* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PEARLS OF CHILDHOOD
  • Availability : Available
  • Translators : DR.VINAYA DHARWADKAR
  • ISBN : 9788184984989
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 199
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN JUNE 1939, SHORTLY BEFORE HER 11TH BIRTHDAY, VERA GISSING ESCAPED FROM OCCUPIED CZECHOSLOVAKIA, LEAVING BEHIND HER PARENTS, FAMILY, AND FRIENDS, TO SPEND SIX YEARS IN BRITAIN. THROUGHOUT THE WAR YEARS, VERA KEPT A DIARY, RECORDING HER DAY-TO-DAY EXPERIENCES, HER LONGING FOR HER PARENTS, HER HOPES, AND HER PRAYERS FOR THE FREEDOM OF HER COUNTRY. BY THE TIME SHE RETURNED TO PRAGUE TO SET UP HOME WITH HER AUNT IN 1945, SHE KNEW THAT BOTH HER PARENTS HAD DIEDXHER MOTHER IN BELSEN, HER FATHER ON A DEATH MARCH. SHE CAME BACK TO ENGLAND IN 1949 AND HAS LIVED THERE EVER SINCE. THE MEMORIES AND EMOTIONS REKINDLED BY A REUNION OF THE CZECH SCHOOL IN WALES WHERE SHE WAS EDUCATED ENCOURAGED VERA TO GO BACK TO HER DIARIES AND THE LETTERS FROM HER PARENTS THAT SHE HAD NOT TOUCHED FOR 40 YEARS, RESULTING IN THIS POWERFUL AND MOVING ACCOUNT OF THE LIFE OF ONE CHILD GROWING UP IN EXTRAORDINARY CIRCUMSTANCES.
दुस-या महायुद्धाचा काळ जून, १९३९. व्हेराचा अकरावा वाढदिवस जवळ आलेला असतानाच, अचानक तिला तिचा प्रिय देश सोडून जावं लागतं. आपलं कुटुंब, आई-वडील आणि मित्रमैत्रिणी यांना सोडून व्हेरा सहा वर्षं ब्रिटनमध्ये राहते. ब्रिटनमधल्या वास्तव्याच्या काळात व्हेरा डायरी लिहायला सुरुवात करते. आई-वडिलांपासून झालेली ताटातूट, त्यांच्या आठवणी, तिच्या आशाआकांक्षा, इच्छा आणि देशासाठी तिने केलेल्या प्रार्थना... असे सगळे ती डायरीत टिपत जाते. १९४५मध्ये ती मायदेशात परतते तेव्हा तिचे आई-वडील मरण पावलेले असतात. ती इंग्लंडला परतते; तेव्हा तिच्या मनात पुन्हा त्या आठवणी, त्या भावना आणि तो काळ जागृत होऊ लागतो. आणि ती पुन्हा वळते तिच्या डायरीकडे.... प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढणा-या एका मुलीची ही करुण, हृदय हेलावणारी भावनिक आंदोलनं म्हणजे हे ‘आठवणींचे मोती’!
संगमनेर इतिहास संधोधन मंडळातर्फे `अनंत फंदी साहित्य पुरस्कार २०१४`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 01-06-2018

    महायुद्धाच्या अशाही आठवणी... होलोकास्ट अर्थात ज्यूंचा नरसंहार, दुसऱ्या महायुद्धातील एक काळा इतिहास. हिटलरच्या सत्तापिपासू वृत्तीतून जन्माला आलेला हा प्रकार इतका भयंकर होता की, नाझी फौजांनी जिंकलेल्या प्रत्येक प्रदेशातील जनता भयभीत होत असे. १९३९ सालीझेकोस्लोव्हाकियावर जर्मन फौजांनी कब्जा मिळवला तेव्हा तेथील लोकांमध्येदेखील हीच भावना होती. डायमंड कुटुंबीय त्यांपैकीच एक. नाझींच्या हाती लागून छळछावणीत अडकून पडण्याची, तेथेच प्राण गमावण्याची भीती त्यांनाही होतीच. हजारो बालकेदेखील याच भीतीच्या छायेत होती. पण एका सद्गृहस्थाने प्रचंड मेहनत करून त्यांपैकी ६६९ बालकांना थेट ब्रिटनला नेले. त्यापैकीच एक म्हणजे व्हेरा गिसिंग. म्हणजेच या पुस्तकाची लेखिका. झेकोस्लोव्हाकियात असताना नाझींचा हल्ला, तेथून निघून ब्रिटनला आल्यानंतर नव्या कुटुंबातील वास्तव्य, तेथील पुढील आयुष्य असा सारा प्रवास लेखिकेने या पुस्तकात मांडला आहे. हा केवळ लेखिकेचा प्रवास नाही. तिच्या वाट्याला आलेले दु:ख हे त्याकाळच्या संपूर्ण समाजाचे चित्रण आहे. लेखिकेने जरी स्वत:चा प्रवास मांडला असला तरी त्यात केवळ स्वत:च्या दुखण्याखुपण्याला प्राधान्य दिलेले नाही. व्हेराने तिच्या ब्रिटनमधील सुरुवातीच्या वास्तव्याच्या साऱ्या नोंदी रोजनिशी स्वरूपात मांडून ठेवल्या आहेत. ब्रिटनमध्ये ती तिच्या दत्तक आई-वडिलांबरोबर राहत असली तरी तिची मूळची ओढ तशीच आहे. झेक भाषा, तिचे मूळ गाव याची ओढ तिला सतत छळत असते. देश सोडून आई-वडिलांपासून ताटातूट झालेली मुलगी काय विचार करते याचे प्रत्यंतर तिच्या डायरीत दिसून येते. नंतरच्या काळात तिचा आई-वडिलांबरोबरचा पत्रव्यवहारदेखील या पुस्तकातून उलगडत जातो. व्हेराने तिचे हे सारे अनुभव, रोजनिशी, पत्रे सारे पुस्तकरूपाने १९८८मध्ये ‘पल्र्स ऑफ चाइल्डहूड’ या नावाने प्रकाशित केले आणि यामुळेच ज्या व्यक्तीने त्या ६६९ बालकांना वाचवले तो माणूसदेखील प्रकाशात आला. त्याचे नाव होते निकोलस विन्टन. तो ब्रिटनमधील एक शेअर व्यावसायिक होता. व्हेरा ही त्याने सुटका केलेल्या बालकांतील पहिली ‘मुलगी’. पुढे ती सर्व ६६९ बालके ही विन्टनची मुले म्हणून ओळखली जाऊ लागली. विन्टनला नंतर अनेक मानसन्मान मिळाले. व्हेराची ही कथा अशा साऱ्या आठवणींचा एक मस्त कोलाज आहे. दु:खातून सुखद स्मृतींना जन्म देणारी ही सत्यकथा आहे. –राधिका कुंटे ...Read more

  • Rating Star SAMNA 5-1-2014

    दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व्हेराचा अकरावा वाढदिवस जवळ आलेला असतानाच अचानक तिला तिचा प्रिय देश सोडून जावं लागतं. आपलं कुटुंब, आई-वडील आणि मित्रमैत्रिणी यांना सोडून सहा वर्षे ब्रिटनमध्ये राहिली. ब्रिटनमधल्या वास्तव्याच्या काळात व्हेरा डायरी लिहायला सरुवात करते. आई-वडिलांपासून झालेली ताटातूट, त्यांच्या आठवणी, तिच्या आशा, आकांक्षा, इच्छा आणि देशासाठी तिने केलेल्या प्रार्थना... सर्व डायरीत टिपते. महायुद्ध संपल्यावर ती पुन्हा मायदेशी परतते आणि त्यामागच्या आठवणी, भावना तो काळ जागृत होतो. ती पुन्हा डायरीकडे वळते... तिचीच ही करूण, हृदय हेलावणारी भावनिक आंदोलने म्हणजेच ‘आठवणींचे मोती’. ‘आठवणींचे मोती’च्या मूळ लेखिका व्हेरा गिसिंग मराठी अनुवाद केलाय डॉ. विनया धारवाडकर यांनी. व्हेरा गिसिंग यांनी विविध इंग्रजी प्रकाशकांकडे भाषांतरकार, संपादक म्हणून काम केले. तसेच बालसाहित्यही लिहिले आहे. महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये असताना लिहिलेल्या डायऱ्यांवर आधारित ‘पर्ल्स ऑफ चाइल्डहूड’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजेच ‘आठवणींचे मोती’. दुसऱ्या महायुद्धात बालपणीच कुटुंबाशी ताटातूट झालेल्या ‘व्हेरा गिसिंग’ लेखिका या ज्यू मुलीचा भावपूर्ण प्रवास आहे. हे पुस्तक अमेरिका, झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया आणि जर्मनी येथे प्रकाशित झाले आहे. जपानी भाषेतही ते अनुवादित झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेला ‘ऑल माय लव्ह वन्स’ हा चित्रपटही बनविला गेला आहे. माता-पिता नाझींच्या छळछावणीत मृत्युमुखी पडल्यानंतरचा प्रवास डोळ्यात अश्रू उभे करणारा ठरतो. त्या युद्ध काळात जी निष्पाप बालके त्यांच्या घरापासून तोडली गेली, त्या सर्वांचीच ही कहाणी ठरू शकते. ब्रिटनने त्या बालकांना आश्रय दिला, मदत केली आणि त्यांना समजूनही घेतले हे विशेष. सदर पुस्तकात व्हेराच्या कुटुंबाची, घराची, शाळेची, शहराची छायाचित्रेही यात समाविष्ट केलेली आहेत. यात एकूण आठ प्रकरणे आहेत. दोन विभागात ती दिलेली आहेत. लेखिकेचा हा दुःखदायक प्रवास डॉ. विनया धारवाडकर यांनी अतिशय संवेदनशीलतेने साध्या, सोप्या भाषेत मांडलेला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही सत्यकथा मराठीकरण करताना कुठेही बटबटीत वाटत नाही. उलट त्यातील जिवंतपणा प्रत्ययास येतो, ही डॉ. विनया धारवाडकर यांच्या भाषाशैलीची पोचपावती ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more