* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662634
  • Edition : 5
  • Publishing Year : 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AGAIN A COLLECTION OF SHORT STORIES. WHAT IS HISTORY? IT IS THE CHAIN OF SUCH EVENTS IN THE PAST WHICH ARE DEEPLY ENGRAVED ON OUR MINDS. OFTEN, SOME MOMENTS, SOME INCIDENCES ARE IMPRINTED ON OUR MIND AND VERY FEW OF SUCH INCIDENCES HAVE THE STRENGTH TO REMIND US OF THE SORROW, OF THE IMMENSE PAIN. THIS COLLECTION IS OF SUCH TENDER MOMENTS, OF THOSE MEMORIES WHICH WE THINK WE HAVE FORGETTEN, BUT NOW WHEN REVEALED STILL POSSESS THE SAME VIGOUR TO TOUCH US; UNMISTAKABLY BY RANJIT DESAI, A WRITER WITH MUCH UNDERSTANDING OF THE WORDS AND THE LITERATURE.
जे घडून गेलं; पण मनामनावर कोरलं गेलं त्याचा ‘इतिहास’ होतो. अनेक क्षण, प्रसंग काळावर आपले ठसे उमटवून गेले. काही चाहूल न लागताही आपले अवशेष मागे ठेवून गेले. काही प्रसंगाचे ओरखडे मात्र आज आठवणीनंही जखम ओली करतात. अशाच फार फार जुन्या आठवणींचा हळूवार पडदा बाजूला सारत, त्या क्षणांचा अनुभव ताजा करणारा, बोलीभाषेचा बाज घेऊन रणजित देसाई यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाचा अक्षरसाज लेवून आलेला कथाविष्कार...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarJANSHAKTI 11-08-1991

    बाबुलमोरा भरजरी, मखमली कथा संग्रह... सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रणजित देसाई यांचे वाङ्मय प्रसिद्ध करण्याची देखण्या आणि आकर्षक स्वरुपात पेश करण्याची बरीचशी कामगिरी पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने घेतली आहे. त्यांनी रणजित देसार्इंच्या कथांचे तीन संगरह प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी ‘बाबुलमोरा’ ही रागदारीच्या गाण्याचा मुखडा असलेला एक कथा संग्रह आहे. ‘स्वामी’कार रणजित देसाई हे कादंबरीकार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके कथाकार म्हणून वाचकांना कमी परिचयांचे आहेत. परंतु त्यांच्या लेखनांचा बहर जरी कादंबऱ्यांमधून अधिक जाणवत असला तरी त्यांची प्रतिभेच्या क्षेत्रातली मुलुखगिरी कथा लेखनानेच झाली. यापूर्वी त्यांचे दोन तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. पण त्यांतील कथांचे सामाजिक, ग्रामीण, निसर्ग, संगीत कथा असे वर्गीकरण करून त्यांचे संग्रह प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते. आता मेहता पब्लिकेशनने हे वर्गीकरण करुन त्यांचे तीन कथा संग्रह प्रसिद्ध केले आहेत. या त्यांच्या कथा विश्वातील ‘बाबुलमोरा’ हा काहीसा भुतकाळातील ऐतिहासिक (खरे तर वाङ्मयीनदृष्ट्या ही वर्गवारी चूकच आहे) व संगीताच्या प्रांतातील कथांचा ‘‘बाबुलमोरा’’हा संग्रह या देसार्इंच्या वाङ्मयांच्या पैलूचे दर्शन घडवून जातो. या संग्रहातील सर्वच कथांना एकप्रकारचा खानदानी भरजरी व मखमली असा भावनात्मक स्पर्श आहे. मराठी कथांच्या क्षेत्रात अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ यांनी सुरुवातीला अनेक नवनवीन प्रयोग करुन एका अर्थाने नवे मन्वन्तर घडवून आणले. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वच नूतन लेखकांनी ‘कथा’ प्रधानतेशी नाते विलग करीत करीत नव्या वाटा यशस्वीपणे चोखाळल्या आहेत. परंतु रणजित देसार्इंच्या या संग्रहातील कथा या जुन्या घटना प्रधान वाटेनेच जातात. त्यांत काही कथा या इतिहासातील घटनांशी संबंधित असल्यामुळे त्यातून उमलणारे व्यक्तिमत्त्व, भावना या अधिक पवाढगाणाऱ्या आहेत. ‘वेडात दौडले सात’ या अशा सोळा कथांमधील पाच कथांपैकी प्रातिनिधीक कथा. मराठ्यांचे एक सेनापती प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमांची गाथा या कथेत शब्दबद्ध केली आहे. या पाचही कथांमध्ये रेखाटलेल्या व्यक्तिरेखा त्यांच्या नावाने आपणास ज्ञात असल्या तरी त्यांच्या जीवनातील स्वभाव वैशिष्ट्यांचा लेखकाने घेतलेला आढावा चमत्कृतीजन्य असला तरी त्यातली पूर्वग्रहीत गौरव पूजाही आपणाला काहीवेळा पारंपारिक वाटते. शब्दांच्या साह्याने रेखाटलेली व्यक्ती चित्रेही वाचनीय झाली असली तरी अंत:करणाला भिडत नाहीत. त्यातली कलाकुसर देखणी वाटते इतकेच. कथा संग्रहाच्या सुरुवातीची नादतरंगा ही कथाही कलावंत आणि राजकन्या यांच्या भावविश्वाचे चित्रण करणारी असली तरी खूप पौराणिक धाटणीची आहे, परंतु ‘अवशेष’मधील संस्थांनिकांच्या व्यथा वास्तव असल्या तरीसुद्धा खानदानी परंपरेचे होत असलेले दर्शन व्यक्तभूत आणि इतिहासाला अधिक जवळकीचे वाटते. या सात कथानंतर संगीताची मैफील सुरू होते. अज्ञात गवय्यांच्या जीवनासंबंधीच्या या कहाण्या आहेत. सैगलच्या आवाजातील ‘बाबुलमोरा’मधील मखमली, अलवार स्पर्श या बहुतेक सर्वच कथांचा आहे. याचा अर्थ असाही आहे की संगीताशी, संगीत साधनेशी नात सांगणाऱ्या कथा वास्तवाशी नाते सांगणाऱ्या आहेत. संगीताचीच नव्हे तर सर्वच कलांचे जे जे आविष्कार आहेत मग ती चित्रकला असो, शिल्पकला असो, वादन नैपुण्य असो वा अन्य चौसष्ट कलांचे क्षेत्र असो, तेथे तेथे भारतीय संस्कृतीतील राष्ट्रीय एकात्मतेचे मनमोकळे दर्शन घडते. महंमद रफी, तलत यांची जात कुणी विचारीत नाही. पंडीत पलुस्करांच्या आत्मपात कुणी जातीयतेचा सूर न धुंडाळता मनसोक्त दाद सारेच देतात. गावस्करचा शैलीदार चौकार, फटकेबाजी पाहून सारे प्रेक्षक पेंडॉल दणाणून सोडतात तर अझरुद्दीनचा स्वीपचा फटका बघताच सगळा पेंडॉल हर्षभराने, उत्साहाने भारुन जातो. कारण तो ‘स्विप’ भारतीय असतो. आज कलांचे हे एकच राज्य असे आहे की ते भारतीय आहे एकात्म आहे. रणजित देसार्इंच्या संगीताच्या प्रांतातील हळुवार भावनांचे दर्शन घडत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जाणिव किती ‘गहरी’ आहे याची सुप्त जाणीव होत राहते आणि वाटते ‘मिले सूर हमारा’ फक्त तो सूर अंत:करणाच्या गाभाऱ्यांतून बाहेर पडलेला हुंकार असला पाहिजे. रणजित देसार्इंच्या या कथा वाचताना या कलाक्षेत्रातील जीवनांचे हळुवार, मखमली समर्थ दर्शन तर घडतेच पण सैगलच्या सुरांचा ‘बाबुलमोरा’ ‘नैहर छुटोरे जाय’मधली व्याकुळताही मधुरपंखी स्पर्शाने मनमोहक वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more