* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619443
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL KNOW RANJIT DESAI AS A VERSATILE WRITER HE GOT HIS NAME AND FAME BECAUSE OF THE NOVELS, STILL HE STARTED HIS CAREER AS A WRITER WITH SHORT STORIES. DURING THE EARLY YEARS, HE MAINLY FOCUSED ON THE RURAL LIFE AND THE REALITIES THEREIN. LATER ON, HE TRIED TO WALK ON THE PATH OF HISTORY GIVING US WONDROUS STORIES WITH MAJESTIC ENVIRONMENT. HE SKETCHED PICTURES OF WELL KNOWN PERSONALITIES IN THE FIELD OF MUSIC AND ART. LATER ON, HE SWITCHED OVER TO STORIES WITH MORE STRESS ON NATURE, STARS ETC. MORPANKHI SAWALYA IS A COLLECTION OF 15 STORIES OF DIFFERENT ANIMALS, USED TO THE NATURE. THE PECULIARITY OF THESE STORIES IS THOUGH THEY ARE WRITTEN BY A HUMAN NOT EVEN A SINGLE HUMAN BEING COMES INTO OUR SIGHT THROUGHOUT AFTER GOING THROUGH THE WONDERFUL NATURE PICTURED BY RANJIT DESAI, WE WILL ONCE AGAIN REALISE HIS GREATNESS.
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. कादंबरीलेखनामुळे त्यांनी दिगंत किर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता. सुरवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुतरम्य वातावरणात नेणाऱ्या मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीतक्षेत्रात अलौकिक यश संपादन करणाऱ्या काही कलावंतांची सुखदुःखही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथाही लिहिल्या, काही रूपककथाही लिहिल्या. मोरपंखी सावल्या या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणाया प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपानं एकत्रित केलेल्या आहेत. या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं, की त्या पूर्णतः मानवविरहित आहेत. कथासूत्रात बांधलेली ही लालित्यपूर्ण निसर्गचित्र पाहून आणि अनुभवून, रणजित देसाई हा आपल्या काळातील केवढा थोर साहित्यिक आहे, याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarPrachi Kadam- Pustak Bistak

    श्रीमानयोगी,राधेय,पावनखिंड,स्वामी,लक्ष्यवेध या आणि यांसारख्या अनेक ऐतिहासिक पुस्तकांपेक्षा हे एक आगळं वेगळं निसर्गावर, त्याच्या सान्निध्यात राहणा-या प्राणी पक्ष्यांवर आधारित आणि विशेष म्हणजे मानवविरहित असं छोटसं पुस्तक. खरं तर मानवविरहित असलं तरी माणाच्या स्वभावाचं पुसटसं दर्शन घडवून जातं. वसंत आगमनाची चाहूल, पावसाच्या सरींनी तुडुंब भरून वाहणा-या वाहिनीचा आनंद, सागराच्या उन्मत्तपणाला मर्यादा आणू पाहणारी खडकाळी, उतार वयातही आपला स्वाभिमान डगमगू न देता आयुष्य संपवण्याचा निर्णय घेणारा गरूड, उन्हाने पर्णहीन आणि एकाकी झालेली सावर, खूप प्रयत्नांती खेकड्याची शिकार केलेल्या कोल्होबाचं सुख, अंधारातून प्रकाशाकडे झालेला ससोबाचा प्रवास आणि शेवट, कोंबड्याची पहाटेची बांग आणि प्राणी जगताची जंगलातील सकाळ, हुप्प्यांची,खारूताईची पळापळी, अशा मस्त कथांनी खिळवून ठेवणारं हे पुस्तक वाचायला निसर्गप्रेमींना नक्की आवडेल. ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    पशुपक्ष्यांचे अंतर्मन व्यक्त करणाऱ्या प्राणिकथा रणजित देसार्इंच्या कथालेखन प्रवासाला एक विशिष्ट वळण मिळाले ते ‘मोरपंखी सावल्या’मुळे. प्राणी जीवनावरील हा अनोखा कथासंग्रह १९८४ मध्ये वाचकांसमोर आला असून त्यात पंधरा प्राणिकथा आहेत. ‘‘या संग्रहातील कथा मझ्या आजवरच्या इतर कथांच्यापेक्षा जरा निराळ्या आहेत. मानवविरहित निसर्ग आणि त्या सावलीत वाढणाऱ्या या प्राणिकथा आहेत.’’ असे त्यांनी स्वत:च सुरुवातीला नमूद केलेले आहे. ग्रामीण समाजाला निसर्गाचे सान्निध्य सहज-सुलभ असते. निसर्गाशी जमवून घेत व प्रसंगी निसर्गाशी झुंज घेत ग्रामीण भागातील लोकांना जीवन व्यतीत करावे लागते. पशु-पक्षी-कीटक इत्यादींसह येणारा ग्रामीण जीवनातील निसर्गाचा घटक अपरिहार्यपणे स्वीकारावा लागतो. पर्यायाने याचे प्रतिबिंब मग इतर वाङ्मय प्रकारांप्रमाणेच कथेतही पडल्याचे दिसून येते. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या प्रमाणेच रणजित देसार्इंच्या कथांमधून निसर्गाची अशी रेखाटने पाहावयास मिळतात. रणजित देसार्इंच्या निसर्गकथांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथांत निसर्गाला स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचा निसर्ग जीवनाशी एकरूप झाल्यासारखा भासत नाही. कथांतील घटनांमधून निसर्ग डोकावण्याऐवजी निसर्गाच्या आधारेच घटना घडत राहते. एखाद्या पक्ष्याचा, प्राण्याचा किंवा किटकाचा उल्लेख येतो आणि ज्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडत असते, त्या निसर्गाचा आत्मस्पर्शी साक्षात्कार होऊन जातो. लघुकथा आणि लघुनिबंध यांच्यामधील सीमारेषा पुसट ठराव्यात, अशा प्रकारचे वर्णन या तीन निसर्गचित्रणामध्ये पहायला मिळते. कारण इतर कथासंग्रहांप्रमाणे कथानक, व्यक्तिचित्रण, प्रसंगवर्णन, वातावरणनिर्मिती इत्यादी घटकांद्वारे कथा फुलत न जाता ती निसर्गाच्या माध्यमातून विकसित होताना दिसते. पण प्रत्येक कथेत एखादा प्राणी आपल्या सर्व वैशिष्ट्यांसह वाचकांसमोर साकार होतो. वाघ आणि माकड यांच्यातील परस्पर संबंधांविषयीची जिज्ञासा ‘जिज्ञासा’ या कथेत आढळते. तर गरुडाचे जगणे, राजेपण, जगण्यातील आब, कालांतराने येणारे वार्धक्य, त्या जाणिवेने झोकून देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय, हे सर्व ‘निर्णय’ या कथेत सूचक शब्दात चित्रित झालेले आहे. ‘कीड’मध्ये छोट्या आणि मोठ्या गव्यांतील रोमांचकारी संघर्ष चित्रित झालेला दिसतो. माणूस जसा नेहमी सुखासाठी धडपडतो, तसेच प्राणीही नेहमी सुखाची अपेक्षा करीत असल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीनुसार एक जीव सुखासाठी दुसऱ्याच्या जिवावर अवलंबून असतो. ‘सुख’ या कथेतील कोल्हा खेकड्याची शिकार साधण्यासाठी अविश्रांत धडपडतो. नाना युक्त्या योजून आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा पाठलाग, खेकड्याचे सापडणे, निसटणे, शेवटचा रंगलेला अटीतटीचा सामना, बऱ्याच कष्टाने यशप्राप्ती झाल्याने कोल्ह्याला झालेला आनंद हे सर्व ‘सुख’मध्ये लेखक नाट्यपूर्ण रीतीने रंगवितो. वृद्धत्वाची सूचकता समर्थपणे प्रकट करणारी ‘पर्णहीन’, शिकार साधल्याच्या आनंदाची सूचना देणारी ‘अंधारातून उजेडाकडे’ किंवा हरिणांची प्रेमकहाणी असणारी ‘मृगजळ’ इत्यादी सर्व कथांतून झाडे, नदी, पाणी, ऊन, सावली, वारा, ओहोळ, झरा, वाघ, माकडे, कोल्हे, तरसे, चितळे, वाघळे, ससे, घुबडे, हरीण, मासे, कोंबड्या, गरुड, कावळे, कुत्री, चिमण्या यासारख्या निसर्गघटकांचे अस्तित्व पहायला मिळते. लेखकाच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीची आणि निसर्ग घटकांविषयीच्या चिंतनशीलतेची प्रचिती यातून येते. आटोपशीरपणा, प्रतिकात्मकता आणि सूचकता ही प्रमुख वैशिष्ट्ये यातील प्रत्येक कथेत आढळतात. लेखकाचा शिकारीचा नाद व त्याविषयीची जाण याचाही उपयोग प्रस्तुत कथालेखनासाठी झाल्याचे जाणवते. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांच्या अंतर्मनात शिरुन त्याची उकल करण्याचे लेखकाचे कौशल्य या कथासंग्रहात पणाला लागलेले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more