* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"AFTER THE DEMISE OF SHIV CHHATRAPATI, AURANGZEB DECIDED TO END THE MARATHA REGIME FOR ONCE AND ALL. WITH A HUGE ARMY HE ATTACKED THE MARATHAS. THIS LED TO THE FAMOUS ‘FREEDOM FIGHT OF MARATHAS’. UNDER THE ABLE LEADERSHIP OF CHHATRAPATI SAMBHAJI, CHHATRAPATI RAJARAM AND QUEEN TARABAI, THE MARATHAS FOUGHT FOR 26 LONG YEARS. IN THE END, THE ONCE GREAT MUGHAL EMPEROR WAS DEFEATED. HE HAD TO BE BURROWED IN THE SOIL OF MAHARASHTRA. DR. JAISING PAWAR, THE GREAT HISTORIAN, HAS TAKEN A REVIEW OF SOME EVENTS THAT TOOK PLACE DURING THIS FREEDOM FIGHT. A FEW TO NAME ARE: • CAPTURING CAPITAL RAIGAD- SURYAJI PISAL’S ROLE IN IT • CHHATRAPATI RAJARAM’S DANGEROUS JOURNEY TO JINJI • MARATHA’S VITALITY 1681 A.D. • MARATHA’S AMBITION TO WIN DELHI • THE TRAGEDY OF SENAPATI SANTAJI GHORPADE • THE SO-CALLED CROWN CEREMONY OF KING KARNA; CHHATRAPATI RAJARAM’S SON FROM A MAID • EVALUATION OF SWATANTRYA SAUDAMINI QUEEN TARABAI’S WORK • MARATHA’S FREEDOM FIGHT- A WIDE SEARCH AND UNDERSTANDING "
"शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा आपल्याअफाट लष्करी शक्तिनिशी मराठ्यांची सत्ता समूळ नष्टकरण्याच्या महत्त्वाकांक्षेने दक्षिणेत धावून आला आणि त्यातून इतिहासप्रसिद्ध ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ सुरू झाले. छ. संभाजी, छ. राजाराम व महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठे २६ वर्षे लढले आणि अखेर बादशहास या मराठ्यांनी पराभूत करून आपल्या दफनभूमीचा शोध याच महाराष्ट्रात घ्यावयास लावला. अशा या स्वातंत्र्ययुद्धातील काही घटनांचा ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी घेतलेला हा शोध. या ग्रंथात आपण वाचाल... राजधानी रायगडचा पाडाव - सूर्याजी पिसाळची भूमिका छ. राजारामांचा जिंजीचा जीवावरचा प्रवास इ. स. १६८१ ची मराठ्याची मसलत मराठ्याची दिली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा सेनापती संताजी घोरपडे याची शोकांतिका छ. राजारामांचा दासीपुत्र राजा कर्ण याचे तथाकथित राज्यारोहण स्वातंत्र्यसौदामिनी महाराणी ताराबार्इंच्या कार्याचे मूल्यमापन मराठ्यांचा स्वातंत्र्ययुद्धाचा शोध आणि बोध "

No Records Found
No Records Found
Keywords
# MARATHYANCHE SWATANTRA YUDHA# DR. JAYSINGRAO PAWAR# SHIVCHATRAPATI# SAMBHAJIRAJE# YESUBAI# RAJARAM# DHANAJI JADHAV# SANTAJI GHORPADE# #TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध# डॉ. जयसिंगराव पवार# शिवछत्रपती# संभाजीराजे# येसूबाई# राजाराम# धनाजी जाधव# संताजी घोरपडे# खंडो बल्लाळ# हंबीरराव मोहिते# रामचंद्रपंत# औरंगजेब# जुाल्फकारखान# अब्दुर्रहीमखान# रायगड# विशाळगड# सूर्याजी पिसाळ# जिंजी# देशमुखी# बखर# मसलत# गनिमी कावा #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarVijay Pawar

    #मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध लेखक- डॉ.जयसिंगराव पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने स्वराज्य स्थापनेचा सुवर्णकाळ अनुभवला , शुन्यातून सुरुवात करुन जगभरातील इतिहासकारांना दखल घ्यायला भाग पाडणार्या दैदिप्यमान स्वराज्याचा गाड डौलाने चालत होता पण अचानक नजर लागावी त्याप्रमाणे शिवाजी महाराज गेले आणि स्वराज्य पोरकं झालं , पण म्हणतात ना कार्यकर्तृत्वाचा वारसा हा एका पिढीतून दुसर्या पिढीत आपोआप जातो त्याप्रमाणेच थोरल्या महाराजानंतर एका वादळाच्या हाती स्वराज्याची कमान आली , एक कुटुंबप्रमुख , एक राज्यकर्ता , एक पालक म्हणून रयतेचा सांभाळ करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजांनी अलौकिक कारकिर्दीने स्वराज्याला सर्वोच्च स्थानी पोचवलं , महाराजानंतर स्वराज्य तेवढ्याच ताकदीनं सांभाळलं , वाढवलं ! पण अवघ्या काही वर्षातच महाराष्ट्राला पुन्हा ग्रहण लागलं छत्रपती संभाजीराजांचा फितुरांनी घात केला आणि औरंगजेबाने महाराजांना कैद करुन अनन्वित छळ करत मृत्युलाही लाजवेल अशा दुर्दैवी पद्धतीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा खून केला, शंभुराजांच्या वादळी कारकिर्दीत इतिहासाच्या पानापानांना अमरत्व बहाल केलं . छत्रपती संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूपासून ते औरंगजेबाच्या अंतापर्यंतच्या धगधगत्या अग्नीकुंडाची पुराव्यानिशी केलेली उकल म्हणजे डॉ.जयसिंगराव पवारांचं #मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध` हे पुस्तक ! शंभुराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात माजलेली अनागोंदी मोडीत काढत महाराणी येसूबाई बाईसाहेबांनी अमोल त्याग करत स्वराज्याचा अमृतकलश राजाराम महाराजांच्या हाती सोपवला , त्यावेळी झालेली `मराठ्यांची मसलत` लेखकाने पुराव्यानिशी मांडली आहे. सुर्याजी पिसाळाची अतुलनीय अशी गद्दारी रायगडाने अनुभवली , लेखकाने हा प्रसंग जिताजागता उभा केला आहे. सुर्याजी पिसाळाची पुराव्यानिशी चिकीत्सा यापूर्वी निश्चीतच कधी झाली नसेल . राजाराम महाराजांचा जिंजी प्रवास , रायगडाने दिलेली लढत , महाराणी येसुबाई साहेबांची निर्णयक्षमता , स्वराज्यापुढे वैयक्तिक भावभावनेला दिलेली मूठमाती , बाळ शाहूराजांसह औरंगजेबाच्या कैदेतील काळ , जिवंत उभा केला आहे लेखकाने. अरजोजी गिरजोजी यादवांचा खटला , नागोजी मानेंचा स्वार्थीपणा , धनाजी संताजीच्या सुवर्णीय कारकिर्दीची वाटचाल , राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील पडद्याआड राहिलेल्या अमूल्य घटना ,राजकारण सारं काही डोळ्यासमोर घडतंय याचीच अनुभूती लेखकाच्या प्रत्येक वाक्यातून होते. संताजी धनाजींचा वाद , त्यातून स्वार्थी लोकांनी साधलेली वेळ, संताजी आणि राजाराम महाराज यांच्यात आलेले वितुष्ट त्यातूनच राजाराम महाराजाविरुद्ध संताजीने लढलेले युद्ध त्यातील महाराजांचा झालेला पराभव आणि त्यानंतर संताजीची झालेली मनस्थिती तसेच संताजी घोरपड्यांचा दुर्दैवी खून यावर लेखकाने केलेला उहापोह मनाला चटका लावून जातो. जिंजीला सात वर्षे दिलेला झुल्फिकारखानाचा वेढा त्यातून सुटून राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात केलेला प्रवास आणि सिंहगडावर झालेल्या राजाराम महाराजांच्या अकस्मात मृत्यूनंतर राजा कर्णाच्या कहानीचा केलेला उहापोह वाचकांना नवी दृष्टी देतो. राजारामपुत्र द्वितीय शिवाजीराजे यांना गादीवर बसवून महाराणी ताराबाईसाहेबांचं राजकारण, धगधगती कर्तृत्व शैली , याचकाळात उफाळून आलेल्या तोतया शाहूराजांचा बिमोड , थोरल्या शाहूराजांची सुटका, त्यानंतर झालेली मराठा गादींची शकलं , या घटना पुराव्यानिशी लेखकाने मांडून त्यावेळची महाराष्ट्राची परिस्थिती जिवंत करून दाखवली. भद्रकाली ताराराणींच्या कारकीर्दीत स्वराज्याला मिळालेली नवसंजीवनी प्रत्येक मावळ्याच्या ह्रदयात मशाल पेटवून गेली आणि उभ्या महाराष्ट्राच्या तीन पिढ्यांना नडणार्या औरंग्याला इथंच कबर खोदावी लागली. शिवरायांनी स्थापन केलेल्या आणि वाढवलेल्या स्वराज्याला राजारामकाळात नर्मदेच्या पार पोचवण्यात आणि ताराराणी काळात तापीपार पोचवण्यात मराठा मावळ्यांना यश आले होते. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध केवळ साम्राज्य वृद्धीसाठी नव्हते तर दीर्घकाळ चाललेली ती एक अस्मितेची लढाई होती. शिवशाही किंवा मराठ्यांचा इतिहास केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीएवढाच नाही तर त्यानंतरच्या इतिहासाची पुराव्यानिशी सांगोपांग चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून होते आणि इतिहास वाचकांना पुढच्या घडामोडींची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून होते. ...Read more

  • Rating StarRahul Kanakdande

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य घशात घालायला आलेल्या औरंगझेबाला 25 वर्ष लढून मराठ्यांनी महाराष्ट्रातच गाडले, आधी राजाराम महाराज,मग त्यांच्या पत्नी ताराराणी यांच्या नेतृत्वात संताजी घोरपडे, धनाजी जाधव , रामचंद्रपंत अमात्य आणि बाक सर्व सरदार कसे लढले त्या काळातील उपलब्ध पत्रांच्या आधारे डॉ जयसिंगराव पवार यांचे `मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध` हे पुस्तक नक्की वाचा ...Read more

  • Rating StarPrashant Patil

    मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध - डॉ जयसिंगराव पवार शिवछत्रपतींच्या निधनानंतर आलमगीर बादशहा आपल्या अवाढव्य सेना सामर्थ्यानिशी हिंदवी स्वराज्य कायमचे उखडून टाकण्यासाठी दख्खनेत उतरला. या प्रचंड अशा मोगली वावटळी मध्ये कुतुबशाही आणि आदिलशाही पालापाचोळ सारख्या उडाल्या. पण मराठ्यांनी मात्र शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रयत्नांची शर्थ केली. छत्रपती शंभुराजे, छत्रपती राजाराम व ताराबाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तब्बल पंचवीस वर्ष लढा देऊन मोगल साम्राज्य खिळखिळे केले. औरंगजेबाला चिरविश्रांती घेण्यासाठी इथल्याच मातीत जागा शोधावी लागली. छत्रपती शिवरायांची स्वराज्य स्थापना व शंभूराजांचे बलिदान या तेजस्वी इतिहास समोर मराठ्यांचा हा लढा तसा झाकोळून जातो. प्रस्तुत पुस्तक हे याच कालखंडावर प्रकाश टाकते. पुस्तकात या लढ्याचा समग्र व सलग इतिहास मांडला नसून यातील महत्त्वाच्या घटनांवरचे स्फुट लेख आहेत. राजधानी रायगडचा पाडाव व त्यात सूर्याजी पिसाळ ची भूमिका; छत्रपती राजारामांचा जिंजी पर्यंतचा रोमहर्षक प्रवास; संताजी, धनाजी, रामचंद्रपंत व शंकराजी नारायण यांनी एकत्र येऊन केलेला सर्जाखानाचा दारुण पराभव; संताजी घोरपडे यांची शोकांतिका; मराठ्यांची दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा इत्यादी बऱ्याच विषयावरती रोचक माहिती या पुस्तकात वाचावयास मिळते. साधारण दोनशे पानांचे हे पुस्तक इतिहासप्रेमींना एका महत्त्वाच्या कालखंडाचा परिचय करून देते. ...Read more

  • Rating StarChetan Jivarak

    हे पुस्तक आज वाचून झालं खूप छान डॉ. जयसिंगराव पवार यांनी हे पुस्तक लिहल आहॆ. या पुस्तकात छत्रपती राजाराम महाराज , महाराणी ताराबाई यांनी दिलेला मोगलांशी लढा याच सविस्तर वर्णन केले आहॆ छत्रपती संभाजी महाराजचा हत्या नंतर 26 ते 27 वर्ष या भूमीत औरंगजेबला गनिमी काव्याचा युद्ध नीती ने छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांनी लढा देत राहिला. छत्रपती राजाराम महाराज यांची पहिली राणी जानकीबाई (सरसेनापती प्रतापराव गुजर याची कन्या) दुसरा राणी ताराबाई (सरसेनापती हंबीरराव मोहिते याची कन्या) तिसरी राणी राजसबाई व संभाजी महाराज राणी येसूबाई व मुलगा शाहू महाराज हे रायगड वर होते जेव्हा संभाजी महाराज कैद केली व पुढे बादशाही कैदेतच हत्या केली . दरम्यान, रायगडवर राणी येसूबाई यांनी राजाराम महाराज यांना सिंहासनारुड केले व स्वराज्यचे नवे छत्रपती घोषित केले . रायगड ला मोगलांनी वेढा दिला या वेढ्यातून राजाराम महाराज व ते त्याचा सहकार्ऱ्यानीशी गुप्तपणे बाहेर पडले त्यांचा बरोबर त्याचा पत्नी ताराबाई व राजसबाई या दोघी रायगडाबाहेर पडला . राजाराम महाराज पन्हाळा गडावरून जिजीकडे पलायन केले व पुढील 8 वर्ष स्वराज्यची राजधानी जिजी होती रायगडच्या पाडावानंतर राणी येसूबाई व मुलगा शाहू आणि राजाराम महाराज पहिली राणी जानकीबाई हे मोगलांच्या कैदी बनुन बादशाही छावणीत गेल्या . जिजीवरून महाराजांनी स्वराज्याची कामे 8ते 9 वर्ष बघितली त्यानंतर राजाराम महाराज पुन्हा स्वराज्यात आले पन्हाळा - विशाळगडास आले राजाराम महाराज स्वराज्यात आल्यावर राजधानी ही सातारा झाली साताऱ्याच्या तुलनेने विशाळगड हा फार सुरक्षित होता महाराजांनी आपला कुटुंब ला विशाळगड वर हलवले राजाराम महाराजाचा अकाली मृत्यू झाला त्यावेळेस त्याचे वय अवघे 30 वर्ष चे होते आता परत स्वराज्याची दशा ना छत्रपती ना राजा झाली होती त्यात वैधव्याचे दुःख बाजूस ठेवून ताराबाईंनी मराठ्यांच्या गादीवर आपला पुत्र शिवाजीराजे यास बसविले व लष्करी मोहिमेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली महाराणी ताराबाई ने पुढे मोगलांशी 7/8 वर्ष आपल्या नेतृत्वाखाली संघर्षं देत राहिला महाराणी ताराबाई च्या कालखंडात मराठे नर्मदा ओलांडून मावळव्यात स्वारी करून खंडण्या वसूल लागले औरंगजेब 27 वर्ष स्वराज्यात लढ्यात राहिला पण त्याला हे स्वराज काबीज करता आलं नाही कारण हे स्वराज्य कोणी राजाच नव्हत हे स्वराज्य या रयतेचा होत 27 वर्ष चा युद्धाचा कालखंडात मराठ्यांचा राज्यात अशा तीन कारकिर्दी झाला :1 संभाजी कारकीर्द 2 राजाराम कारकीर्द 3 ताराबाई कारकीर्द यांनी औरंगजेब सघे युद्ध केले पण त्याला स्वराज्य पूर्ण काबीज करू दिले नाही ताराबाई चा नेतृत्वाखाली मराठ्याने माळवा ,गुजरात,कर्नाटक इ सुभ्यावर राजरोस प्रहार चालू ठेवला दिल्लीपती औरंगजेब बादशाह शेवटी याच महाराष्ट्रचा मातीत त्याने जगाचा निरोप घेतला ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more