* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I CAN SEE YOU
  • Availability : Available
  • Translators : PARAG POTDAR
  • ISBN : 9789357200042
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2023
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 616
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NEW YORK TIMES BESTSELLING AUTHOR KAREN ROSE DELIVERS HER PULSE-POUNDING SUSPENSE NOVEL, WHERE THE LINE BETWEEN THE VIRTUAL WORLD AND EVERYDAY REALITY BLURS WHEN IT COMES TO MURDER. EVE AND NOAH ARE AN APPEALING COUPLE. BOTH HAVE SUFFERED A GREAT DEAL, BUT HAVE OVERCOME ALL OBSTACLES WITH STRENGTH, DETERMINATION AND RESILIENCE. ONE CANNOT HELP BUT ADMIRE HOW FAR THEY HAVE COME.
एकामागोमाग एक सहाजणींचे खून पडलेत...या सहाहीजणी शॅडोलॅन्ड या व्हर्च्युअल जगाशी निगडित असतात, जिथे त्या वेगळ्या नावाने वेगळ्या अवतारात वावरत असतात...सहाही जणींचा खून एकाच पद्धतीने झाला आहे...अ‍ॅब्बॉटच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्टिव्ह नोआह आणि जॅक खुन्याचा माग काढू पाहत आहेत...पण तो गुंगारा देतोय...शॅडोलॅन्डचा अभ्यास करणारी इव्हही त्यांना सहकार्य करते आहे...सहा वर्षांपूर्वी निर्घृण हल्ला होऊनही त्याच्यातून बचावलेली इव्ह आणि अपघातात आपली पत्नी आणि मुलगा गमावलेला नोआह यांच्यात प्रेमबंध निर्माण झालाय...डेलला नोआह, जॅक आणि इव्हचा बदला घ्यायचाय...त्याच्याकडे संशयाची सुई आहेच...पण त्याला अटक केल्यावरही खुनांचं सत्र सुरू राहतं...खुन्याचं मुख्य लक्ष्य आहे इव्ह आणि नोआहही...तो इव्हचं अपहरण करतो...कोण आहे हा विकृत खुनी? इव्ह सुटते का त्याच्या तावडीतून? थरारक घटनांनी भरलेली, धक्कादायक वळणांनी पुढे सरकत राहणारी उत्कंठावर्धक रहस्यमय कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #कादंबरी #अनुवाद #क्लासिक #इतिहास #धार्मिक #आयकॅनसीयू #करेनरोझ #क्राईमफिक्शन #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #ICANSEEYOU #PARAGPOTDAR #CRIMEFICTION #FICTION #TRANSLATION
Customer Reviews
  • Rating Starअंजली आमोणकर, गोमन्तक

    आय कॅन सी यू : आभासी जगाची किमया. उत्कृष्ट रोमँटिक थ्रिलरसाठी मूळ लेखिका करेन रोझ यांनी चांगला नावलौकिक मिळवला आहे. त्याला कुठेही अनुवादकाने तडा पडू दिलेला नाही. सध्याचे युग म्हणजे आभासी दुनियेचे युग. या युगात, नवनवीन संशोधनांद्वारे जशी प्रचड क्रांती होत आहे, तशीच - किंबहुना त्यापेक्षा जास्तच क्रांती कल्पना जगातही होत आहे. कल्पनेतली ही क्रांती, अत्यंत गरजेची आहे. कारण त्यामुळे कुठेतरी, आणखीन नवीन शोधांची ठिणगी पडणार आहे. नवीन बीजे रुजणार आहेत. (जी अनेक वर्षांनी वृक्षांत रूपांतरित होताना दिसणार आहेत) ही बीजे काल्पनिक असूनसुद्धा अत्यंत सशक्त आहेत. ती नीट रुजण्याकरता, सत्य अनुभवांच्या खताची सुपीक माती वापरली गेली आहे. गुप्तहेर खात्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या कहाण्यांची जोड त्याला दिली गेली आहे. खुन्यांचा शोध घेणाऱ्या स्क्वॅडच्या कामगिऱ्या मदतीला घेतल्या आहे. व एक अफलातून कादंबरी उभी झाली, `आय कॅन सी यू`. मुळात करन रोझ या लेखकाद्वारे इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या, कादंबरीचा उत्कृष्ट असा अनुवाद पराग पोतदार यांनी `मेहता पब्लिशिंग हाउस` करता केलेला आहे. उत्कृष्ट पुस्तकांचा अनुवाद करून घेऊन तो प्रकाशित करण्याबाबत, मेहता पब्लिशिंगने खूप मोठा पल्ला गाठलाय. त्यातीलच हा एक मानाचा तुरा म्हणता येईल. अत्यंत वेगवान कथा, अनेक भयचकित करणारी वळणे- घटना- हाडे गोठवणारे प्रसंग व धडधड वाढवत नेणारी दाट रहस्ये... असे एकंदरीत या कादंबरीचे स्वरूप आहे. त्यातील दोघांमधल्या एका जटिल प्रेमकथेला, खुनांच्या मालिकेची पार्श्वभूमी लाभली आहे. नंतर नंतर खुनी, पुढे कोणाचा खून होणार याचे गुप्त संकेत देणे सुरू करतो. ते लक्षात आल्याबरोबर त्या व्यक्तीला वाचवण्याकरता, सर्व यंत्रणेची जी प्रचंड धावपळ, घबराट, आकांत होतो त्यात वाचक हरवत हरवत जातो. अनेकदा नकळत श्वासही रोधला जातो. जेव्हा सुटतो तेव्हाच लक्षात येते की रोधला गेला होता म्हणून. हीच रहस्यमय कादंबरीच्या यशाची पावती म्हणता येईल ना! कादंबरीची नायक `नोआह` व नायिका `इव्ह` यांची ही अत्यंत जटिल प्रेमकथा आहे. इंटरनेटवर चालणाऱ्या `गेम्स` या कथानकाच्या आधार आहेत. जेव्हा लोक आपल्या गरजा नीट पद्धतीने भागवू शकत नाहीत तेव्हा ते अशा आभासी दुनियेचा आधार घेत जगू पाहतात. त्यापैकी एक गेम असतो, `शॅडोलॅण्ड`. तो एखाद्या साध्या खेळापेक्षाही पुष्कळ वेगळा आणि थोडा अधिक व्याप्ती असणारा. ती एक कम्युनिटी असते. तिथे तुम्ही लोकांना भेटू शकता, तिथे काम करू शकता. काहीतरी मालमत्ता खरेदी करू शकता. पण हे सारे तुमच्या खऱ्या नावाची गुप्तता राखून ठेवत. त्या आभासी जगात तुम्हाला कसे दिसायला आवडेल, तो `अवतार` घेता येत असतो. तिथे अनेक `अवतारांची` विक्रीही होते. सिरियल हुकर, एका पाठोपाठ एक खून करत सुटतो. हे सारे खून आत्महत्या वाटावेत अशा रीतीने केलेले होते. त्याला, ज्यांना अवमानित झालेले, दर्जा हरवलेले व समूहात इज्जत घालवून बसलेले बघायचे त्यांचेच तो खून करत होता. कारण त्यांचे बिल्ले व बंदुका यांच्या जिवावर ते गर्जना करीत. एकूण नियोजित सहा खुनांपैकी तीन खून झाल्यावर, डिटेक्टिव्ह स्क्वॅडच्या लक्षात येते की या आत्महत्या नाहीत, तोपर्यंत त्याची चौथ्या खुनाची तयारी सुरू झालेली असते. शॅडोलॅण्डच्या आभासी दुनियेत त्याला शिकार सापडायची कारण तिथे, माणसे त्यांचे संरक्षक कवच बाजूला सारून खेळायची. वास्तवातील जगात ते करू व बोलू शकणार नाहीत अशा सर्व गोष्टी करत व बोलत. कारण त्यांना खात्री असायची की इथे त्यांना कोणीही ओळखू शकत नाही व हुकरला त्यांचा विश्वास संपादन करणे सोपे जायचे. पण आभासी जगात ऑनलाइन असणाऱ्या लक्षावधी लोकांतून त्याने नेमक्या या सहा जणांचीच निवड का केली याचे उत्तर फक्त आणि फक्त `त्यालाच माहीत होते. लेखकाने वाचकांना रहस्याच्या अनेक गुहांमधून, भयाण दऱ्यांमधून भकास रस्त्यांवरून खुबीने हिंडवले फिरवले आहे. ६०८ पानी ही कादंबरी संपता संपत नाही. परंतु जेव्हा वाचून संपते तेव्हा वाचक प्रचंड प्रमाणात दि:ड्मुढ व अवाक् झालेला असतो. मुळांत इंग्रजी कादंबरी असल्याने नावापासून पुढे सगळेच वाचकाला परके असते. जीवनशैली, हिंसा, सेक्स, पात्रांच्या वागणुकी-सवयी, पार्श्वभूमी, तसेच रहस्य सोडवण्याच्या रीतीदेखील!! तरीही अनुवादात, कादंबरी मस्तपैकी वाचकाला गुंतवून ठेवते. याचे निश्चित श्रेय अनुवादक पराग पोतदारांना जातेय. उत्कृष्ट रोमँटिक थ्रिलरसाठी मूळ लेखिका करेन रोझ यांनी चांगला नावलौकिक मिळवला आहे. त्याला कुठेही अनुवादकाने तडा पडू दिलेला नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more