- Pawan Chandak
सुधा मूर्तीच्या सर्वच कथा या मानवी मूल्यांवर आधारित व त्या कथेतून सकारात्मक संदेश व शिकवण देऊन जातात. अशीच ही एक कथा `पितृऋण`.
बेंगलोर मध्ये एक कुटुंब राहत असते. वेंकटेश नावाचे ज्येष्ठ व्यक्ती त्या कुटुंबातील एक जबाबदार सहृदय अत्यंत शांत व सदैव इतरांना मदत कारणारा स्वभाव असणारे गृहस्थ जे SBI मध्ये नोकरी करतात. तर त्याच विरुद्ध स्वभावाची त्यांची पत्नी शांता की अत्यंत व्यवहारी जिला नेहमीच व्यवहार, पैसा गुंतवणे, शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग, महिला मंडळ लेडीज पार्टी आदीत आवड सोबत प्रतिष्ठा वगैरे प्रिय. त्यांना 2 मुले मुलगा रवी सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केलेला आई प्रमाणेच व्यवहारी तर मुलगी गौरी MBBS करून स्त्रीरोगतज्ज्ञ चे शिक्षण सुरू आणि भविष्यात स्त्रीरोगतज्ज्ञ होऊन रुग्णांची सेवा हेच तिचे ध्येय, वडीलांप्रमाणे तिचा स्वभाव मनमिळाऊ, शांत, इतरांना मदतीसाठी सदैव तत्पर.
एकदा वेंकटेश यांची बदली हुबळी येथे होते तिथे ते गौरी ची मैत्रीण पाटील यांच्या घरी किरायदार म्हणून राहू लागतात. एकदा एका मुंजच्या कार्यक्रम निमित्त शिग्गावी जातात केंव्हा अनेक जण त्यांना शंकर मास्तर समजून आवाज देतात, एकदा घोळ होऊ शकतो पम तीनदा ... ते म्हणतात ना जगात एकाच प्रमाणे दिसणाऱ्या 7 व्यक्ती असू शकतात. पण एकाच गावात 3 लोक त्यांना शंकर मास्तर म्हणून हाक मारतात म्हणून मग शोध सुरू होतो. शंकर मास्तर कोण आहेत त्याचा.....त्यांना जाऊन वेंकटेश भेटतात.....तिथे शंकर मास्तरांची मुलगी देखील वडील समजून हाक मारते.....मग दोघांची चर्चा कुटुंबविषयी....शंकर मास्तरांचे कुटुंब अत्यंत साधे दारिद्र्यात परंतु स्वाभिमानाने जीवन जगत असतात.
वेंकटेश यांचा शोध त्यांना शंकर मास्तर यांच्या मूळ गावी शिशुनाळ ला पोहोचतात तिथे त्यांची भेट शंकर मास्तरांची आई भागव्वा शी भेट होते. आणि वेंकटेश यांना श्राद्ध पूजेतून पीत्रांचे स्मरण करतांना आपल्या पूर्वजांच्या नावाशी साम्य दिसल्यावर मग ते रहस्य जाणून घेण्यासाठी ते भागव्वा ला विनंती करतात.
भागव्वा कडून त्यांना त्यांच्या वडील सेतुमाधवराव विषयीच्या पूर्वायुष्याची कहाणी, त्यात गैरसमज व नियतीने घेतलेल्या कठीण परीक्षा, परिस्थिती सर्व गोष्टी तुटक तुटक उलगडत जातात.
या सर्व कठीण परिस्थितीत आपल्या आज्जीच्या स्वभावामुळे, गुंडप्पा, गावातील लोकांच्या बोलणे, गैरसमज आदींमुळे भागव्वा व शंकरराव वर ओढवलेली आर्थिक परिस्थिती, अवेळी आलेले वैधव्य, केशवपन ........
नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वतःचे अर्घ्य देऊन पूर्ण करणाऱ्या कर्तव्यशील पुत्र वेंकटेश याचे अस्वस्थपन या कादंबरीत पावलोपावली दिसून येते.
आता खरी भूमिका नायक वेंकटेश यांची ही परिस्थिती जाणून घेतल्यावर वेंकटेशराव आपल्या वडिलांचे पितृऋण अर्थात भागव्वा व शंकर च्या प्रति त्यांची असलेली जबाबदारी व पितृऋण फेडण्यासाठी काय भूमिका घेतात ?
अत्यंत व्यवहारी अशी त्यांची पत्नी शांता व मुलगा रवी त्यांना हे पितृऋण फेडण्यासाठी साथ देईल का ?
मुलगी गौरी तिच्या वडिलांचे पितृऋण हे आपलेच समजून ते पूर्ण करण्यासाठी काय भूमिका घेईल.....
मानवी भावना, मूल्यांची जपवणूक शिकवणारी अशी ही कादंबरी पितृऋण नक्कीच आपण सर्वांनी एकदा तरी वाचावी.
वाचक: डॉ पवन चांडक
- Shivraj Aarati Vishwasrao Juvekar
सुधा मूर्ती यांचं आणखीन एक अफलातून पुस्तक. ८७ पाने मनात घर करून जातात. काल वाचायला घेतले आज पूर्ण झाले.
- Rajesh Latpate
नियतीचा बळी ठरलेल्या वडिलांची जबाबदारी स्वतःच अर्घ्य देऊन पूर्ण करणाऱ्या कर्तव्यशील पुत्राचं अस्वस्थपण. आणि त्या पूर्ततेसाठी खंबीर उभी असलेली कन्या, यांचं अतूट नातं जपणारी `पितृऋण` !
कन्नड भाषेतील सुधा मूर्ती यांच्या `RUNA` या कादंबरीचे मराठीतील `पितृऋण` हे भाषांतर वाचण्यात आले. काळाच्या पडद्याआड गेलेल्या अतर्क्य घटना दीर्घ कालावधी नंतर समजतात आणि माणसांच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत वाढत जाते. वडिलांच्या हाताने झालेल्या अपरित घटना जेव्हा मुलाला कळतात तेव्हा अस्वस्थ होऊन त्याची जबाबदारी स्वतः वर घेत त्यासाठी धरपड करणारा व्यंकटेश जेव्हा हातास होऊन जगत असतो आणि घरात सगळं काही असताना जुन्या नात्याला काहीही मदत करू शकत नाही त्यावेळी त्याला समजवणारी आणि खंबीर उभी राहिलेली त्याची मुलगी गौरी नात्याचं बंधन जपण्यासाठी वडीलांना ज्याप्रकारे साथ देते त्याच चित्र मनाला हेलावणारे आहे. वडीलांवर मुलगी ज्याप्रमाणे प्रेम करते, त्यांना समजून घेते त्याच अप्रतिम चित्रण मनाला भिडते.
नात्यातील एका बाजूला वाढत गेलेला दुरावा आणि दुसऱ्या बाजूला आजही जिवंत असलेली भावनिकता `पितृऋण` त सुधा मूर्ती यांनी अप्रतिम मांडणी केली आहे ज्यात वैचारिक आणि भावनिक दोन्हीचा संगम करून आजच्या घडीचे वास्तविक चित्र आपल्या समोर उभं केलंय.
- Neeta Kuvalekar
सकारात्मक प्रेरणादायी पुस्तके सुचवा
- Shraddha Bhoite
chan ahe
- Rajesh Mahamuni
माणसाचं आयुष्य ही एक अजब गुंतागुंत !
नात्यांची, भावनांची आणि आतर्क्य घटनांची !
काही नाती कोणतेही भावबंध निर्माण न करणारी ,
तर काही नकळत नात्यांचे बंध उरात जपणारी!
काळाचा दीर्घ पडदा सरुन गेल्यानंतर ही
एका अनोख्या नात्याची ओळख होते.
मग...
नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वतःचं
अर्घ्य देऊन पूर्ण करणाऱ्या कर्तव्यशील पुत्राचं अस्वस्थपण...आणि त्या पूर्ततेसाठी खंबीर उभी राहिलेली कन्या , यांचं अतूट नातं जपणारी `पितृरूण`!
सुधा मूर्ती यांच्या वैचारिक , भावनाप्रधान लेखणीचा नवा अविष्कार....!!!
Image may contain: one or more people
- SANJAY B. PATIL
Recently I read the Novel name Runa (Marathi name PitruRuna) written by Sudha Murti and translated in Marathi my Mandakini Katti.
It was very good to read and we all enjoyed this book. I appreciate the simple writing without any fantasy words which touches directly to reader`s heart.
- DAINIK GAOKARI 28-03-2010
सुधा मूर्ती यांची ही नवी मंदाकिनी कट्टी यांनी अनुवादित केलेली कादंबरी आहे. मानवी नात्यांवर, त्यातील गुंतागुंतीवर आधारित. माणसाचे आयुष्य म्हणजे नात्यांची, भावनांची अतक्र्य घटनांची अजब गुंतागुंत असते. काही मानवी नाती कोणतेही भावबंध निर्माण न करणारी तर काही नकळत नात्यांचे बंध उरात जपणारी असतात. अशाच एका वेगळ्या विषयावरची सुधा मुर्ती यांची ही ‘पितृऋण’ कादंबरी आहे. व्यंकटेश हा बँकेत नोकरी करणारा एक सर्वसामान्य माणूस व त्याची पत्नी शांता ही अधिक व्यवहारीपणाने वागणारी असल्याने ती नोकरी न करता आपल्या नवऱ्याची वडिलोपार्जित इस्टेट अक्कल हुशारीने वाढवते, त्यातून व्यवसायवृद्धी करते, मुलांनाही आपल्या मनाप्रमाणे वाढवते, शिक्षण देते. व्यंकटेश बदलीच्या निमित्ताने एकटे हुबळीला जातात.तेव्हा त्या गावातल्या प्रत्येकजण त्यांना ‘मास्तर’ नावाने संबोधतो. तेव्हा व्यंकटेश त्याचा शोध घेतात. शंकर मास्तर नावाचे गृहस्थ अगदी हुबेहूब व्यंकटेशासारखे दिसणारे असतात. चेहऱ्यातले हे साम्य शोधण्याचा व्यंकटेश जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना एका अनोख्या नात्याची ओळख होते आणि मग नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदरी स्वत:चे अर्घ्य देऊन पूर्ण करणाऱ्या कर्तव्यशील पुत्राचे अस्वस्थपण आपल्याला ठायीठायी या कादंबरीतून प्रत्ययाला येते आणि त्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी खंबीरपणे उभी राहिलेली व्यंकटेशाची कन्या गौरी यांचे अतूट नाते जपणारी ही ‘पितृऋण’ कादंबरी ही वैचारिक असूनही भावनाप्रधान आहे. या कादंबरीच्या रूपाने मुर्तींच्यार लिखाणाचा नवा आविष्का बघायला मिळतो.
- DAINIK PUNYANAGARI 17-01-2010
सुधा मूर्ती कन्या आणि वडील यांचं अतूट नातं जपणारी ‘पितृऋण’ ही कादंबरी लिहिली. माणसाचं आयुष्य विचित्र गुंतागुंत असते. यात विविध अतक्र्य घटना घडत असतात. काही नाती कोणतेही भावबंध निर्माण न करणारी असतात तर काही नात्याचे बंध हृदयात दीर्घकाळ जपणारी असतात. काळाचा पडदा सरून गेल्यावरही एखाद्या नात्याची खरी ओळख पटत राहते आणि मग जीवनाच्या चक्रात भावनांच्या कल्लोळात ती व्यक्ती गुंतून राहते. काळाचा बळी ठरलेल्या वडिलांची जबाबदारी स्वतःच्या आयुष्याचे मोल देऊन पूर्ण करणाऱ्या मुलाची ‘पितृऋण’ ही सुधा मूर्ती यांची कादंबरी मंदाकिनी कट्टी यांनी अनुवादिक केली आहे.