सूडकथा चमत्कारिक आहे. एका डॉक्टरने दुसऱ्याच्या सुस्वरूप पत्नीवर डोळा ठेवून त्या श्रीमंत माणसाचा पशू करणे, त्याला इंजेक्शने देणे अशी ही कथा. अखेरी तो पूर्ण पशू त्या डॉक्टरचाच जीव घेतो अशी कलाटणी. ‘असाही एक कलावंत’मध्ये एक बिलंदर आहे. त्याला कुणाचा तरी खून करण्याची खुमखुमी. रहस्यकथेचे बादशाह नानासाहेबांकडे तो येतो, त्यांचा सल्ला घेतो व कुणाचा खून करतो, त्यामुळे नानासाहेब वैतागतात अशी ही कथा. सर्वच कथा वाचनीय असून रहस्यमय गूढ निर्माण करणाऱ्या आहेत. -रमेश उदारे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.