* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KARN, THE SURYAPUTRA (SON OF GOD) WHO SPENDS HIS WHOLE LIFE BEING MOCKED AS SUTPUTRA. KARN, THE JAYSHTHA KAUNTYA(ELDEST SON OF KUNTI, THE QUEEN MOTHER) WHO IS BETTER KNOWN AS RADHAY. KARN WHO WAS EQUALLY ADMIRED AND LOVED BY PANCHALI (THE EMPRESS) AND VRISHAALI. KARN, THE INVINCIBLE, BORN WITH A SHEATH WHICH COULD NEVER BE PENETRATED IS THE MOST SOFT HEARTED PHILANTHROPIST;KARN,THE ONE WHO NEVER RETURNED ANYBODY FROM HIS DOOR EMPTY HANDED BUT COULD NEVER FILL UP HIS OWN HANDS .
असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarPratibha Mahajan - Mali

    मृत्युंजय ही मराठीतील एक अजरामर कलाकृती आहे. 2005 ला डी.एड् ला असताना वाचली होती... पण आता परत वाचावीशी वाटली... 1800 पानांचे हे हस्तलिखित पूर्णत्वास नेण्यासाठी लेखकांना 7 वर्षांचा कालावधी लागला.प्रचंड मोठा आवाका असणारे मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक िवाजी सावंत.... लेखकांच्या अफाट मेहनतीला,तळपत्या लेखनीला व वाचकाला खिळवून ठेवणार्या लेखनशैलीला मानाचा मुजरा!!! कर्णकथा,दानशूर कर्ण,ज्येष्ठ कौतेय,राधेय सूर्यपूत्र कर्ण ! कर्ण ! कर्ण ! त्याचा त्याग,त्याने भोवलेल्या यातना,सोसलेले कष्ट,सूर्यपूत्र असूनही त्याला आयुष्यभर सूतपुत्राची अवहेलना सहन करावी लागली,त्याचे निव्वळ मित्रप्रेम,त्याचा आदर्शवाद.....कादंबरी मधील पात्रांचे आत्मकथन सारं काही खिळवून ठेवणारं आहे. ...Read more

  • Rating StarVishwanath Joshi

    `कर्णा`, तु `मृत्युंजय` नव्हतास! काही पुस्तकं मनावर गारूड करतात , सहजासहजी अशी गारुडं मग खाली उतरवता येत नाहीत . त्या पुस्तकातील काही व्यक्तिरेखाही मनावर प्रभाव करतात . एकुणच ते पुस्तक वाचून झाल्यावरही आपण त्या पुस्तकाच्या धुंदीतच असतो! माझ्या ाचनात अशी फार पुस्तके आली नाही पण काही पुस्तकांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . त्यातीलच एक पुस्तक म्हणजे `मृत्युंजय`!! कै. `शिवाजीराव सावंत` यांची अजरामर साहित्यकलाकृती! साधारणपणे ज्यांना मराठी साहित्याची गोडी नाही त्यांना मृत्युंजय वाचायला द्यावी . मराठी भाषेची गोडी सहज लागेल . आज मराठी वाचकांमध्ये असे क्वचित वाचक असतील ज्यांनी मृत्युंजय वाचली नाहीये . `वि. स. खांडेकरां`च्या `ययाति`नंतर इतकं शब्दसौदर्य असलेली कादंबरी म्हणजे मृत्युंजय होय! इथेच एक प्रांजळ कबुलीजबाब देऊ इच्छितो की इतिहासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मृत्युंजयचे स्थान हे शुन्य आहे . व्यासांच्या महाभारतात काही प्रसंग नाहीच आहेत जे मृत्युंजयमध्ये आहेत . त्यामुळे मृत्युंजय मधील शब्द अन शब्द खरा आहे असा गैरसमज करुन घेऊ नये! मृत्युंजयची ओघवती भाषा , सावंतांची ती अनोखी शब्दरचना , निसर्गांचं केलेलं वर्णन , या सर्व बाबींचा मात्र विचार केला तर मृत्युंजयचे स्थान फार वरचे आहे हे निश्चित! काही पुस्तकं अशी असतात जी वाचायला घेतल्यावर खाली ठेवावी असं वाटतच नाही , मृत्युंजय अशांमधीलच एक आहे! मृत्युंजय या कादंबरीमुळे मराठी भाषेला एक संजीवनी मिळाली . मराठी भाषेचे वाचक वाढले . लोकांना पुन्हा एकदा कादंबर्‍यांनी भुरळ घालायला सुरुवात केली असे अनेक फायदे मृत्युंजयचे आहेत पण तेवढेच तोटे देखील आहेत . मृत्युंजय ही `महाभारत`कालीन महारथी `कर्णा`ची भावस्पर्शी कथा आहे . इथे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण ती कादंबरी वाचत जातो . सुरुवातीला स्वत: कर्ण आपली कथा सांगायला सुरुवात करतो . त्याच्या त्या गावाचं - `चंपानगरी`चं तर वर्णन इतकं सुरेख आहे की इथुनच ही कादंबरी आपल्या मनावर पकड घेते . मग `कुंती` कर्णाविषयी सांगते . खरं सांगायचं तर वैयक्तिकपणे कुंतीचं सांगणं मला वाचायला कंटाळा देणारं होतं! पण कर्णाची जन्मकथा आपल्याला कुंतीच सांगते आणि त्यावेळी सावंतांनी तीथे अगदी प्रसंगानुरूप लेखणी वापरल्यामुळे कर्ण भाव खाऊन जातो! कर्णाची पत्नी `वृशाली` ही देखील कर्णाविषयी सांगते आणि कर्ण आणि वृशाली दोन्ही सहानुभूती मिळवतात. स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमलपुष्प असतं! पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य . पतीच्या जीवनाची अर्धी बाजु सावरण्याची पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगल वेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते . अशा वाक्यांमुळे माझ्या मनात वृशालीने एक वेगळाच आदर मिळवला . शिवाय `शोण`, `दुर्योधन` यांची मनोगतं देखील भारावून टाकणारी होती . शेवटचं `श्रीकृष्णा`चं मनोगत वाचताना मध्येच डोळे डबडबलेले होते! शेवटी मृत्युंजय वाचून पुर्ण केलं! मृत्युंजय वाचल्यावर एक वर्णनविलक्षण भावना मनात चेतवली गेलेली होती . मृत्युंजय वाचल्यावर `कर्ण` आमच्यासाठी `हिरो` झाला होता . एक कर्ण आणि दुसरा `दिलीप कुमार` हे त्या काळातील आमचे हिरो होते . मृत्युंजय मधल्या अनेक वाक्यांनी मनावर जबरदस्त पकड घेतली होती . "तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन" यांसारख्या वाक्यांनी मनाचा तळठाव व्यापला होता . मृत्यंजयमधील काही प्रसंग वाचल्यावर मनामध्ये एक विषण्णता जाणवली . जन्म झाल्यावर त्याला आईनेच आपल्यापासून दूर केलं होतं . `गुरु द्रोणां`चा आदर करुनही द्रोणांनी त्याच्या पदरी उपेक्षाच टाकली होती . तो ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी महेंद्र पर्वतावर `भार्गव परशुरामां`कडे गेला आणि त्याने सर्वस्व पणाला लावले पण पुन्हा एकदा त्याच्या पदरात जळजळीत निखारेच पडले आणि एक धगधगता शाप! शेवटी अंगावर धारण केलेली कवच - कुंडलेही इंद्राने दान म्हणून मागीतली आणि त्याच्यासोबत छळ केला आणि हे सगळं झाल्यावर कुंती त्याच्यासमोर आली! कुंतीसाठी त्याने एकाच म्हणजे फक्त अर्जुनालाच वधेन बाकीच्यांचा वध करणार नाही असं वचन दिलं! `गंगापुत्र भिष्मां`ची अवज्ञा होईल म्हणून हा रणधुरंधर पहिले दहा दिवस रणांगणात उतरला नाही! अर्जुनासाठी राखुन ठेवलेली `वैजयंती` त्याला `घटोत्कचा`वर सोडावी लागली . शेवटी नखं नसलेल्या सिंहासारखी त्याची अवस्था झाली होती! पण तरिही मनामध्ये अदम्य जिद्द ठेवून हा रणमार्तंड सेनानायक रणांगणात उतरला आणि पांडवांचे दुर्दै़वाचे दशावतार दिसु लागले . शेवटी कृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाने त्याच्यावर बाण चालवला आणि एक वादळ शांत झाले! कुरुक्षेत्रावर सुर्यास्त झाला!! `कर्ण`पर्व समाप्त झाले होते!! कर्णाचं गारुड मनावर ठेवूनच मग पुन्हा एक दोनदा मृत्युंजय पूर्ण वाचुन काढलं . पुन्हा पुन्हा कर्णाने माझ्या मनात वादळ उठवलं! मधल्या काळात माझं वाचन वाढलं . विविध दृष्टीकोनातून मी महाभारत वाचु लागलो . प्रत्येक वेळी कर्ण वेगळा वाटत गेला असला तरीही मृत्युंजयमुळे मी भारावून गेलो होतो . मग पणशीकरांचं `कर्ण कोण होता?` हे पुस्तक वाचनात आलं . नंतर परम पुज्य `वरदानंद भारती` यांचे कर्णावरचे लेख वाचनात आलं . या दोन्ही पुस्तकांमध्ये कर्णाविषयी नकारात्मकता वाचायला मिळाल्यामुळे संदर्भासहित महाभारत वाचायला घेतले आणि कर्णविषयी सत्य हळुहळू समजत गेले . बुद्धीला ते सत्य पटत होते मात्र मनाला पटत नव्हते . मग मात्र मृत्युंजय मधील अवास्तव , काल्पनिकतेवर असलेला भर हे सगळं स्पष्ट झालं मग कर्णापेक्षा कितीतरी पटीने मला इतर व्यक्तिरेखा भावल्या . विशेषतः भीष्मांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . कर्ण हा कुणी महात्मा /वीरपुरुष नसुन तो खलपुरुष होता हे देखील मला चिंतन केल्यावर समजु लागलं . शेवटी माझ्या मनावर दीर्घ काळ राज्य करणारा कर्ण माझ्या मनातुन अखेर हद्दपार झाला!! सुरुवातीला कर्णाच्या कृतींचं आम्ही समर्थन करायचो . आता मात्र तसं करताना स्वता:हाचीच लाज वाटु लागली . द्रौपदीला तो भर सभेत वेश्या म्हणाला असं वाचताना पुर्वी आम्हाला काही विशेष वाटलं नव्हतं पण आता मात्र तो विचार करतानाही मन धजवत होतं! भार्गव परशुरामांना असत्य सांगुन अंधारात ठेवणार्‍या कर्णाची प्रवृत्ती किती हिणकस असावी असं वाटु लागलं . गरीब ब्राह्मणाची गाय मारुन कर्णाला काय मिळालं? स्वता:हाच्या धनुर्विद्येच्या टिमक्या मिरविणारा कर्ण गांधर्व युद्धात निष्पभ्र का ठरला ? असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आणि कर्ण हा माझ्या मनात इतिहासजमा होवुन बसला! आजही मी मृत्युंजय वाचतो पण कर्णासाठी नाही तर त्यातील अमोघ भाषेसाठी . साहित्य कलाकृतींमध्ये मृत्युंजय फार वर आहे मात्र त्यात इतिहास मिसळला गेला तर अज्ञानाचं प्रदुषण पसरतं. `श्रीमान योगी`/`छावा` किंवा मृत्युंजय या कादंबर्‍या अवश्य वाचाव्यात पण त्यातील काल्पनिकता ही खरी मानु नये . किमान सुज्ञ आणि विवेकी वाचकाने ही गोष्ट नोंद करुन घ्यावी! कर्णाशी माझं काहीच वैर नाही . तो पराक्रमी होता , त्याने अनेक दिग्वीजयही केले , त्याच्या दानशुरपणाला तोड नाही हे सगळं खरं पण तो अराजक प्रवृत्तीला पाठिंबा देणारा अधर्मी होता असं व्यासांनी म्हटलयं . आम्ही नाही!! आज एकुणच कर्णाकडे वळुन पाहताना जास्त काही म्हणावसं वाटतं नाही . दोन ओळीच खुप आहेत , कर्णा , तु मृत्युंजय नव्हतास रे! मृत्युंजय नव्हतास!! धन्यवाद! ...Read more

  • Rating StarDatta Shinde Patil

    एक वेळ अवश्य वाचावं असं पुस्तक

  • Rating StarSomnath Rathod

    आज जेव्हा शिवाजी सावंत यांची लोकप्रिय कादंबरी मृत्यूंजय वाचून समाप्ती झाली तेव्हा कळाले. "अंगराज कर्ण. सुतपुञ कर्ण. कौरव दिग्विजयी सेनापती कर्ण .जेष्ठ कौंतिया कर्ण. राधेय कर्ण . साक्षात इंद्रदेवाला आपल्या दारात याचक म्हणून उभा करणारा दानीर कर्ण आपला मिञ दुर्योधन व कौरव पराभूत होणार माहीत असताना मिञाला दिलेल्या शब्द खातीर शेवट पर्यंत जिगरांने लढणारा कर्ण. मृत्यू च्या दारात उभा असताना याचक वृद्ध ब्राम्हणाला स्वतःचे दोन सोन्याचे दात दगडाने तोडून देण्याचे मुलाला आदेश देणारा दानविर कर्ण प्रत्येक माणसात एक कर्ण असतोच..! १० दिवस डोक्यात गरागरा फिरणारा कर्ण आज डोक्यासह शांत झाला.! कादंबरी कार शिवाजी सांवत ना कोटि कोटि प्रणाम. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.