* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: BEDHUND
 • Availability : Available
 • ISBN : 9789353170257
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 184
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
Quantity
THIS GRIPPING STORY ABOUT LOVE, FRIENDSHIP, BETRAYALS, RESPONSIBILITIES, ADDICTIONS AMIDST THE DREAMS ABOUT THE FUTURE OF FIVE YOUNG SOULS WILL KEEP YOU GLUED AND WILL DEFINITELY LEAVE AN INDELIBLE IMPRINT ON YOUR LIVES.
‘बेधुंद’ ही जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा (फाइव्ह स्टार्स) या पाच मित्रांची कहाणी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकणारे हे पाच जण वसतिगृहात राहत असतात. या पाच तरुणांच्या निमित्ताने कॉलेज जीवनाचा वेध या कादंबरीतून घेतला आहे. जया आणि हर्षलाच्या निमित्ताने आंतरजातीय विवाहाला होणारा विरोध, या पाच जणांवर सुरुवातीला सीनिअर्सकडून झालेल्या रॅगिंगच्या चित्रणातून रॅगिंगचा प्रश्न, अक्षा आणि सोनिया आणि अन्य मुलामुलींच्या माध्यमातून ‘सेक्स’चा अनुभव, या पाचही जणांच्या दारू पिण्यातून व्यसनाधीनता, सुऱ्या आणि पिया यांच्यात होणारं सेक्स चॅटिंग, काही उत्सव साजरे करत असताना विद्याथ्र्यांमध्ये जातीयवादावरून झालेली भांडणे इ. विषयांचं वास्तव चित्रण या कादंबरीतून केलं गेलं आहे. कॉलेज जीवनाची ही काळी बाजू समाजावरही विघातक परिणाम करू शकते, असा गर्भित इशारा या कादंबरीतून मिळतो. तेव्हा कॉलेज जीवनातील हे दाहक वास्तव जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.
Video not available
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#BEDHUND# AVINASH HAMBIRRAO LONDHE #बेधुंद# अविनाश हंबीरराव लोंढे# जयंत# अक्षय# सुरेश# समीर# अण्णा# अश्विनी# सोनिया# हर्षदा# कॉलेज#वसतिगृह# क्रिकेट# बॅडमिंटन# मेस# डीन# रेक्टर# ब्रेकअप
Customer Reviews
 • Rating StarAkash Alugade

  प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी अनुभवलेली कॉलेज लाईफ असते, काही जणांनी एन्जॉय केलेली, काही जण मनासारखी कॉलेज लाईफ जगतात तर काही जणांना अगदी वेगळ्या आठवणी किंवा निराशजनक घेऊन जगलेली असतात. मी हि माझ्या कॉलेज लाईफवर अनेक लेख लिहले आहेत. कॉलेज लाईफ हि आपण ्रगल्भ अवस्थेत जात असतो त्यात घडलेल्या घटना आपल्याला नेहमी आठवणीत असतात.. असच कॉलेज लाईफ वरील आधारित असलेले एक पुस्तक ,एक लहान कादंबरी "बेधुंद" हे माझ्या नुकतंच वाचनात आलं. बेधुंद हि कादंबरी माझ्या हाती आली आणि जस जस ते पुस्तक मी वाचायला सुरवात केली तस तस मला ती सर्व पात्रे आणि घडणाऱ्या घटना समोर प्रत्यक्षात दिसू लागल्या. लेखक अविनाश लोंढे हे आजच्या युवा युगातील तीक्ष्ण लेखणी घेऊन उमजलेले लेखक म्हणायला हरकत नाही... तर बेधुंद हि `फाईव्ह स्टार ग्रुप` वर आधारित एक कथा आहे. फाईव्ह स्टार म्हणजे जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा. हे फाईव्ह स्टार इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने ओळखी झालेले कथेचे "फाईव्ह स्टार" असतात. लव्ह , सेक्स , ब्रेकअप , रॅगिंग, व्यसन आणि कॉलेज अभ्यास बद्धल सुरु असलेला त्या ५ जणांचा आणि त्याच्या मित्रांचा एकमेकांबध्दल असणारा विश्वास, मैत्री आणि अश्या सगळ्याचा प्रत्येकाच्या आयुष्यावर होणारा वेगवेगळा परिणाम... पुस्तक वाचताना असे अनेक हिस्से आले जे माझ्या सोबत घडले आहेत. ह्या पुस्तकात अश्या अनेक घटना तुमच्या कॉलेज जीवनात घडल्या असतील ज्या पुस्तक वाचताना नक्की समोर येतीलच . जसे जसे त्यांच्या इंजनिअरिंगच्या सेमिस्टर संपत जातात आणि नवीन येत राहतात तशी तशी पुस्तकातील कथा अनेक रूप घेत राहते, पुस्तकात हिंदी आणि इंग्रजीचा उल्लेख भरपूर ठिकाणी आहे आणि तसा करणे लेखकाला भाग पडले आहे. तुम्हाला सांगतो मराठी भाषेतील किंवा "नवीन युगातील" असे एकमेव पुस्तक आहे जे बेफाम आणि नावाप्रमाणे "बेधुंद" असे लिहले गेले आहे. सुरवातीला पुस्तक वाचताना जाणवते कि लहान लहान गोष्टीचा उल्लेख का केला असेल पण जसे जसे वाचत जातो तसे तसे उत्सुकता लागते कि आता पुढे काय होईल...??? तिसऱ्या सेमिस्टरपासून पुस्तकातील लेखकाच्या भावना जाणतात. कथेतील अक्ष्या ( अक्षय ) आणि हर्षल हे माझे आवडते पात्र आहेत. तसेच कॉलेज लाईफ मध्ये होणारे कार्यक्रम , त्यातील राजकारण , कमिटी आणि लेखकांनी आजच्या तरुणाईची भाषा, त्यांचे प्रश्न, विषय, बिनधास्त आणि मोकळेपणाने `बेधुंद` मध्ये मांडले आहेत. जे शब्द प्रत्यक्ष कॉलेज लाईफमध्ये वापरले जातात ते `जसेच्या तसे` लेखात दिले गेले आहेत. खरं म्हणजे इंजनिअरिंग केलेल्या सर्वानी हे पुस्तक वाचले पाहिजेच. हे वय "धुंद" होण्याचे आहे की आपल्या आयुष्याला योग्य वळणं देण्याचे आहे याचा योग्य विचार करायला लावणारे पुस्तकं आहे. लेखक खूप धाडसी आहेत मला त्या पुस्तकाकडून आणि लेखकाकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. खूप मोजकीच पुस्तके आहेत जी अशी लिहली गेली आहेत. १८२ पानांचे हे पुस्तक जेव्हा शेवटच्या पानावर वाचन येते तेव्हा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देऊ शकतो. इतक्या तीव्र भावना इतका विझूलाईझन त्या शब्दातून होतो कि हृदय हळहळ व्यक्त करतच... ह्या पुस्तकातून मला फाईव्ह स्टार ग्रुपची कॉलेज लाईफ वाचन करत जगता आली ह्यासाठी मी लेखकाचे आभार व्यक्त करतो.. `मेहता पब्लिकेशन हाऊसने` हि लहान कादंबरी प्रकाशित केली आहे. बेधुंद ऍमेझॉन वर https://amzn.to/2tmz85O ह्या लिंक वर उपलब्ध आहे. पुस्तकाचे नाव - बेधुंद | लेखक - अविनाश लोंढे आकाश आलुगडे, बेधुंद पुस्तक परीक्षण २ जानेवारी २०२० ...Read more

 • Rating Starप्रमोदकुमार अणेराव

  नमस्कार मित्रांनो! मागील चार पाच दिवसांपूर्वी पोस्टाने एक जाडजूड पार्सल मला प्राप्त झाले.माझ्या स्वभावाप्रमाणे मी ते हावरटपणे उघडले तर त्यात बेधुंद ही देखणी कादंबरी निघाली.लेखक अविनाश लोंढे.हा तरुण लेखक आय आय टी खरगपूर वरून एम.टेक झालेला आणि आता इथिपिया देशात कोका कोला कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो आहे .अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण असूनही मराठीत लेखन करण्याची त्याची अनन्यता पाहून खरेच अभिमान वाटतो.अविनाश चे सारे शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झाल्याने तेथील सगळे अनुभव सहजपणे आणि कलात्मक बाज घेऊन या कादंबरीत लीलया प्रगट झालेले आहे.ही कादंबरी मेहता पब्लिकेशन सारख्या ख्यातनाम प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे.त्यामुळे त्याचे निर्मितीमूल्य अधिक वाढले आहे.कॉलेज जीवन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाची पायभरणी असते असा आपला सर्वसाधारण समज असतो.या जीवनात भविष्याचे वेध घ्यायचेही हे दिवस असतात.नवे ज्ञान ,नवे आव्हान ,नवे प्रश्न यांना पुढे जाण्यासाठीचा हा सुवर्णकाळ असतो.पण अभियांत्रिकी कॉलेजातील वास्तव मात्र खूप वेगळे असते.बुद्धीच्या वरच्या स्तरातील मुले जिथे एकवटल्या जातात तिथे काही भव्यदिव्य घडण्याचा ,नवे विधायक स्वप्न आकारण्याचा अपेक्षा असतात पण असे न होता रॅगिंगचे विकृत वाटावे असे स्वरूप , व्यसनाची आधिक्यता , टोळीयुद्ध वाटाव्यात असल्या मारामाऱ्या , त्यांच्यातील क्लेशकारक वाटावे असे अनिष्ट स्तरीकरण, मुक्त सेक्स असले विकृत जीवनरूप तिथे पाहायला मिळते .तेव्हा सामान्य वाचकांना सखेद आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही.ही कादंबरी जयंत ,सूऱ्या ,अक्षय, समीर आणि अण्णा अश्या पाच फाईव्ह स्टार म्हणविणार्या मित्रांची स्खलनशीलता दर्शविणारी सकृतदर्शनी कथा आहे.पण हे सारे पात्र केवळ प्रातिनिधिक पात्र आहे.अभियांत्रिकी आणि मेडिकल कॉलेज मध्ये कुठेही जा ही प्रवृत्ती आपणांस अलीकडे दिसावे असे हे वास्तव आहे.या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची वाचनियता .कुठेही ती वाचकाला थकवत नाही.तिच्यातील कथानुभव आणि त्यातील नाट्य वाचकांना आपल्यासोबत घेऊन जाते. यातील पात्राच्या सुखदुःखात आणि त्यांच्या नैसर्गिक वागण्यातही आपण नकळत ओढल्या जातो. पण सारखा प्रश्न पडतो की , बुद्धीच्या वरच्या स्तरावरची ही सगळी मुलं विधायक , creative ,productive विचार करताना निदान या कादंबरीत तरी दिसत नाही.स्खलनशीलतेकडून स्खलनशीते कडे त्याच्या प्रवास संबंध कादंबरीभर आपल्याला दिसतो.पण लेखकाला बुद्धीच्या या स्तरावरील विद्यार्थ्यांची ही स्खलनशीलता च दाखवायची आहे.एक संदेश असावा कदाचित त्यातून याबाबतीत अविनाश लोंढे हा लेखक यशस्वी झालेला आहे.अविनाश च्या लेखनात खूप प्रवाहीपण आहे.हा त्याचा स्वानुभव असल्याने त्यात आत्मनिष्ठ जाणिवा पण तीव्रतम पातळीवर प्रकट होतात.,पण त्याच बरोबर त्यात समूहनिष्ठता सुद्धा आहेच. ज्याचे आव्हान आणि आवाहन व्यक्तींना आहे तसे ते समूहालाही आहे.या कादंबरीची खूप वेगवेगळ्या पातळीवरून आणि मानसशास्त्रीय पातळीवरूनही समीक्षण करण्याची नितांत गरज आहे.युवकांचे मानसशास्त्रीय भावविश्व आणि प्रत्यक्षातील सर्वत्र अस्तित्वात असलेले सामाजिक आणि राजकीय वास्तव यातील गुंतागुंतीची आणि प्रश्नांना अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे. ,एक रसिक म्हणून मला ही कादंबरी अतिशय आवडलेली आहे.कमालीची गध्यप्रायता आणि कथारहिता लेखनात येत चाललेल्या या काळात बेधुंद ही कादंबरी बरीच दिलासा देते ,एक आश्वासकता जागृत करते.तिचे अंतर्बाह्य स्वरूप कादंबरी विश्वात अधिक उठून दिसणारे आहे. अविनाश तुला पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा ! ...Read more

 • Rating Starप्रथमेश कांबळी

  पुस्तक: बेधुंद लेखक: अविनाश लोंढे आज झालं वाचून. कॉलेज मधील एका ग्रुपची, म्हणजेच अक्षय, सुरेश, जयेश, समीर आणि स्वप्नील या पाच जणांच्या कॉलेज लाईफची ही कहाणी. या सर्वांनी बेधुंदपणे अनुभवलेली प्रेमप्रकरणं, व्यसनं, हाणामाऱ्या, रॅगिंग वाचताना आपल्याल सुद्धा बेधुंद व्हायला होतं. पुस्तक वाचताना एक उत्तम असा चित्रपट डोळ्यासमोरून सरकत चालल्यासारखे वाटते. उत्तरार्ध तर अप्रतिम जमून आला आहे. दुनियादारी किंवा Five point someone चा feel पुन्हा एकदा अनुभवायचा असेल तर नक्की वाचा हे पुस्तक. ...Read more

 • Rating Starदैनिक सुराज्य २९/१२/२०१९

  भावलेलं पुस्तक - वाचनात गुंग करते बेधुंद मित्रांनो , तुमच्या आयुष्यातले आनंदी दिवस कोणते होते ? - असे विचारल्यास नक्कीच उत्तर असेल कॉलेज लाईफ ! तेथील बेधुंद गोष्टी , बेधुंद मस्ती , बेधुंद करणारे शब्द , बेधुंद संवाद , बेधुंद हसणे , बेधुद रडणे , बेधुंद प्रेमाच्या गोष्टी , बेधुंद मनमानी , बेधुंद बोलणे , बेधुंद वागणे , बेधुंद जगणे , सारे काही बेधुंद ! दोन मनाच्या रस्त्यामध्ये , प्रेमाचं एक गाव असतं , असं आहे नातं ज्याला , मैत्री असं नाव असतं ! कुठे , कधी , केव्हा पृथ्वी तलावर - कोणत्या मुहूर्तावर कोणी आणली मैत्री माहित नाही . परंतु मैत्री हे शब्द उच्चारताच मन अलगद भरून येते . या पवित्र नात्याला मोलचं नाही . अनमोल असेल काही ह्या जगात तर `मित्रत्व ` असे ठणकावून सांगता येईल . रसिक मायबापहो , आजच्या आपल्या भावलेल्या पुस्तकातून , लेखक अविनाश हंबीरराव लोंढे लिखित `बेधुंद (`फाईव्ह स्टार्स असे बेधुंद ग्रुप म्हणजेच कॉलेज लाईफ ) या पुस्तकाविषयी सांगणार आहे , कॉलेज लाईफच्या प्रवासाविषयी मांडणार आहे . रसिकजन हो , आता आपल्या लक्षात आलं असेल कि , मी इतक्या वेळा `बेधुंद ` हा शब्द का वापरला आहे ! या पुस्तकाच्या आधी अविनाश ह्यांनी लिहलेल्या चारोळी संग्रहाचे नावही ` बेधुंद ` ! या चारोळी संग्रहाचे प्रकाशन समाजसेविका सिंधुताई सपकाळ ह्यांच्या हस्ते झाले होते . आताचे हे पुस्तक मला अमोल सीताफळे ह्यांनी स्वरांजली तेलगू चॅनेल स्टुडिओत भेट म्हणून दिले . मग सुरु झाला वाचनप्रवास - जया , अक्ष्या , सुऱ्या , आण्णा , समीर , सोनिया , हर्षला , हर्षल यांच्याभोवती फिरणारे प्रसंग , कथानक वाचताना आपण एखादा चित्रपट पाहतो आहोत की काय - असा भास होतो . बारावी झाल्यावर स्वप्नातले कॉलेजचे आयुष्य सुरु होते . कॉलेज लाईफ म्हणजेच एक भन्नाट अनुभूती , सुख: - दुःखांचा संगम , न पुसले जाणारे वेदनेचे घाव , तितकेच आंनद , तितकेच दुःख , तितकेच हसू आणि आसू , तितक्याच गोड कल्पना , तितकेच कठोर प्रसंग या सर्व घटना ह्या पुस्तकात आहेत . युवा वर्गासाठी हे पुस्तक पर्वणीच आहे . रफ -टफ भाषा , कधी मृदू , साध्या - सोप्या शब्दातून लेखकांनी आपल्यापुढे ह्या पुस्तकाद्वारे ठेवलेले संवाद अवर्णनीय आहेत . शिकण्यासाठी आई - वडील कॉलेजमध्ये मुलांना पाठवतात परंतु काही मुले व्यसनाधीन होतात , प्रेम - प्रकरणात बुडून नाही ते करून घेतात असे काही प्रसंगावरून आपल्याला कळून येते . रॅगिंग सीन्स वास्तवाचे दर्शन घडवतात . प्रेम प्रकरणात अडकलेल्या विद्यार्थ्यांचे जीवन किती गुदमरल्यासारखे होते , याचा प्रत्यय येतो . हिंदी , मराठी , इंग्रजी संवाद मनाला बेधुंद करतात . सोनिया - अक्षय प्रेम -प्रकरण , जया - हर्षला ह्यांचे प्रेम , सचिनचे अनुभव , फाईव्ह -स्टार्स चा नुसता दरारा , मेस कमिटी , हर्षला हिचा गंमतीदार बायोडाटा , शिवीगाळ , टोमणे मारणे , हर्षलाचे जीव देण्या पलीकडचे प्रेम , सोनिया च्या विरहानंतर अक्ष्यामधे झालेला बदल हे सर्व वाचताना वाटतं , `खरंच तारुण्य एवढे बेधुंद असतं का ? ` जया - हर्षला प्रेमप्रकरण मनाला चटका लावून जातो . जीवापाड प्रेम करणाऱ्या ह्या युगल -प्रेमींची ताटातूट होते . शेवटी वाचताना अगदी डोळे पाणावतात . कॉलेज जीवन म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पायाभरणी . पाच मित्रांच्या निम्मिताने ही ब्लॅक कॅनव्हासवर रेखाटलेली कादंबरी . कॉलेज जीवनाची चित्रं वास्तवाच्या वास्तवाच्या जवळ जाणारी , वाईट गोष्टींचा परिणाम किती भयावह असू शकतो ह्याचे दिग्दर्शन करणारी , वाचनीय ग्रेट पुस्तक म्हणून मनीषा संदीप यांनी या पुस्तकासाठी दिलेला अभिप्रायसुद्धा वाचनीय आहे . लेखक अविनाश लोंढे ह्यांच्या पुढील लिखाणास भरभरून शुभेच्छा ! पुस्तक - बेधुंद लेखक - अविनाश लोंढे प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस मुखपृष्ठ - सतीश भावसार . ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ROOPMAHAL
ROOPMAHAL by RANJEET DESAI Rating Star
Astana Pathan

vachale he pustak.chhan aahe.

SECOND LADY
SECOND LADY by IRVING WALLACE Rating Star
Amit Sutar

सगला क्षीण नाहीसा झाला.