* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745187
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"THIS BOOK IS A COMPILATION OF MANY MEMORIES REGARDING THE GREAT MARATHI HUMORIST, P.K. ATRE. HE HAD EXTENSIVELY WRITTEN IN THE ‘NAVYUG’. THIS BOOK PRESENTS SELECTIVE WRITINGS. ALONG WITH A FEW POEMS AND SMALL INCIDENCES THERE ARE MANY NOTES INCLUDED HERE. ATRE WAS AN EDITOR OF NEWSPAPER, BUT, HIS WRITING WAS NOT LIMITED BY IT. RATHER, HE WAS A VERSATILE LITTERATEUR. THIS BOOK TRIES TO FATHOM THE VASTNESS OF VARIOUS FORMS OF HIS WRITING. ‘NAVKAVINCHI TOLDHAD’, ‘OLAVA KAVITECHA’, ‘KAVICHE PIK’, ‘MIRZA GALIB’, ‘CHORANCHE SAMMELAN’, ETC. ARE A FEW OF HIS FAMOUS WORKS. THIS BOOK TELLS US MORE ABOUT THE DRAMAS WRITTEN BY HIM. THESE INCLUDE NOTES ON ‘NAMAN NATVARA’, ‘MARATHITIL PAHILE BOOKISH NATAK’, ‘MARATHI NATYSAMMELANE VA TYANCHE ADHYAKSH’, ETC. A FEW ARTICLES BASED ON THE CINE WORLD LIKE ‘NUTANLA ADVILE’, ‘TAPORYA DOLYANCHI HASARI NATI-MALA SINHA’, ‘GA DI MANNI LACH GHETALI’, ‘SANDHECHA SINHASHI SAMNA’, DAMUANNA MALVANKAR’, ETC. ARE INCLUDED HERE. ‘KON SUNDER? STREE KI CHANDRA?’, ‘STRI MHANJE RAMY KAVY’, ‘BAYKANCHI SHUDDH MARATHI’, ETC. ARE ARTICLES WRITTEN WITH WOMEN AT THE CENTRE. ATRE WAS FAMOUS FOR HIS LECTURES. A FEW OF THE ARTICLES INCLUDED HERE ARE BASED ON ‘PU LANCHE VYAKHYAN’, ‘ASE VAKTE ASHA SABHA’, ‘VAKTRUTVACHYA GAMTI’, ETC. WHERE LECTURE IS THE MAIN CONCEPT. A FEW ARTICLES ARE WRITTEN ON FAMOUS PERSONALITIES LIKE DURGA KHOTE, NATH MADHAV, NANA JAGANNATH SHANKARSHETH, FAMOUS OLYMPIC PLAYER MILKHA SINGH AND OTHERS. AS THESE ALL ARE NEWSPAPER ARTICLES, THERE IS A LOT OF VARIETY SEEN. ‘TAPAL SANSTHECHI TEENSHE VARSH’, ‘MUMBAITALA PAHILA BARF’, ‘SAATH SALATIL BHRASHTACHAR’, ‘AMBRASAT KOKANI KAVA’ ARE A FEW TO NAME. THE POEMS INCLUDED HERE ARE ‘SHETANICHE PREMPATR’, ‘KASHAS KAY MHANU NAYE’, ‘BHUPALI VINAKARYACHI’, ‘RABAR JINKACH’, ETC. SHIRISH PAI HAD INTERVIEWED LATA MANGESHKAR UNDER THE TITLE ‘TULSHICHI MANJIRI-LATA’. IT IS INCLUDED IN THIS BOOK. THE MANGALASHTAKA BY SOPANDEV CHOUDHARI, ESPECIALLY FOR SHIRISH PAI’S MARRIAGE ARE INCLUDED HEREIN. EXTENSIVE NOTES ON ‘ATRE-PHADKE VAAD’, ‘ATRE ANI MATE’ ARE INCLUDED HERE. PROF. KRUSHNAJI PANDURANG KULKARNI HAD PREPARED A LIST OF HUNDRED MOST IMPRESSIVE MAHARASHTRIANS FOR THE 1945 DIWALI EDITION OF NAVYUG. IT IS INCLUDED HERE. THIS BOOK IS THUS BECOME A KALEIDOSCOPE WITH THE MANY FORMS OF LITERATURE BY P. K. ATRE "
"‘खुमासदार अत्रे’ हे एक प्रसन्न संकलन आहे, म्हटलं तर इतिहासातील काही नोंदी आहेत. अत्र्यांच्या ‘नवयुग’च्या वीस वर्षांतील अंकांमधून वेचलेलं हे साहित्य आहे. या साहित्यातील छोट्या छोट्या टिपणांचा या पुस्तकात समावेश केला आहे. अर्थातच ही टिपणं विविधरंगी आहेत. काही कविता, एखादी सूची इ. बाबी संपूर्णपणेही समाविष्ट केल्या आहेत. अत्रे हे केवळ वृत्तपत्राचे संपादक नव्हते, तर त्यांच्या अनेक पैलूंपैकी एक अत्यंत सामथ्र्यशाली पैलू होता साहित्याचा. ते अष्टपैलू साहित्यिक होते. या वेचलेल्या साहित्यामध्ये साहित्यविषयक अनेक टिपणं आहेत. जसे ‘नवकवींची टोळधाड,’ ‘ओलावा कवितेचा,’ ‘कवीचे पीक,’ ‘मिर्झा गालिब’, चोरांचे संमेलन’ इ. नाटककार अत्रे हा अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक प्रभावशाली पैलू. साहजिकच नाटक या विषयावरची अनेक टिपणं या पुस्तकातून वाचायला मिळतात. उदा. ‘नमन नटवरा’, ‘मराठीतील पहिले बुकीश नाटक’, ‘मराठी नाट्यसंमेलने व त्यांचे अध्यक्ष’ इ. सिनेसृष्टीविषयीची काही टिपणंही यात समाविष्ट आहेत. जसे ‘नूतनला अडविले’, ‘टपोNया डोळ्यांची हसरी नटी - मालासिन्हा’, ‘ग. दि. मांनी लाच घेतली’, ‘संध्येचा सिंहाशी सामना,’ ‘दामुअण्णा मालवणकर.’ इ. ‘कोण सुंदर? स्त्री की चंद्र?’, ‘स्त्री म्हणजे रम्य काव्य’, ‘स्त्री व विनोद’, ‘बायकांची शुद्ध मराठी’ असे स्त्रीविषयक लेख यात आहेत. अत्र्यांची व्याख्यानं हाही एक वैशिष्ट्यपूर्ण विषय. त्यामुळे व्याख्यानांबाबतचे ‘पु. लं.चे व्याख्यान,’ ‘असे वत्तेÂ, अशा सभा’, ‘वत्तृÂत्वाच्या गमती’ इ. लेख या पुस्तकात आहेत. काही व्यक्तिविषयक टिपणंही यात आहेत. जसे ‘दुर्गा खोटे’, ‘नाथमाधव’, ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’, ‘ऑलिंपिकपटू मिल्खासिंग’इ. अर्थातच ही वृत्तपत्रांतील टिपणं असल्यामुळे त्यात कमालीची विविधता आहे. ‘टपाल संस्थेची तीनशे वर्षे’, ‘मुंबईतला पहिला बर्पÂ’, ‘साठ सालातील भ्रष्टाचार’, ‘आंबरसात कोकणी कावा’ इ. अनेक प्रकारची टिपणं यात वाचायला मिळतात. ‘शेटाणीचे प्रेमपत्र’, ‘कशास काय म्हणू नये’, ‘भूपाळी विणकNयाची’, ‘रबर जिंकाच’ या कवितांचाही समावेश या पुस्तकात आहे. लता मंगेशकर यांच्या शिरीष पै यांनी घेतलेल्या मुलाखतीचं टिपण ‘तुळशीची मंजिरी लता’ या शीर्षकासह या पुस्तकात वाचायला मिळतं. तर शिरीष पै यांच्या लग्नासाठी सोपानदेव चौधरी यांनी रचलेल्या मंगलाष्टकाचाही या पुस्तकात समावेश आहे. ‘अत्रे-फडके वाद’, ‘अत्रे आणि माटे’ ही टिपणंही वाचण्यासारखी आहेत. येवढंच नाही तर प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी १९४५ सालच्या नवयुगच्या दिवाळी अंकात दीडशे वर्षातील शंभर कर्तबगार महाराष्ट्रीयन व्यक्तींची जी सूची दिली आहे, तिचाही समावेश या पुस्तकात आहे. तर हे पुस्तक म्हणजे विविधरंगी टिपणांचं, कवितांचं, लेखांचं, विडंबनांचं संकलन आहे."

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KHUMASDARATRE #KHUMASDARATRE #खुमासदारअत्रे #SHORTSTORIES #MARATHI #SHYAMBHURKE #श्यामभुर्के "
Customer Reviews
  • Rating Starलोकप्रभा ९/२/२०१८

    आचार्य अत्रे म्हणजे मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव. त्यांनी मांडलेले विषय, विचार हे आजही तितकेच ताजे आहेत. त्यांच्या शैलीची वाहवा आजहा होतेच. अत्रे यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकात अनेक वर्षं लेखन केलं होतं. त्यांच्या या लेखनाचं संकलन म्हणजे ‘खुमासदर अत्रे’ हे पुस्तक होय. प्रा. श्याम भुर्के यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकाचे अनेक अंक चाळून, वाचून केलेला मधुसंचय म्हणजे ‘खुमासदार अत्रे’ होय. हे पुस्तक वाचून वाचकांना आचार्य अत्रे यांच्या उत्साहवर्धक आणि प्रसन्नतेनं बहरलेल्या सहवासाचा आनंद मिळेल हे निश्चित! ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 21-01-2018

    अत्रे यांच्या खुमासदार टिपणाचं अनोखे संकलन... श्याम भुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य, तीन बँकांवर संचालक म्हणून काम केले. सध्या आझेलटेक प्रा. लि. पुणे आणि अमेरिका येथे संचालक आहेत. आतापर्यंत वििध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘खुमासदार’ ज्यातून त्यांनी आ. अत्रे यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकांचे अंक वाचून त्यातला खुशखुशीत भाग निवडला आणि तो पुस्तकात संग्रहित केला. या पुस्तकात अत्रे त्यांच्या लेखणीनं प्रसवलेला स्फोटक मजकूर तर आहेच, पण दत्तू बांदेकरांचे, मजेदार, विनोदी किस्से आणि वचनं आहेत. ‘नवयुग’च्या वीस वर्षांच्या आमदानीत जे जे लेखकाच्या दृष्टिकोनातून-लक्षणीय लेखन ‘नवयुग’मध्ये आले ते इथं वाचकांच्या भेटीला आले आहे. त्याची मांडणी खास श्याम भुर्केच्या शैलीतून आहे. हे पुस्तक वाचताना आ. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आणि निष्णात संपादनाचा प्रत्यय तर येतोच, पण महाराष्ट्रातील वीस वर्षांच्या महत्त्वाच्या घटनांचा एक चित्रपटच डोळ्यांसमोरून सरकत जातो. नामवंत लेखकांच्या भेटीही या पुस्तकातून घडतात. त्यांची विशेष मौज वाटते. लेखकाला उत्तम विनोददृष्टी असल्यामुळे त्यांनी जे जे संग्रहित केलं ते निश्चितच ‘खुमासदार’ आहे. पुस्तकाचे वाचन करताना त्यातील विविधतेनं मन थक्क होते आणि क्षणभरही पुस्तक खाली ठेवावेसं वाटत नाही हे या सग्रहाचे खरे यश. ‘नवयुग’ने महाराष्ट्राच्या जीवनात एकमेद्वितीय स्थान सतत वीस वर्षे मिळवलं होतं. त्यांच्या यशात अत्रे यांच्या लेखणीचा सिंहाचा वाटा होता. पण दत्तू बांदेकरांचा खुसखुशीत विनोद, श्री. बाळ ठाकरेंची व्यंगचित्रे आणि महाराष्ट्रातले अनेक नामवंत लेखक ‘नवयुग’मधून उदयाला आले. ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलना’त तर या ‘नवयुग’ जी कामगिरी केली ती अजोड आहे. महाराष्ट्राचा सारा सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास म्हणजे ‘नवयुग’. एखाद्या विस्मृत बहारदार उपवनातून मधमाशीनं हिंडून हिंडून मध गोळा करावा तसं ‘नवयुग’चे वीस वर्षांचे असंख्य अंक बारकाईनं वाचून श्याम भुर्के यांनी त्यातून जो मधुसंचय केला त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन. काही खुमासदार उदा. ‘कोण सुंदर? स्त्री की चंद्र?’ हा वाद मिटवण्यासाठी परमेश्वराने एक मोठा सोन्याचा तराजू आणला. एका पारड्यात स्त्रीला आणि दुसऱ्या पारड्यात चंद्राला घातले. अन् तराजू वर उचलला तो काय? चंद्राचे पारडं वर गेलं. तो राहिला आभाळात आणि स्त्री पृथ्वीतलावर!’ ‘ओळंबा कवितेचा’- आ. अत्रे एकदा अनंत काणेकर यांना म्हणाले, ‘तुम्हाला एक गणित सांगतो या गणिताचे उत्तर तुम्ही बरोबर दिलंत तरच नवकाव्य तुम्हाला एकदम समजेल!’ ‘हे घ्या गणित, दोन पैशांना चार पेरू, तर फडक्यांच्या हौदात पाणी किती?’ अशा रीतीने नवकाव्यातल्या अर्थहीनतेची ते टर उडवीत. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more

  • Rating Starसकाळ १९.११.२०१७

    प्र.के.अत्रे यांनी वेगवेगळ्या साहित्यप्रकारातून मांडलेल्या विनोदाचं संकलन प्रा. भुर्के यांनी केलं आहे. मंदस्मित करायला लावणाऱ्या विनोदापासून खदखदून हसायला लावणाऱ्या विनोदपर्यंत अनेक प्रकार अत्रे यांच्या लेखनातून दिसतात. भुर्के यांनी त्यातले नेमके आणिखुमासदार विनोद निवडले आहेत. कोणतही पान उघडावं आणि अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेल्या विनोदाचा आस्वाद घ्यावा असं हे पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more