ANANT P. LABHSHETWAR

About Author

Birth Date : 01/01/1939


NA

सुवर्णपदांकित डॉ. लाभसेटवार शिष्यवृत्ती मिळवून पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. जननशास्त्र आचार्याची पदवी संपादन केल्यावर त्यांनी या क्षेत्रात मूलभूत संशोधन केलं व १०० हून अधिक पेपर सन्मानित आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले. कलकत्ता विद्यापीठाच्या आचार्याच्या पदवीसाठी ते बाह्य परीक्षक होते. आचार्य पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी (POSTDOCTORAL FELLOWSHIP) त्यांनी मार्गदर्शन देखील केलं. त्यानंतर त्यांनी संशोधन क्षेत्राचा सन्यास घेऊन औद्योगिक जगात प्रवेश केला व १००० एकर शेती, ४ व्यापारसंकुलं, आकाशवाणी केंद्र व बँक विकत घेतली. अमेरिकेत स्वत:ची बँक विकत घेणारे ते पहिले भारतीय समजले जातात. याबाबतीत त्यांना पत्नीची (सौ. लता) खूपच मदत झाली. त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर अमेरिकेत स्त्रीरोगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं व आपला स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय स्थापन केला. २००० मध्ये या दांपत्यानं स्वत:चे १ कोटी रुपये घालून डॉ. अनंत व लता लाभसेटवार धर्मादाय प्रन्यास नागपूरला स्थापन केला. ही संस्था दरवर्षी मराठी ललित साहित्य व संतती नियमन या क्षेत्रात पारितोषिकं प्रदान करते. आपल्या देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर सुरू केलेलं हे पहिलं पारितोषिक म्हणून ओळखल्या जात. याशिवाय त्यांच्या प्रन्यासानं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात वि. स. खांडेकर जयंती व्याख्यानमाला पुरस्कृत केली. अशाच व्याख्यानमाला लवकरच मुंबई व पुणे विद्यापीठातही सुरू होत आहे. डॉ. लाभसेटवारांना मराठी साहित्यात विद्यार्थीदशेपासूनच रस आहे. आचार्यांच्या पदवीचा अभ्यास करतांना त्यांनी आजची अमेरिका नावाची लेखमाला अमृत मासिकात ३ वर्ष चालवली. प्रथमच अमेरिकन जीवनाचं चित्रण मराठी वाचकांसमोर मांडण्यात आलं– ते अतिशय लोकप्रिय ठरलं कारण मासिकाचा खप एकदम वाढला. त्यांनी अमेरिकेतील वाटचाल नावाची दुसरी लेखमाला त्याच मासिकात मार्च २००४ पासून सुरू केली. त्यांचं अमेरिकेतील धावपळ हे परचुरे प्रकाशित आत्मचरित्रातही लोकप्रिय ठरलं. आतापावेतो त्याच्या दोन आवृत्त्या निघून त्याच हिंदी रूपांतर प्रकाशनाच्या मार्गावर आहे. याशिवाय त्यांच्या ४ कादंब-या व एक लघुकथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांचे लेख सकाळ (सोलापूर) व तरुण भारत (कोल्हापूर) मध्ये नियमितपणे प्रकाशित होत असतात. मूळचा औद्योगिक पिंड असल्यामुळे त्यांच्या लिखाणाला निराळं परिमाण लाभलं आहे. अमेरिकेत दीर्घकाळ वास्तव्याला असल्यामुळे त्यांनी तिथल्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या लिखाणातून मराठी वाचकाला अमेरिकन जीवनाचं दर्शन घडतं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more