- Hansraj Patil
वपु च्या कथा म्हणजे काहीतरी वेगळेपण असणारच..हे मानत वाचायला घेतलं..सगळ्या कथा मनाला भिडणाऱ्या आहेत ..खूपच सुंदर पुस्तक...
- Manoj Mohale
"भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय देईलच ह्याची खात्री नसते.प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहायची असते हि माझी शिकवणं आहे.भावना प्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात.पण बुद्धी प्रधान माणुस हा स्वतःलाच नव्हे तर ईतराना सुद्धा आधार देतो".. मी हे पुस्तक चार पाच वेळा हाती घेतलं पण पूर्ण वाचण्याचा काही योग आला नाही काल संपवलं वाचुन बर का 😋 तसे वपु काळे माझे आवडते लेखक याची पुस्तक म्हणजे माझ्या साठी एक नेहमीच मेजवाणी राहते.जशे जशे आपण यातले काही कथा वाचता जातो तेव्हा आपल्याला समजत वपु कशे लिहतात त्याचा ऐकुन एक शब्द मला लागतो!म्हणून मी नेहमी याची पुस्तके वाचतो..आपण सुद्धा वाचून पाहा आणि अनुभव सांगा धन्यवाद 🙏😊...
- सौ. शीला मराठे
वसंत पुरुषोत्तम काळे यांचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा कथा संग्रह वाचनात आला. एकूण बारा कथांचा हा कथा संग्रह आपल्याला प्रत्येक कथेतून निराळ्याच सौंदर्याने चमकताना दिसतो.
व. पु. काळे यांनी या कथा संग्रहाद्वारे वाचकांच्या हृदयात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. कथा वाचताना गाभाऱ्यात नकळत व सहज कोरला जातो. कथेतील वास्तववादी जीवन व प्रगट करण्यासाठी वापरलेली भाववाही भाषा शैली यांचा सुंदर संगम कथा वाचताना अनुभवास येतो.
या संग्रहातील प्रत्येक कथेत आपल्याला जिद्द. करारीपणा, चिकाटी व त्यासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत चालत असलेला झगडा दिसून येतो. हिऱ्याच्या पैलूप्रमाणे निरनिराळ्या पात्रांच्या रूपाने माणसाच्या स्वभावाचे पैलू चमकताना दिसतात. सजीव चित्रण व साधी सरळ भाषाशैली हे याच्या कथेचे मोठे वैशिष्ट्य होय.
‘‘सुंभ जळतो पीळ उरतो.’’ यामधील न्यायासाठी आमरण उपोषण करणारा धाकटा भाऊ तर ‘‘जंक्शन’’ मधील आपल्या हक्काची वाद लावून घेणारी रेवती, सारख्याच करारीपणानं वागताना दिसतात. ‘निगेटिव्ह’ मध्ये स्वार्थापायी स्टुडिओ जाळण्याचे सुचित्राने केलेले नीच कारस्थान तर रविंद्राचे तितकेच उदार अंत:करण यांचा अपूर्व संगम या कथेत पहावयास मिळतो. सुंदर असूनही शारीरिक पंगुत्वामुळे मुलींची लग्नाच्या बाजारात होणारी हेळसांड. पण त्याहीपेक्षा मानसिक दुबळेपणाने वागणारा आजचा तरुण वर्ग किती असमर्थ आहे याचे प्रत्यंतर ‘पंगु’ या कथेद्वारे येते. स्वाभिमानी के जी काकांना अखेर रस्त्यावर सामान विकणाऱ्या पंकजपुढे हार खावी लागली. एका क्षुल्लक मुलाने आपल्या प्रेमळ व उदार स्वभावाने सगळ्यांना भारावून टाकले. याचा अनुभव ‘पराधीन आहे जगती’ यामध्ये येतो. स्वाभिमानी सरोजने पैशाचा गर्व असलेल्या कुमारला हे दाखवून दिले की, ‘गरीब माणसं ही श्रीमंतीच्या हातातली नक्की खेळणी होऊ इच्छित नाहीत.’’ या वास्तववादी सत्याचा साक्षात्कार ‘खेळणी’ या कथेत होतो. मंगलसारख्या निष्पाप भाबड्या मुलीच्या क्षणभरच लाभलेल्या प्रेमाशी बेईमानी न करणारा रमेश ‘जलधारा’मध्ये बिजलीसारखा चमकून जातो तर समाजातील सुखदु:खाचा अनुभव घेऊन ती किती फसवी आहेत याचा साक्षात्कार होताच त्यांना वाळूच्या कणाप्रमाणे झटकून टाकणारी सुरेखा ‘‘वाळू’’चा कथेत पाहावयास मिळते. ‘‘पाळणा’’ मध्ये माया मिथ्याचा लेखकाला आलेला साक्षात्कार अनुभवास येतो. ‘‘ही वाट एकटीची’’ या कथेतील सत्याने वागणारी बाबी तर ‘‘जिद्द’’ मधील जिद्दीने वागणारे दादा सारख्याच महत्त्वाचे ठरतात.
‘‘पापा’’ कथेतील आईच्या व पपांच्या वात्सल्य प्रेमाची चाललेली कुचंबणा व ते प्रेम व्यक्त न करता दाबून ठेवण्यासाठी चाललेला प्रयत्न हा स्वभाव चित्रणाचा उत्तम नमुना खरोखरीच आपल्या मनावर प्रभाव पाडून जातो.
अशा तऱ्हेने ‘‘मोडेन पण वाकणार नाही’’ मधील सगळीच पात्रे या नावाप्रमाणेच अपूर्व व उदात्त जीवन जगताना दिसतात. व. पु. काळे यांचा हा कथासंग्रह वाचकांना एक नवी दृष्टी देऊन जातो त्यात शंकाच नाही.
- DAINIK TARUN BHARAT 06-12-1970
श्री. व. पु. काळे यांच्या आगळ्या शैलीने रंगलेल्या गूढ जीवनकथा...
कुठल्याशा वाळवंटात पावसाची एक सर अचानक येते अन् जवळ असणारं एखादं वाळक झाड आणखी तग धरून राहतं... पानं, फुलं, नसतातच पण तरी ते वाकत नसतं, क्वचित वादळ जोराचच झालं तर उन्मळून मात्र पडत. ते झाड वाळवंटातच असेल असेही नाही. सुपीक प्रदेशातसुद्धा वठलेलं, वाळकं झाड दिसत नाही असं नाही.
‘मोडेन पण ... वाकणार नाही. जिवात जी असे तो ताठ मानेनं राहीन’ पण कशापुढंही हार नाही पत्करणार, अशाच बाण्यानं जगणारी माणसं या आपल्या समाजात पाहायला मिळतात... ती माणसंही कधी त्या झाडाप्रमाणे उन्मळून पडणार असतात. पण त्याची त्यांना पर्वा नसते.
वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या निरीक्षणातून अन् अनुभवातून तर अशी माणसं सुटणं कठीणच नाही का? अर्थात हे पटलं ते त्यांचा हा कथासंग्रह वाचूनच.
कुठेतरी धागा गुंफला जातो...
पु. लं. च्या ‘व्यक्ति आणि वल्ली ची चटकन आठवण होते हा कथा संग्रह वाचताना. लिहीण्याची धाटणी तशाच पद्धतीची. वाचल्याबरोबर लेखकाला विचारावंत वाटवणारी की, ही व्यक्ती कुठंय ती वल्ली तुम्हाला कुठं भेटली?’’
अनुभव असे मिळतात म्हणून कथा लिहिल्या जातात की त्या गोष्टीतल्या प्रमाणे आपण प्रसंग अनुभवतो?
आता हेच पहा ना! ‘जलधारा’ मधील मंदा नाईक ही अगदी आपल्यातली. पण गर्दी असताना सिनेमाचं तिकिट ऑफर करणारा उमदा रमेश अन् त्याचा मोकळा स्वभाव कुठला? ही ‘मोडेन पण वाकणार नाही’ या बाण्याचा! मंगला नामक एका मुलीशी एका जलधारित पडलेल्या बाणाशी एकनिष्ठ राहणारा!
‘सुंभ वळतो पीळ उरतो’ मधले लेखकांच्या मित्राचे मित्र ‘धाकटा’ अन् ‘मोठा’ यांचे स्वभाव असे चमत्कारीकच. प्रोड्यूसर होण्याच्या आशेनं नटीच्या घरी ‘टॉमी’ असलेलेला मोठा भाऊ अन् लेटमार्क केला जाऊ नये यासाठी उपोषण करीत मृत्यूला मिठी मारणारा धाकटा दोघेही जिद्दीच नव्हे तर काय? ‘जिद्द’ मधला जिद्दी दादाही असाच पिळाचा माणूस.
पुरुषांप्रमाणेच स्त्रियासुद्धा मोडतील पण वाकत नाहीत अशातल्या!
या स्त्रियासुद्धा तशा जिद्दी!
किंबहुंना कथासंग्रहात पुरुषांपेक्षा अशाच स्त्रियांचे विविध नमूने आहेत. ‘पंगू’ मधली मोहिनी अगदी मनात ठाण मांडून बसते. कथा वाचता वाचता आपणसुद्धा तिच्या मनानं मानानं पंगूच आहोत काय असा मधली रेवती आपल्यासमोर सारखी नाचत राहते. पूर्वाश्रमी रविद्रांबरोबर मजा केलेली सुचित्रा विवाहबद्ध झाल्यावर, रविंद्र अन् तिचे सहवासातील ‘फोटोच्या ‘निगेटिव्हज् ’ मिळवण्यासाठी त्याच्या स्टुडिओला आग लावते. ही सुचित्रा कोण? हिच्या अंगी होता तो बाणा कोणता? ती मोडली? की वाकली?
‘ही वाट एकटीची’ मधली बाबी तर फारच वेगळी. आपल्यापेक्षा आपला बच्चा सवाई होईल. ताठ मानेनं जगेल, कोणापुढं मान तुकविणार नाही या आकांक्षेनं, कोणताहि प्रसंग आला तरी सत्याला सामोरी जात स्वत: आयुष्य खऱ्या अर्थाने जगते. आठले मास्तरांनी तिची कुंतीशी केलेली तुलना तिला आवडलेली नाही. लग्ना आधी मूल झालं तर पाप म्हणून या मुलाला जगात येण्याचा अधिकार न देण्याइतकी ती क्रूर नाही. पण अशानं या जगात तिला सुख केवळ मानसिक लाभलं. सत्यप्रिय व सत्यनिष्ठ जगात पुनर्जन्म घेण्याची तिची इच्छा आहे.
‘खेळणी’ मधलं सरोजच व्यक्तिमत्त्व आणखीच निराळ! ती म्हणजे खरोखरच न फुटणारं खेळणं आहे. दुसऱ्याला मोडायला अन् वाकायला लावणारी सरोज स्वत: अगदी ताठ आहे, चौपाटीवर बसल्यानंतर कपड्यांना लागणारी वाटू जितक्या सहजपणे झटकावी तितक्याच सहजी निरनिराळ्या पुरुषांना आपल्यापासून झटकणारी अन् जगातील बरेवाईट बरेच अनुभव घेऊन लग्न करण्याची जिद्द बाळगणारी ‘वाळू’ तली सुरेखा काही औरच आहे.
आणखी किती तरी व्यक्ति ध्यानात राहतात. कितीतरी वाक्यं, संवाद लक्षात राहतात. पण किती म्हणून सांगावेत? त्यापेक्षा पुस्तक वाचाव हेच बरं.
आगळी, लोभस शैली
करमणूक म्हणून काळ्यांचा हा कथासंग्रह वाचायला घेतला तरी तो वाचल्यावर ‘केवळ करमणूक’ म्हणून एवढंच त्याचं स्थान निश्चितच राहत नाही. मनाच्या खोल गाभ्यापर्यंत काही व्यक्ति भिडतात, तर काही वाक्यं अंतरंगात खोलवर कोरली जातात.
अननुभवी व्यक्तीला क्वचित त्या व्यक्तीचं भयही वाटेल. पण त्यात भिण्यासारखं काही नाही. उलट, अशी जिद्द मोडेन पण वाकणार नाही. बाण्याची माणसं जीवनात भेटायलाच हवीत, त्या आगळ्या जीवनाची थाडीशी तरी ओळख व्हायला हवी की!
काळ्याचं नाव कथालेखक. म्हणून प्रसिद्धच आहे. छोट्या छोटया वाक्यांतून बराच मोठा आशय सांगण्याची त्याची हातोटी आता आपल्या परिचयाची आहे. मानवी जीवनातल्या तत्वज्ञानाच्या कधी कधी तर ते इतक्या जवळून जातात; पण न वाकणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून प्रत्येकाचं निराळं तत्त्वज्ञान ऐकताना त्यात रुक्षपणा किंवा कठोरपणा मुळीच जाणवत नाही. लालित्यातूनच ते जीवनाचा हा मागोवा घेतात हेच तर ‘वपुं’चे वैशिष्ट्य.
-कालिंदी घाणेकर
- माधव मनोहर
व. पु. काळे यांच्या मर्मभेदक कथा...
काही कमताकद लेखकांना त्यांच्या लेखनगुणांचा विचार करता-गैरवाजवी प्रसिद्ध मिळते, आणि काही ताकदवान लेखकांना त्यांच्या लेखनगुणांचा विचार करता वाजवी तीहि प्रसिद्धी लाभत नाही. असं का व्हावे, ते ही समजतं नाही. काही ताकदवान लेखकांना त्यांच्या लेखनगुणांचा प्रमाणात योग्य ती प्रसिद्धी कधी मिळणारच नाही का, आणि कधी काळी ती मिळणारच असल्यास त्यासाठी त्यांनी किती काळापर्यंत वाट पाहावी, त्यालाही कधी मर्यादा नाही. आणि संभव आहे की कदाचित वाजवी प्रसिद्धी त्यांची वाट शोधीत कधी येणारही नाही. हा विचार मनात आला की विचारत्रस्त मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही. मला वाटते, व. पु. काळे यांच्या संबंधात हा विचार खरोखरच करण्यासारखा आहे. गेल्या काही वर्षात एक डझनभर तरी कथासंग्रह त्यांच्या नावाच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि त्या कथासंग्रहाच्या बळावर ह्या वेळेपर्यंत केवळ अग्रगण्य नव्हे, पण निदान– पक्षी अग्रगण्य कथाकारांपैकी एक अशी त्यांची गणना आजवर व्हावयास हवी होती, असे वाटल्याशिवाय राहत नाही.
मूलत: स्वभावप्रधान असलेला कथा घटनाप्रधान ही आहेत, घटना अर्थातच अशा शोधलेल्या की ज्या स्वभाविशेषांवर प्रकाशाचा झोत टाकतील, आणि स्वभाविशेष पुन्हा एकच मोडेन, पण वाकणार नाही पण तो एकच एक स्वभाव विशेष व्यक्त करणाऱ्या व्यक्तित्वाच्या तऱ्हा किती तऱ्हेवाईक असू शकतात. ते समजून घेण्यासाठी तरी निदान काळ्यांचा हा कथासंग्रह अवश्य वाचावयास हवा. अखंड दहा वर्षे सदा सर्वकाळ नियमित वेळेवर ऑफिसमध्ये जाणारा एक कारकून एक दिवस केवळ दहाच मिनिटे उशीरा ऑफिसला जातो आणि आपल्या नावाखाली लेट मार्कची तांबडी खूण पडलेली पाहून इतका खवळतो की ती खूण रद्द करून घेण्याच्या प्रयत्नात तो आपले आयुष्य संपवतो. सासरच्या माणसांचा मुका छळ असह्य झाल्यामुळे बायको स्वत:ची बदली दिल्लीस करून घेते ते बघून आजीही हवी आणि बायको पण हवी. अशा कात्रीत सापडलेला नवरा व्यथित होतो एक पुरुष आवडला म्हणून त्याचा सहवास अनिर्बंध भोगणारी स्वैरिणी तिचे सहवासरहस्य उघडकीस आणू शकणाऱ्या निगेटिव्हजच्या शोधात आपल्या फोटाग्राफर प्रियकराच्या स्टुडिओलाच आग लावून देते आणि तो वंचित प्रियकर आगीत घुसून प्राणपणाने पैदा केलेल्या त्या निगेटिव्हज् शांतपणे आपल्या प्रयसीच्या हवाली करतो. एका पायाने अधू असलेली एक मनस्विनी वधू तिला पाहण्यासाठी म्हणून घेणाऱ्या भावी वराच्या मनाचे अधूपण नेमके उघडकीस आणते आणि सममनस्क मनस्वी पण कथाहत पुरुषाचा स्वीकार करते एका सुस्वभावी सिंधी फेरीवाल्यापोराच्या निर्लोभ उपकार भरातून स्वत:ला सोडवण्यासाठी एक खाष्ट पण शिष्ट म्हातारा नाना लटपटी खटपटी करतो पैशासाठी स्वत:ला विकून न घेणारी एक मानिनी एका लक्षाधीश प्रियकराला आपला निर्धन पण सुखी संसार दाखवून शरमिंदा करते. एक विक्षिप्त निर्भय तरुण आपण एका मोहवश स्त्रीच्या हत्येस कारण झालो, त्या पापाची निष्कृति करण्यासाठी म्हणून नंतरच्या प्रेयसीला स्वत:जवळ येऊ देत नाही. दुसऱ्यांच्या संसारानुभवानं वैतागलेली एक प्रौढ पण सुंदर स्त्री आपले थंडगार निश्चितेने शरीर एका प्रेमिकाच्या हवाली करते. आपल्या आईच्या आकस्मिक मरणाच्या परिणामी सन्यस्त वृत्तीने जगणारा तरुण आपण भावजयीच्या तान्ह्या मुलाच्या अपघाती मृत्युस कारण झालो, अशा जाणिवेने भावजयीला तिचे अपत्य परत करण्यासाठी म्हणून एक अडलेल्या करुण स्त्रीशी लग्न करतो, आणि अंती तिच्याही मृत्यूला कारण होते त्या मुलाला समाज मानणार नाही अशा अपत्याला जन्म देण्यासाठी म्हणून एक सत्यनिष्ठ, स्त्री आपले माहेर, घरदार-संसार सर्व सोडून मोठ्या अभिमानाने समाजाला न पटणारे जीवन जगते. पण शेवटी आपला शाळकरी मुलगाच खोटे बोलला, म्हणून त्यालाही निष्ठुरपणे घराबाहेर काढते. नवरा केवळ जिद्दीसाठी म्हणून आपले अवघे जीव जुगाराच्या कैफात झोकून देतो. पण त्याच्या या बेफाम जिद्दीची बळी ठरते ती त्याचीच पत्नी लग्नापूर्वी जिचे पाऊल वाकडे पडले, अशा पत्नीच्या असूड मातृत्वाचे पाप स्वत: भोगणारा उदात्त हृदय पुरुष आपल्या पत्नीला परपुरुषापासून झालेली मुलगी स्वत:ला पपा म्हणून हा मारण्यास तयार नाही. म्हणून मरणाच्या क्षणी टाहो फोडतो... हे सर्वच स्त्री पुरुष मोडेन, पण वाकणार नाही या धारणेचे घडवलेले असले तरी त्यांचे अनुबंध परिसर भिन्न भिन्न असल्याच्या परिणामी त्यांची आयुष्येही भिन्न भिन्न ताणांनी तोललेली आणि बांधलेली कशी आहेत, त्याचा प्रत्यय उपयुवर अतिसंक्षिप्त परिचयाच्या परिणामी जिज्ञासु वाचक सहज भोगू शकेल. आणि त्यातील मनोरम मनोविश्लेषाची कल्पनाही करू शकेल. काळ्यांनी निर्माण केलेले हे बाणेदार मनोगतांचे विराट विश्व क्चित केव्हा करुण असले तरी ते निरपवाद भीषण आहे. कारण या सर्वच स्त्रीपुरुषांना कळत न कळत ट्रॅजिडीचे परिणाम लाभले आहेत. ट्रॅजिडी ही वस्तू मुळातच स्वस्त नाही. आणि मराठी भाषेच्या परिसरात तर ट्रॅजिडी एकूण दुर्मिळच आहे. स्वभावप्राप्त ट्रॅजिडीचे आव्हान व. पु. काळ्यांनी अशा सामर्थ्याने स्वीकारले आहे की यापुढे अग्रगण्य मराठी कथाकारात त्यांची गणना करण्यावाचून गत्यंतरच नाही.
- NEWSPAPER REVIEW
आपापल्या जीवनमूल्यांना कवटाळून ताठ कण्याने जगू पाहणाऱ्या व्यक्ती...
सुंभ जळतो-पीळ उरतो, निगेटिव्ह, पंगू, पराधीन आहे जगती, खेळणी, जलधारा, पाळ्या, पपा अशा आठ कथांचा `मोडेन पण वाकणार नाही` या पुस्तकात समावेश आहे. या आठही कथांतून लोकविलक्षण अशा जिद्दी व्यक्तींची जीवनशैली चितारण्यात आली आहे. स्वतःच्या मतप्रणालीचा आग्रह धरणारी, आपल्या हट्टाच्या पूर्ततेसाठी इतर सर्वांना धुडकावून लावणारी, पण माघार न घेणारी अशी माणसे वपुंना आवडतात आणि त्यांना समजावून घेण्याची जिद्द आणि चिकाटी ते दाखवितात.
एखाद्याच्या रक्तातच वेगळेपण असते. जिद्दीने पेटणे हाच त्याचा स्थायी भाव असतो. एकाकी राहून झगडत राहण्यातच त्याला समाधान मिळते. अशी माणसे मरतात. पण मागे हटत नाहीत. जिवावर उदार होऊन ती जगत असतात.
दहा वर्षात एकदाही रजा न घेतलेल्या आणि लेटमार्क नसलेल्या एकाला दहाच मिनिटे उशीर झाला म्हणून प्रथमच लेटमार्क पडतो. हा लेटमार्क काढून टाका म्हणून तो हेडक्लार्कला सांगतो. हेडसाहेबांकडे जातो, ते दाद देत नाहीत, तेव्हा तो ऑफिस समोरच्या फूटपाथवर झाडाखाली प्राणान्तिक उपोषणाला बसतो. अकराव्या दिवशी त्याची तब्येत अगदी बिघडते. त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून रघुनाथ वर्तक हा गृहस्थ निरनिराळ्या ऑफिसर्सना भेटतो. अठरा दिवस जातात; तेव्हा रघुनाथ उपोषण करीत असणाऱ्या व्यक्तीच्या मोठ्या भावाला भेटतो. तो एका नटीच्या घरी राहत असतो. बिनपगारी नोकरी करीत कुत्र्याचं जिणं जगणारा तो भाऊ प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये थोडीफार रक्कम कमिशन म्हणून काढून साठवत असतो. स्वतःचे पिक्चर काढायचं स्वप्न बघत असतो, त्याच्याजवळ धाकट्या भावाला देण्यासाठी मात्र पैसे नसतात.
व. पु. काळे या हकीगतीतील दाहकता आणखी गडद करतात. पंचविसाव्या दिवशी धाकटा भाऊ उपोषणातच मरतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यास लेटमार्क माफ केल्याचे पत्र मिळते.
सहा वर्षे झाल्यानंतर मोठा भाऊ नोटांनी खच्चून भरलेली बॅग धाकट्या वहिनीकडे घेऊन जातो. पिक्चर काढणं जमणार नाही हे त्याला कळलेलं असतं. वहिनी म्हणते, ``भाऊजी, थांबा! ती बॅग उचला. ते विष या घरात नको. सहा वर्षापूर्वी यातील एक नोट मिळाली असती तरी ती लाखाच्या ठिकाणी होती. नको असताना घरात येणारा पैसा विषच असतो. आता दारिद्र्य मी पचवलं आहे. दारिद्र्य कसं उपभोगायचं ते मला समजलंय.``
हे दोघे भाऊ आणि वहिनी तिघेही विक्षिप्तच! प्रत्येकाचा स्वभाव जिद्दी!
`निगेटिव्हज`मधील सुचित्रा फोटोग्राफर रवीन्द्रबरोबर फिरते, मजा करते; पण ती लग्न करते श्रीमंत घारपुऱ्यांशी. घारपुरे रवीन्द्रला फोटो स्टुडिओसाठी भांडवल देतात. सुचित्रा त्यात पार्टटाईम काम करू लागते. रवीन्द्रजवळ तिचे काही विशिष्ट पोझमधील फोटो असतात. त्याच्या निगेटिव्हज मिळवण्यासाठी सुचित्रा सतत त्यांचा शोध घेते; आणि शेवटी स्टुडिओलाच आग लागते. रवीन्द्र तिला त्या फोटोंच्या निगेटिव्हज देऊन सांगतो. ``या चार निगेटिव्हजसाठी तू जंग जंग पछाडलेस, स्वतःच्या संसाराला आग लागू नये म्हणून तू अनेकांच्या संसाराला आग लावलीस... तुझं वाटोळं करायचं असतं तर मी तुझी पहिली रात्रही उगवू दिली नसती. पण मला तसं काही करायचं नव्हतं. आणि नाही पण!``
त्या निगेटिव्हजसाठी सुचित्रा कोणत्या थराला जाते हे पाहून आश्चर्य वाटते.
मोहिनी गोडबोले दिसायला सुंदर; पण तिच्या पायात व्यंग असते, त्यामुळे तिच्या लग्नात अडथळे येतात. बहात्तर नकार तिला मिळतात. साठे यांच्याशी तिचे लग्न ठरलेय कळल्यावर त्याने `सुमित्राला पूर्वी प्रेमाच्या आणाभाकाही घेऊन, नंतर नकार दिल्याने तिला आत्महत्या करावी लागली,` ही हकीगत सांगायला साठेचा पूर्वाश्रमीचा मित्र मोहिनीकडे जातो. ती त्याला सुनावते, ``मी पायानं लंगडी आहे. तुम्ही मला नकार दिलात. तुम्ही मनानं लंगडे ठरलात. मला माझा शारीरिक पंगूपणा नडला नाही तेवढा तुम्हाला तुमचा मानसिक पंगूपणा नडला.``
``साठे यांनी मला सगळं सांगितलंय. मोहापुढे वाकायची वेळ आली तेव्हा मी वाकलो असं सांगणारा पुरुष मला भेटला. त्याच्याजवळ लपवाछपवी नाही. म्हणून तुम्ही लग्नाला या. मित्र म्हणून, हितिंचतक म्हणून.``
सर्वसामान्य माणसाचं मानसिक पंगुत्व वपु `पंगू` या कथेत अशा प्रकारे मांडतात.
नानासाहेब देशमुखांनी लग्नाआधीच एका स्त्रीशी केलेल्या जवळिकीतून जन्मलेल्या वीणाला अठरा वर्षे अनाथाश्रमात काढावी लागतात. अठराव्या वर्षी तिला ते घरी न्यायला येतात, तेव्हा वीणा विचारते, ``घरी माझी ओळख काय देणार?`` ते म्हणतात, ``माझी मुलगी म्हणूनच घरची सर्व माणसे तुला स्वीकारतील. माझी दोन्ही मुलं, पत्नी, आई तुझं स्वागत करायला उत्सुक आहेत. इतके दिवस तुला घरी नेऊ शकलो नाही, कारण माझे वडील हयात होते. त्यांना ही गोष्ट सांगण्याचे धाडस माझ्यात नव्हते.``
वीणा त्यांच्याबरोबर घरी जाते. तिचे यथास्थित स्वागत होते. तिला स्वतंत्र खोली देण्यात येते. देशमुखांच्या पत्नीला ती आई म्हणते, पण त्यांना `पपा` अशी हाक ती मारू शकत नाही. ती कॉलेजला जाते, तिला कार मिळते. ती एम. ए. होते. तिचे एका प्राध्यापकाशी लग्न ठरते. देशमुख तिचे लग्न थाटामाटात करून देतात. वीणाने आपल्याला पपा अशी हाक मारावी एवढीच त्यांची इच्छा असते; पण वीणा ती इच्छा पूर्ण करीत नाही. आश्रमातील गुरुजी नंतर तिला सांगतात की, देशमुख हे तिचे वडील नव्हते; परंतु त्यांची पत्नी ही तिची खरी आई आहे. देशमुखांचे वडील वारल्याने तिने नवऱ्याला सर्व सांगितले आणि पपांची भूमिका निभावण्याचे कबूल केले. देशमुखांची आई जिवंत असल्याने देशमुखांची पत्नी मात्र वीणाला थोडीफार दूरच ठेवत राहिली. सासूला संशय येऊ नये म्हणून.`` तेव्हा साहजिकच वीणाच्या तोंडून पपा अशी हाक येते.
कृष्णाजी गाडगीळ म्हणजे केजी नगरपालिकेत अकाऊंटस खात्यात कामाला होते. परळच्या भर वस्तीतले त्यांचे घर आता पडझडीमुळे दयनीय झालेले. दुरुस्तीची ऐपत नाही; विकताही येत नाही अशा त्या घराजवळ पंकज हा सिंधी मुलगा, ``कोई भी चीज आठ आठ आना. रुपये का दो उठाव, जर्मन कंपनी का दिवाला`` ओरडत माल विकू लागतो. त्याच्या ओरडण्याने केजींचे डोके उठते. त्याला तेथून हुसकावून लावण्यासाठी ते बायकोला सांगतात. पण बायको उलट त्याच्याकडूनच वस्तू खरेदी करते. त्या पोराला चहा देते; वेळीअवेळी त्याला हवे ते काम सांगते. एकदा अडचणीत पंकजचे पाचशे रुपये केजी वापरतात आणि पंकज जणू त्यांचा सावकार बनतो. या पंकजकडून मिळणाऱ्या मदतीने ते एकीकडे मिंधे होतात, दुसरीकडे त्याच्यावर जळफळत राहतात. केजींच्या आजारपणात तो तीन हजार रुपये खर्चासाठी देतो. केजी त्याला म्हणतात, ``तुझे पैसे मी परत करीन.`` तो म्हणतो, ``इस घर में हमने दूधभात खाया है, इधर हम कौनसा भी हिसाब रखना नही चाहते... बिझिनेस में कैसे भी कमाऊंगा. घर गया, मोटरगाडियाँ गयी, माँ गयी, बाप गया, तीन हजार की बात छोड दो.`` जातानाही तो केजींना असा ओशाळवाणा करून जातो. हे सर्व विलक्षण ओढाताणीचे नाते `पराधीन आहे जगती` या कथेत उलगडत जाते.
कॉलेजातील कुमारची प्रेयसी असणारी पण लग्नाला नकार देणारी सरोज मुलांची खेळणी उत्पादित करणाऱ्या माधवरावांशी लग्न करते. लग्नानंतर तिची परिस्थिती जेमतेमच असते. पण कुमार मात्र आर्थिकदृष्ट्या चांगली प्रगती करतो. तो आपल्या श्रीमंतीच्या दिमाखाने सरोजला मिंधे करू पाहतो. भारी कपबशीचा सेट तिला भेट देतो. मुलाला खेळणी आणून देतो. माधवरावांनाही तो पार्टनरशिपमध्ये खेळण्याचा स्टॉल काढण्याची ऑफर देतो. परंतु सरोज त्याला विरोध करते. ``वारंवार मदत करून आम्हाला लुळं करायचं आहे, तुला नकार देऊन मी फसले, मी दुःखी आहे, असे माझ्या तोंडून तुला ऐकायचं आहे? पण तसे शब्द येणार नाहीत. मला माझ्या आत्मबळाची कल्पना आहे. मी तिला बधणार नाही.`` तेव्हा कुमारला स्वतःचीच शरम वाटते. सरोज हे न फुटणारं खेळणं आहे, ते ज्याच्यावर पडतं ती वस्तू फुटते तसं आपण फुटतोय असं कुमारला वाटतं. सरोज त्याला आणखी पुढं सांगते, ``माणसं जोडायची आहेत मला. मात्र पैशाचा डाग लावून नाही, तर मायेचा!``
अशा व्यक्तींच्या आणि नात्याच्या संघर्षाचे क्षण वपु काळे यांना टिपावेसे वाटतात. एकेकाचा मान, अभिमान आणि स्वाभिमान, त्यावर होणारे आघात, दुसऱ्यावर इम्प्रेशन मारायचा व त्याला मिंधे करण्याचा अहंभाव आणि स्वभाव, यांचा वेगवेगळ्या कोनातून ते शोध घेतात. वपु फँटसीवजा भराऱ्यात रमतात; परंतु या संग्रहातल्या कथांत वास्तवातल्या व्यक्तीच त्यांच्या लेखनाचा विषय झालेल्या दिसतात. या सर्व व्यक्ती आपापल्या मूल्यांबाबत आग्रही आहेत. कणा असलेल्या आहेत. रोखठोक विचार करणाऱ्या आहेत. `जलधारा` मधील नायिका मंदा नाईक पावसात नुकत्याच ओळख झालेल्या रमेश देशपांडेच्या फ्लॅटवर जाते. तो जरा कोपऱ्यावरून येतो असे सांगून तिला घरातली नवीकोरी साडी देऊन ओली साडी बदलून घ्या असे सुचवितो. तिच्या मनात काय विचार येतो तर, `एवढा सरळ माणूस. असं गुपचूप काही करणार नाही. तो जरासा वाह्यात असेल. पण निर्भीड आहे. तो खरा पुरुष आहे. तसं काही वाटलं तर सरळ सरळ म्हणेल की-माझ्या मनातून तुम्हाला एक मिठी मारावीशी वाटतेय. होकार असेल तर सांगा. नकार असेल तर...`
हा मोकळेपणाही वपुंच्या व्यक्तींचा सच्चेपणा प्रकट करतो. तो वाचकांना आकृष्ट करून घेतो.
- NEWSPAPER REVIEW
आपापल्या जीवनमूल्यांना कवटाळून ताठ कण्याने जगू पाहणाऱ्या व्यक्ती...
सुंभ जळतो-पीळ उरतो, निगेटिव्ह, पंगू, पराधीन आहे जगती, खेळणी, जलधारा, पाळ्या, पपा अशा आठ कथांचा `मोडेन पण वाकणार नाही` या पुस्तकात समावेश आहे. या आठही कथांतून लोकविलक्षण अशा जिद्दी व्यक्तींची जीवनशैली चितारण्यात आली आहे. स्वतःच्या मतप्रणालीचा आग्रह धरणारी, आपल्या हट्टाच्या पूर्ततेसाठी इतर सर्वांना धुडकावून लावणारी, पण माघार न घेणारी अशी माणसे वपुंना आवडतात आणि त्यांना समजावून घेण्याची जिद्द आणि चिकाटी ते दाखवितात.
एखाद्याच्या रक्तातच वेगळेपण असते. जिद्दीने पेटणे हाच त्याचा स्थायी भाव असतो. एकाकी राहून झगडत राहण्यातच त्याला समाधान मिळते. अशी माणसे मरतात. पण मागे हटत नाहीत. जिवावर उदार होऊन ती जगत असतात.
दहा वर्षात एकदाही रजा न घेतलेल्या आणि लेटमार्क नसलेल्या एकाला दहाच मिनिटे उशीर झाला म्हणून प्रथमच लेटमार्क पडतो. हा लेटमार्क काढून टाका म्हणून तो हेडक्लार्कला सांगतो. हेडसाहेबांकडे जातो, ते दाद देत नाहीत, तेव्हा तो ऑफिस समोरच्या फूटपाथवर झाडाखाली प्राणान्तिक उपोषणाला बसतो. अकराव्या दिवशी त्याची तब्येत अगदी बिघडते. त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून रघुनाथ वर्तक हा गृहस्थ निरनिराळ्या ऑफिसर्सना भेटतो. अठरा दिवस जातात; तेव्हा रघुनाथ उपोषण करीत असणाऱ्या व्यक्तीच्या मोठ्या भावाला भेटतो. तो एका नटीच्या घरी राहत असतो. बिनपगारी नोकरी करीत कुत्र्याचं जिणं जगणारा तो भाऊ प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये थोडीफार रक्कम कमिशन म्हणून काढून साठवत असतो. स्वतःचे पिक्चर काढायचं स्वप्न बघत असतो, त्याच्याजवळ धाकट्या भावाला देण्यासाठी मात्र पैसे नसतात.
व. पु. काळे या हकीगतीतील दाहकता आणखी गडद करतात. पंचविसाव्या दिव%E