* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MODEN PAN VAKNAR NAHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663693
  • Edition : 22
  • Publishing Year : OCTOBER 1970
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NAME SUGGESTS THE FOUNDATION OF THE STORIES. THIS IS AN EXCLUSIVE COLLECTION OF ONLY 8 STORIES BASED ON SOME WHIMSICAL CHARACTERS. EVERY MAIN CHARACTER IN ALL THESE STORIES HAS ONE THING IN COMMON. IN A TRUE SENSE, THEY ARE NOT WHIMSICAL; ACTUALLY THEY HAVE SET THEIR OWN DOCTRINES AND HAVE STUCK TO THEM, NO MATTER WHATEVER HAPPENS. IN ONE OF THE STORIES, THE HERO DIES JUST BECAUSE OF HIS DOCTRINES. THE OTHER STORY IS BASED ON THE MENTALITY OF BEING LAME; IT PROVES THAT MANY A TIMES THOSE WHO ARE PHYSICALLY DISABLED ARE MORE FIRM THAN THOSE WHO ARE PHYSICALLY CAPABLE OF DOING EVERYTHING BUT HAVE A LAME AND LIMP MIND. ONE STORY IS BASED ON THE INSECURITY; HERE THE HEROINE WHO HAD REFUSED SOMEONE WHOM SHE LOVED SO MUCH COMES INTO CONTACT WITH HIM AGAIN. SHE FEELS THAT HE WILL BLACKMAIL HER BUT FAILS TO UNDERSTAND HIM, AT THE END, THOUGH VERY BEAUTIFUL, HER INSECURE MIND SHOWS ITS UGLINESS. EACH AND EVERY STORY HAS SOME SPLENDID FELLING OR OTHER TO SHARE WITH US, TO REVEAL THE VASTNESS AND THE INSULARITY OF THE MIND.
जगाला विक्षिप्त वाटतील अशा स्वतःच्या एखाद्या मतप्रणालीच्या पूर्ततेसाठी, हट्टामुळे नामशेष होऊन जाणाऱ्या, पण माघार ण घेणाऱ्या अशा विक्षिप्त व्यक्तींची एकेक तऱ्हा रंगविणाऱ्या आठ खाशा कथांचा संग्रह
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarHansraj Patil

    वपु च्या कथा म्हणजे काहीतरी वेगळेपण असणारच..हे मानत वाचायला घेतलं..सगळ्या कथा मनाला भिडणाऱ्या आहेत ..खूपच सुंदर पुस्तक...

  • Rating StarManoj Mohale

    "भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय देईलच ह्याची खात्री नसते.प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहायची असते हि माझी शिकवणं आहे.भावना प्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात.पण बुद्धी प्रधान माणुस हा स्वतःलाच नव्हे तर ईतराना सुद्धा आधर देतो".. मी हे पुस्तक चार पाच वेळा हाती घेतलं पण पूर्ण वाचण्याचा काही योग आला नाही काल संपवलं वाचुन बर का 😋 तसे वपु काळे माझे आवडते लेखक याची पुस्तक म्हणजे माझ्या साठी एक नेहमीच मेजवाणी राहते.जशे जशे आपण यातले काही कथा वाचता जातो तेव्हा आपल्याला समजत वपु कशे लिहतात त्याचा ऐकुन एक शब्द मला लागतो!म्हणून मी नेहमी याची पुस्तके वाचतो..आपण सुद्धा वाचून पाहा आणि अनुभव सांगा धन्यवाद 🙏😊... ...Read more

  • Rating Starसौ. शीला मराठे

    वसंत पुरुषोत्तम काळे यांचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा कथा संग्रह वाचनात आला. एकूण बारा कथांचा हा कथा संग्रह आपल्याला प्रत्येक कथेतून निराळ्याच सौंदर्याने चमकताना दिसतो. व. पु. काळे यांनी या कथा संग्रहाद्वारे वाचकांच्या हृदयात एक अनोखं स्थान निर्माण कले आहे. कथा वाचताना गाभाऱ्यात नकळत व सहज कोरला जातो. कथेतील वास्तववादी जीवन व प्रगट करण्यासाठी वापरलेली भाववाही भाषा शैली यांचा सुंदर संगम कथा वाचताना अनुभवास येतो. या संग्रहातील प्रत्येक कथेत आपल्याला जिद्द. करारीपणा, चिकाटी व त्यासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत चालत असलेला झगडा दिसून येतो. हिऱ्याच्या पैलूप्रमाणे निरनिराळ्या पात्रांच्या रूपाने माणसाच्या स्वभावाचे पैलू चमकताना दिसतात. सजीव चित्रण व साधी सरळ भाषाशैली हे याच्या कथेचे मोठे वैशिष्ट्य होय. ‘‘सुंभ जळतो पीळ उरतो.’’ यामधील न्यायासाठी आमरण उपोषण करणारा धाकटा भाऊ तर ‘‘जंक्शन’’ मधील आपल्या हक्काची वाद लावून घेणारी रेवती, सारख्याच करारीपणानं वागताना दिसतात. ‘निगेटिव्ह’ मध्ये स्वार्थापायी स्टुडिओ जाळण्याचे सुचित्राने केलेले नीच कारस्थान तर रविंद्राचे तितकेच उदार अंत:करण यांचा अपूर्व संगम या कथेत पहावयास मिळतो. सुंदर असूनही शारीरिक पंगुत्वामुळे मुलींची लग्नाच्या बाजारात होणारी हेळसांड. पण त्याहीपेक्षा मानसिक दुबळेपणाने वागणारा आजचा तरुण वर्ग किती असमर्थ आहे याचे प्रत्यंतर ‘पंगु’ या कथेद्वारे येते. स्वाभिमानी के जी काकांना अखेर रस्त्यावर सामान विकणाऱ्या पंकजपुढे हार खावी लागली. एका क्षुल्लक मुलाने आपल्या प्रेमळ व उदार स्वभावाने सगळ्यांना भारावून टाकले. याचा अनुभव ‘पराधीन आहे जगती’ यामध्ये येतो. स्वाभिमानी सरोजने पैशाचा गर्व असलेल्या कुमारला हे दाखवून दिले की, ‘गरीब माणसं ही श्रीमंतीच्या हातातली नक्की खेळणी होऊ इच्छित नाहीत.’’ या वास्तववादी सत्याचा साक्षात्कार ‘खेळणी’ या कथेत होतो. मंगलसारख्या निष्पाप भाबड्या मुलीच्या क्षणभरच लाभलेल्या प्रेमाशी बेईमानी न करणारा रमेश ‘जलधारा’मध्ये बिजलीसारखा चमकून जातो तर समाजातील सुखदु:खाचा अनुभव घेऊन ती किती फसवी आहेत याचा साक्षात्कार होताच त्यांना वाळूच्या कणाप्रमाणे झटकून टाकणारी सुरेखा ‘‘वाळू’’चा कथेत पाहावयास मिळते. ‘‘पाळणा’’ मध्ये माया मिथ्याचा लेखकाला आलेला साक्षात्कार अनुभवास येतो. ‘‘ही वाट एकटीची’’ या कथेतील सत्याने वागणारी बाबी तर ‘‘जिद्द’’ मधील जिद्दीने वागणारे दादा सारख्याच महत्त्वाचे ठरतात. ‘‘पापा’’ कथेतील आईच्या व पपांच्या वात्सल्य प्रेमाची चाललेली कुचंबणा व ते प्रेम व्यक्त न करता दाबून ठेवण्यासाठी चाललेला प्रयत्न हा स्वभाव चित्रणाचा उत्तम नमुना खरोखरीच आपल्या मनावर प्रभाव पाडून जातो. अशा तऱ्हेने ‘‘मोडेन पण वाकणार नाही’’ मधील सगळीच पात्रे या नावाप्रमाणेच अपूर्व व उदात्त जीवन जगताना दिसतात. व. पु. काळे यांचा हा कथासंग्रह वाचकांना एक नवी दृष्टी देऊन जातो त्यात शंकाच नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 06-12-1970

    श्री. व. पु. काळे यांच्या आगळ्या शैलीने रंगलेल्या गूढ जीवनकथा... कुठल्याशा वाळवंटात पावसाची एक सर अचानक येते अन् जवळ असणारं एखादं वाळक झाड आणखी तग धरून राहतं... पानं, फुलं, नसतातच पण तरी ते वाकत नसतं, क्वचित वादळ जोराचच झालं तर उन्मळून मात्र पडत. तेझाड वाळवंटातच असेल असेही नाही. सुपीक प्रदेशातसुद्धा वठलेलं, वाळकं झाड दिसत नाही असं नाही. ‘मोडेन पण ... वाकणार नाही. जिवात जी असे तो ताठ मानेनं राहीन’ पण कशापुढंही हार नाही पत्करणार, अशाच बाण्यानं जगणारी माणसं या आपल्या समाजात पाहायला मिळतात... ती माणसंही कधी त्या झाडाप्रमाणे उन्मळून पडणार असतात. पण त्याची त्यांना पर्वा नसते. वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या निरीक्षणातून अन् अनुभवातून तर अशी माणसं सुटणं कठीणच नाही का? अर्थात हे पटलं ते त्यांचा हा कथासंग्रह वाचूनच. कुठेतरी धागा गुंफला जातो... पु. लं. च्या ‘व्यक्ति आणि वल्ली ची चटकन आठवण होते हा कथा संग्रह वाचताना. लिहीण्याची धाटणी तशाच पद्धतीची. वाचल्याबरोबर लेखकाला विचारावंत वाटवणारी की, ही व्यक्ती कुठंय ती वल्ली तुम्हाला कुठं भेटली?’’ अनुभव असे मिळतात म्हणून कथा लिहिल्या जातात की त्या गोष्टीतल्या प्रमाणे आपण प्रसंग अनुभवतो? आता हेच पहा ना! ‘जलधारा’ मधील मंदा नाईक ही अगदी आपल्यातली. पण गर्दी असताना सिनेमाचं तिकिट ऑफर करणारा उमदा रमेश अन् त्याचा मोकळा स्वभाव कुठला? ही ‘मोडेन पण वाकणार नाही’ या बाण्याचा! मंगला नामक एका मुलीशी एका जलधारित पडलेल्या बाणाशी एकनिष्ठ राहणारा! ‘सुंभ वळतो पीळ उरतो’ मधले लेखकांच्या मित्राचे मित्र ‘धाकटा’ अन् ‘मोठा’ यांचे स्वभाव असे चमत्कारीकच. प्रोड्यूसर होण्याच्या आशेनं नटीच्या घरी ‘टॉमी’ असलेलेला मोठा भाऊ अन् लेटमार्क केला जाऊ नये यासाठी उपोषण करीत मृत्यूला मिठी मारणारा धाकटा दोघेही जिद्दीच नव्हे तर काय? ‘जिद्द’ मधला जिद्दी दादाही असाच पिळाचा माणूस. पुरुषांप्रमाणेच स्त्रियासुद्धा मोडतील पण वाकत नाहीत अशातल्या! या स्त्रियासुद्धा तशा जिद्दी! किंबहुंना कथासंग्रहात पुरुषांपेक्षा अशाच स्त्रियांचे विविध नमूने आहेत. ‘पंगू’ मधली मोहिनी अगदी मनात ठाण मांडून बसते. कथा वाचता वाचता आपणसुद्धा तिच्या मनानं मानानं पंगूच आहोत काय असा मधली रेवती आपल्यासमोर सारखी नाचत राहते. पूर्वाश्रमी रविद्रांबरोबर मजा केलेली सुचित्रा विवाहबद्ध झाल्यावर, रविंद्र अन् तिचे सहवासातील ‘फोटोच्या ‘निगेटिव्हज् ’ मिळवण्यासाठी त्याच्या स्टुडिओला आग लावते. ही सुचित्रा कोण? हिच्या अंगी होता तो बाणा कोणता? ती मोडली? की वाकली? ‘ही वाट एकटीची’ मधली बाबी तर फारच वेगळी. आपल्यापेक्षा आपला बच्चा सवाई होईल. ताठ मानेनं जगेल, कोणापुढं मान तुकविणार नाही या आकांक्षेनं, कोणताहि प्रसंग आला तरी सत्याला सामोरी जात स्वत: आयुष्य खऱ्या अर्थाने जगते. आठले मास्तरांनी तिची कुंतीशी केलेली तुलना तिला आवडलेली नाही. लग्ना आधी मूल झालं तर पाप म्हणून या मुलाला जगात येण्याचा अधिकार न देण्याइतकी ती क्रूर नाही. पण अशानं या जगात तिला सुख केवळ मानसिक लाभलं. सत्यप्रिय व सत्यनिष्ठ जगात पुनर्जन्म घेण्याची तिची इच्छा आहे. ‘खेळणी’ मधलं सरोजच व्यक्तिमत्त्व आणखीच निराळ! ती म्हणजे खरोखरच न फुटणारं खेळणं आहे. दुसऱ्याला मोडायला अन् वाकायला लावणारी सरोज स्वत: अगदी ताठ आहे, चौपाटीवर बसल्यानंतर कपड्यांना लागणारी वाटू जितक्या सहजपणे झटकावी तितक्याच सहजी निरनिराळ्या पुरुषांना आपल्यापासून झटकणारी अन् जगातील बरेवाईट बरेच अनुभव घेऊन लग्न करण्याची जिद्द बाळगणारी ‘वाळू’ तली सुरेखा काही औरच आहे. आणखी किती तरी व्यक्ति ध्यानात राहतात. कितीतरी वाक्यं, संवाद लक्षात राहतात. पण किती म्हणून सांगावेत? त्यापेक्षा पुस्तक वाचाव हेच बरं. आगळी, लोभस शैली करमणूक म्हणून काळ्यांचा हा कथासंग्रह वाचायला घेतला तरी तो वाचल्यावर ‘केवळ करमणूक’ म्हणून एवढंच त्याचं स्थान निश्चितच राहत नाही. मनाच्या खोल गाभ्यापर्यंत काही व्यक्ति भिडतात, तर काही वाक्यं अंतरंगात खोलवर कोरली जातात. अननुभवी व्यक्तीला क्वचित त्या व्यक्तीचं भयही वाटेल. पण त्यात भिण्यासारखं काही नाही. उलट, अशी जिद्द मोडेन पण वाकणार नाही. बाण्याची माणसं जीवनात भेटायलाच हवीत, त्या आगळ्या जीवनाची थाडीशी तरी ओळख व्हायला हवी की! काळ्याचं नाव कथालेखक. म्हणून प्रसिद्धच आहे. छोट्या छोटया वाक्यांतून बराच मोठा आशय सांगण्याची त्याची हातोटी आता आपल्या परिचयाची आहे. मानवी जीवनातल्या तत्वज्ञानाच्या कधी कधी तर ते इतक्या जवळून जातात; पण न वाकणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून प्रत्येकाचं निराळं तत्त्वज्ञान ऐकताना त्यात रुक्षपणा किंवा कठोरपणा मुळीच जाणवत नाही. लालित्यातूनच ते जीवनाचा हा मागोवा घेतात हेच तर ‘वपुं’चे वैशिष्ट्य. -कालिंदी घाणेकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more