* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KEVAL MAITRISATHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980394
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :UMESH KADAM COMBO SET- 6 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EXPERIENCES GATHERED IN THE COURSE OF THE JOURNEY OF LIFE ARE A TREASURE. MEMORIES OF PEOPLE MET IN THE COURSE OF THIS JOURNEY KEEP LINGERING IN THE MIND REGARDLESS OF THEIR CAST OR CREED, NATIONALITY AND RELIGION. YOU ENCOUNTER IN THIS JOURNEY SOME UNBELIEVABLY UNIQUE PERSONALITIES WHOM YOU NEVER DREAMT TO MEET AND THEY OCCUPY A CORNER IN YOUR HEART, SO MUCH SO, THAT THEY LEAVE AN INDELIBLE IMPRINT ON YOUR MIND. YOU KEEP REMINISCING ABOUT THEM FOR THE REST OF YOUR LIFE. BECAUSE, UNKNOWINGLY YOU HAVE ALREADY BEGAN A UNIQUE FRIENDSHIP WITH THEM…EVERLASTING AND NEVER DIMINISHING…
आयुष्याच्या प्रवासात अनुभवांची शिदोरी हेच माणसाचं मोठं वैभव असतं. माणूस कोणत्याही जाती-जमातीचा, कोणत्याही पदावर काम करणारा असो; त्याचे अनुभव, आठवणी मनात रेंगाळत राहतात. काही खास व्यक्तिमत्त्वं आयुष्यात भेटतील असं स्वप्नातही वाटत नसताना अशा व्यक्ती अचानक समोर येऊन उभ्या राहतात आणि आपल्या जीवनाचा एक कोपरा व्यापून टाकतात. ण सांगता येणारे; पण आयुष्याचे रंग उजळवून टाकणारे असे काही बंध. त्या क्षणांचा सुगंध मनात दरवळत राहतो आणि त्यातूनच फुलून येते एक आगळीवेगळी मैत्री...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KEVALMAITRISATHI #KEVALMAITRISATHI #केवळमैत्रीसाठी #SHORTSTORIES #MARATHI #UMESHKADAM #उमेशकदम "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVSHAKTI 25 -10 -2009

    ‘केवळ मैत्रीसाठी’ हा कथासंग्रह असून यामध्ये उमेश कदम यांनी त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मित्रांच्या कथा रेखाटल्या आहेत. उमेश कदम हे ज्येष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांचे चिरंजीव, वडिलांकडूनच लेखनाचा वारसा त्यांना लाभला. उच्चशिक्षणासाठी त्यांनी परदेश प्वास केला, नंतरच्या काळातही सातत्याने परदेश प्रवास करण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले. १९९८ पासून ते आंतरराष्ट्रीयरेड क्रॉससाठी युद्धविषयक कायद्याचे विभागीय कायदा सल्लागार म्हणून काम पाहतात. या प्रवासात त्यांना विविध देशांमध्ये नाना प्रकारच्या व्यक्ती भेटल्या. यापैकी अनेकजण त्यांचे जिवलग मित्र बनले. अशा मित्रांच्या कथा त्यांनी ‘केवळ मैत्रीसाठी’ या पुस्तकातून मांडल्या आहेत. अलंकारिक भाषेचा वापर न करता साध्या सोप्या शब्दांत मांडलेल्या या कथा आपल्याशा वाटतात. १६० पृष्ठांच्या या पुस्तकात २४ मित्र आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव वाचायला मिळतात. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 11-4-2010

    मुशाफिरीत उमगला माणूस फिरत राहण्याने माणूस अनुभवसमृद्ध होतो. उमेश कदम यांनी स्वतःचं अनुभव विश्व मराठी वाचकांसमोर सढळ हाताने खुलं केलंय. उमेश कदम शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने निरनिराळया देशांमधून फिरले. त्यावेळेस त्यांना भेटलेली माणसं, त्यांचीपरिस्थिती यांची परस्पर संगती लावली. लोकांच्या मनाचा ठाव घेतला आणि त्यातून या कथा जन्माला आल्या. पर्यटनस्थळ तर कुणीही बघतं, परंतु ज्या देशात लेखक गेले त्या देशात तळागाळातून फिरस्ती केली. स्थानिक बाजार, वृत्तपत्रे, स्थानिक कर्मचारी यांचा त्यांना मदत झाली. माणूस वाचणारा लेखक म्हणून उमेश कदमांचा ‘केवळ मैत्रीसाठी’ हा कथासंग्रह मनास आल्हाद आनंद देऊन जातो. नेपाळ, फुकेत, लंडन, क्वालंलपूर, इथिओपिया, सिंगापूर, लाओस, उझबेकिस्तान इथे आलेल्या कार्यानुभवांचे आणि छोट्या-मोठ्या व्यक्तिगत प्रसंगांचे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक एकाग्रतेने वाचायला हवं कारण प्रसंगांचे वर्णन या संदर्भामुळेच जिवंत होते. देश-विदेशात माणूसपणाच्या भावना एकसारख्याच आहेत. परदेशात व्हिएन्तीयेनमध्ये वियेंगविलेच्या आईने स्वादिष्ट कसे कसे खाऊ घातले आणि गावाकडच्या कौसल्याकाकी आणि बबनची आठवण कशी आली याचे सुंदर वर्णन आहे. परदेशात कठीण प्रसंग आल्यावर आपल्या देशातल्या माणसाचे भेटणे, मदत मिळणे, त्यातून निभावून जाणे याची जाणीव परांजपे काकू या गोष्टीतून मिळते. हीच या कथासंग्रहाचा ताकद ठरलीय. प्रत्येक कथेतून नकळत एक संदेश दिला गेलाय. अतिशय प्रामाणिकपणे आणि सुसंगत, रसाळ भाषेतील केवळ मैत्रीसाठी हे पुस्तक वाचकांचा आनंद द्विगुणीत करेल यात शंकाच नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more